Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 18, 2007

Hitguj » Views and Comments » General » Cricket » Archive through April 18, 2007 « Previous Next »

Deepanjali
Friday, April 13, 2007 - 1:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीलंका किंवा NZ ने हरावायला हवे त्या Aussies ना !

Farend
Friday, April 13, 2007 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण आत्ताच्या फॉर्म वर ऑस्ट्रेलियाच लायक वाटते कप न्यायला. लंका इतर कोठे चालणार नाही, जर स्लो पिचेस नसतील तर. किंबहुना ऑसीज बरोबर जर तसे पिच आले नाही तर अवघड आहे त्यांचे.

Zakki
Friday, April 13, 2007 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयर्लंड पाच बाद ३२! फारसे आश्चर्य वाटले नाही.

पण माझ्या आठवणीत हजारे, मर्चंट इ. खेळाडू इंग्लंडला टेस्ट मॅच खेळायला गेले होते तेंव्हा फ्रेडी Trueman ने चार बाद शून्य अशी अशी अवस्था करून सोडली होती भारताची! विजय मांजरेकर (म्हणजे तुम्हाला जो मांजरेकर माहित असेल त्याचे वडिल) तेंव्हा अगदी नवीन, प्रथमच टेस्ट मधे आलेले होते. त्यांनी जरा तग धरला. मग ३२ मधे सर्व गडी बाद अशी नामुष्कीची वेळ आली होती. त्या वेळी फ्रेडी Trueman ने " Gimme the ball, I will get those !&%$*^^ out! असे अपशब्द वापरले होते, त्याचीच जास्त चर्चा झाली! क्रिकेटसारख्या सभ्य लोकांच्या खेळात अशी भाषा? उच्चवर्णीय (विशेषत: भारतातले लोक,) लगेच म्हणू लागले, हा खालच्या जातीचा दिसतोय्, याला कसे घेतले टीममधे, नि तेहि साहेबाच्या राज्यात? एकंदरीत सायबाच्या विरुद्ध बोलायची कुणाची ताकद नव्हती, (पाचच वर्षे झालेली स्वातंत्र्य मिळून, अजून सगळे लोक सायबाचे गुलामच होते!) म्हणून साधा निषेध खलिता पाठवण्याची हिंमत झाली नाही कुणाची!


पुढे एकदा विनू मंकड व पंकज रॉय यांनी सुरुवातीलाच ४२५, शून्य बाद असा पराक्रम केला होता, बहुतेक न्यू झीलंडविरुद्ध.


Zakki
Friday, April 13, 2007 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला संपला एकदाचा विश्वचषक स्पर्धेतील दुसर्‍या फेरीतील सामना.

दोन्ही संघ मिळूनसुद्धा पन्नास षटके झाली नाहीत. आयर्लंडने ३० षटकात ९१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला १२.२ षटके पुरली.


Satishmadhekar
Saturday, April 14, 2007 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्वी एकदा गावसकरला इंग्लंडच्या MCCने सन्माननीय सदस्यत्व बहाल केले होते. गावसकरला एकंदरीत इंग्लीश क्रिकेट, त्यांचे औपचारिक वागणे इ. गोष्टींची फार चीड होती. लॉर्डसला कुठल्यातरी स्टॅंडमध्ये म्हणे सूट घातलेला असल्याशिवाय प्रवेश देत नाहीत म्हणे. तिथल्या रखवालदाराने गावसकरला न ओळखता आत सोडण्यास नकार दिला होता. गावसकरच्या दृष्टीने लॉर्डसचे मैदान म्हणजे काही जगातले फार ग्रेट असे काही नाही.

या सर्व पूर्वोतिहासामुळे गावसकरने
MCCचे सदस्यत्व नाकारले. त्यामुळे बेदीलाच राग आला. त्याच्या दृष्टीने अशा थोर क्लबचे सदस्यत्व नाकारून गावसकरने सर्व भारताची छीथू केली होती.

गोर्‍या कातडीची गुलामगिरी, दुसरं काय.


Mandard
Tuesday, April 17, 2007 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Angry indian cricket fans courtsy rediff

Mandard
Tuesday, April 17, 2007 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरील पाटी रेडिफ़ वरुन घेतली आहे.

Zakki
Tuesday, April 17, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या पाटीखाली लिहायला पाहिजे होते की तुम्हाला काय आम्ही अक्षत देऊन बोलावले होते काय? नि आता तिकिटे काढलीच आहेत तर बसा नि इतर सामने बघा की मुकाट्याने. तुम्हाला केंव्हा एव्हढे क्रिकेट बघायला मिळणार आहे अमेरिकेत?

आमचा खेळ पहायचा तर पैसे खर्च करून भारतात या! कधी आलात तर, जणू काही आम्ही फार महत्वाचे लोक, आम्हाला वेळ नाही म्हणून दोन दिवसात परत जाता! जणू काही तुमच्या वाचून अमेरिकेचे काही अडतेच!

आम्ही भारतीय IT वाले आहोत म्हणून अमेरिकेचे बरे चालू आहे, नाहीतर तिथे येते का कुणाला customer support किंवा प्रोग्रॅमिंग??


Zakki
Tuesday, April 17, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण म्हणते भारत विश्वचषक स्पर्धेतून बाहेर गेला. आत्ताच बघा भारतीय लोकच दक्षिण अफ्रिकेशी खेळताहेत, पनेसर, बोपारा!

काही वर्षांनी भारतीयच लोक सगळ्या टीम्स मधे असतील. मग मज्जाच मज्जा!



Jaymaharashtra
Tuesday, April 17, 2007 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा झक्किकाका
काय उत्तर दिलेत.! अनुमोदन
उपकार करतात जणु अमेरीकेतुन क्रिकेटचे सामने बघायला येवुन.कुणी आवताण दिले होते की काय यांना?अतिशहाणे लेकाचे!निराश आम्ही समस्त भारतिय पण झालोच आहोत की. आपल्या संघाचे सुमार प्रदर्शन बघुन पण म्हणुन काय येताजाता खेळाडुंना शालजोडितला घरचा आहेर प्रत्येक वेळि द्यायलाच हवा का?आणि खेळाडुंचे मानसिक खच्चिकरण करुन लोकहो काय मिळवणार आहोत आपण?
गपगुमान समोर जे कुणि संघ खेळतायत त्यांना प्रोत्साहन द्यावे की? खिलाडुवृत्तिच नाहि त्याला काय करणार नाही का?आता त्या आयर्लंडने बांगलादेशला झोपवले त्यातच सुख मानुन घ्यावे."दुधाची तहान ताकावर भागवायची" ............................पण नाहि शिंचे! नुसती टिका करत रहाणार.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Zakki
Tuesday, April 17, 2007 - 7:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे एकंदरीत शिव्या देण्याबद्दल लोकांचे मत चांगले नाही असे दिसते. त्यातल्या त्यात पुरुषांनी दिल्या तरी चालेल असे काही लोक म्हणतात. पण मी म्हंटले कशाला लोकांची मने दुखवा? नाहीतर मी काहीतरी भक्कम शिवीने या लिखाणाची सुरुवात करणार होतो.

तर, काय म्हणतो मी, कसले भक्कम ठोकले आहे दक्षिण अफ्रिकेनी इंग्लंडला! इंग्लंडने ४८ षटकात दहा गडी गमावून जेव्हढ्या धावा केल्या, तेव्हढ्या दक्षिण अफ्रिकेने २० षटकांच्या आतच, फक्त एक गडी गमावून केल्या. अहो, १५७ धावात २३ चौकार! स्मिथचा SR १५३.४५!

काय मजा आली असेल ही मॅच बघायला!


Zakki
Tuesday, April 17, 2007 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता ठरले का फायनल फोर? ऑस्ट्रेलिया, श्री लंका, दक्षिण अफ्रिका नि .... ?

Farend
Tuesday, April 17, 2007 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठरले ना (न्यूझीलंड). उरलेल्या मॅचेस निरर्थक झाल्या आता, नाहीतर शेवटच्या मॅचेस पर्यंत चौथी टीम ठरली नसती.

बाकी लंकेच्या कालच्या डावपेचांचे (मलिंगा, वास आणि मुरली ला लपवण्याचे) खूप कौतूक होईल जर पुढच्या वेळेस ऑस्ट्रेलियाला हरवले तर, नाहीतर खूप टीका. पण २,३,४ हे क्रम कसे लागतात त्यावर असेही होऊ शकेल की लंका ऑस्ट्रेलिया मॅच सेमी फायनल लाच होईल.


Farend
Tuesday, April 17, 2007 - 8:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि ऑस्ट्रेलिया आता सलग २६ सामने हरलेलीच नाही वर्ल्ड कप मधे (१९९९ च्या कप मधे शेवटचे ७, २००३ मधे सर्व ११ आणि आता आत्तापर्यंत ८) पासून. यात १९९९ मधे एक टाय होती. आणि आता सलग चौथ्यांदा फायनल मधे व सलग तिसर्‍यांदा जिंकायचे जवळजवळ नक्की दिसते.

NZ and RSA: पूर्वी कप न जिंकलेल्या या दोन संघांना संधी आहे


Kedarjoshi
Tuesday, April 17, 2007 - 9:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपुन तो न्यूझीलंड के लिये रुट कररेला है.

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=934335#POST934335

Satishmadhekar
Wednesday, April 18, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि न्यूझीलंड दुसर्‍या क्रमांकावर असणार हे नक्की. तिसरा आणि चौथा क्रमांक अनुक्रमे श्रीलंका व दक्षिण आफ्रिकेचा आहे.

म्हणजे उपांत्य फेरी ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका-न्यूझीलंड यांच्यात होणार.

मला दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातला अंतिम सामना आवडेल. पण ते अवघड वाटते. श्रीलंकेचा संघ मला आवडत नाही आणि ऑस्ट्रेलियाचा नक्षा उतरला पाहिजे. म्हणून हे दोघे उपांत्य फेरीतच हरावे अशी माझी इच्छा आणि अपेक्षा आहे.


Farend
Wednesday, April 18, 2007 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश, उरलेल्या सामन्यांतून ३ आणि ४ क्रमांक बदलू शकतात का?

अजून एक म्हणजे हेडन सचिनचे रेकॉर्ड मोडू शकतो ६७३ धावांचे, अजून तीन सामने आहेत. आणि नक्की माहीत नाही, पण अजून साधारण २०० ने तो मागे आहे.


Satishmadhekar
Wednesday, April 18, 2007 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> सतिश, उरलेल्या सामन्यांतून ३ आणि ४ क्रमांक बदलू शकतात का?

दक्षिण आफ्रिकेचे सर्व सामने संपलेले आहेत. त्यांचे एकूण ८ गुण असून धावगती +०.३१३ आहे.

श्रीलंकेचे देखील एकूण ८ गुण असून धावगती +०.९९५ आहे. आज त्यांचा शेवटचा सामना आयर्लंडबरोबर आहे. जर आयर्लंडने त्यांना खूप मोठ्या फरकाने हरवले तर, श्रीलंकेची धावगती दक्षिण आफ्रिकेपेक्षा कमी होऊन ते तिसर्‍या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर जाऊ शकतात. श्रीलंकेला ४थ्या क्रमांकावर ढकलण्यासाठी आयर्लंडला प्रथम फलंदाजी करून श्रीलंकेला १७५ च्या फरकाने हरवावे लागेल किंवा जर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून २०० किंवा ३०० धावा केल्या तर तेवढ्या धावा १२ किंवा १५ षटकात कराव्या लागतील. पण असे होणे अशक्य वाटते.

प्रथम क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्यांचे एकूण १२ गुण व धावगती +२.०२८ आहे. न्यूझीलंड दुसर्‍या क्रमांकावर असून त्यांचे एकूण १० गुण व धावगती +१.०६८ आहे. दोघेही एकमेकांशी खेळून आपला शेवटचा सामना संपवतील. जर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला खूप मोठ्या फरकाने हरवले, तर त्यांच्या क्रमांकाची अदलाबदल होऊ शकते. पण त्यासाठी न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला ३०० धावांच्या फरकाने हरवायला लागेल किंवा प्रथम गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला २०० धावांच्या आत गुंडाळून तेवढ्या धावा १० षटकात करायला लागतील. हे सुद्धा अशक्यच वाटते.

न्यूझीलंड आणि श्रीलंकेच्या धावगतीत फारच थोडा फरक आहे. श्रीलंकेने आयर्लंडला मोठ्या फरकाने हरवले आणि जर न्यूझीलंड जर ऑस्ट्रेलियाकडून हरला तर, श्रीलंका दुसर्‍या व न्यूझीलंड तिसर्‍या क्रमांकावर जाऊ शकतात. पण त्याने काहीही फरक पडणार नाही कारण उपांत्य फेरीचा एक सामना २र्‍या व ३र्‍या क्रमांकमध्येच आहे.

म्हणजे फक्त दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकाची आपापसात (श्रीलंका आणि न्यूझीलंड) अदलाबदल होऊ शकते. पण त्याने उपांत्य फेरीचे चित्र अजिबात बदलत नाही.



Farend
Wednesday, April 18, 2007 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरी analysis. Thanks सतिश

Robeenhood
Wednesday, April 18, 2007 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता त्या आयर्लंडने बांगलादेशला झोपवले त्यातच सुख मानुन घ्यावे."दुधाची तहान ताकावर
>>>>>
खाशी, आणि जसे मूळ भारतीय वंशाच्या लोकानी दुसर्‍या देशात त्या देशासाठी केलेल्या कामाचा इकडे उदो उदो करण्याची जी पद्धत आहे त्यानुसार बांगला देश जिंकल्यास' मूळ हिन्दू वंशाच्या लोकांचा विजय झाला म्हणून उदो उदो करीत आपल्याच बडवाव्यात हे उत्तम!!

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators