Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 10, 2007

Hitguj » Views and Comments » General » Cricket » Archive through April 10, 2007 « Previous Next »

Satishmadhekar
Thursday, April 05, 2007 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल इंग्लंड-श्रीलंकेतला एक अतिशय रोमहर्षक सामना बघायला मिळाला. इंग्लंड एवढ्या परिश्रमानंतर जिंकायला पाहिजे होते. केवळ ५ वा सामना खेळणार्‍या बोपाराने आणि मुरलीधरनसमोर न भिता खेळणार्‍या निक्सनने जवळ जवळ हरलेला सामना विजयाच्या खूप जवळ आणला होता. दुर्दैव इंग्लंडचं!

श्रीलंका खरच खूपच सुदैवी आहे. श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करायला मिळाली तर ते बर्‍यापैकी धावा करतात आणि मग दुसरी फलंदाजी करणार्‍या संघाला त्यांचा फिरकी मारा खेळणे अवघड जाते. द्रविड आणि लारा पाठोपाठ काल वॉनने नाणेफेक जिंकून सुद्धा श्रीलंकेला प्रथम फलंदाजीला बोलविण्याची चूक केली. शेवटी फलंदाजी करून आतापर्यंत फक्त दक्षिण आफ्रिका श्रीलंकेविरूद्ध कसेबसे जिंकू शकला आहे.

श्रीलंकेची जिद्द मात्र वाखाणण्यासारखी आहे. त्यांचे सर्व गोलंदाज सतत नवनवीन प्रयोग करत असतात. मुरलीधरन हा समोरचा फलंदाज कसा आहे ते बघून यष्टींच्या दोन्ही बाजूने गोलंदाजी करतो. फर्नांडो आणि मलिंगा (हा फेकतो अशी माझी खात्री आहे) यॉर्कर, कमी वेगाचे चेंडू, बाउन्सर, यष्टींच्या दोन्ही बाजूने गोलंदाजी असे सारखे बदल करत असतात. भारतीय गोलंदाज मात्र सर्व ५० षटके एकाच पद्धतीने टाकतात.

भारतीय खेळाडूंना श्रीलंका आणि आणि इंग्लंड च्या खेळाडूंकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.


Vinaydesai
Thursday, April 05, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या मलिंगाबद्दल आणि त्याच्या फेकंदाजीबद्दल सगळे मूग गिळून गप्प का हेच मला कळत नाही..? थोड्या दिवसानी बोलर न दिसता बेसबॉल सारखे पिचर दिसणार क्रिकेटमध्ये...

सध्याचे क्रिकेटर, समालोचक, पंच एकालाही 'तो फेकतो' हे दिसत नाही, यातच काय ते आलं..


Satishmadhekar
Thursday, April 05, 2007 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून तो ऑस्ट्रेलियाविरूद्ध फारसा खेळलेला नाही म्हणून त्याच्या फेकी गोलंदाजीकडे फारसे कोणी लक्ष दिलेले नाही. जेव्हा तो ऑस्ट्रेलियाविरूद्ध बळी मिळवायला लागेल तेव्हा अचानक जगाला तो फेकत असल्याचा साक्षात्कार होईल.

मुरलीधरन, हरभजन इ. गोलंदाज कसे ऑस्ट्रेलियाविरूद्ध यशस्वी ठरल्यावर एका रात्रीत फेकी म्हणून जाहीर झाले?

काही का असेना, मलिंगा उघड उघड फेकतो अशी माझी खात्री आहे.


Nanya
Thursday, April 05, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ेकण्याचि व्याख्या cricket च्या दृष्टिने वेगळी आहे.
हात हा खान्द्याच्या वर असेल आनि कोपरातुन हात वाकत नसेल(विशिष्ठ प्रमाणच्या बाहेर) तर ते valid असते. मलिंगा पहिल्या condition च्य अगदि जवळ येतो.. पण नियमात बसतो. त्यामुळे तो फ़ेकि bowler ठरत नाही.


Zakki
Thursday, April 05, 2007 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग हा नियम ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना माहित नाही का? त्यांना कसे जगातले सगळे चांगले गोलंदाज एकदम फेकी दिसतात? नि समजा कुणि एकहि गडी बाद न करता चांगल्या शंभर दोनशे धावा दिल्या, तर मग तो कितीही उघडपणे फेकत असला तरी चालेल का?

Jaymaharashtra
Thursday, April 05, 2007 - 10:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचा
http://o3.indiatimes.com/mytimes/archive/2007/04/05/3948839.aspx
याला म्हणतात नतद्रष्टपणाचा कळस!!!!!!!!!!!!!!!

Prafull
Friday, April 06, 2007 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Malinaga's action is unorthodox but its not chucking. In cricketing terms its an extreme example of round arm action. As his arm is not straightening and atleast one degree above shoulder at the point of delivery its a valid "overarm" bowling action. The effort required to generate a speed of 150kmph is the same for him as for Bond and others (while in chucking an average bowler can generate high speed with miniimum effort, a good eg. is faster one of Shahid Afridi or Samuels). Its very difficult to have control when a person has Malinga's action and hence not advised by coaches. Its to Malinga's credit that he has achieved so much of control to be picked as a front line bowler in international team. In long term I donot believe he's going to be an effctive bowler. Many batsmen are facing him for the first time and hence he is having high success rate. But it wont last for sure. In any case I think we should celebrate his unorthodoxy (another eg, is Muralitharan) , its fun to watch such people.

Mahaguru
Friday, April 06, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदुस्थानच्या क्रिकेटमधील पराभवावर अनेकांनी अनेक भाषेत अनेक सुरात लिहले आहेच. द्वारकानाथ संझगिरीनी नुकताच लिहलेला लेख
http://www.saamana.com/2007/April/06/Link/Main3.htm

Satishmadhekar
Friday, April 06, 2007 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> आता तुम्ही हरभजनलाही निरुपयोगी म्हणता... त्याचा ER आहे ४.१३

लक्खी,

"सामना"मध्ये द्वारकानाथ संझगिरींनी हरभजनबद्दल फारसं काही चांगलं लिहिलेलं नाही. हरभजन हा एकदिवसीय सामन्यांसाठी फारसा (गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यापैकी कशासाठीही) उपयुक्त नाही.




Asami
Friday, April 06, 2007 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

performance based evaluation seems to be keyword for ongoing analysis. However, one has to be very careful with PBE. If not handled appropriately, it can lead to individualism and more groupism.

Cricket after all is a team sport. A team can win few matches based upon individual performances but can not consistently expect one person or handful players to bear all load. All eleven have to chip in on average. hence it is imperative that PBE should be applied at team level rather than at individual level. Baseline for all criteria can be determined by taking into consideration result of last series between same countries.

Your thoughts are welcome ....


Aaspaas
Sunday, April 08, 2007 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे सचिन बद्द्ल फारच चर्चा चालू आहे. काही इतर ही मुद्दे महत्वाचे व दखल घेण्याजोगे वाटतात.
काही चांगले निर्णय घेतले आहेत असे वाटते. या सगळ्या प्रक्रियेत पवार दिसून येत आहेत. ते कसेही असोत पण जे आजपर्यंत कोणी करायचा प्रयत्न केला नाही त्यातील काही पावले तरी त्यांनी टाकली.
ज्या लोकांना या खेळाची चांगली माहिती आहे त्यांची प्रक्रियेतील सहभाग वाढवला
कुंबळेसारख्या लढवय्या, प्रामाणिक खेळाडू कसोटी वगळता दिसणार नाही.
द्रविडने पराभवाची जबाबदारी कर्णधार म्हणून घेतली व काही चांगल्या सूचनाही केल्या. हे माझ्या माहितीनुसार दुर्मिळच, आणखी उदा. असल्यास लिहावे (भारतीय)
कर्णधार म्हणून त्याची कामगिरी सर्व क्षेत्रात चांगली आहे
चपेल स्वगृही परत, त्यांनी चांगले काम केले. पण त्यांच्यी व्यावसायिकता भारतीयांना रुचणारी किंवा स्विकारता येणारी नव्हती. आपण भावनेनी खेळ खेळतो. मुळात कांगारुंसारखी व्यावसायिकता किंवा फिटनेस, आपले वातावरण आणि भारतीय शरीर क्षमता पाहता आणणे अवघड आहे.
याचा अर्थ आपण उत्तम खेळ करु शकत नाही असे नाही.


Satishmadhekar
Monday, April 09, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> काही चांगले निर्णय घेतले आहेत असे वाटते. या सगळ्या प्रक्रियेत पवार दिसून येत आहेत. ते कसेही असोत पण जे आजपर्यंत कोणी करायचा प्रयत्न केला नाही त्यातील काही पावले तरी त्यांनी टाकली.

क्रिकेटमध्ये निर्णय घेण्याच्या जागेवर कधीही हातात बॅट न धरलेली माणसे बसविली की कसा विचका होतो, याचे नुकतेच जाहीर झालेल्या नवीन नेमणूका हे उत्तम उदाहरण आहे.

क्रिकेटपटुंच्या जाहिराती आणि त्यांची मैदानावरची कामगिरी याचा काय संबध आहे? खेळाडूंनी फक्त तीनच जाहिराती कराव्या हे सांगणारे नियामक मंडळ कोण? क्रिकेटपटुंनी आपल्या खाजगी आयुष्यात कसे पैसे कमवावे हे पवार का ठरविणार? क्रिकेट खेळाडूंच्या जाहिरातींचा जर त्यांचा कामगिरीवर परिणाम होत असेल, तर पवारांच्या क्रिकेटमधील लुडबुडीचा त्यांच्या कृषीमंत्रालयाच्या कामावर परिणाम होत नाही का?

आता म्हणे रवि शास्त्री भारताचा प्रशिक्षक! निवृत्त झालेले असंख्य दर्जेदार खेळाडू भारतात असताना, क्रिकेट नियामक मंडळाला नेमका शास्त्रीसारखा या पदाला सर्वस्वी अयोग्य असा खेळाडू मिळावा, हे भारतीय संघाचे दुर्दैव. रवि शास्त्री हा एक अतिशय स्वार्थी आणि स्वत:पुरतं खेळणारा सामान्य दर्जाचा खेळाडू. त्याचा भारतीय संघात प्रवेश १९८१ साली झाला. सुरवातीचे २-३ वर्षे तो बरा खेळायचा. १९८५ मधल्या बेन्सन-हेजेस चषकामध्ये त्याला नशिबाने 'चॅंपियन ऑफ चॅंपियन्स' असा मान मिळाला. खरं पाहता त्या मालिकेत त्याने काही विशेष असे केलेच नव्हते. भारताने खेळलेल्या ५ पैकी ४ सामन्यात प्रतिपक्षाचा डाव ३ वेळा पावणेदोनशेच्या आसपास आणि एकदा २०६ मध्ये गुंडाळून फलंदाजांचे काम अतिशय सोपे करून टाकले होते. मदनलाल, कपिलदेव, बिन्नी इ. गोलांदाजंच्या प्रभावी गोलंदाजीने, प्रत्येक सामन्यात भारताने प्रतिपक्षाचा डाव लवकर गुंडाळण्यात यश मिळविले. नंतर भारत फलंदाजी करताना, शास्त्री आघाडीला येऊन टुकुटुकु खेळून ५०-५५ धावा करायचा. त्याने ५ सामन्यात एकूण ३ अर्धशतके केली. प्रत्येक अर्धशतकाला त्याने १०० पेक्षा जास्त चेंडू घेतले. त्याच्या कूर्मगती फलंदाजीमुळे न्यूझीलंडच्या २०६ धावसंख्येविरुद्ध एकवेळ भारताची धावसंख्या २१ षटकात २ बाद ४५ अशी होती. नंतर वेंगसरकर आणि कपिलदेवने वेगवान अर्धशतक झळकावून भारताला विजयी केले होते.

१९८५ नंतर तर त्याची कूर्मगती अतिशय वाढली. तो एकदिवसीय सामन्यात ६०-७० चेंडू खेळून १०-१५ धावा करायचा. त्याच्या संथ फलंदाजीमुळे भारताला अनेक सामने गमवावे लागले. त्याची गोलंदाजीही सामान्य होती तर क्षेत्ररक्षण खराब होते. उंचावरून आलेले झेल तो हमखास सोडायचा. १९९२ च्या विश्वचषकात त्याच्या संथ खेळामुळे (६७ चेंडूत २५ धावा) भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना केवळ १ धावेने गमवावा लागला. त्यावेळी त्याच्याविरूद्ध संपूर्ण भारतात जोरदार निदर्शने झाली होती.

असा खेळाडू भारतीय संघाला काय प्रशिक्षण देणार?

क्रिकेटमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी क्रिकेटशी संबधित व्यक्ती नियामक मंडळावर असणे आवश्यक आहे.


Gobu
Monday, April 09, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतीश,
खरय,
अगदी खरय!!!
पण,
पवारानी मराठी माणसाला पुढे केले आहे हे विसरु नकोस
आणि शास्त्री याला मेनेजर केले आहे, कोच नाही (माझ्या माहीतीप्रमाणे- चु.भु.द्या.घ्या.)


Satishmadhekar
Monday, April 09, 2007 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> पवारानी मराठी माणसाला पुढे केले आहे हे विसरु नकोस
आणि शास्त्री याला मेनेजर केले आहे, कोच नाही

पवारांना इतके सगळे चांगले जुने मराठी खेळाडू सोडून हा शास्त्र्याच कसा काय सापडला? माझ्या माहितीप्रमाणे तो प्रशिक्षक-कम-व्यवस्थापक आहे. त्याला निवडण्यामुळे पवारांचे क्रिकेटविषयीचे अगाध अज्ञानच दृगोच्चर होते. त्यांनी आपल्याला ओ की ठो कळत नसलेल्या या क्षेत्रातून बाजूला होऊन शेतीमंत्रालयात संपूर्ण लक्ष घालावे हे उत्तम! :-)


Mandard
Monday, April 09, 2007 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शास्त्री ची नेमणुक तात्पुरती आहे. सुनील, कपिल ने अन्ग काढुन घेतले आणि शास्त्री ने चान्स मारला. आता तो लागेल सचिनच्या मागे. बाकी आता सचिन वगैरे झी च्या अकादमीत जातील.

Kedarjoshi
Monday, April 09, 2007 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पवारानी मराठी माणसाला पुढे केले आहे हे विसरु नकोस>>>>
गोबु अरे क्रिकेट महत्वाचे की त्या फालतु शास्त्र्या सारखा मराठी माणुस.

शास्त्रा सच्याच्या गेम करनार पण ईतके सोपे नाहीये ते. त्याला घेऊन चुक केली. अगदी शिवराम कृष्णन चालला असता. शास्त्रीलाच करायचे तर मी काय वाईट होतो. मी पण मराठी आहे. ~ड, शिवाय एक वेगवान गोलंदाज आहे, तेवढेच त्या झहीर ला शॉट पिच बॉल न टाकन्याचे प्रशिक्षन दिले असते.


Farend
Monday, April 09, 2007 - 10:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवा चालेल. निदान त्याची कॉमेंटरी बंद होईल :-)

पण सगळे तज्ञ शास्त्रीबद्दल चांगले बोलतायत. काहीतरी त्यामागे असले पाहिजे. आणि मुळात तो फलंदाज म्हणून कसा होता यावरून तो मॅनेजर कसा असेल याचा अंदाज लावता येणार नाही. नाहीतर गावस्कर, बॉयकॉट वगैरेंनी धीरगंभीर समालोचन केले असते :-) दोघांचा वास्तवातील मिश्कीलपणा त्यांच्या खेळात चुकून ही दिसला नाही (गावस्कर ची एक दोन सामन्यातील गोलंदाजी वगळता).

त्याने मुम्बई च्या संघासाठी असा काही रोल केलेला आहे का? लक्षात नाही. पण त्याच्या कप्तानपदाची तारीफ़ मी ऐकलेली आहे.


Gobu
Tuesday, April 10, 2007 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतीश,
पवारानी शेतीत लक्ष घालावे,
हे अगदी अगदी खर
(विदर्भातल्या शेतकर्‍यान्च्या आत्महत्या आणि कृषीमन्त्री क्रिकेटचा जप करत आहेत, किती अजब!!!)


Asami
Tuesday, April 10, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शास्त्रा सच्याच्या गेम करनार पण ईतके सोपे नाहीये ते. त्याला घेऊन चुक केली.
>>
?????? हे कसे कळले ?

खेळाडू म्हणुन शास्त्री फ़डतूस होता etc हे म्हणने किती सोपे आहे. He started as no 11 batsman and worked up to opening slot. He is well known for his strategic thinking and so called खतरुडपणा. He was cricketer with limited capabilities but I doubt if anyone can contend the claim that he had exploited them to full extent. Won't you like if he manages to do same with Indian cricket team ? How about giving him fair chance ?


Kedarjoshi
Tuesday, April 10, 2007 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शास्त्रा सच्याच्या गेम करनार पण ईतके सोपे नाहीये ते. त्याला घेऊन चुक केली.
>>
?????? हे कसे कळले


कळले नाही. वाटले. ते ही त्याच्या वक्तव्या वरुन.

वर्तमान्पत्रात आपन हारल्यावर शास्त्री ने सचिन कसा जायला पाहीजे हे सांगीतले आहे. (काही दिवसांपुर्वी च्या पोस्ट मध्ये मी हे लिहीले आहे).

शास्त्री किती ग्रेट आहे हे त्याचे stat prove करतच आहे. वर माढेकरांनी काही आकडेवारी दिली आहे. शिवाय आपण लहान्पणी त्याला खेळताना बघीतले आहे तो कसा खेळत होता ते. त्याचा एका व्क्तव्यावर कपील देव ने मस्त प्रती वक्तव्य केले. शास्त्री म्हणाला कोटा सिस्टीम खराब आहे. व आज पर्यंत जे काही चालु होते ते खराब होते. (मलाही कोटा वाईटच वाटतो). कपील म्हनाला की सचिन, सोरभ, मी, गावस्कर, श्रिनाथ, अझर असे खेळाडु याच कोटा सिस्टीम मधुन तयार झाले आहेत. आम्हाला आधी कोणीही ओळखत न्हवते. मग आजच शास्त्री व कंपनीला कोटा सिस्टीम बद्दल राग का यावा?

तु म्हणतोयस तसा शास्त्री ग्रेट असेलही. (निदान Stat तरी तसे सिद्ध करत नाही. he was a avg. player )

yes he should have fair chance पण सचीन जावा असे त्याने म्हणने फेअर आहे काय. ( तो स्व्त नंतर कसा खेळत होता हे सर्वांना माहीती आहे). पण अमोल म्हणतो तसा
तो फलंदाज म्हणून कसा होता यावरून तो मॅनेजर कसा असेल याचा अंदाज लावता येणार नाही. I buy that.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators