|
Imtushar
| |
| Monday, March 26, 2007 - 11:38 am: |
| 
|
शरद पवार काय किंवा राजीव शुक्ला काय... ही लोकं फ़क्त BCCI चे पदाधिकारी आहेत... भारतीय cricket ची धोरणे ठरविण्याइतपत त्यांचा खेळाशी संबंध.... संघनिवडीसाठी निवडसमिती असतेच की... आणि हो... आपण हरलो ते सचिन, राहुल सारख्या खेळाडूंनी खराब खेळ केल्यानेच. शरद पवारांच्या नावाने खडे फोडणे म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी... - तुषार
|
गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट खेळाडू आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पैश्याच्या इतके मागे लागले आहेत की भारतात एप्रिल-मेच्या कडक उन्हाळ्यात आणि ऑगस्टमध्ये मान्सून जोरात असताना सुद्धा सामने आयोजित केले जातात. ऑगस्ट २००६ मध्ये आयोजित केलेल्या श्रीलंकेतील मालिकेत मुसळधार पावसामुळे एकही सामना होऊ शकला नाही. लागोपाठच्या सामन्यांमुळे बहुतेक खेळाडू रणजी आणी दुलीप चषकांच्या सामन्यांमध्ये खेळतच नाहीत. टेनिस खेळाडूंना जसे दरवर्षी ठराविक स्पर्धेत भाग घेणे सक्तीचे आहे, त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेट खेळाडूंना ठराविक रणजी आणि दुलीप चषकाचे सामने खेळणे सक्तीचे करावे.
|
शरद पवार काय किंवा राजीव शुक्ला काय... ही लोकं फ़क्त BCCI चे पदाधिकारी आहेत... भारतीय cricket ची धोरणे ठरविण्याइतपत त्यांचा खेळाशी संबंध.... संघनिवडीसाठी निवडसमिती असतेच की... तुषार, भारतीय क्रिकेटचे धोरण जुने खेळाडू योग्य तर्हेने ठरवू शकतील की प्रत्येक क्षेत्र कमाईची संधी समजणारे आणि क्रिकेटमधले ओ की ठो सुद्धा न समजणारे पुढारी? आणि जर संघ निवडीसाठी निवडसमिती आहे तर मग पवारांनी "आता आम्ही संघात महत्वपूर्ण बदल करू" असे वक्तव्य का करावे? खरं सांगायचं तर, क्रिकेट नियामक मंडळ हे या पुढार्यांसाठी भरघोस कमाई करून देणारे एक क्षेत्र आहे. बाकी सर्व काही बकवास आहे. म्हणून तर कडक उन्हाळ्यात किंवा भर पावसाळ्यात ही मंडळी सामने आयोजित करतात आणि करदात्यांच्या जिवावर मंडळ चालत असताना (क्रिकेट मंडळाचे संपूर्ण उत्पन्न आणि नफा करमुक्त आहे!), प्रक्षेपणाचे हक्क मात्र परस्पर तिसर्याला विकून सर्वसामान्यांना सामने बघण्यापासून वंचित करतात.
|
Imtushar
| |
| Monday, March 26, 2007 - 12:08 pm: |
| 
|
सतीश, तुमच्या मताविषयी पूर्ण आदर व्यक्त करून हे सांगावेसे वाटते की निवडप्रक्रिया आणि सामन्यांचे आयोजन, schedule या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला नेमका problem कुठे वाटतो हे समजले नाही. पवारांच्या क्रिकेटविषयी ज्ञानाबद्दल मला माहिती नाही, परंतु, त्यांच्या खालील विधानावरून तरी त्यांचे म्हणणे मला पटते... Pawar said that although the BCCI did not interfere with the selection process, it would adopt a new approach, perhaps based on that of Cricket Australia's. "They [CA] do not go by emotions and past performances, but by current performance and there are a number of instances in Australian selection that a harsh decision has been taken on non-performers." आणि धोरण जुने खेळाडू व्यवस्थित ठरवतील याची हमी काय? आपले कप्तान एका सामन्याचे धोरण नाही ठरवू शकत, आख्ख्या क्रिकेटचे काय कप्पाळ ठरविणार? -तुषार
|
Yogy
| |
| Monday, March 26, 2007 - 3:33 pm: |
| 
|
डॉलरमिया पेक्षा पवार बरे आहेत. (दगडापेक्षा वीट मऊ)
|
Zakasrao
| |
| Tuesday, March 27, 2007 - 4:51 am: |
| 
|
मंडळी जरा विनोदाच्या BB वर जाउन मिल्याने केलेले विडंबन पाहुन या.
|
भारतीय प्रेक्षकांचा क्रिकेटपटुंवरील राग कायमस्वरूपी नाही. ही एक तात्पुरती अवस्था आहे. मे महिन्यात बांगलादेशाविरुद्ध भारताने १-२ सामने जिंकले की बघा कसे सर्वांना प्रेक्षक डोक्यावर घेतात ते!
|
Mansmi18
| |
| Tuesday, March 27, 2007 - 8:00 pm: |
| 
|
एक छान विनोद भारताच्या पराभवाला जबाब्दार कोण? इन्दिरा गान्धी (बान्ग्लादेशच्या निर्मितिसाठि) श्री हनुमान (लन्का पुर्ण न जाळल्यासाठि)
|
Deshi
| |
| Tuesday, March 27, 2007 - 8:16 pm: |
| 
|
माझ्या मते ब्रिटीश ज्यांनी आपल्याला हा खेळ शिकविला व आपण जे नेहमी निगेटिव्ह खेळतो.
|
आता उरलेल्या ८ संघातून कोण उपांत्य फेरीत येईल? बांगलादेश आणि आयर्लंड सर्व सामने हरतील असा अंदाज आहे (आपापसातला सोडून). ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडे सुरवातीपासून २ गुण आहेत. ऑस्ट्रेलिया सर्व ६ सामने जिंकून एकूण १४ गुण मिळवतील आणि प्रथम क्रमांकावर राहतील. दुसर्या क्रमांकावर बहुतेक न्यूझीलंड १२ गुण मिळवून असेल (ऑस्ट्रेलिया त्यांच्याविरुद्ध बहुतेक जिंकेल). उरलेल्या चौघांपैकी दक्षिण आफ्रिका नक्कीच उपांत्य फेरीत येणार. इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंके मध्ये ४थ्या क्रमांकासाठी चुरस असेल. वेस्ट इंडिजला घरच्या मैदानावर खेळत असल्याने आणि त्यांना मागच्या फेरीतले २ गुण असल्याने, वेस्ट इंडिज हा ४था संघ असण्याची जास्त शक्यता आहे.
|
Gobu
| |
| Thursday, March 29, 2007 - 6:25 pm: |
| 
|
मनस्मि १८, फ़ारच सुरेख विनोद ह हा विनोद मी मायबोलीवरील "विनोद" या सदरात टाकलादेखील! (विनोदाचे पुर्ण श्रेय तुला देवुन) सतीश, म्हणजे सेमीफ़ायनलला आस्ट्रे, नुज़ी,विन्डीज आणि द. अफ़्रिका असणार तर...
|
Farend
| |
| Thursday, March 29, 2007 - 7:07 pm: |
| 
|
नक्कीच तसे वाटते, म्हणजे ICC Champions Trophy ला मागच्या वर्षी जसे झाले तसेच. एकही आशियातील टीम सेमी मधे नाही.
|
हर्ष भोगलेंचा एक चांगला लेख http://cricket.expressindia.com/worldcup/07/story.php?storyid=83973
|
वेस्ट इंडिजला उपांत्य फेरीत जाण्यासाठी उरलेले सर्व सामने जिंकावे लागतील. बांगलादेश, ईंग्लंड आणि श्रीलंकेबरोबर ते जिंकू शकतील, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मात्र काही खरं नाही.
|
दक्षिण आफ्रिका, आणि वेस्ट इंडीजची अवस्था बघता, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड मध्ये फायनल, आणि श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका सेमी मध्ये बाहेर असंच वाटतय... श्रीलंकेच्या बॅटिन्गची परिस्थीती फार चांगली नाही. जयसूर्या महेला आणि संगाकारा कधीही बाद होतात..
|
भारताचं दुर्दैव. या विश्वचषकात पहिल्या फेरीत फक्त ३ च सामने होते. आताची परिस्थिती बरीचशी १९७५ च्या पहिल्या विश्वचषकासारखी आहे. १९७५ मध्येही पहिल्या फेरीत ३ च सामने होते. भारत फक्त १ सामना दुबळ्या पूर्व आफ्रिकेविरुद्ध जिंकू शकला. उरलेले इंग्लंड आणि न्यूझीलंड विरूद्धचे सामने गमवावे लागले. १९८३ पासून २००३ पर्यंत पहिल्या फेरीत कमीत कमी ६ सामने तरी असायचे. त्यामुळे पहिले १-२ सामने गमावले तरी भीती नसायची. १९९२ मध्ये तर पहिल्या फेरीत प्रत्येक संघाला ८ सामने खेळायचे होते. पहिल्या ५ सामन्यातून पाकिस्तानला फक्त १ गुण मिळाला होता. इंग्लंड विरूद्ध पाकिस्तानची धावसंख्या सर्वबाद ७८ होती. परंतु पावसामुळे इंग्लंडची फलंदाजी होऊ शकली नाही आणि दोन्ही संघांना १-१ गुण मिळाला. मात्र पाकिस्तानने शेवटचे तीनही सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आणि नंतर इतिहास घडविला. यावेळी जर पहिल्या फेरीत ६-७ सामने असते तर भारत नक्की पुढे गेला असता.
|
Zakki
| |
| Friday, March 30, 2007 - 2:07 pm: |
| 
|
विशेषत: सगळे सामने बर्म्युडा किंवा स्कॉटलंड विरुद्ध असते तर बरे झाले असते. आता कदाचित् पुढच्या वेळी भारताला त्यांच्याच गटात घालतील, मग पहा भारत नक्कीच पहिली फेरी जिंकेल, निदान दुसर्या क्रमांकावर तरी.

|
Mansmi18
| |
| Friday, March 30, 2007 - 2:11 pm: |
| 
|
गोबु, धन्यवाद. सतीश, आपण किती दिवस आपल्या सन्घाच्या नाकर्तेपणाकडे दुर्लक्श करणार आहोत? मला एक कळत नाही "ऑस्ट्रेलिया" ला अशी कारणे का द्यवी लागत नाहीत? त्यान्च्यात कसा कोणी ना कोणी डाव सावरतो? त्याना का ह्यनी त्याना हरवावे अशी गणिते मान्डावी लागत नाहीत? नोकरीवर मी काम नीट केले नाही तर मला कान धरुन हाक्लुन दिले जाइल. नीट खेळणे हे खेळाडुन्चे कामच नाहि का? माझे हरल्याबद्दल काही म्हणणे नाही. हार्-जीत हा खेळाचा हिस्सा आहे पण आपण प्रयत्नच पुर्ण केले नाहीत तर हार ही अगदी निश्चीत आहे. आता उरला नशीबाचा भाग्: फ़ार वर्शापुर्वी टीवीवर एक समालोचक म्हणाल्याचे माझ्या लक्शात आहे. "किस्मत हमेशा बहादुरोन्का साथ देती है" कुणास ठाउक आपण थोडीतरी हिम्मत दाखवली असती तर पुढे गेलोही असतो.
|
Nanya
| |
| Friday, March 30, 2007 - 5:23 pm: |
| 
|
"किस्मत हमेशा बहादुरोका साथ देति है" नेपाळ नेहमिच cricket matches जिंकेल. (तिथे सगळे "बहादुर" च असतात)
|
Mansmi18
| |
| Friday, March 30, 2007 - 7:29 pm: |
| 
|
नान्या यु आर पीजे बहाद्दर(बहादुर)
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|