Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 26, 2007

Hitguj » Views and Comments » General » Cricket » Archive through March 26, 2007 « Previous Next »

Mansmi18
Friday, March 23, 2007 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयसुर्यने चेक वटवला हो वटवला:-)

Dinesh77
Friday, March 23, 2007 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो,
जरा
positive thinking करा.
Enjoy the game :-)

Mansmi18
Friday, March 23, 2007 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पौल,

तुम्हि मनापासून प्रार्थना केलि नाही वाटते.

:-(


Runi
Friday, March 23, 2007 - 9:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय रे आपण कटलो वर्ल्ड कप मधुन . आणि सचिन डक वर काय गेला???, फ़क्त द्रविड बरा खेळला.

Atul
Friday, March 23, 2007 - 9:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"हुश्श! डिश चे पैसे ($) वाचले", दिनेश ७७ हे तुमच्या साठी :-) ~D

Jaymaharashtra
Friday, March 23, 2007 - 9:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुश्श!शेवटी हरलो एकदाचे.
चला आता बगा भरा आणि घरचि वाट धरा!
निकाल लवकर लागला हे बरेच झाले आता किमान उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर फ़िरायला तरि जाता येईल. नाहितर उगिचच रात्र रात्र जागुन डोळे चोळत सामने बघायचे कष्ट घ्यावे लागले असते आणि उगिचच झोपेच खोबर झाल असत. आपल्या नीळ्या रंगातिल खेळाडुंनि प्रेक्षकांचा हा सगळा त्रास वाचवायचाच या उदात्त हेतुने हाराकिरि करत हातातला सामना हरवुन दाखवला. चला आता पुरे झाले विश्वकप पुराण उठा आणि आपापल्या कामाला लगा पाहु.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Robeenhood
Saturday, March 24, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारत हरल्याने एक गोष्ट चांगली झाली! मिडियाच्या ससेमिर्‍यातून आपली सुटका झाली. कोणतेही माध्यम बघा वर्ल्ड कप शिवाय काही लिहादाखवायला तयार नाही. अगदी लोकसत्ता म.टा. सारखे पेपर देखील मूळ अंकावर दोन पानाची क्रिकेट पुरवणी चढवून देऊ लागली. डी डीच्या न्यूज चॅनेलवर देखील तासन तास क्रिकेटवर panel discussion . अगदी १९७९ च्या कपापासून फीचर्स. तो कपिलदेव देखील त्याने विश्वचषक जिंकल्याचे विसरून गेला होता पण त्या निमित्तने यानी त्याला सुध्धा यात बुचकळून काढले.कुठली capital market की moneycontrol ची साईट पहात होतो तिथेही काहितरी क्रिकेतचे कार्यक्रम, ऑनलाईन स्कोअर असे काही तरी होतेच.

चला या निमित्ताने या मिडियाचे डोके थोडे जागेवर येईल आणि काही वेगळे विषय हाताळतील. अन्यथा यानी महिनाभर जगणे नकोसे करून टाकले असते.


Mukund
Saturday, March 24, 2007 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिनहुड.. आम्ही भारतात नसल्यामुळे मिडिया च्या ससेमिर्‍यापासुन बचावलो आहे. पण तु म्हणतोस ते बरोबर आहे मिडीयाबद्दल. डोक्यात बरेच विचार आहेत पराभवानंतर पण मी तरी बरेचसे माझ्या आधीच्या पोस्टींगमधे लिहिले होते... खास करुन त्या माझ्या इ मेल मधले द्रविड तेंडुलकरबद्दलचे विचार...

पण सद्य परिस्थितीमधे संबीत बाळ चे खालील आर्टिकल सगळ्यांनी जरुर वाचावे असे मला वाटते. रॉबिनहुड म्हणतो त्याप्रमाणे मिडिया ने(व आपल्या सारख्या फ़ॅन्स नी!) काय चुक केली ते यात व्यवस्थित दाखवुन दिले आहे. जरुर वाचा...


http://content-usa.cricinfo.com/ci/content/current/story/286676.html

Giriraj
Saturday, March 24, 2007 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या boys पेक्षा लंकेतिल boys ना भविष्याची अधिक चिन्ता असावी! :-)

Satishmadhekar
Saturday, March 24, 2007 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला. अखेर एकदाचा भारतीय संघ हरला. नाणेफेक जिंकून सुद्धा द्रविडने गोलंदाजी स्वीकारली तेव्हाच पाल चुकचुकली होती. भारत-श्रीलंका आजपर्यंत झालेल्या लढतीत बहुतेकवेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकलेला आहे. श्रीलंका धावांचा पठलाग करण्यात फारसे वाकबगार नाहीत. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणेच योग्य होते.

पहिल्या दोनही सामन्यात अपयशी ठरून उथप्पाला का घेतले? कार्तिकला संधी द्यायला पाहिजे होती.

निर्णायक सामन्यात हमखास अपयशी ठरण्याची परंपरा सचिनने खंदित केली नाही. तो आधीच्या सामन्यात चांगला खेळतो, पण ज्या सामन्यावर पुढच्या फेरीतील प्रवेश अवलंबून आहे किंवा मालिकेचा निकाल ठरणार आहे, अशा वेळी तो कायम अपयशी ठरतो.

२००१ च्या भारतातील ऑस्ट्र्लियाविरूद्दच्या कामगिरीच्या जोरावर हरभजनला अजून किती काळ संघात ठेवणार आहेत? तो एकदिवसीय सामन्यांना अजिबात योग्य नाही. त्याच्याकडे अशा सामन्यांसाठी लागणारे गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण असे कोणतेही कौशल्य नाही. खरं तर पोवारला न्यायला पाहिजे होते. निदान काल कुंबळे किंवा पठाणला खेळवायला पाहिजे होते.

असो. आता टीका करून काय उपयोग? आपण समजतो तेवढी काही वाईट परिस्थिती नाही. भारत आता पुढे खेळणार नसल्याने, कोट्यावधी नागरिकांची जागरणे वाचली आहेत. टिव्ही, रेडिओ, इंटरनेट इ. बंद राहणार असल्याने मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार आहे. विजेची बचत म्हणजेच विजेचे उत्पादन आणि विजेचे उत्पादन म्हणजेच राष्ट्राचा विकास. भारतीय संघाचे हे राष्ट्रविकासातील योगदान दुर्लक्षून चालणार नाही.


Muks77
Saturday, March 24, 2007 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

there's no point in getting disheartned by team india show.our players didnt seem too bothered after or during match.they've got their money.the post match comments from dravid and coach were 'ICING ON CAKE'.dravid wants to change the format of domestic cricket...???chappel: i'm not answerable to indian public....
think it as blessing in disguise.all the so called veterans and stars shoud now retire ,specially tendulkar,sehwag,harbhajan.tendulkar should retire now...before he is sacked.dravid's captaincy was very very very poor.

Dinesh77
Saturday, March 24, 2007 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारत सुपर ८ मधुन बाहेर गेल्याचे फ़ायदे:-
१) दहावीच्या विद्यार्थ्यांना मन लावुन अभ्यास करता येईल. वर्ल्ड कप चा स्कोअर बघु का अभ्यास करु ही घालमेल होणार नाही.
२) अत्यंत महत्त्वाचा फ़ायदा म्हणजे हजारो मेगावट वीज वाचेल. गरज आहे हो महाराष्ट्राला वीजेची. हे ही कारण असु शकेल मॅच फ़िक्सिंचे :-)

मी तर म्हणतो फ़ुटबाॅल प्रमाणे वर्ल्ड कप क्रिकेट मधे पण क्वाॅलिफ़ायिंग राउंड ठेवायला पाहिजे.


Chyayla
Sunday, March 25, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलिकरान्नो.. कोणी हारो वा जिन्को मला आनन्द आहे की क्रिकेट जिन्कले बस्स... क्रिकेट असाच खेळ आहे त्याची मजा घ्यायची असते अशीच... खिलाडुपणे.

Jaymaharashtra
Sunday, March 25, 2007 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदि खरे बोललास च्या"!
अरे आपल्याला जर इतके दुःख होतय तर त्या खेळाडुंना स्वतःच्या पराभवाने वाईट वाटले नसेल का?
पण आपल्याकडे क्रिकेट्ला धर्म मानुन बघितले जाते. आणि याच मुळे खेळाडुंवर दडपण येतय. हरलो म्हणुन खेळाडुंच्या घरांवर हल्ला करणे किति समर्थनिय आहे? त्या दिवशी हरताना आपल्या खेळडुंच्या चेहर्‍यावरचे नैराश्य आणि चिंता बघितलि आणि निदान मला तरि खुप वाईट वाटले.
सचिनला देव मानुन त्याचे देवुळ बांधा असे लोकांना करायला सचिनने तर सांगितले नव्हते ना?आधि त्यांना डोक्यावर बसवायचे आणि अपेक्षाभंग झाला कि पायदळि तुडवायचे हे कितपत योग्य आहे? शेवटि ति देखिल हाडामासाची माणसेच आहेत तुमच्या आमच्या सारखी. चुका न करायला ते काही देव नाहित! मला पण खुप संताप आला होता आणि त्यामुळे मी काही पोस्ट उद्वेगाने लिहिलि देखिल पण नंतर सारासार विचार केल्यावर वाटले आपण आपल्या खेळाडुंवर अन्याय करतोय.त्यांना अश्या परिस्थित आपलेपणाने समजुन घेणे जास्त गरजेचे आहे.
आता भारतात परतताना त्यांना भितिने ग्रासलेले असेल.कारण इथे आल्यावर देखिल त्यांना क्रिकेट्प्रेमींच्या रोषाला सामोरे जावे लागणारच आहे. स्वतच्या घरट्याची आणि माणसांची चिंता त्यांना लागुन राहीली असेल. असो मी मात्र आशावादी आहे.या पराभवाने आपले खेळाडु खचुन न जाता पुन्हा जोमाने खेळायला सिद्ध होतिल.फ़क्त त्यांना आपण साथ द्यायला हवी.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Atuldpatil
Sunday, March 25, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निदान आता तरी..

"त्र्याऐंशी ची पुनरावृत्ती होईल का.., त्र्याऐंशी ची पुनरावृत्ती होईल का.." असे म्हणत आपण आता जवळ जवळ पंचवीस वर्षे काढली. पुनरावृत्ती तर राहूदेच पण चांगला खेळ सुद्धा बघायला मिळत नाही. इतर खेळातल्या खेळाडूंपेक्षा कित्तीतरी प्रचंड पैसा, सोयीसुविधा, प्रसिद्धी सगळे देऊनसुद्धा ही अवस्था आहे. खेळापेक्षा खेळाडूंना अवाजवी महत्व मिळाले तर हेच होणार! क्रिकेट रसिकानी निदान आता तरी शहाणे व्हायला हवे.

व्यक्तिगत मला तरी ह्या क्रिकेटीयर्संचे कधीच कौतुक वाटले नाही. अशा कोणत्या गुणांमूळे ह्या लोकाना इतके डोक्यावर चढवून ठेवले जाते तेच कळत नाही. आणि असे जर कुठले गुण असतीलच, तर शंभर कोटींहून अधिक लोकसंखेच्या देशात फ़क़्त पंधरा-वीस जणांकडेच हे गुण असतील यावर तर अज्जिबातच विश्वास बसत नाही. आणि जर तसेच असेल तर मग हाच न्याय इतर खेळांच्या खेळाडूंनाही मिळायला हवा. पण नाही! तिकडे मात्र अजून उपेक्षा आणि अप्रसिद्धीचा अंधार आहे.

बरं, प्रत्येक देशात एखादाच खेळ जास्त लोकप्रिय असतो त्यामूळेही असे असेल, असाही कोणी युक्तिवाद करेल. पण तसे असेल तर संपूर्ण देशाचे क्रिकेट मधे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्याच ठराविक खेळाडूंना वर्षानूवर्षे खेळवत ठेवायचे तरी काय कारण? त्यामुळे आपण खेळापेक्षा या खेळाडूंनाच जास्त महत्व देत आहोत असे वाटत नाही का? एक खेळाडू जास्तीत जास्त एक ते दोन वर्षेच खेळेल असे करायला काय हरकत आहे? त्यामुळे जास्तीत जास्त जणांना संधी मिळेल. सरतेशेवटी हा खेळ आहे, आणि ते बस्स खेळाडू आहेत. कोणी राजकीय धोरणे ठरवणारे मुत्सद्दी नव्हेत, नाही का?

जाता जाता अजून एक मुद्दा... आजकाल हा "टीम इंडीया" शब्दप्रयोग कुठ्ल्या अक्कलशून्य महाभागाने काढला आहे कळत नाही. "टीम इंडीया" म्हणजे काय फ़क़्त क्रिकेटची टीम? का? काय इतर खेळासाठी इंडीयाच्या टीम नाही आहेत का?

असो. आपल्याला फ़ार महत्व व प्रसिद्धी देवू नये. ती आपली योग्यता नाही असा संदेश तमाम क्रिकेट रसिकांच्या "लाडक्या" क्रिकेटीयर्सनी आता दिलेला आहेच. त्यातून काही बोध घेतला तर ठीक नाही तर आपल्यासारखे मूर्ख आपणच.

Jayavi
Monday, March 26, 2007 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही ऐकलंय की भारत आणि पाकीस्तानच्या टीमला डोकं वर काढू देता येऊ नये हिच चॅपेल आणि वूल्मर ची कामगिरी होती आणि त्यांनी ती व्य्वस्थित बजावली.


Jadhavad
Monday, March 26, 2007 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी. सी. सी. आय चे अध्यक्ष, कृषीमंत्री ह्यानी जर सध्या चाललेल्या शेतकर्‍याच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर त्यानी हारलेल्या टीम इंडीया च्या नियमां मध्ये बदल करुन ते पैसे शेतकर्‍यांना द्यावे. असे करवयाचे झाल्यास काय अपेक्षीत आहे.
१. खेळ किँवा जाहीरात. जो खेळेल त्याला जाहीरात करता येनार नाही, ज्याला जाहीरात करायची त्याने क्रिकेट खेळायचे नाही.
२. एक गेम जिंकल्यावर जसे सगळ्याना पैसे मिळतात तसेच गेम हारल्यावर त्या गेम चे पैसे व दंड असे डबल पैसे बी. सी. सी. आय ला परत करायचे.
३. टॉप ६ प्लेअर्स नी जर ५ गेम मध्ये कमीत कमी १ फ़िफ़्टी नाही मारली तर त्याला अजुन दंड.
४. नवा बॉलींग कोच, नवा batting कोच, आणि नवा फ़िल्डींग कोच. पण
अ. ५ पेक्षा ज्यादा अवांतर धावांना बॉलींग कोच ला दंड,
ब.१० च्या आत विकेट गमावणार्‍यांना Batsaman ला दंड,
क. ओपनर पेअर ने कमीत कमी १५० रन २० ओव्हर मध्ये करणे बंधनकारक. आणी
ड. झेल सोडनार्‍यांना/ थ्रो चुकवीनार्‍यांना जागच्या जागी दंडाची घोषणा.
५. स्वत्: पुर्ण ५० ओव्हर खेळणे बंधनकारक. पन समोरच्या टीमला ५० च्या आत गुंढाळणे बंधनकारक. नियम तोडणार्‍यांना दंड.
६. बॉलिंग करणार्‍या प्रत्येक बॉलर ने समोरच्या टीम चे २ विकेट घेणे बंधनकारक. अन्यथा दंड.
७.विदेशात खेळताना सीरिज हरले तर येन्या-जान्याचा खर्च बोर्डाला भरुन देणे बंधनकारक.
८. भारतात खेळतांना सीरिज हरले तर हॉटेल मध्ये राहण्याचा आणी जेवनाचा खर्च भरुन देणे बंधनकारक.



Satishmadhekar
Monday, March 26, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतीय खेळाडू इतरांचे पाहून काहीच शिकत नाहीत. परवा मुरलीधरन समोरचा फलंदाज डावखुरा आहे की उजवा आहे त्यानुसार यष्टीच्या वेगवेगळ्या बाजूने गोलंदाजी करत होता. मलिंगा, फर्नांडो सारखे गोलंदाज प्रत्येक षटकात किमान एक बाउन्सर, एक यॉर्कर आणि एक्-दोन कमी वेगाचे चेंडू टाकून 'निर्धाव' चेंडूंचे प्रमाण वाढवत होते. याऊलट भारतीय गोलंदाजांनी सर्व षटके एकाच पद्धतीने टाकली.

आता मे महिन्यात भारत बांगलादेशाचा दौरा करणार आहे. द्रविडला कर्णधारपदावरून हटवून म्हणे सचिनला कर्णधार आणि युवराजला उपकर्णधार करण्यात येणार आहे.

भारताने आता देशातील सामन्यांसाठी आणि परदेशातील सामन्यांसाठी वेगवेगळे संघ तयार करावेत. धोनी, हरभजन, उथप्पा वगैरे मंडळी भारतात प्रचंड पराक्रम करतात, पण परदेशात मात्र त्यांची फॅ फॅ उडते.

शरद पवारांनी तर म्हणे संघात अनेक बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले. शरद पवार काय किंवा राजीव शुक्ला काय, यांनी आयुष्यात कधी बॅट हातात धरली सुद्धा नसेल किंवा चेंडू कसा असतो हे सुद्धा त्यांना माहित नसणार. पण ह्यांच्या हातात मात्र सगळे निर्णयाचे अधिकार. सर्वात पहिल्यांदा ही क्रिकेटशी संबधित नसणारी मंडळी हाकलली पाहिजेत.



Jaymaharashtra
Monday, March 26, 2007 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनुमोदन सतिश.
ज्यांना क्रिकेट्च्या बॅटची लांबी रुंदी देखिल माहिति नाहि अश्यांना बिसीसीआय मधे येण्याचा आणि संघ निवडिचा किंवा संघाबद्दलचे कुठलेही निर्णय घेण्याचा काय अधिकार पोहोचतो?
मुंबई मधे सचिनचा पुतळा राष्ट्रवादिच्या कार्यकर्त्यांनि जाळला अरे लायकी काय तुमची?स्वतःची औकात विसरु नका.क्रिकेट खेळणे म्हणजे काय चारित्र्यहिन नेत्यांची हाजिहाजि करण्याएव्हढे सोपे वाटले कि काय यांना?मुर्ख कुठचे?
माझा विश्वास आहे की हे कृत्य करणारा माणुस हा मराठीमाणुस नक्किच नसेल.
आज नविन काय तर म्हणे भारत बांगलादेश सामना फिक्स होता असे पकिस्तानच्या एका सट्टेबाजाने starnews ला सांगितले काय डोकि फ़िरलि आहेत कि काय? सामना हरल्यावर खेळाडुंचे पुतळे जाळणार्‍यांच्या देशात match fixing मधे सहभागि होवुन कोण खेळाडु स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारुन घेईल. आणि परत ह्या बातम्या पुरवतय कोण तर पाकिस्तान मधिल सट्टेबाज?स्वततर त्या बॉब वुल्मरचा खुन करुन खड्यात पडलेच आहेत आणि आता त्यात भारतिय खेळाडुंना देखिल ओढायचा प्रयत्न करतायत.पण स्वतःच्या channel ला प्रसिद्धि मिळवुन द्यायच्या नादात हे media वाले आपल्याच खेळाडुंवर चिखलफ़ेक करत आहेत.
आता जर श्रीलंका आणि भारत यांच्यात झालेला महत्वाचा आणि निर्णायक सामना भारताने जिंकला असता तरि हा सामना पण फ़िक्स होता अशीच ओरड झाली असती.आणि हेच बर्मुडा जिंकला असता तरि बोलले गेले असते कि यांना तर भारताने पैसे चारुन जिंकवले याला म्हणातात "धरलत तर चावतय आणि सोडल तर पळतय".
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Badbadi
Monday, March 26, 2007 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी इथे विषयांतर करत असेन तर माफ करा.. पण
हे वाचण्यालायक आहे

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators