|
एक नक्की झालंय, भारताला श्रीलंकेला नुसतचं हरवायचं आहे. धावांच्या गतीची आता काही समस्याच नाही. बांगलादेश धावांच्या गतीमध्ये आता इतका मागे पडला आहे की बर्म्युडाला त्यांना ४००-५०० च्या फरकाने हरवायला लागेल. बांगलादेशाला जर बर्म्युडाने हरवले तर भारत श्रीलंकेकडून हरला तरी चालू शकेल. http://www.rediff.com/wc2007/2007/mar/22india.htm
|
Mansmi18
| |
| Thursday, March 22, 2007 - 1:23 pm: |
| 
|
इजा, बिजा आणि... होणार? आतापपर्यंत आठ र्वल्डकप स्पर्धा झाल्या; मात्र भारत आणि श्रीलंका यांच्यात एकंदर सहाच लढती झाल्या आहेत. १९७५च्या पहिल्या र्वल्डकपमध्ये किंवा १९८३च्या तिसऱ्या आणि त्यापाठोपाठच्या १९८७च्या र्वल्डकप स्पर्धांमध्ये आपली श्रीलंकेशी गाठ पडलीच नव्हती. ज्या सहा लढती झाल्या, त्यापैकी ७९मधील एक सामना, ९६च्या स्पधेर्तील दोन्ही सामन्यांत आपल्याला पराभव स्वीकारावा लागला. ७९च्या स्पधेर्तील लढतीत श्रीलंकेने ५ बाद २३८ धावा केल्या. (वेट्टीमुनी ६७, डायस ५०, मेंडिस ६४) त्या धावांचा पाठलाग करताना आपण फक्त १९१ धावाच करू शकलो. (दिलीप वेंगसरकर ३६, अंशमन गायकवाड ३३ आणि सुनील गावस्कर २६). १९९२मध्ये भारत-श्रीलंका सामना (मॅके, ऑस्ट्रेलिया) झाला; पण तो २० षटकांचाच ठरविण्यात आला. पावसामुळे मैदान आणि धावपट्टी ओली होती. ती सुकविण्यासाठी हेलिकॉप्टर वापरले गेले. त्यानंतर खेळ सुरू झाला; पण दोन चेंडू टाकताच पुन्हा पाऊस सुरू झाला. (त्यावेळी श्रीकांतच्या जोडीला कपिलदेव अतरला होता. २०च षटकांचा सामना असल्याने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करून धावा जमवण्याचे डावपेच आखले होते, असे दिसते.) त्यामुळे खेळ थांबवावा लागला. १९९६मध्ये र्वल्डकप स्पर्धा भारतात झाल्या. आपली श्रीलंकेशी दोनवेळा गाठ पडली. पहिल्यावेळी दिल्लीत सामना झाला. आपण ५० षटकांत ३ बाद २७१ धावा केल्या. (सचिन तेंडुलकर याने १३७ चेंडूंतच १३७ धावा काढल्या; तर अझरुद्दिन याने ८० चेंडूंत ७२!.) पण आपली २७१ ही धावसंख्या श्रीलंकेने ४८.४ षटकांतच चार गड्यांच्या बदल्यात ओलांडली. खरंतर एकावेळी श्रीलंकेची स्थिती ४ बाद १४१ अशी होती. पण त्यानंतर रणतुंगे नाबाद ४६ आणि तिलकरत्ने नाबाद ७० यांनी श्रीलंकेला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याच स्पधेर्त सेमीफायनलमध्ये आपली श्रीलंकेशी पुन्हा गाठ पडली, ती कोलकात्यात. श्रीलंकेने ८ बाद २५१ धावा जमावल्या. श्रीनाथ आणि तेंडुलकर यांनी प्रत्येकी तीन-तीन बळी मिळविले. श्रीलंकेच्या २५१ धावा या अवघड नव्हत्या. पण आपली अवस्था ३४.१ षटकांतच ८ बाद १२० अशी झाली. सचिन तेंडुलकर (६५) आणि संजय मांजरेकर ( २५) यांच्याखेरीज कोणीच खेळू शकले नाहीत. आपल्या संघाची ही कामगिरी बघून संतापलेल्या प्रेक्षकांनी स्टँडच्या एका भागात आग लावली. नंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंवर पाण्याच्या बाटल्या आणि फळे फेकून मारली. त्यामुळे खेळ थांबवला गेला. थोड्या वेळाने तो पुन्हा सुरू झाला. परंतु पुन्हा त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. सामना अधिकारी क्लाईव्ह लॉईड यांनी सामना थांबवला आणि तो श्रीलंकेला बहाल करून टाकला. १९९९ आणि २००३मध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांत मात्र आपण यश मिळविलं. ९९च्या सामन्यात आपण ५० षटकांत ६ बाद ३७३ धावा केल्या, त्या सौरव गांंगुली आणि राहुल दविड यांच्या बहारदार फटकेबाजीमुळे. गांगुलीने १५८ चेंडूंतच १८३ धावा फटकावल्या त्या १७ चौकार आणि ७ षटकार खेचत. तर दविडने हमभी कुछ कम नही म्हणत १२९ चेंडूंतच १४५ धावा केल्या त्या १७ चौकार आणि एक षटकार यांच्या मदतीने. या फटकेबाजीने श्रीलंकन खेळाडू शरीरानं पिचले तर मनानं खचले आणि ४२.३ षटकांतच त्यांचा डाव सर्वबाद २१६ धावांवर संपला. आर. आर. सिंग याने ३१ धावांत ५ बळी घेतले. २००३मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेला सामनाही आपण रुबाबात खिशात घातला. आपण ५० षटकांत ६ बाद २९२ अशी धावसंख्या उभारली, ती तेंडुलकर (९७), सेहवाग (६६) आणि गांगुली (४८) यांच्यामुळे. त्यानंतर झहीरखान, श्रीनाथ आणि नेहरा यांनी श्रीलंकेला अवघ्या १०९ धावांत गुंडाळून भारताला विजयी केले. तांत्रिकदृष्ट्या भारत-श्रीलंका सहा लढती झाल्या. मात्र ९२ची लढत नाममात्रच होती. उरलेल्या पाचपैकी तीनवेळा श्रीलंका तर दोनवेळा भारत विजयी झाला आहे. समाधानाची गोष्ट अशी की १९९९ आणि २००३ असे लागोपाठ दोन्हीवेळा आपणच यशस्वी झालो आहोत. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही होईल, अशी आपण आशा करूया.
|
Zakki
| |
| Thursday, March 22, 2007 - 1:29 pm: |
| 
|
farend इ. नी लिहीलेले सगळे text message करून ताबडतोब द्रवीड, नि चॅपेलला पाठवा. शिवाय फोन व तारा करून सुद्धा कळवा. नाहीतर, ते दोघे भलतेच काहीतरी करून बसतील! नि मग हरलो की म्हणतील आम्हाला वेळच्या वेळी मा. बो. करांनी सांगीतले नाही काय करायचे ते! आम्हाला समजेना की कुणी कशी गोलंदाजी, फलंदाजी करावी, क्षेत्ररक्षक कुठे ठेवावे? आम्ही आपले सगळ्यांना सांगीतले की तुम्ही सगळे घोळका करून यष्टीरक्षकाच्या मागे उभे रहा, नि चेंडू फटकारला की लगेच धावत जाऊन तो अडवा. द्रवीड संघनायक म्हणून त्याने आधी गोलंदाजी घेतली, पण त्यांनी सगळे चेंडू उंचावरून पाऽर सीमेपार तडकावले. कसे झेलणार आम्ही ते? बरे सहा चेंडू टाकल्यावर पंच म्हणाला झाले षटक, आता दुसरा गोलंदाज. पण कोण? शेवटी धोणी म्हणाला मी करतो गोलंदाजी, म्हणून त्याला दिला चेंडू! आमची काही चूक नाही सामना हरण्यात, हा सगळा संघाचा नि मायबोलीकरांचा दोष!
|
Aaspaas
| |
| Thursday, March 22, 2007 - 6:23 pm: |
| 
|
अरे आपण सगळे इथे रोजच खेळ खेळतो आणि रोजच शतक ठोकतो असे बोलतो आहे. प्रत्येकालाच वाटते आहे आपण स्वतःसुद्धा आपापाल्या कार्यालयात रोज प्रत्येक क्षणी १००% कार्यक्षमता दाखवतो. फारच वाईट भाषेत टीका करतो आहोत. जरा स्वतःकडे बघूनही टीका करा. हा खेळ आहे, निर्णय, अंदाज आणि खेळ हे चुकू शकते. आपलेही आडाखे चुकतातच की, फरक एवढाच की त्याचुकण्यामुळे फक्त आपल्यावरच परिणाम होतो. इथे परिस्थिती बदलते एवढेच. मागे जाऊन बघा काय भाषा वापरलीय आपण. तुम्हीही पुतळे आणि खेळाडूंच्या घरच्या व्यक्तिना त्रास देण्यार्यांपेक्षा वेगळे वाटत नाही आहात. फक्त तुम्ही पाटीवर लिहिताय आनि ते रस्त्यावर. खेळ कसा होतो हे महत्वाचे आहे म्हणूनच इतरांचे सामनेही महत्वाचे आहेत. आपण सगळ्यानी इतरांचेही कौतूक केलेच आहे. आपल्या सगळ्यांच्यात मृदूता आली पण १९ दिनांकानंतर. असे पराजय आपण पूर्वीपासूनच पाहतो आहोत त्यामुले या प्रत्येक वेळी प्रत्येक खेळाडू मुद्दामच करायचे म्हणून, चाहत्यांना त्रास द्यायचा, घरच्यांना त्रास द्यायचा, आपलीच घरे फोडायची म्हणून करत असतील. जराचांगला विचार करायला आपणतरी काहीच हरकत नाही. झक्की म्हणतात ते खरच आहे. एवढा मूर्ख आहे का द्रविड? त्याला उगाच बुद्धीमान संघनायक म्हणतात का? शेषविश्वचा कर्णधार होता तो, त्याला भिंत हेही नाव मिडीयानेच दिले आहे. आक्र्मक नाही म्हणजे झाले का? गांगुली चांगला कर्णधार होताच, पण तो असतानाही असेच हरलो आहोत आपण. घरात आईचा एखादा पदार्थ एखाद दिवशी बिघडला तर आपण तिला काढतो का घराबहेर? कि मुद्दाम केले म्हणतो? कि कशेही बोलतो? हिच गोष्ट घरच्या कर्णधारालाही लागू आहे.
|
Deshi
| |
| Thursday, March 22, 2007 - 6:25 pm: |
| 
|
farend इ. नी लिहीलेले सगळे text message करून ताबडतोब द्रवीड, नि चॅपेलला पाठवा>>>> दिले पाठवून एकदाचे. बघु काय होते ते. पण आगरकर ला बसवा आता. ( या match पुरते).
|
Deshi
| |
| Thursday, March 22, 2007 - 6:29 pm: |
| 
|
घरात आईचा एखादा पदार्थ एखाद दिवशी बिघडला तर आपण तिला काढतो का घराबहेर? कि मुद्दाम केले म्हणतो? कि कशेही बोलतो? हिच गोष्ट घरच्या कर्णधारालाही लागू आहे>>> अहो पण निदान आईवर चिडचिड करतोच ना. तशीच ही पण चिड चिड आहे. लगेच काही द्रविड ला कोणी काढनार नाही काही. ( तसही आपल्या हातात थोडीच आहे). शिवाय रोज चांगला चहा करनार्या आईने नेमका मित्रांसाठी वाईट चहा का करावा? तसेच हे आहे. आणी या अशा अपेक्षा काही बर्मुडा, आयर्लंड अशा टिम कडुन नाहीत त्या ' भारता ' कडुन आहेत.
|
Zakki
| |
| Thursday, March 22, 2007 - 6:40 pm: |
| 
|
नेमका मित्रांसाठी वाईट चहा का करावा आई, त्या मित्रांना नि तुम्हाला पण 'ओळखून' आहे. खरे तर आता तुम्ही चहा करायचा नि आई ला विश्रांति द्यायची. ते गेले कुठेच! काय पण असतात लोक!
|
भारत आज बहुतेक जिंकेल असं वाटतंय. श्रीलंकावाले 'ब' गटात प्रथम क्रमांकावर असल्यामुळे आणि भारताविरूद्ध हरले तरी त्यांच्या स्थानाला धक्का बसणार नसल्याने, ते बहुतेक फारसे गांभीर्याने खेळणार नाहीत.
|
Giriraj
| |
| Friday, March 23, 2007 - 6:10 am: |
| 
|
मला या सामन्यात अर्थकारण दिसतंय!मुळात क्रिकेटवर भारतातून इतका पैसा ओतला जातो की भारताने पहिल्याच फ़ेरीत बाद होणं कुणालाच परवडणारं नाहिये. जर आपले तट्टू हरले तर सगळ्यांचे ad contracts renew तर होणारच नाहित त्यामुळे पुढे मिळणारा पैसाही अर्थातच कमी होईल. पुन्हा मोठ्या (वयाने आणि मानानेही) खेळाडूंना भविष्याची चिंता असणारच आहे. आताच हात धुवून घेतला तरच फ़ायदा आहे. आता हारले तर जाहिरातदार विचारणार नाहीत,लोक शिव्ह्या घलतिल आणि दिमाखात रिटायर होणे अश्या वेळी शक्य नाही. जाहिरातदारांचा दबाव खूपच मोठा असणार आहे. हे सगळे झाले सकारत्मक नजरेतून पण दुसरी बाजूही आहेच या अर्थकारणाची! हे काही लपलेले नाही की भारतातून अब्जावधी रुपयांचा सट्टा क्रिकेट्वर लागतो. कुठेतरी त्यचही परीणाम होत असेलच की! तसेही श्रिलंकेला खूप फ़रक पडणार नाहिये!असे सगळे पाहता भारताचे जिंकणे थोडे सोपेच वाटते!
|
Paragb
| |
| Friday, March 23, 2007 - 7:54 am: |
| 
|
Year 1981 1. Prince Charles got married 2. Liverpool crowned Champions of Europe 3. Australia lost the Ashes 4.Pope Died 2 years later India won the world Cup!!! Year 2005 1. Prince Charles got married 2. Liverpool crowned Champions of Europe 3. Australia lost the Ashes 4.Pope Died 2 years later will India win the world Cup???? ......... - - - Trivia -2 1982 Football World Cup won by Italy 1983 Cricket World Cup won by India 2006 Football World Cup won by Italy 2007 Cricket World Cup: INDIA ??? So any guesses who s going to win the World Cup ....?
|
भारत आज बहुतेक जिंकेल असं वाटतंय. श्रीलंकावाले 'ब' गटात प्रथम क्रमांकावर असल्यामुळे आणि भारताविरूद्ध हरले तरी त्यांच्या स्थानाला धक्का बसणार नसल्याने, ते बहुतेक फारसे गांभीर्याने खेळणार नाहीत. <<<<असं कसं , लंका अजिबात सोडणार नाही chance, आपल्या ऐवजी S-8 मधे बांग्लादेश आलेले नको आहेत का त्यांना ? ते नक्कीच खेळतील गांभीर्याने आणि अर्थात टीम इंडीया पण !
|
Swa_26
| |
| Friday, March 23, 2007 - 9:30 am: |
| 
|
मला या सामन्यात अर्थकारण दिसतंय!मुळात क्रिकेटवर भारतातून इतका पैसा ओतला जातो की भारताने पहिल्याच फ़ेरीत बाद होणं कुणालाच परवडणारं नाहिये............. खरं आहे तुमचे गिरिराज... शेवटी काय "पैसा बोलता है" हे पण तितकेच खरे आहे.... पण आज मात्र टिम इंडिया जिंकावीच असे वाटतेय...
|
Imtushar
| |
| Friday, March 23, 2007 - 10:04 am: |
| 
|
श्री लंका नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करेल कारण S8 मध्ये जातान तुम्ही ज्या संघाला हरवलंय त्याच्या विरुद्ध च्या सामन्याचे points घेउन जाणार... म्हणजे जर भारत जिंकतो, तर भारत २ आणि श्री लंका ० गुण घेऊन S8 मध्ये जातील... आणि श्री लंका जिंकली तर ते २ आणि बांगलादेश ० गुण घेऊन S8 मध्ये जातील. त्यामुळे हा सामना श्री लंके साठीही महत्वाचा आहेच. -तुषार
|
मी पण गिरी च्या मताशी संमत आहे, कारण दुसरा सामना पाहिला तर लगेच लक्षात येईल, कारण बर्म्युडा सारख्या दुबळया संगाने टोस जिंकल्यावर सुधा आधि फ़ंलदाजी भारताला करु देणे तेवढेच संशयास पद होते........ जे झाले ते बरेच, नाहितर एवढे रेकॉर्ड झाले नसते. (कमीत कमी बिचारा सेह्वाग साठी तरि ......). त्यामुळे श्रीलंका सोबत आपण मॉच जिंकणे तेवढेच खरे आहे..........
|
भारत आज बहुतेक जिंकेल असं वाटतंय. श्रीलंकावाले 'ब' गटात प्रथम क्रमांकावर असल्यामुळे आणि भारताविरूद्ध हरले तरी त्यांच्या स्थानाला धक्का बसणार नसल्याने, ते बहुतेक फारसे गांभीर्याने खेळणार नाहीत. >>>>>> अहो, ही भारतीय संघाची विचारसरणी झाली. तुम्ही सिलोनच्या संघाबद्दल बोलताय....
|
आज कोण जिंकणार हे बुकी ठरवतील. पहिले दोन खेळाडू क्रीजवर गेल्यावर त्यांचे बुकिंग पूर्ण होईल. मग झालेले बुकिंग पाहून ते ठरवतील कोनाला जिंकवले म्हणजे ते प्रॉफिटमध्ये राहतील. मग ते संबंधिताना निरोप देतील विकेट फेका. अथवा लगे रहो... रन आऊट व्हा ई. चॅपेल सांभाळ रे बाबा जिवाला. नाही तर आमच्या संघाला चौकशी साठी जमेकातच रहावे लागेल..
|
भारताने प्रथम फलंदाजी करावी. श्रीलंकेविरूद्ध प्रथम फलंदाजी करूनच चांगल्या धावा होऊ शकतात. त्याचप्रमाणे यशस्वीपणे पाठलाग करण्याबद्दल श्रीलंकेची फारशी ख्याती नाही. याउलट त्यांची गोलंदाजी आपल्यापेक्षा बरी असल्यामुळे आपल्याला पाठलाग करणे अवघड जाईल. माझा असा अंदाज आहे की भारताने श्रीलंकेविरुद्ध बहुतेक विजय प्रथम फलंदाजी करूनच मिळविले आहेत.
|
आजच्या सामन्यात भारताचा विजय होणार हे नक्की झालंय. सट्टेबाजांनी श्रीलंकेला ८५ पैसे तर भारताला १.१० रू. दर दिलेला आहे. श्रीलंका हरली तर भारतावर पैसे लावणार्यांना प्रचंड फायदा होणार असल्याने श्रीलंका हरणार हे नक्की. श्रीलंकेच्या 'मॅच फिक्सरनी' जाणूनबुजून विकेट फेकल्या तर आश्चर्य वाटायला नको.
|
Paul
| |
| Friday, March 23, 2007 - 12:23 pm: |
| 
|
ओ पालनहारे, निर्गुन और न्यारे तुम्हरे बिन हमरा कौनो नाहिन हमरी उल्झन सुल्झाओ भगवन तुमरे बिन हमरा कौनोन नाहिन तुम हमका हो सम्भाले तुम हमरे रखवाले तुमरे बिन हमर कौनो नाहिन
|
Mansmi18
| |
| Friday, March 23, 2007 - 12:39 pm: |
| 
|
सतीश आणि इतर, मी लिहिणार होतो ते तुम्हि सर्वानी आधीच प्रेडिक्ट केलेत. भारत्-लन्का सामन्यावर बेटिन्ग आहे ६०० कोटिचे. सामन्याचा निकाल ठरणार आहे कोणाची ओफ़र जास्त आहे त्यावर. कप जिक्न्कुन त्याना समजा १ कोटि मिळणार असतील प्रत्येकी. त्या ऐवजी १० कोटी बुकिकडुन मिळाले तर ते कशाला जिन्कण्याच्या फ़न्दात पडतील. ११० कोटी जरी सन्घाला द्यायला लागले तरि बुकि नेट २००३०० कोटी फ़यद्यात राहतील. वरील मोजणीत जरा अतिशयोक्ती वाटली तरी ते अगदिच असम्भव नाही. मला आपल्या सन्घाच्या गुणवत्ते विशयी जराही सन्शय नाही. परन्तु आधी कोणी म्हटल्याप्रमाणे अर्थकारण आले कि सगळे नासते. देव करो नी हे अर्थकारण वगैरे खोटे ठरो आणि आपल्याला एक चान्गला सामना बघायला मिळो.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|