|
Mansmi18
| |
| Monday, March 19, 2007 - 5:31 pm: |
| 
|
नमस्कार भारतियान्ना सुचना क्रुपया दगड्फ़ेक, पुतळे जाळणे वगैरे प्रकार सुरु ठेवा. असे प्रकार केल्याशिवाय आपल्या खेळाडुन्चा माज उतरत नाही. क्रुपया आपण सुपर ८ मधे गेल्याशिवाय थाम्बु नका. धन्यवाद.
|
Zakki
| |
| Monday, March 19, 2007 - 6:13 pm: |
| 
|
जयमहाराष्ट्र, एकंदरीत तुम्ही अनेऽक क्रिकेट सामन्यात कप्तानपद स्वीकारून भारताला एकामागून एक भव्य विजय मिळवून दिले असावेत असे वाटते. त्यामानाने अर्थातच् द्रवीड इ. ना काय कळत असणार? तर आता असे करा: त्या द्रवीडच्या कानात एक छोऽट्टा स्पीकर ठेवा. नि तुम्ही मग त्याला वेळोवेळी सूचना देत चला की आता असे कर, तसे कर वगैरे. म्हणजे मॅच संपल्यावर नि हरल्यावर काय चुकले ते सांगण्यापेक्षा, चुका होण्यापूर्वीच त्यांना तुमच्या ज्ञानाचा नि अनुभवाचा फायदा दिलात तर बरे. अर्थात् मधे मधे चॅपेलला बोलू देऊ नका. त्याला काय कळते? नि हो, पहिल्या मॅचमधे खेळपट्टी प्रथम फलंदाजी करणार्यांना चांगली आहे असे तिथे प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या बर्याच आजी नि माजी खेळाडूंचे मत होते असे कळले. खुद्द गांगुलीने ६६ धावा काढून ते सिद्ध केले. कदाचित् तो बाद झाल्यावर जेंव्हा इतर खेळाडू बाद होऊ लागले तेंव्हा जर द्रवीडने गांगुलीचे ऐकून अत्यंत मुत्सद्देगिरीने नि चातुर्याने, पंचांना नि बांगलादेशकरांना पटवून दिले असते की, आता जरा बांगलादेशला फलंदाजी करू द्या. त्यांचे झाले की मग आम्ही आमची उरलेली षटके खेळू, तर बरे झाले असते. पण या गोष्टी सांगायला तुम्ही नव्हता तिथे!
|
झक्कि काका अहो तुम्हि एव्हढे का रागावताय? माझा द्रविड्ला विरोध मुळीच नाहि उलट सचिन सौरव इतकाच एक खेळाडु म्हणून तो मलाही आवडतोच. त्याचे श्रेष्ठत्व निर्विवाद आहे. पण आक्रमकतेचा आभाव हि एक गोष्ट वगळता त्याच्या मधे दोष काढण्यासारखे काहिच नाहि. सौरव चे म्हणाल त्याने जे पेरलय तेच उगवतय. त्याने कप्तान असताना जी वागणुक दिली त्याचि फ़लश्रुति म्हणुन आज त्याला संघात कस्पटासमान वागणुक मिळतेय. असो. खोलात शिरुन काहि उपयोग नाही. मला क्रिकेट मधिल जास्त काहि कळत नाहि हे मी मान्य करते पण कणेकरांनी म्हटल्या प्रमाणे "भारत हा एक असा देश आहे जिथे क्रिकेट मधिल सगळ्यांना सगळ कळत". मग यात मी तरी मागे कशी राहणार? विनोदाचा भाग सोडुन द्या.पण कुणाच्याहि भावना दुखवण्याचा माझा अजिबात हेतु नव्हता. तसेच संघाचा पराभव झाला असता ज्या तिव्र प्रतिक्रिया क्रिकेट प्रेमींकडुन येतात त्याबद्दल देखिल मी माझा निषेध नोंदविला आहेच. कारण घरट्यातुन बाहेर पडलेल्या पक्षा प्रमाणेच,घराबाहेर किंबहुना घरापासुन बरेच दुर असलेल्यांना घराची आणि घरातिल सदस्यांचि किति काळज़ी लागुन राहते हे तुम्ही आणि आम्ही परदेशी वास्तव्यास असल्या कारणाने समजु शकतो. माझ्या पोस्ट मुळे जर कुणी दुखावले असेल तर मी क्षमस्व आहे. आज गुढिपाडव्याच्या शुभमुहुर्तावर आपल्या संघाने(बर्मुडाचा संघ का असेना?)दैदिप्यमान यश संपादित करत आणि विश्वविक्रम करत आपला विजय नोंदविला हे कारण समस्त भारतियांना आनंदोत्सव साजरा करण्यास पुरेसे नसावे काय? चु.भु.द्या.घ्या. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Deshi
| |
| Monday, March 19, 2007 - 9:51 pm: |
| 
|
अहो जयमहा. झक्की काकानी तुमची उगीच खेचून पाहीली पण तुमचे उत्तर अगदी समपर्क आहे.
|
Zakki
| |
| Monday, March 19, 2007 - 10:24 pm: |
| 
|
जयमहाराष्ट्र, मी लहान असल्यापासून, म्हणजे तुमचे बाबाहि कदाचित् जन्माला आले नसतील, तेंव्हापासून लोक हे असेच. लेकाचे स्वत:ला शहाणे समजतात नि प्रत्यक्ष मैदानावर खेळणार्या, अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या, अश्या खेळाडूंच्या चुका, त्याहि सामना हरल्यावर सांगतात. म्हणून मला नवल वाटते की या लोकांना बाहेरून जर एव्हढे समजते, तर प्रत्यक्ष मैदानावरच्या खेळाडूंना का ते समजत नाही? आज तुम्ही समोर दिसलात, म्हणून तुमच्यावर घसरलो एव्हढेच. बाकी काही नाही. इथे बेसबॉल मधे न खेळणारा मॅनेजर केंव्हाहि उठून मैदानात येतो नि पिचर बदलतो, खेळाडूंनी काय करावे, कुठे उभे रहावे, वगैरे सांगतो. इथल्या फूटबॉलमधे अगदी प्रत्येक खेळीच्या आधी मॅनेजर ठरवतो कसे खेळायचे ते. तशी सोय क्रिकेटमधे का नाही?
|
Nanya
| |
| Monday, March 19, 2007 - 11:05 pm: |
| 
|
झक्की काका, तशी सोय cricket मध्ये नाहि म्हणुनच cricket ची मजा आहे. न खेळणारी व्यक्ती आत येउन सुचना करणार असेल तर, captain चा काय उपयोग? tension मध्ये असुनही शान्त डोक्यने विचार करु शकणाराच चान्गला captain होतो. आणि अश्या वेळि केलेल्या चुकामुळे तर game मध्ये अनिश्चितता राहते. आणि तिच तर cricket ची मजा आहे.
|
Mukund
| |
| Tuesday, March 20, 2007 - 6:40 am: |
| 
|
मनोज.. तुमचा उद्वैग मी समजु शकतो पराभवानंतर.. पण भाषा जरा जपुन वापरा... अशा मुळेच बिचार्या धोनीच्या घराची तोडफोड झाली.. हे अतिशय वाइट आहे. सामन्यात काय चुका झाल्या त्याचे विवेचन होउन द्या.. दगडफेक करुन,पुतळे जाळुन काय साध्य होणार आहे? खेळ आहे.. हार जीत व्ह्यायचीच.खासकरुन एक दिवसिय सामन्यात अशे अपसेट्स होउ शकतात. आपणही १९८३ मधे विंडीजच्या बलाढ्य संघाला हरवुन विश्वकरंडक जिंकला होता.. तेव्हा आपला संघही विंडीजच्या समोर बांगला देशा सारखाच होता. म्हणुन वेस्ट इंडीज मधे कोणी विव्ह रिचर्ड्स चे किंवा क्लाइव्ह लॉईडचे घर फोडुन जाळले नाही.... आज ते त्यांच्या लौकीकाला साजेसे खेळले पण प्रतिस्पर्धी संघ हा हौशी खेळाडुंचा होता हेही लक्षात ठेवा... नाहीतर उद्या परत धोनीचे घर फोडणारीच माणसे हातात "भारत आता विश्वविजेता होणार!" अश्या पाट्या घेउन नाचतील( क्रिक इन्फ़ो वर सिधार्थ वैद्यनाथन म्हणतो त्याप्रमाणे) द्रविडने सेहवागचा फासा टाकायचाच ठरवले आहे... त्याला काल यश आले.. अगदी भरभरुन.. पण मी अजुनही म्हणेन की सेहवागला खेळवणे हा जुगारच आहे. त्याच्या क्षमतेबद्दल वादच नाही There is no pleasure greater than watching Sehwag when he is in his all out distructive mode.... पण फ़ॉर्म आणी त्याच्या ऍटीट्युड मुळे त्याला घेणे जुगार वाटतो. जुगाराप्रमाणे त्यात द्रविडला(म्हणजेच भारतीय संघाला) एकदम जॅकपॉट पण लागु शकतो किंवा दिवाळखोरी पण येउ शकते. त्यातले नेमके काय होते ते या शुक्रवारी समजेलच. Dravid is ready to roll the dice with Sehwag and he is ready to gamble with him in the hope of hitting a big jackpot...hope for the sake of millions of passionate fans in India..his gamble pays off..not only pays off but pays off handsomly...lets see. गांगुली व युवराज असेच फ़ॉर्म मधे राहीले व तेंडुलकर जर त्याच्या मुळच्या आक्रमक व्रुत्तीला जागुन खेळला तर भारत अजुनही सुपर ८ मधे जाउ शकेल. काल तेंडुलकरला आक्रमक खेळताना कधीही असे वाटले नाही की त्याचे रिफ़्लेक्सेस कमी झाले आहेत... मला हेच कळत नाही की गेल्या ३-४ वर्षात कोणी त्याच्या डोक्यात भुत शिरवले आहे की त्याने आता वेगळ खेळल पाहीजे..त्याच्या मुळच्या व स्वाभावीक आक्रमक व्रुत्तीला आळा घातला पाहीजे वगैरे वगैरे.. He is at his best when he is in attacking mode. Defense is very unnatural for him. He should be allowed to play his natural game to get the best out him...he still has the reflexes to be a fierce attacker. In fact he looks very awkward and slow when he plays defense...because that is not his natural game.. या शुक्रवारी चांगले खेळुन आपला विजय व्हावा हीच मनापसुन इच्छा... तेंडुलकरच्या रेस्युमे मधे वर्ल्ड कप ची भर पडुन त्याची रेस्युमे व कारकिद्र सगळ्या द्रुष्टीने पुर्ण व्हावी ही माझी इच्छा आहे..
|
झक्किकाका, माझ्या अंदाज जर चुकत नसेल तर तुम्हि कदाचित माझ्या वडिलांच्याच वयाचे असाल.(१९३७ चा जन्म होता त्यांचा आज ते हयात नाहित). असो आपल्या संघाने काल झालेल्या सामन्यात फ़ार छान कामगिरि केली मी त्यातच समाधान मानते. काल चक्क सेहवागने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविला आणि त्याला त्याच फ़लंदाजितला हरवलेला सुर गवसला. सचिनने देखिल उत्तम खेळ करुन दाखवला.तात्पर्य काय तर काल सगळ्यांनी सांघिक खेळ करुन यश संपादन केले. आता सुपर ८ मधे जाण्याचे दिव्य पार पाडण्यास जास्त त्रास पडणार नाही अशी आशा करायला वाव आहे. पण उगिच हुरळुन जाण्यात काहि अर्थ नाही कारण श्रीलंका आणि बांगलादेश यांच्या निर्णायक सामन्यावर आपले भवितव्य अवलंबुन आहे. उगिच आत्तापासुन उड्या मारायच्या आणि मग जर काही उलटफ़ेर झालाच तर आत्ता जी जनता खेळाडुंवर स्तुतिसुमनांचा वर्षाव करते आहे तिच्याच हाती एखादा दगड येण्यास वेळ लागणार नाहि. असो निराश न होता पुढे जे होइल ते आपल्या भल्याचेच असेल अशी आपण आशा करु या. चला! आज माझी अक्कल पाजळण्याचा कोटा पुर्ण झालाय. लगे रहो जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Zakki
| |
| Tuesday, March 20, 2007 - 10:20 am: |
| 
|
जयमहाराष्ट्र, तुमच्या वडिलांबद्दल वाचून वाईट वाटले. ते माझ्यापेक्षा थोडेसेच मोठे होते. त्यामुळे आता लवकरच मी पण त्यांना भेटायला जाईन, नि मग मायबोलीवरचे ग्रहण सुटेल.
|
Mansmi18
| |
| Tuesday, March 20, 2007 - 2:18 pm: |
| 
|
मुकुन्द, तुम्हाला माझ्या लिहिण्यातला उपरोध कळला नाही. (मला लिखाण सुधारावे लागणार माझा रोख आपल्या खेळाडुन्वर होता. थोडा दणका मिळाल्याशिवाय आपले खेळाडु सुधरत नाहीत. (अर्थात त्यासाठि हिन्सा किन्वा जाळ्पोळ अयोग्यच आहे). धन्यवाद.
|
Deshi
| |
| Tuesday, March 20, 2007 - 2:38 pm: |
| 
|
कालच्या match मध्ये काय आवडले? १. विरू ची batting २. युवराज ची batting ३. सचिन चा आक्रमकपणा ४. द्रविड नी वा टिम mgt नी केलेला क्रमातिल बदल.
|
Zakki
| |
| Tuesday, March 20, 2007 - 3:05 pm: |
| 
|
एक राहिले ना! आपण जिंकलो! सगळ्यात महत्वाचे तर तेच.
|
आज तुम्ही समोर दिसलात, म्हणून तुमच्यावर घसरलो एव्हढेच. बाकी काही नाही. >>>>> आज घसरायला किमान तुम्ही समोर तरी दिसलात. एरव्ही याना घसरायला समोर कोणी असण्याचीही गरज नसते. की बोर्डला बोटे लागली की हे कोणावरही घसरू लागतात.......
|
भारतिय संघाचे वैशिष्ट्य म्हणजे माज आणि बेफिकिरी! मग ते हरताना असो अगर जिंकताना. लाजिरवाणी हार होत असली तरी त्यांच्या चेहर्यावरचा माज आणि बेफिकिरी कधीच लुप्त होत नाही. त्यांची खेळावरील निष्ठा कधीच जाणवत नाही. बांगला देश आणि बर्म्युडाचे संघ खेळताना त्यांची उत्स्फूर्तता आणि innocence enjoy केला. बर्म्युडाने तर हरे पर्यन्त कधी दिल टाकलय असं वाटलं नाही. आपली मात्र हरताना body language खेटरं मारल्यासारखी असते. ७० वर्षांची परम्परा असणार्या संघाने दोनेक वर्षाचा क्रिकेट इतिहास असणार्या संघावर मिळविलेल्या विजयाने ज्याना हुरळायचे असेल त्यानी हुरळावे पण बर्म्युडावाले केविलवाणे कधीच वाटले नाही. कदाचित त्याना गमवायचे काहीच नव्हते असे म्हणता येईल. आपल्याकडे हरले की जाहिरातीची contracts गमविण्याचा धोका फार मोठा असतो. अब्रू तर गमविण्याचा प्रश्नच नाही. ती नाहीच आहे. भारत सुपर ८ मध्ये येत नाही हे पाहिल्यावर सगळ्यात मोठा पोटात गोळा आलाय तो जाहिरातदारांच्या आणि चॅनेल वाल्यांच्या. त्यांचे सगळे आर्थिक नियोजनच कोसळले आहे. कालच मी याची चिन्ता करणारे फिचर वाचले. लोकाना चीड येऊन घरावर हल्ले चढवतात त्याचे कारण हा माज आणि बेफिकिरी हेच आहे. समोरच्या संघाने ३०० धावा काढल्यात आणि यांनी अटितटीने जिगरबाज रीतीने खेळून पाच दहा रनने हरले असे कितीही पराभव झाले तरी कोणी रागावणार नाही. अशा खेळाने किमान nail biting खेळाचा आनन्द तरी मिळतो. पण यांची हरण्याची पद्धत इतकी संतापजनक असते की त्यामुळे लोक चिडतात.. पुन्हा त्यावर समर्थन असे की गोलंदाजानी अधिक चांगली बोलिंग करायला पाहिजे होती किंवा फलंदाजानी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. आणि आम्ही काही महत्वाचे झेल सोडले इत्यादी इत्यादी... (असे ऐकल्यावर माझ्यातरी हातात पायताणच येते बुवा...) आवडला आपल्याला बर्मुडाचा आनि बांगला देशाचा संघ आणि त्यांचे स्पिरिट आवडले....
|
रोबिनहूडला माझे १०० टक्के अनुमोदन.
|
Zakki
| |
| Tuesday, March 20, 2007 - 6:18 pm: |
| 
|
पुन्हा त्यावर समर्थन असे की गोलंदाजानी अधिक चांगली बोलिंग करायला पाहिजे होती किंवा फलंदाजानी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. आणि आम्ही काही महत्वाचे झेल सोडले इत्यादी इत्यादी... नशीब प्रेक्षकांनी काही करायला पाहिजे होते ते केले नाही म्हणून आम्ही हरलो असे म्हणत नाहीत. खरे तर इथे तुमची Home team नसेल नि तुम्ही हरलात तर खुशाल सांगतात, प्रेक्षकांनी होम टीम ला जास्त प्रोत्साहन दिले, नि आम्हाला नाही, म्हणूनहि आमचा खेळ नीट झाला नाही!
|
नशीब प्रेक्षकांनी काही करायला पाहिजे होते ते केले नाही म्हणून आम्ही हरलो असे म्हणत नाहीत.>>>>> बोवाजी, ह. ह. पु. वा!!!
|
Atul
| |
| Wednesday, March 21, 2007 - 8:53 pm: |
| 
|
आजचा लन्केचा खेळ पाहता, आपल्या हिरोन्नी ब्यागा भरायला सुरवात करायला पाहिजे
|
Farend
| |
| Wednesday, March 21, 2007 - 9:53 pm: |
| 
|
या विकेट्स वर लंका डेंजर वाटते, नाहीतर याच टीम ला आपण भारतात एकदा ६-१ आणि एकदा २-१ हरवले आहे. आगरकर ऐवजी पठाणला आणायला पाहिजे असे वाटते, जरी आगरकर श्री लंकेविरुद्ध चांगला बोलिंग करत असला तरी, कारण आत्ता तो फॉर्म मधे वाटत नाही, आणि पठाण डावखुरा आहे, कदाचित त्यांच्या स्लो बोलर्स विरुद्ध चांगला खेळेल. ३-४ क्रमांकावर एकदम ४०-५० मारून जाऊ शकतो.
|
अखेरीस बॉब वुल्मर यांचा मृत्यु नैसर्गिक नसुन त्यांची हत्याच केली गेली हे सत्य बाहेर आलेच. क्रिकेट सट्टेबाजीने वुल्मर यांचा बळी घेतला असे बोलले जातेय. हे कृत्य कुणी केले हे क्रिकेट्प्रेमिंना खरच कधि कळु शकेल का?ह्या बद्दल जरा शंकाच आहे. पण या सगळ्यामधे एका गुणी भुतपुर्व क्रिकेट्पटुचा हकनाक बळी घेतला गेलाय याचे शल्य जास्त आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|