|
Zakki Saturday, March 17, 2007 - 5:26 pm: बंगलादेशचा भारतावर ५ गडी राखून विजय. अनेक धन्यवाद. बघितले, सापडले, संतोषलो! >>>>>> पहा हे भारतद्वेष्टे झकी बोवा!! ! भारताच्या पराभवाने त्याना कसा संतोष झाला आहे!!. अरे अरे! कुठे फेडाल हे देशद्रोहाचे पातक!!! हटकेश्वरा बाबा आता तूच रे वाली!!!!!!!!!!!!!! !!!
|
बांगला देशाबरोबर झालेली मॅच सम्पल्यावर मी कागद घेऊन भारतीय संघातील काढून टाकण्याच्या खेळाडूंची यादी करायला बसलो. एक एक प्लेयर काढता काढता फक्त दादासाहेब गांगुली शिल्लक राहिले. मग मी त्याला खूप slow खेळल्याबद्दल काढून टाकले अन आपल्या नेहमीच्या कामाला निघून गेलो!!!!!!
|
Muks77
| |
| Sunday, March 18, 2007 - 7:46 am: |
| 
|
(probabale)headline after india -bermuda match....INDIA STUN BERMUDA by defeating them!!!!!
|
Aaspaas
| |
| Sunday, March 18, 2007 - 9:11 am: |
| 
|
आता आपल्या गटातल्या [गट ब]लढती चुरशीच्या आहेत भारताला सु ८ साठी तीनही सामने जिम्कणे महत्वाचे, श्रीलंकेला भारता विरुद्ध जिंकणे महत्वाचे आहे त्यामानाने बांगलादेशला एक सामना जिंकलातरी सु ८ मधे शक्यता जास्त तिकडे गट ड मधे विंडीज सु ८ मधे जाणारच आणि पहिल्या स्थानावर, पाकिस्तान बाहेर असल्यामुळे आयर्लंड सु ८ दुसरे स्थान गट क मधे इंग्लंड केनियाच्या लढतीवर अवलंबून सु ८ मधे आजतरी गट अ ऑस्ट्रे व द अफ्रिका ब क न्युझी, ? ड विंडीज, आयर्लंड
|
Zakki
| |
| Sunday, March 18, 2007 - 12:58 pm: |
| 
|
उगीच काहीतरी मूर्खासारखे बोलून इतरांची वैयक्तिक बदनामी करायचा प्रयत्न करू नका, रॉबिनहूड! अनेक धन्यवाद. बघितले, सापडले, संतोषलो! या साध्या वाक्यात तुम्हाला भारतद्वेष कुठे दिसला? काल संध्याकाळी सामना संपताना मी पी सी वर धावफलक बघत असता अचानक नजरेला आले की भारताचा पराभव झाला आहे. म्हणून लगेचच बातमी म्हणून लिहीले. त्यात लगेच तुम्हाला भारतद्वेष कसा दिसला? जिंकणारे जिंकले, हरणारे हरले. मला आनंद किंवा दु:ख झाल्याचे मी म्हंटले का? उगीचच? तुमचे भारतप्रेम काय मोठे उतू जातेय. संघाला दिलासा द्यायचा, पुढील विजयासाठी आशा बाळगायची की लगेच वडाचे तेल वांग्यावर काढल्यासारखे जो दिसेल त्याला शिव्या घालून त्याची बदनामी करायची?! आता तुमच्यासारख्यांनी काऽहीहि लिहीले इथे तरी मला काडीचाहि फरक पडत नाही! उगीचच तुमचा मूर्खपणा जाहीर होतो, नि ज्यांना तो कळला नसेल त्यांच्यासाठी मी बापडा परत सांगतो. एव्हढेच. या असल्या अत्यंत आचरट, मूर्ख, लोकांपायीच भारतापासून दूर राहिलेले बरे वाटते! द्वेष, असूया वगैरे ज्याची करायची त्याची सुद्धा लायकी लागते. फालतू माणसांचे द्वेष नाही करत कुणि! चांगले आहेत ते कुठल्याहि देशात चांगलेच. जे तुमच्यासारखे आहेत त्यांच्यामुळेच भारतासारखा एकेकाळी सर्वश्रेष्ठ असलेल्या भारतातून लोक परदेशात जाऊन राहू लागले, आमच्या काळी.
|
युवराज शेखर - मी या आधी काही प्रेडिक्शन्स केले आहेत पण warm-up मॅचेसचे निकाल पाहता 'ड' गटात असलेला आयर्लंड संघ कदाचित कमाल करू शकतो. कमाल आहे बुवा तुमच्या भाकिताची. तुमची बत्तीशी आयर्लंडने खरी करून दाखविली. तुमचे भारताबद्दल काय भाकीत आहे? आपण पुढच्या वीकएंडला परत येणार का पुढच्या फेरीत पोचणार? इंझमानचं दुर्दैव. १९९२ मध्ये त्याच्यामुळे पाजीस्तानल विश्वचषक जिंकता आला. त्याला आता लाजिरवाण्या अवस्थेत परतावं लागतय. बहुतेक आता तो निवृत्ती जाहीर करेल. नाहीतर त्याची हकालपट्टी होणार हे नक्की. पोवार, गंभीर इ. भरात असलेल्या खेळाडूंना न घेता सेहवाग, हरभजन इ. भरात नसलेल्या आणि निरूपयोगी लोकांना घेऊन भारताने काय मिळविले? अब्रू गेलेली आहेच. निदान आता तरी पुढचे दोन सामने जिंकून पुरते वस्त्रहरण तरी वाचवावे.
|
पोवार, गंभीर इ. भरात असलेल्या खेळाडूंना न घेता सेहवाग, हरभजन इ. भरात नसलेल्या आणि निरूपयोगी लोकांना घेऊन भारताने काय मिळविले?>>>>> असे आपल्याला उगीच वाटते. गम्भीरही संघात असताना त्याने काय दिवे लावले? हे फक्त रणजीत फालतू बोलरपुढे खेळून आश्वासक वातावरण तयार करतात. संघात घेतले की पाट्या टाकतात. आता आगरकरला घ्या घ्या म्हणून कंठशोष चालला होता काय केले त्याने. कसले अनुभवी.? बोथट झालेत सगळे बोलर सगळ्यानी त्यांच्या बोलिंगचे इन्गित ओळखले आहे. त्या तिथे पलिकडे मुरली बघा! अजूनही कसा सगळ्याना नाचवतोय! तेंडुलकर कसला असह्य कुंथतो सध्या! म्हणे तो जबाबदारीने काळजीपूर्वक चेन्डू जोखून खेळतोय... हूँ!
|
पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वुल्मर यांचे दुःखद निधन झाले आहे. आपल्या हॉटेलच्या रुम मधे ते बेशुद्ध अवस्थेत सापडले. पाकिस्तानचा पराभव ते सहन करु शकले नाहित आणि ह्रुदयविकाराने त्यांचे निधान झाले असे बोलले जात आहे. असे हि घडु शकते यावर विश्वास ठेवणे कठिण जाते आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो हिच प्रार्थना. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
मला नाही वाटत नुसते ऋद्यविकार याचे कारण आहे.
|
Mukund
| |
| Sunday, March 18, 2007 - 10:16 pm: |
| 
|
आसपास... क्षमा कर..पण कुठल्या गटातुन कोण पहिला येईल याची भाकित अजुन तु करण्याच्या मनस्थितीत आहेस?...मला तर त्यात काहीच स्वारस्य वाटत नाही आता... निदान आज तरी.. कदाचीत २ दिवसांनी बाकीच्या संघांचा विचार करीन... सध्या तरी डोक्यात बर्याच विचारांचे थैमान आहे... माझ्या जवळच्या एका ख़्रिकेटप्रेमी व्यक्तीची इ मेल मला काल आली. अतिशय निराश झाली होती कालच्या पराभवाने. तिला मी पाठ्वलेल्या उत्तराच्या इ मेलमधला काही भाग इथे मला जसाच्या तसा लिहावासा वाटतो... माफ़ करा तो भाग इंग्लिश मधे आहे... Now coming back to the e mail you sent me and India's loss against highly improved Bangla Deshi team. I completly understand the state of your mind..believe me...my heart is bleeding too..and my brain is numb....trying to comprehend the logic and mindset of so called stalwarts in Indian cricket team.....it made no sense what so ever.....in Indian teams approach and execution of plan..(I wonder..if they had any paln at all!) .They looked like going thro motions..with huge burden on their head.,with shackles in their feet...without any spark,imagination,plan,intent,aggression,will,desire....the list of such adjectives is long.........only one word best describes their performance( Or I should rather say..nonperformance!)..PATHETIC......no other word for such a shambolic display of cricketing skills.... If you ask me...unless Tendulakar/Dravid lift their game dramatically to very high level and carry India thro to super 8(highly improbable thing at this time!) its time for these players to step down....they are giants of Indian cricket..they performed admirably in the past.. they have given their blood and sweat to our country...they have reached to the dizzing heights of Individual records...but I am afraid their glorious days are behind them..more often than not..they look like Old Lion king....now toothless and weak...they lack the burning passion, they lack the fire in the belly..like you saw in those young Bangla Deshi kids...they lack the imagination and plan....they look spineless and purposeless...unable to show aggression,unable to turn on the extra fire power at will.... which they used to do it with regularity. Now they show that divine spark and talent in them..not as a rule... but as an exception...hence it is time for them to pass the battan to younger players with fire in belly...like Chiteshwar Pujara and Manoj Tiwari... xxxxxx...I understand your frustration and depression.....but dont blame yourself for that...those players has to take the blame by coming forward....I started hating Dravid now for making obvious statements in post game interviews.......He lacks the passion and imagination...always talking with monotonous tone about plans,process,flexibility and execution.....but hardly you see that in reality.....always .....we have a process..we have to execute.blah blah blah....and we have to put fielders strategically to hide older and useless fielders...and what do you see against Bangla Desh? Munnaf Patel...for Gods sake..THE WORST FIELDER in our side at covers.....AT COVERS?....is that a strategic plan? unbelievable......I am feeling sick in my stomach WITH HIS STRATEGIC FIELDING PLACEMENT.........Also he wants to take the country down to the bottom ....with his bonehead decision to take Sehwag in the team..and to crown his quixotic decision.. his stupidity...he puts him in the opening slot!..ahead of in form Uthaappaa!......and what happens? ..results were there to see yesterday against Bangla desh...half back foot..half front foot..not a cut..nor a drive..a very awkward ,pathetic,ridiculous shot..to get himself bowled out......unbelievable....really.... I agree with you about Inzumaam...I dont like Pakistan team..but I do like and respect Inzi...very relaxed, royal batsman...he always makes batting look so easy...hence he is great in my book...any time a sportsman makes game look easy....he is great(Tiger Wood,Roger Federer are 2 other exapmples of such great sportsmen). He didnt deserve such a bad farewell..and adding to that.....tragic death of Bob Woolmer today..their Coach.....who died probably with extreme sorrow and depression after shocking exit from the world cup.....Very Sad and Tragic indeed! आता या पुढच्या दोन सामन्यात सचिन,द्रविड यांनी आपला खेळ उंचावुन त्यांच्यात असलेली क्षमता व त्यांच्या नावाच्या दबदब्याला जागुन खेळले तर मला अतिशय आनंद होइल..कारण मीही गेली कित्येक वर्षे त्यांचा खरा चाहता आहे..म्हणुनच कालच्या सारखा त्यांचा खेळ बघुन खुप वाइट वाटले. त्या तळतळीतुनच मी वर लिहिले आहे. Hope they and rest of the Indian players live up to their great individual past and collectively save India from an ignominious exit from this world cup.. world cup for which millions of Indian cricket fans like me were waiting eagerly for 4 years for one reason...to see our great heroes like Sachin,Dravid,Kumble and Ganguly exit from the world of cricket as world cup winners.....a perfect way to drop a curtain to the glorious act they performed for Indian cricket for so many years...and to see them take a grand exit with one final bow.. with world cup in their hands. Just like Inzi ..these stalwarts of Indian cricket team do not deserve a humiliating exit from the grand stage of this wonderful game.....
|
I stared hating Dravid now>>> Couldn't agree any more. Not as a player but as a capton. And Common he was batting like what my 4 yr daughter does with bat. Ball was going elsewhare, he was somewhere. मुनाफ पटेल च्या पहिल्या स्पेल मध्ये असे वाटत होते की आपण जिंकू. तर या द्रवीड बाबा ने त्याला बदलले. का? याचे ऊत्तर त्याला द्यायला पाहीजे? बर सर्वांना आपली गेल्या वल्ड कप ची शेवटची match आठवते का? हो तिच ती फायनल. त्यातली आपल्या ग्रेट झहीर खानची बॉलींग आठवुन पाहा. कशी शॉट पिच, ओव्हर ईंन्थू टाकत, जोरात होता अगदी तशीच सेम त्याने काल टाकली. प्रत्येक बॉल मस्त bat वर येत होता. कहर म्हणजे पहील्या ३ ओव्हर आगरकर ने टाकल्यावर त्याला थांबवला पण झहीर ला नाही. का? अरे गेल्या वेळेस च्या चुकीतून सुधरा की. झहीर ने गेल्या match मध्ये जे चालु केले ( Aus Final ) तेच त्याने अगदी प्रेमाने कंटीन्यु केले. बांगलादेश चांगला खेळला असे म्हणने अतिश्योक्ती होईल ( bating करताना). या घोळात मुनाफ पटेल दबावाखाली न येता खेळत होता असे वाटले.
|
Mandard
| |
| Monday, March 19, 2007 - 6:55 am: |
| 
|
In last world cup "Man of the Series" Sachin failed in the final. This is our bad luck that Sachin never delivered when India was really needed. (except 1996 Sharjah). For all that matter all our heros are like this. You can see their concentration & hard work while filming the ads for Nike.
|
केदारजी, राहुलच्या captaincy बद्दल आता मलाही राग येत आहे. फ़िल्डिंग लावतना नक्की काय विचार केला होता. हरभजनचा बॉल वळत असताना.. परत जहीर का आणला? जहीर एक्स्ट्रा चे डॉस देणे केव्हा सोडणार? सेहवाग ला बाहेर बसवण्यासाठी त्याने काय करणे गरजेचे आहे? आणि दादाने कप्टन होण्यासाठी अजून काय केले पाहिजे? he is vary good captain.. तो न बोलता काम करतो. त्याच्यामधे दुसर्याकडून खेळ खेळवून घ्यायची क्षमता आहे. भिंत असण्यापेक्षा मैदानात खेळाडूवर ओरडणारा कप्टन केव्हाही चांगला...
|
अपेक्षेप्रमाणे इंझमानने एक दिवसीय सामन्यांतून निवृत्ती जाहीर केली. २००३ च्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारताला हॉलंडने फेस आणला होता, तर दुसर्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात भारताचा डाव केवळ १२५ धावात आटोपला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती व्हावी अशी इच्छा आणि अपेक्षा आहे. पुढच्या दोन सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवावा. उथप्पाच्या ऐवजी दिनेश कार्तिक आणि हरभजनच्या ऐवजी कुंबळेला आत आणावे.
|
Imtushar
| |
| Monday, March 19, 2007 - 9:19 am: |
| 
|
Being scared is not going to help us - Chappel http://content-uk.cricinfo.com/wc2007/content/current/story/285968.html म्हणजे आता चप्पल गुरुजींचे असे म्हणणे आहे, की आम्ही घाबरलो आहोत???? मुळात आम्हाला लाज वाटायला हवी... Chappell did not rule out changes to either the batting order or to personnel. Indications are that Sachin Tendulkar, who has batted in the middle order since the start of this year, will join Sourav Ganguly at the top of the order अरे... विंडीज मधी खेळपट्ट्यांचा विचार करता, आपल्याला अनुभवी आणि तांत्रिकदृष्ट्या निर्दोष आघाडीवीर हवेत. क्र. २ आणि ३ वर सेहवाग आणि उथप्पा आपल्या पाटा खेळपट्ट्यांवर चालतील तिथे नव्हे... Chappell did not rule out changes ... बदल try out करण्यासाठी आपण श्रीलंका आणि विंडीज सोबत मालिका खेळलो, मग २ सराव सामने होते... आता बदल करणे म्हणजे panic button दाबणे आणि आपण खरच घाबरलोय यावर शिक्कामोर्तब करणं. आणि अर्थातच पराभवाचा शिल्पकार असलेल्या द्रविड बद्दल काय बोलावं... पटेल कव्हर्स मध्ये! आणि ज्या पद्धतीने साहेब गोलंदाज हाताळतात त्याबद्दल काय बोलावे... हरभजन ने पहिली ३ षटके चांगली टाकल्यानंतरही त्याचा end बदलला... त्यानंतर आगरकर ला परत बोलावले, तेही ज्या बाजूने पटेल ने ६ उत्तम षटके टाकली त्याबाजूने नव्हे... फ़िरकी उत्तम पडत असतानाही (सर्वांचे मिळून 13-1-37-1 ), दुतर्फ़ा फ़िरकी मारा सुरू केला ३७ व्या षटकात. सेहवाग आला ३८ व्या षटकात. क्षेत्ररक्षणाच्या मांडणीत ना कुठे कल्पकता दिसली ना नाविन्य, ना आक्रमकता... आणि अगदी common sense सुद्धा नाही.... आपण श्रीलंकेला कुठल्या जोरावर हरवू हे समजत नाही...
|
असे समजतेय कि नाणेफ़ेक जिंकुन प्रथम गोलंदाजि घेण्याचा सल्ला सौरवने राहुलला दिला होता पण तो झुगारुन त्याने प्रथम फलंदाजिचा निर्णय घेतला जो सर्वस्वि चुकिचा होता. हे पुढे आपण बघितलेच.भारतिय संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा सौरव कडे सोपवणे जास्त श्रेयस्कर ठरेल. तसेच गोलंदाजित बदल करताना सचिनच्या हाती राहुलने चेंडु सोपवला तो पर्यन्त खुप उशिर झाला होता.याला शुद्ध मराठीत "बैल गेला आणि झोपा केल्या" असे म्हणतात. पण तरिहि क्रिकेट्प्रेमिंनी खेळाडुंच्या घरांवर हल्ला करणे गैर आहे. अश्या प्रकारच्या घटनांची परिणिति कुणाचा तरि जीव जाण्यात देखिल होवु शकते हे आपण बॉब वुल्मर यांच्या निधनाने बघितलेच आहे तेंव्हा संयम राखणेच जास्त योग्य ठरेल. नविन वर्षाच्या शुभमुहुर्तावर कदाचित आपला संघ नेत्रदिपक कामगिरि करेल अशी अपेक्षा करु या. राखेतुन भरारि घेणार्या फिनिक्स पक्ष्या प्रमाणे आपला भारतिय संघ पुन्हा एकदा भारारी घेवुन दैदिप्यमान यश मिळावो हिच सदिच्छा! जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Mansmi18
| |
| Monday, March 19, 2007 - 11:43 am: |
| 
|
नमस्कार सर्वाना नववर्शाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या मनात एक विचार येउन गेला. कशावरुन हा सामना आपण मुद्दाम हरलो नाही? बान्ग्लदेशला बेटिन्ग्चे "ऑड्स" खुप असतील. म्हणजे भारताचे चान्सेस जर "१:३" असतिल तर बान्ग्लादेशचे "१:१०" असतिल. या खेळान्वर कोट्यवधी रुपयाचे बेटिन्ग होत असते. एखादा सामना हरुन जर काही फ़ायदा होत असेल तर ते का करणार नाहीत? (देव करो आणि माझा अन्दाज चुकिचा असो). मी सामना पाहिला नाही. कोणी पाहिला असेल तर सान्गेल का..बान्ग्लादेश चान्गले खेळले का आपण वाइट खेळलो? धन्यवाद.
|
Imtushar
| |
| Monday, March 19, 2007 - 12:09 pm: |
| 
|
आपण खूपच वाईट खेळलो... मला तर आता असं वाटतंय की चप्पल ला कुणीतरी भारतीय क्रिकेटची सुपारी दिली आहे, नाहीतर मागच्या WC पेक्षा (कागदावर) चांगला भासणारा संघ असा कसा ढेपाळला?
|
Zakki
| |
| Monday, March 19, 2007 - 2:29 pm: |
| 
|
लोक उथ्थप्पा ऐवजी सेहवागला का आघाडीला पाठवले म्हणून रडत होते. आता घ्या. उथ्थप्पा आघाडीला! पूर्ण एक षटक काही खेळला नाही! चार चेंडूत बाद होऊन परत तंबूत. आता इडली सांबार खात नि (फुकट मिळणारी) बीअर ढोसत बसेल. असो. मला तर manasmi18 च्या बोलण्यात बरेच तथ्य वाटते. शेवटी सगळे राजकारणी पैसे खाऊन देश विकायला निघाले आहेत, मग क्रिकेट खेळणार्यांनी का करू नयेत थोडे पैसे? अगदीच बोंबा बोंब झाली तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध जरा बरे खेळायचे. तिथे काही मॅच जिंकण्याचा संभवच नसतो. शिवाय आधीपासून सांगून ठेवले आहे, ऑस्ट्रेलिया बलाढ्य संघ आहे म्हणून, आता बोलू नका हरलो आम्ही तर!
|
Chyayla
| |
| Monday, March 19, 2007 - 4:43 pm: |
| 
|
मायबोलीकरान्नू ही घ्या पर्वणी अगदी फ़ुकट आहे ऑनलाईन क्रिकेट म्याच पहायला... करा मजा लेकहो... http://www.seo-india.org/
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|