द्रविड आणि सेहवागच्या विधानात काहीच चुकीचं नाहीये उगाचंच आमचा संघ जिंकेल अशी फ़ुशारकी मारण्यात काय अर्थ आहे? आणि कितीही म्हटलं तरी ऑस्ट्रेलिया आजही तितकाच लढवय्या संघ आहे आणि याविश्वचषकासाठी तेच फ़ेव्हरिटस आहेत.एक ब्रेट ली किंवा सायमंड्स संघात नसला तरी ते तितकेच धोकादायक आहेत आणि लालभाई सेहवाग हा संघाचा उपकर्णधार नसून सचिन हा भारताचा उपकर्णधार आहे.
|
Zakasrao
| |
| Tuesday, March 06, 2007 - 4:24 am: |
| 
|
काव आणायची मंडळी कधी कधी अगदी पुस्तकी अतिशुद्ध शब्द! कधी हिन्दी commentary लागेल असं व्हायचं... >>>>>>>> रॉबीनहूड अरे यार ह्या नावात रॉबीन आहे.कही ये samuels वाला रॉबीन तो नही D अहो आज काल हिंदी commentry सुधा खुप बोअर असते. DD वाले फ़ुकटच प्रक्षेपण करतात वर स्टुडिओ मधे बसवून हिन्दी commentry चालु करतात. त्यापेक्षा इंग्रजी commentry परवडते. जितकी कळेल तितकी कळेल. बाकीची गोड मानुन घेता येते. पण हिन्दि पुर्ण कळत तिथेच गोची होते.
|
Farend
| |
| Tuesday, March 06, 2007 - 5:34 pm: |
| 
|
आणि म्हणे भारतात Set Max वर्ल्ड कप दाखवणार आहे. इथे ( US ) सुद्धा डिश वर ते चॅनल दिसते, पण इथे मॅच चे हक्क त्यांच्याकडे नसतील असे वाटते. कारण डिश कडे exclusive rights असल्याने ते एखाद्या चॅनल ला असेच दाखवू देणार नाहीत, पण DirecTV वरून दिसेल का माहीत नाही. कोणाला काही माहीत आहे का? कदाचित मॅच दाखवण्याचे हक्क Set Max ला US मधे नसतील
|
Direct Tv आणि Dish net दोघांनी जाहिराती सुरू केल्या आहेत, $१९९.९० ल पूर्ण पॅकेज म्हणून.. बाकी pay per view type काही Deals असली तर छान होईल पण अजून तरी दिसली नाहीत कुठे..
|
शिवाय आणखी ९.९९ दिले तर नेट वर पाहाता येईल.
|
Asami
| |
| Wednesday, March 07, 2007 - 12:14 am: |
| 
|
कोणी तरी net a/c घेउन मला credentials कळवा बरे
|
असामी तुझे क्रेडीट कार्ड व ऐक्स्परेशन डेट दे आत्ताच a/c घेऊन तुला क्रेडेंशिअल्स कळवतो.
|
पूर्ण Package घेतल्यावर NET-ACCESS FREE आहे... 9.99$ ची गरज नाही.. मी सोमवारी घेतलं. TV वर Holland-IND पाहीली. पण NET ACCESS सुरू करायला 72 तास लागतील.. त्यामुळे घेताना हे लक्षात ठेवा.. Credentials सोपे आहेत, माझं नांव सांगा...
|
Zakki
| |
| Wednesday, March 07, 2007 - 3:25 pm: |
| 
|
अरे पण एव्हढे सगळे घेऊन चार पाच तास मॅच बघत बसायला वेळ कुणाला आहे? त्यापेक्षा जमले तर त्याची सीडी करा नि मला विका. चांगला भाव लावलात तर मी लगेच विकत घेईन. फक्त मॅचमधे भारत जिंकलेला पाहिजे, नि काही चांगली फलंदाजी असेल तरच.
|
Aaspaas
| |
| Wednesday, March 07, 2007 - 5:04 pm: |
| 
|
युवराज, फुशारकी मारण्याचा संबंध नाही. मी काही असे म्हणत नाही आम्हीच जिंकणार म्हणा. कदाचित ते म्हणणारही नाहीत त्यांना त्यांच्या मर्यादा ठाऊक असतीलच. पण एवढ्या मोठ्या स्पर्धेची तयारी आणि पाठीराख्यांच्या आशा घेऊन गेल्यावर तुम्ही म्हणता प्रतिस्पर्धक जिंकणार. मग खेळताच कशाला. मी किंवा कुणीही ऑस्ट्रेलियाला मुळीच कमी लेखत नाही आणि आपला संघ ही दुबळा मुळीच नाही. असे वक्तव्य स्पर्धेच्या ठिकाणी आणि सामन्यापूर्वी चुकीचे आहे. डाव हातातून निसटल्यावर आणि निसटण्यापूर्वीही बर्याचदा आपण असे म्हणतोच की.
|
Adi787
| |
| Wednesday, March 07, 2007 - 5:43 pm: |
| 
|
या बाबतीत सचिन खुप समर्पक बोलला : जर आमच्यात जिंकण्याची कुवत आणी इच्छा नसती तर आम्ही इथे आलोच नसतो, घरी बसलो असतो! सचिन ऑस्ट्रलिया जिंकणार असे कुठे म्हणाला?? तो म्हणाला की, जखमी (डिवचलेली) ऑस्ट्रलिया आणखी धोकादायक ठरु शकते आणी प्रतिस्पर्ध्याला कधिच कमी लेखु नये.. हे त्याचे म्हणणे योग्यच आहे!
|
Farend
| |
| Wednesday, March 07, 2007 - 8:05 pm: |
| 
|
आत्ताच्या warm-up मॅचेस पॅकेज न घेता तशाच दाखवतायत डिश वर.
|
Laalbhai
| |
| Thursday, March 08, 2007 - 12:35 pm: |
| 
|
सचिन तेंडुलकर उपकर्णधार का? छान छान, बघुयात दीड महिन्यानी काय बोलायचे ते.
|
विश्वचषकाचे सर्व संघांचे सर्व सामने दूरदर्शनवर दिसणार का? कोणाला काही कल्पना? फक्त भारताचेच किंवा ठराविकच सामने दाखवले तर मजा नाही. या निम्बसच्या वादात महत्वाचे सामने बुडायला नकोत.
|
निदान आकाशवाणीवर सर्व सामन्यांचे धावते वर्णन तरी असायला पाहिजे.
|
world cup matches onlineबघण्यासाठी चान्गल्या वेब साईट्स आहेत का?
|
Svalekar
| |
| Saturday, March 10, 2007 - 8:43 am: |
| 
|
Me_mastani, www.cricinfo.com var ball to ball comentry dakhvata (Not visualy) check karun paha
|
Asami
| |
| Saturday, March 10, 2007 - 9:11 pm: |
| 
|
http://www.cric20.net/live/index.php साईअट्ची reliability etc माहित नाहि. YMMV
|
मी या आधी काही प्रेडिक्शन्स केले आहेत पण warm-up मॅचेसचे निकाल पाहता 'ड' गटात असलेला आयर्लंड संघ कदाचित कमाल करू शकतो.
|
Karadkar
| |
| Tuesday, March 13, 2007 - 5:26 am: |
| 
|
श्रीकांत चे World Cup वर भाष्य http://www.worldcupwithkrish.blogspot.com/
|