|
Laalbhai
| |
| Monday, March 05, 2007 - 3:19 pm: |
|
|
संघाचे द्वितीय सरसघचालक श्री. गोळवलकर गुरुजी ह्यांची जन्मशताब्दी २ आठवड्यापूर्वी साजरी झाली. लोकसत्ताने ह्यावर मान्यवरांचे ३ दीर्घ लेख दिले आहेत. (इतर कुणी ह्याबद्दल काही छापल्याचे किमान माझ्या पहाण्यात नाही. Times of India ने एक लेख दिला होता पण तो मुख्यतः परिचयात्मक होता.) मुळातच टिकेचे वावडे असलेल्या संघिष्ट विचाराच्या लोकांना हे लेख आवडले नसणारच, ह्यात काहीच नवल नाही. http://loksatta.com/daily/20070218/lokkal.htm मुकुंद संगोराम http://loksatta.com/daily/20070218/lr01.htm सुधीर जोगळेकर http://loksatta.com/daily/20070218/lr02.htm डॉ. सदानंद मोरे हे तिन्ही लेख इथे देऊन संघाविषयीचे काही मुद्दे जे वारंवार विस्कळित पणे मांडले जातात ते एका ठिकाणी असावेत, अशी योजना! गोळवलकर गुरुजी, हे संघाचे द्वितिय सरसंघचालक! एका मायबोलीकरानेच म्हटल्याप्रमाणे एक ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व. त्यांच्या कार्याचा आणि कार्यपद्धतीचा अभ्यास केला तर ही व्यक्ती अतिशय प्रतिभासपंन्न आणि हुशार होते हे सहजच दिसून येतो. मी मुख्यतः प्रभावित झाले ते त्यांच्या संघटना कौशल्यामुळे आणि संघाविषयी असलेल्या अपार निष्ठेमुळे! पण ह्यांचे गुण विधायक देशकार्यासाठी वापरले गेले असते, तर देशाचा फार मोठा फायदा झाला असता. (जसे डॉ. होमी भाभा, विक्रम साराभाई ह्यांच्या दूरदृष्टीमुळे अणू तंत्रद्नानातले अनेक मोठे टप्पे आपण पार केले आहेत. दूरदृष्टी असलेल्या माणसाने विधायक कामात सहभाग घेतला की त्याचे असे चांगले फळ पहावयास मिळते. असो.) वास्तविक, संघ आणि भाजपाची सध्याची भरकटलेली अवस्था पहाता, खुद्द गोळवलकर गुरुजींनाच काय वाटेल, हा संशोधनाचा विषय आहे. पण संघाच्या "सरसंघचालकांची लायकी" ही उतरती भाजणी आहे, हे श्री. गोळवलकर गुरुजी आणि सध्याचे सुदर्शन, ह्यांच्याकडे पाहिले तर दिसून येते. ह्यानंतर संघाला चांगलाच सरसंघचालक मिळण्याचीच शक्यता आहे. कारण ह्यापेक्षा आणखी वाईट काय असू शकणार? किंवा ह्यापेक्षा आणखीही काही वाईट असू शकते काय, हे संघाकडूनच आपल्याला कळेल. संघाच्या जन्मापासून त्याची राजकिय महत्वाकांक्शा हा काही गुप्ततेचा विषय नव्हता. पूर्वी जनसंघ आणि आता भाजपा ह्यांच्या मार्गाने संघाला आपला राजकिय अजेंड पुढे चालवायचा आहे, हे उघड सत्य आहे. पण असे असूनही संघाने कधीही ही गोष्ट जाहिरपणे मान्य केली नाही. म्हणजे फायदा दिसला की आपले म्हणायचे आणि तोटा दिसला की लाथा हाणायच्या. तरीही ह्या राजकिय पक्षांना निवडणूकीत जिंकून येण्यासाठी सगळी मदत करायची, हा संघाचा दुटप्पीपणा, आजचा नाही! (हे मुकुंद संगोरामांनी त्यांच्या लेखात सविस्तर दिलेले आहे.) अर्थात, संघाचा जो काही पाठीराखा आहे, तो मुख्यतः पांढरपेशा मध्यमवर्ग आहे. ह्या वर्गाला स्वतःचे आयुष्य अधिकाधिक समृद्ध करून घेण्याची इतकी घाई झालेली आहे, की थोडाफार tax भरावा लागला तरी "हाय मै लुट गयी" अशी आरोळी हा वर्ग ठोकत असतो. तेंव्हा अशा ह्या वर्गाकडून, आपला राजकिय अजेंडा पूर्ण होण्यासाठी किती अपेक्षा ठेवायची, हे समजण्याइतपत बुद्धीमत्ता सरसंघचालकांकडे असावी, अशी अपेक्षा. (वास्तव तसे वाटत नाही.) दुसरा धनिकांचा वर्ग. ह्या वर्गाला जो पक्ष अधिकाधिक आर्थिक स्वातंत्र्य देईल त्याकडे हे धनिक वळणार. ह्यात नवल ते काय? उरला कष्टकर्यांचा वर्ग. ह्या वर्गाचा कितपत पाठिंबा संघाला आहे, हे संघानेच ठवायचे आहे. तात्पर्य, श्री. संगोराम म्हणतात तसे "आत्मग्लानीच्या गर्तेत सापडणे हा भाजपानंतर संघाला जडू पहाणारा रोग आहे" (इतका जवळचा संपर्क असेल, तर रोगांचेच संक्रमण व्हायचेच!) श्री. संगोरामांचे शेवटचे भाष्य फारच बोलके आहे. "सामाजिक समरसतेच्या, वनवासी कल्याण आश्रमाच्या आणि अन्य अनेक संघटनांच्या कामातील कार्यकर्त्यांनी स्वतःचेच कौतुक करत शाबासकी मिळवण्याचा खटाटोप बंद केला तर संघाला नजीकच्या कालात समाजात रुजण्याची संधी तरी निर्माण होऊ शकते. एकविसाव्या शतकाच्या आरंभी ज्या देशाच्या विकास दर साडे नऊ टक्क्यांपर्यंत पोहोचतो, त्या देशाच्या विकासात प्रत्यक्ष हातभार न लावता केवळ योजना मांडणे म्हणजे कार्य नव्हे, हे जोवर संघनेत्यांच्या लक्षात येत नाही, तोवर संघाला आपला अजेंडा कार्यान्वित करता येणार नाही."(श्री. संगोराम ह्यांना संघाविषयी soft corner असावा. ) ह्या सगळ्या लेखात काही मुद्दे ठळकपणे आले. हेच मुद्दे काही चर्चेत वारंवार येत रहातात. संघिष्ट त्याला उत्तर टाळतात आणि मुद्दे वाहून जातात. त्यामुळे हे मुद्दे एकाच ठिकाणी एकाच वेळेस मांडलेले असावेत, ह्या भुमिकेतून हे लिहित आहे. ह्या लेखाला चालना लोकसत्तातल्या लेखानी मिळाली. तर ते मुद्दे असे. १. श्री. गोळवकर गुरुजींना हिंदू मुसलमानांमधे सलोखा असावा, अशी इच्छा होती. समान नागरी कायद्याला त्यांचा विरोध होता. - सुधीर जोगळेकर. गोळवलकरांनी समान नागरी कायदा का नको, ह्याचे विश्लेषणही केलेले आहे. लेखात ते सविस्तर नाही. तरीही राजकिय फायद्यासाठी "आजचा" संघ आणि भाजपा वारंवार समान नागरी कायद्याचा उल्लेख करत आहेत. अर्थात, बदलत्या काळानुसार तो त्यांना आवश्यक वाटू लागला असेल किंवा अवघे गुरुजीच निरुपयोगी वाटू लागले असतील. म्हणूनच आपली "कट्टर" प्रतिमा उभी करण्याच्या नादात आजचे सरसंघचालक "मुसलमान देशाचे शत्रू!" "हिंदूंनी चाच अपत्ये जन्माला घालावीत" अशी जाहीर आव्हाने करत असतात. त्याच वेळे आपल्या पूर्वसुरींनी काय आदर्श घालून ठेवले आहेत, हे तपासून पहाण्याचे भान त्यांना नाही. तसेच वरिष्ठांना काही सुचवणे, हे संघाच्या कार्यपद्धतीत बसत नाही! २. लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी अशी अनेक कॉंग्रेसींनी संघाचा यथोचित सन्मान केलेला आहे. - सुधीर जोगळेकर. वारंवार कॉंग्रेस आणि इतर विरोधकांवर दुगाण्या झाडणार्या संघाने ही गोष्ट सोयीस्करपणे विस्मरणाच्या कप्प्यात घालवली. कारण तसे केले तर विरोधकाच्या चांगल्या कामाचीहे प्रशस्तीपत्र दिल्यासारखे होते. ती संघाची पद्धत नाही. जीनांविषयी काही कौतुकाचे उद्गार काढणार्या अडवाणींना आपल्याच संस्थेच्या ह्या पार्श्वभूमीचा विसर पडला असावा. ३. गांधीहत्येतून संघाची बिनशर्त मुक्तका झाली. सुधीर जोगळेकर. पुन्हा, विरोधकांबद्दल केवळ द्वेष बाळगणार्या संघाने "आम्हाला अडकवले" ह्याच गोष्टीचा कांगावा केला, करत आहेत. तत्कालिन सरकारला काय गरज होती, संघाला शुद्धीपत्र देण्याची? तरीही तसे केले गेले! "आजचा" संघ हे विसरला आहे काय, हे संघिष्टांनीच तपासून पहावे. ४. संघाने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही. - सदानंद मोरे. कोणत्या संघटनेने कोणत्या काम महत्वाचे मानावे, ह्या त्यात्या संघटनेच्या व्यक्तीगत प्रश्न असतो. पण "आपणच राष्ट्रभक्त" अशी शेखी मिरवणारा संघ, इतरांवर कायम दुगाण्या झाडत असतो की "अमुक ह्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही." त्याचवेळेस, आपल्या ह्या भुमिकेचे कारण काय, हे त्यांनी कधीही स्पष्ट केले नाही. डॉ. हेडगेवार हे ब्राह्मण तरुणांना खुले आव्हान देत की स्वातंत्र्य चळवळीपेक्षा तुम्ही संघाच्या कार्यात सहभागी व्हा, तुमचा कौटुंबिक खर्च संघ चालवेल. (आर्थिक आमिष?) ५. संघाची पहिली शपथ, ध्वज नि प्रार्थना हिंदू महासभेच्या बाबाराव सावरकरांची होती. पुढे तीच संघाने वापरली पण त्याचे योग्य श्रेय बाबारावांना कधीही दिले गेले नाही. - सदानंद मोरे. दुटप्पीपणा, दांभिकपणा ही संघाची आजची वैशिष्ठ्ये नसून, मुळातच ती संघाची प्रवृत्ती आहे काय? ६. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संघाने कधीही आपले मानले नाही. आंबेडकरांनी जे मोठे धर्मांतर केले, त्यावर संघाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. सदानंद मोरे. आंबेडकरांच्याच काय पण कोणत्याही धर्मांतराबद्दल संघाने कधीच ठोस भुमिका, आजवर घेतली नाही. (बजरंग दल स्थापन केले, असा दावा काही जण करू शकतात.) हा मुद्दा मोर्यांनी फार मोजक्या आणि नेमक्या शब्दात मांडला आहे. पण संघात जातीयवाद किती भिनला आहे, हे आपल्या मायबोलीवरच्या काही संघिष्ठांच्या भाष्यावरुनच कळते. हे लोक "अखिल हिंदू" समाजाचे नेते कसे होऊ शकतात, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःस विचारावा. तसेच "सामान्यांपर्यंत" पोचण्यासाठी स्वतःमधे किती बदल करावे लागणार आहेत, हे संघाने तपासून पहावे. असे म्हटले की, काही लोक श्री. रमेश पतंगेचे उदाहरण तोंडावर फेकतात. पण संगोराम म्हणतात तसे आत्मग्लानीच्या अवस्थेतून बाहेर येऊन जर पाहिले, तर संघाची "सामाजिक समरसता" कुठे दिसते? श्री. मोरे म्हणतात तसे, नुसते संघस्थानावर जातीयवाद न मानून काही उपयोग आहे का? संघाने एकूणच ह्या सगळ्या प्रकाराबद्दल कधीच ठोस भुमिका घेतलेली नाही. पर्यायाने, भाजपाही आरक्षणांच्या बाबतीत तळ्यात, मळ्यात दिसतो. ७. इशान्येकडची राज्ये, संघाचे कार्य आणि कांगावा - हा मुद्दा कोणत्याही लेखात नाही. उल्फावाल्यांनी राष्ट्रिय खेळांच्या आधी काहीदिवस मोठ्या हिंसक कारवाया केल्या, हे आपण सर्वांनी वाचले असेलच. ह्या पार्श्वभूमीवरही आसामातले राष्ट्रिय खेळ अतिशय निर्वेधपणे यशस्वी झाले. (दुर्दैवाने, कोणत्याही "राष्ट्रभक्ताने" ह्याची दखलही घेतल्याचे दिसले नाही.) अतिशय यशस्वीपणे पार पडलेले राष्ट्रिय खेल, बर्याच गोष्टी शिकवून जातात. त्यामुळे त्याच त्याच प्रश्नांचा कांगावा किती काळ करायचा, हेही पहावे लागेल. तिथला मुख्य प्रश्न दारिद्र्याशी आणि आर्थिक मागासलेपणाशी संबंधित आहे. पुन्हा एकदा श्री. संगोराम म्हणतात त्याप्रमाणे, नुसत्या योजना मांडण्यापेक्षा राष्ट्र उभारणीत संघाला काही विधायक भुमिका घेता येईल. त्यामुळे देशाचाच जास्त फायदा होईल. "राष्ट्रभक्त" असलेल्या संघटनेला, हे स्वीकारायला इतके जड का जाते, हेच कळत नाही! ---------------------------------------------------------------------------------------- well, आता बरेच जण विचारतील की ह्याला काय करायचे आहे? किंवा "हा कम्युनिस्ट आहे" म्हणूनच संघावर टिका करतो आहे. तर ज्यांना जे म्हणायचे ते म्हणोत बापडे, मी कोण अडवणारा? पण मी लोकशाहीचा पक्का पाईक आहे. कम्युनिस्टप्रेरित अथवा संघप्रेरित हुकुमशाहीचा मी सारख्याच तीव्रतेने विरोध करतो. देशाचा लोकशाही साचा टिकवण्यासाठी प्रामुख्याने सबळ सत्ताधारी आणि जबाबदार विरोधीपक्ष उपलब्ध असणे आवश्यक असते. समाजवादी, रिपब्लिकन्वगैरे लोकांत ह्या दोन्ही भुमिका बजावण्याची ताकद नाही. "कम्युनिझम" हा मुख्यतः वैचारिकदृष्ट्या भावला पाहिजे. पण व्यक्तीगत आयुष्यापुढे इतर काही विचार करण्याला कुणालाच वेळ नाही, त्यामुळे "कम्युनिझम" वाचून समजणे आणि नाकारणे, ह्या कालबाह्य गोष्टी आहेत. त्याचे सावट कम्युनिस्ट पक्षांवर पडतेच. कम्युनिस्ट राजकिय पक्षातही इतके मतभेद आहेत की तेही प्रमुख सत्ताधारी अथवा विरोधी पक्ष बनू शकत नाहीत. coalition governments मधे अस्तित्व दाखवणे, ह्यापलिकडे त्यांचा प्रभाव वाढणार नाही. ह्या सगळ्या राजकिय पार्श्वभूमीवर विचार करता, १९९१ पर्यंत कॉंग्रेस हा एकमेव प्रमुख पक्ष भारतीय राजकारणात होता. त्याचे भले बुरे परिणाम आपण सगळेच जाणतो. पुढे योग्य, अयोग्य मार्गाचा वापर करत १९९१ पासून भाजपाने बर्याच मोठ्या प्रमाणावर base मिळवला. आणि देशातले पहिले कॉंग्रेसेतर सरकार त्याचा कार्यकाल पूर्ण करू शकले. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजपा (पर्यायाने संघ!) ह्या देशातल्या प्रमुख राजकिय शक्ती आहेत, ज्यांच्याच हातात देशाची धुरा असणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वागण्याचे मूल्यमापन, विश्लेषण होणे आवश्यक आहे. पण संघाने हा base मिळवण्यासाठी मुख्यतः भावनिक राजकारणाचा वापर केला. (जो व्ही. पी. सिंग ह्यांनीही केला. but where is he now? does anybody have a clue? ) पण दुर्दैवाने, भाजपाचा आणि संघाचा "भावना चाळवून" सत्ता मिळवण्याचा प्रकार अजुनही चालूच आहे. (राष्ट्रभ्क्तीच्या घोषणा देणारे, भिंद्रनवाल्यांअशी राजकिय युती कशी करू शकता? ह्या भिंद्रनवाल्यांनी पाकिस्तानच्या मदतीने पंजाबात दहशतवाद माजवला होता! पण तरीही भाजपाने अकाली दलाशी पंजाबात युती केली. आणि चतकोर सत्तेच्या लोभापायी दहशतवाद्यांना पुन्हा एकदा टॉनिक दिले!) ह्या मार्गाचे सामाजिकतेवर दूरगामी परिणाम होत आहेत, हे समजण्याची संघाच्या आजच्या नेतृत्वाची लायकी नाही, हे खेदाने म्हणावेसे वाटते. संघाच्या कार्यपद्धतीवर आणि दांभिकतेवर टिका करणारे लेख तरी संघाच्या नेतृत्वाला विचार करायला भाग पाडतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजपा (पर्यायाने संघ!) ह्यांच्या कार्यपद्धतीचे विश्लेषण कायमच होत रहाणार. संघिष्ठांनी ह्यात आपले कौतुकच मानले तर बरे होईल. काही ठिकाणावर असलेले संघिष्ठ ह्या टिकेतून बोध घेतीलच पण मुख्यत "राष्ट्रभक्ती"ची कावीळ झालेल्यांना कॉंग्रेसबरोबर संघाचे नाव जोडण्याचा राग येईल. त्याला माझा इलाज नाही! पुढे आणखी काही लिहिण्याचा विचार आहेच, सध्या एका दमात इतकेच! हे लिखाण V&C, general मधे हलवावे, ही नम्र विनंती.
|
तुमचे पोष्ट येथे हलवले आहे.
|
Laalbhai
| |
| Tuesday, March 06, 2007 - 7:54 am: |
|
|
धन्यवाद, moderator_2 .. ..
|
लालभाईंचे वरील विनोदी विचार वाचून खूप हसलो. अखिल ब्रह्मांडात निदान एक व्यक्ती तरी "सोनियासत्ता" या कॉंग्रेसच्या मुखपत्राला गांभीर्याने घेते, हे पाहून प्रत्यक्ष थोर, निर्भीड, नि:पक्षपाति इ. असलेले कुमार केतकर सुद्धा थक्क झाले असतील! इतरांनी मात्र या विनोदी मुखपत्राला अणि त्यातील लेखांना मुळीच गंभीरपणे घेण्याची गरज नाही. "सोनियासत्ता" हे एकेकाळी (म्हणजे माधव गडकरी, विद्याधर ग़ोखले इ. संपादक असताना) "लोकसत्ता" या नावाने प्रसिद्ध होत होते. त्याचा दर्जाही त्या काळी बर्यापैकी होता. नंतर कुमार केतकरांनी त्याचे नाव बदलून "सोनियासत्ता" ठेवले आणि महाराष्ट्र टाईम्स पाठोपाठ अजून एका चांगले वृत्तपत्र सोनियाच्या दावणीला नेऊन बांधले. कुमार केतकरांची सोनिया, लालू आणि मनमोहन सिंग यांच्याविषयींची भक्ती (की लाळघोटेपणा) सर्वश्रुत आहे. त्यांचा भाजप, रा.स्व.संघ, जॉर्ज फर्नांडिस, प्रमोद महाजन, वाजपेयी, अडवाणी इ. विषयींची मळमळ सर्वजण जाणतात. या व्यक्तींविषयी लिहीताना कुमार केतकर - "निगरगट्ट, कोडगे, निर्लज्ज, बेशरम, म्हातारचळ लागलेले" अशी शेलकी विशेषणे सढळ हाताने वापरतात, तर भारतमाता सोनिया विषयी लिहीताना त्यांच्या लाळेचा पूर आलेला असतो. अशा प्रचारकी प्रकाशनांमधून संघाविषयी काय छापून येणार याचा कोणीही अंदाज करू शकतो. संघ निरूपयोगी आहे की नाही हे संघ कार्यकर्त्यांनाच ठरवू द्यात! तात्पर्य काय, संघाने काय केले, संघ १९४२ च्या गांधीच्या असहकार आंदोलनात नव्हता इ. गोष्टींची अजिबात कोणी उठाठेव करू नये. निदान ब्रिटिशांचे हस्तक असलेल्या, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकरांना देशद्रोही म्हणणार्या, १९६२ च्या युद्धात चीनला पाठिंबा देणार्या आणि स्वत: पूर्णपणे निरूपयोगी व कालबाह्य झालेल्या लाल कम्युनिस्टांनी तर अजिबातच करू नये!
|
Zakasrao
| |
| Tuesday, March 06, 2007 - 8:35 am: |
|
|
कुमार केतकरांची सोनिया, लालू आणि मनमोहन सिंग यांच्याविषयींची भक्ती (की लाळघोटेपणा) सर्वश्रुत आहे>>>>>>> पद्मश्री उगीच मिळाली आहे का?
|
Laalbhai
| |
| Tuesday, March 06, 2007 - 9:02 am: |
|
|
फारच भाजलेले दिसतेय!!! सतिशराव, तुम्ही लोकं मुळीच अपेक्षाभंग करत नाही राव! माझे दुसर्या परिच्छेदातले वाक्य वाचा. आणि कुमार केतकरांचे मत काहीही असले तरी हे लेख इतर लोकांनी लिहिलेले आहेत. ते केतकरांच्या मार्गदर्शनाखाली लिहिले, असे तुमचे मत असेल तर असो. बाकी मी हे का लिहिले ह्याचे स्पष्टीकरण मी शेवटी दिलेच आहे. तेही जरा शांत डोक्याने वाचा. तुमच्यावर मोठी जबाबदारीच आहे, असे माझे म्हणणे आहे, असेही तुम्हाला कळेल. तात्पर्य काय, संघाने काय केले, संघ १९४२ च्या गांधीच्या असहकार आंदोलनात नव्हता इ. गोष्टींची अजिबात कोणी उठाठेव करू नये. >>> मग सार्वजनिक जीवनातून बाहेर जावे आणि घरगुती शाखा चालवाव्यात! सार्वजनिक जीवनातही रहायचे, सत्ताही मिळवायची पण कुणी टिका करायची नाही, असे कसे जमायचे? त्याऐवजी जाणकारांनी (मी नाही!) लिहिलेल्या मुद्द्यांचे खंडन करा. ते जास्त विधायक होईल.
|
कॉम्रेड लालभाई, कशासाठी तुमच्या मुद्द्यांचे खंडन करायचे? खंडन करून फायदा काय? खंडन करून तुमचे विचार बदलणार आहेत का? "सोनियासत्ता" कॉंन्ग्रेसची भलामण करायची सोडून संघाची स्तुती करायला सुरवात करणार आहे? कोणी काहिही सांगितले तरी तुम्ही काय, कुमार केतकर काय किंवा "सोनियासत्ता" आपली मते बदलणार आहेत का? मग कशाला खंडन करायचे? आणि खंडन केले तरी ते समजण्याची पात्रता नको का? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १४ वर्षे खडतर कारावास भोगला. तरी कम्युनिस्टांच्या मते ते देशद्रोही होते. तेच मत नेताजी सुभाषचंद्रांबद्दल. लाल रंगाचा धुरकट चष्मा वापरणार्यांना आणि चीनमध्ये बिगुल वाजला की इथे कवायती करणार्यांना संघाचे महत्व पटवून देणे अशक्य आहे. जाऊ द्या. कशाला ऊगीच त्रास करून घेता? संघ निरूपयोगी आहे हे तुमचे मत कायम राहू द्यात. काय फरक पडतो संघाला तुमच्या मतामुळे? आनी काय फरक पडतो तुम्हाला संघ उपयोगी झाला तरी! तुम्हाला कदाचित आसाममध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय खेळांच्या यशाचे रहस्य बहुतेक माहीत नसावे. आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी ऊल्फाला १० कोटी रूपये देऊन तात्पुरता संधी केला होता असे अनेक वृत्तपत्रांतून आले होते. तुम्हीच ठरवा आता की तिथला दहशतवाद खोटा की संघाने व्यक्त केलेली दहशतवादाची भीती खोटी की ही बातमी खोटी! दहशतवादाचा संघाचा बागुलबुवा खोटा असेल तर उत्तमच. पण मागच्याच आठवड्यात ऊल्फाने आसाममध्ये सार्वमत घेण्याची मागणी केली आहे. यातच सर्व काही आले.
|
Laalbhai
| |
| Tuesday, March 06, 2007 - 1:02 pm: |
|
|
LOL.. you are being funny now!!! जसे लिहिलेय तंतोतंत तसेच वागत आहात. टिकेचे "इतके" वावडे असलेल्यांनी सार्वजनिक जीवनात उतरू नये किंवा इतरांवर टिका करू नये. वर लिहिलेल्यातला एकही मुद्दा खोटा नाहीये, म्हणूनच इतकी तडफड होतेय, हे जाणवतेच आहे. anyway, enjoy!
|
अगदी खरं आहे तुमचं म्हणणं, कॉम्रेड! वर मी लिहिलेल्यातला एकही मुद्दा खोटा नाही हे तुम्हालाही पटलं म्हणायचं! धुरकटलेला लाल चष्मा फुटला की काय?
|
कॉम्रेड लालभाईंना माझे सर्व मुद्दे पटल्यामुळे ह्या BB चे आता प्रयोजन उरलेले नाही.
|
Laalbhai
| |
| Tuesday, March 06, 2007 - 1:22 pm: |
|
|
शब्दखेळ करू नका, हा बीबी त्यासाठी नाही. बीबीचे पावित्र्य राखा.
|
Laalbhai
| |
| Tuesday, March 06, 2007 - 1:24 pm: |
|
|
ह्या BB चे आता प्रयोजन उरलेले नाही. >>>
|
लालभाई, तुमचे घर पुण्यात मोतीबागेच्या शेजारी हे की नागपुरात रेशिमबागेच्या शेजारी हे?????? असुद्यात असुद्यात! (कुणीस म्हणलच हे, निन्दकाचे घऽऽऽरऽ, असावे शेजारी ) बायदिवे, या सन्घवाल्यान्ना मुख्य कार्यालयाकरता मोतीबाग, रेशिमबाग अशी बागान्चीच नावे का सुचतात????? यावर एक चर्चासत्र घ्यायचे का??????? DDD
|
Aaspaas
| |
| Wednesday, March 07, 2007 - 5:41 pm: |
|
|
लालभाई, तुम्ही गोळा केलीली माहिती नक्कीच व्यवस्थित वाचायला हवी. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्यावा हे बरे. पूर्वीच्या थोर लोकांच्या जीवावर कोणीच बोलू नये. आपण आणि संघटना म्हणून काय करत आहोत आत्ता. हे पहायला हवे. थोरांनी करायचे ते करुन गेले. कोणीही बोलले म्हणून काय झाले. स्पष्टीकरण देता येतेच की. ८० वर्षांची संघटना आहे. विचार आणि आचार सुधारण्यासाठी टिका ही व्हायलाच हवी कोणीही असो. बी. बी. बंद करायची ही आवश्यकता नाही. लालभाई किंवा कोणीही उत्तर द्यावे असे वाटत असेल तर, तुम्हीही नवीन बी. बी. उघडा ज्यात `लाल सलाम की गुलाम' यावर चर्चा होऊ शकते. दोन्ही संघटना एका विचारावर आधारीत उभ्या आहेत. त्यामुळे कोणीही भांडारकर मधे झाले त्याप्रमाणे धसमुसळेपणा करु नये. आणि तमाम संस्कृती जपणार्या संघटना असूनही, संस्कृतीचे माहेरघर समजल्या जाणार्या पुण्यात, त्यांच्या बगलेत, प्रत्यक्ष सिंहगडाच्या पायाशी सर्रास घटना होतात. तेंव्हा कुठे जातात `ब्रिगेड'. अशा घटना आवरायला मात्र पोलिस. विचारी-अविचारी दोघांनाही आवरायच.
|
>>> `लाल सलाम की गुलाम' यावर चर्चा होऊ शकते. यावर चर्चा होऊच शकत नाही. वादातीत मुद्द्यांवर काय चर्चा करायची? चीनला लाल सलाम करणरे फक्त 'गुलामच' असू शकतात. गेल्या काही महिन्यांपासून चीन सारखी भारतीय प्रदेशांची मागणी करत आहे. चीनच्या राजदूताने तर भारतीय भूमीवर उभे राहून 'संपूर्ण अरूणाचल प्रदेश हा चीनचा भाग आहे' असे सांगितले. या वक्तव्याचा फक्त भाजप आणि संघ परिवाराने विरोध केला. 'लाल सलाम' करणार्या चीनच्या 'गुलामां'ची मात्र दातखिळ बसली होती. >>> दोन्ही संघटना एका विचारावर आधारीत उभ्या आहेत. अजिबात नाही. संघ परिवार हा भारतीय भूमीतला आहे. संघ ही राष्ट्रीय विचारांची संघटना आहे. राष्ट्रीय विचारांच्या भारतीयांचे संघटन हे संघाचे उद्दिष्ट आहे. संघ कधीही भारतविरोधी कार्य करत नाही. देशविघातक समाजाचे फाजील लाड करायला संघाचा विरोध आहे. पूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत करण्यात नेहमीच संघ कार्यकर्ते पुढे असतात. याउलट कम्युनिस्ट ही देशद्रोह्यांची टोळी आहे. ज्या ज्या गोष्टी भारताला अपायकारक असतात, त्याला नेहमीच कम्युनिस्टांचा पाठिंबा असतो. किंबहुना भारताचे वाटोळं करणे हे या साम्यवाद्यांचे अंतिम उद्दिष्ट आहे. १९६२ मध्ये चीनने भारतावर हल्ला केला तेंव्हा हे "आक्रमण" आहे की याला "अतिक्रमण" म्हणावे यांवर यांच्या पॉलिट ब्युरोमध्ये वर्षभर विचारमंथन चालू होते. चीनच्या सेनेचे "मुक्तीसेना" म्हणून यांनीच स्वागत केले होते. ही देशद्रोही बांडगुळं (चीनच्या मदतीवर भारतात राहून भारतविरोधी कारवाया करणारी) कधी कुठल्या मदतकार्यात दिसतात का? पश्चिम बंगाल आणि केरळचे यांनी पुरतं वाटोळं करून टाकलं आहे. या दोन्ही संघटना संपूर्ण परस्परविरोधी विचारांवर उभ्या आहेत. पूर्व युरोपमधून यांना केंव्हाच अर्धचन्द्र मिळाला. आता फक्त क्यूबा आणि भारतात यांच्यात थोडीशी धुगधुगी शिल्लक आहे. तिथे सुद्धा यांचे श्राद्ध फार काही दूर नही.
|
Laalbhai
| |
| Thursday, March 08, 2007 - 10:52 am: |
|
|
Moderators, कम्युनिस्टांना शिव्या घालण्यासाठी वेगळा BB आहे, तेंव्हा इथले सतिश मेढेकरांचे कम्युनिस्टांबद्दलचे विवेचन त्यावर हलवाल का? हा बीबी संघाबद्दल बोलण्यासाठी सुरु केला आहे, तो त्यासाठीच वापरला जावा अशी अपेक्षा आहे. आगाऊ धन्यवाद. aaspaas, कम्युनिझमवर आधीच एक वेगळा बीबी आहे, तिथे तुम्ही चर्चा करू शकता. आणि माहिती मी "गोळा" केलेली नाही. ती उपलब्ध आहे. मी इथे लिहिण्याचे कष्ट घेतले, इतकेच. श्रेय मला देऊ नका.
|
Laalbhai
| |
| Thursday, March 08, 2007 - 10:56 am: |
|
|
अहो लिंबुटिंबु, पण उपयोग काय? उपयोग शून्य! कितीही निंदक शिजारी असले तरी तुमचे घडे पालथेच ना! ते उपडे कधी होणार कुणास ठाऊक?
|
Laalbhai
| |
| Thursday, March 08, 2007 - 12:31 pm: |
|
|
भाग दोन : सावरकर आणि संघ. विनायक दामोदर सावरकर हे गोळवकर गुरुजींइतकेच मोठे व्यक्तिमत्व होते. ह्या दोन्हींचा एक गुण मला अतिशय भावतो, तो म्हणजे तर्कशुद्ध विचारसरणी! त्यांचे मत पटो अथवा न पटो, त्यात गोंधळ, दुटप्पीपणा कुठेही जाणवत नाही. (इच्छुकांनी शेषराव मोर्यांचे पुस्तक वाचावे.) आणि जनमताच्या अनुग्रहासाठी, सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी त्यांनी कधीही स्वतःची मते बदलली नाहीत. जसे सावरकरांनी स्पष्टपणे विज्ञाननिष्ठ हिंदुत्ववादाचा पुरस्कार केला. अंधश्रद्धेवर कायमच कोरडे ओढले. तेंव्हा "हिंदू" समाजाचा रोष ओढवला जाईल ह्याची पर्वा त्यांनी केलीनाही. विवेकानंद, सावरकर ह्यांना कायमच प्रगतीशील आणि पुरोगामी हिंदू समाज अपेक्षित होता. (ह्याउलट संघाची स्थापनाच मुळी मुस्लिमांना राजकिय शह देण्यासाठी झालेली आहे! त्यामुळे त्यांच्याकडून समाज सुधारणेसाठी काही करण्याची अपेक्षा ठेवण्यातच अर्थ नाही. भावना भडकावून एकगठ्ठा मतांची बेगमी करणे, हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट आणि साध्य आहे. ह्याचे उदाहरण म्हणजे, गेल्या अनेक वर्षात कुटुंबनियोजनाचे महत्व हिंदू समाजाने बाणवलेले आहे, तेही संघाला खुपते आहे. त्यामुळेच हिंदूंनी तीन, चार अपत्ये जन्माला घालावीत, अशी सवंग घोषणा सरसंघचालक सुदर्शन कायमच देत असतात. संघाच्या प्रतिगामी बुद्धीमत्तेचे एक उदाहरण. समाजाला कालप्रवाहाच्या मागे मागे नेण्यातच ह्यांचा आनंद आहे. जसे मुस्लिम समाजातल्या मुल्ला मौलवींना मुस्लिम समाज मागासलेला असण्यातच जास्त फायदा आहे.) तसेच गोळवलकर गुरुजींनी सामान नागरी कायद्याला विरोध करण्याचे सोडले नाही. त्यामागे त्यांची समाजाविषयीची खोल समज होती. पण संघाने ह्या व्यक्तींचा योग्य आदर केला का? गोळवलकर संघाचेच तेंव्हा ते बाजुला ठेवू. पण सावरकरांना संघाने किती आदर दिला हे तर सर्वश्रुतच आहे. सावरकरांचा पुरोगामी हिंदुत्ववाद संघाला कधीही मान्य नव्हता, हे सत्य आहे. गांधीवधाच्या वेळेस संघाला तर clean cheat मिळाली पण सावरकरांना शेवटपर्यंत लढत रहावे लागले. त्यावेळेस संघाने सावरकरांशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले होते. त्याचे पुरावे देण्याची गरज नाही, हा ज्ञात इतिहास आहे. तरीही अधिक माहितीसाठी ह्या दोन लिंक्स पहाव्यात. http://en.wikipedia.org/wiki/Vinayak_Damodar_Savarkar http://www.hindu.com/op/2004/09/21/stories/2004092100241400.htm ( wikipedia वर तर गांधीवधाबाबत लिहिताना स्पष्ट म्हटले आहे की Hindu nationalist organisations such as the RSS and the Bharatiya Jana Sangh disavowed any links with Savarkar and his ideology. ) पुढे सावरकरांचे कार्यच असे होते की त्यांच्याशी मतभेद असले तरी त्यांचे मोठेपण ठिकाणावर असलेल्यांना मान्य करावेच लागते. त्यांचा जनमानसावर प्रभाव होता. त्याचा फायदा करून घेण्यासाठी संघाने - त्यांच्या नेहमीच्या दुटप्पीपणाने - सावरकरांना "आपले" म्हणायला सुरवात केली. त्यांच्या अपमानाच्या निषेधार्थ मोर्चे काढायला सुरवात केली. गोळवलकर, सावरकर ह्यांच्याशी तुमचे वचारिक मतभेद असू शकतील. पण दोघांची निस्प्रुहता आणि तर्कशुद्ध विचारसरणी वादातीत आहे. दुर्दैवाने, संघासारख्या दुटप्पी आणि दांभिक संघटना त्यांचा वापर करत आहेत, त्यांच्या मूळ विचारांचा तिलांजली देऊन! पुढे लिहिनच, आज इतकेच.
|
Zakki
| |
| Thursday, March 08, 2007 - 2:02 pm: |
|
|
अहो लिंबूटिंबू, तुम्ही लिहीले आहे निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजे संघाच्या शेजारी संघाचे निंदक. पण त्या निंदकाची निंदा करणारे संघवाले हेहि संघनिंदकांचे शेजारीच ना! ( Rhetoric!) मग ते 'घडे पालथे' आहेत ते कुणाचे? संघवाल्यांचे की संघनिंदकांचे? आणि कुणाचेहि असले तरी 'उपयोग शून्यच' ना? की काही फरक पडतो कुणाचे 'घडे पालथे' आहेत त्याचा? जरा समजत असले तर मलाहि समजवा! इतर कुणाला विचारले असते पण काही लोकांच्या मते समजून घेण्या इतकी मला अक्कल नाही. (कारण त्यांच्या मते, त्यांचे मत ज्यांना पटते तेच अक्कलवाले, बाकीचे नाहीत.) तुम्हाला तसे वाटत नसावे या आशेने तुम्हाला विचारले. धन्यवाद.
|
>>>> गांधीवधाच्या वेळेस संघाला तर clean cheat मिळाली पण सावरकरांना शेवटपर्यंत लढत रहावे लागले. त्यावेळेस संघाने सावरकरांशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले होते. त्याचे पुरावे देण्याची गरज नाही, हा ज्ञात इतिहास आहे. >>>>> wikipedia वर तर गांधीवधाबाबत लिहिताना स्पष्ट म्हटले आहे की Hindu nationalist organisations such as the RSS and the Bharatiya Jana Sangh disavowed any links with Savarkar and his ideology. ) लालभाई, सन्घ आणि सावरकर एकमेकान्चे द्वेषी होते हे सिद्ध करण्याची उर्मी कुणाला असेल तर आम्ही काय बोलणार बापडे???? पण ज्यान्नी "क्रान्ती कार्य" केलीत त्यान्चा "गुप्ततेच्या" धोरणाला वरील उक्त्यान्नी कितीही डिवचलेत तरी काहीही निःष्पन्न होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ हे! आमच्या पालथ्या घड्यांआड काय दडलय ते तुम्हाला कितीही आदळाआपट करुन कोणाचेही पुर्वग्रहदुषित अपुर्या माहितीवर आधारीत दाखले दिलेत तरी तुम्हाला कळणार नाही आणि कोणीही टीकेची कितीही झोड उठवली तरी "आतल्या बातम्या आणि धोरणे" तुम्हाला कळणार नाहीत! जेव्हा सरकारी दडपशाहीचा वरवण्टा फिरत असतो तेव्हा सन्घ अन सावरकर यातल्या सम्बन्धान्च काय बोलता राव?? स्वतःच्या आईबापान्बरोबरचे नी बायका पोरान्बरोबरचे सम्बन्धही वेळेला तोडायला लागतात! [तोडलेले दाखवायला????? तेच तुम्हाला सिद्ध करायच हे ना??? की बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला? एक तर सम्बन्ध तोडले होते सान्गा किन्वा छुपे सम्बन्ध होते असे सान्गा.... म्हणजे गान्धीवधाचे (ओह ओह, वध म्हणुन चालणार नाही, खुन म्हणायला हव तुमच्या गरजेसाठी) गाडलेले भुत पुन्हा उकरुन काढुन सन्घाला पुर्णतः नेस्तनाबुत करता येईल हे उद्देश लपुन राहिलेत किन्वा कुणाला समजत नाहीत असे तुम्हाला वाटते का???????? तस असेल तर खुळे हात "तुम्ही लालभाई"! ] सन्घावर तेच टीका करतात, वेळेला सावरकरान्ची उदाहरणे घेतात ज्यान्ची घोषणा होती "याल तर तुमच्या सह, न याल तर तुमच्याविना आणि आडवे याल तर तुम्हाला निखन्दुन", पण तरीही स्वतन्त्रपणे सावरकरान्वर टिकास्त्र सोडायचेच, पण सन्घावर टीका करताना सावरकारान्चे उदाहरण सोईस्कर घ्यायचे हा दुटप्पीपणा तेच करु पहातात ज्यान्च्या राजकीय निधार्मिक विचारसरणीस सन्घ आणि सावरकरान्च्या हिन्दु सन्घटना पासुन अडथळा निर्माण होतो हे! आणि हे सत्य या देशातली जनता जरी तथाकथित "अडाणी" असली तरी त्यान्ना पुरेपुर माहिती हे! आता सन्घ आणि सावरकरवादी लोकान्च्या हिन्दुसन्घटनाचा अडथळा आणि त्रास "कोणत्या विचारसरणीच्या" लोकान्ना होतो हे काही छुपे गुपित नाही........ मला कोणत्याही पक्षाचे/विचारसरणीचे नावही घ्यायची गरज नाही.... हो की नाही??? DDD
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|