|
Aaspaas
| |
| Saturday, February 24, 2007 - 6:21 pm: |
| 
|
वा, आता कोणती कसोटी, धावा इ. सांगून टाक. मुकुंदा, बाळ पंडीत किंवा महाराष्ट्र क्रिकेट असो., डेक्कन जिम. येथे का भेटत नाहीस. मला वाटते आपण थोडे विश्लेषण करुयात का? सुपर ८ मधे एकूण ८ संघ. यात ४ गट,त्यापैकी अ, ब, क, ड प्रमाणे प्रत्येक गटात पहिला व दुसरा संघ येणार आता, अ १ दफ्रि. अ २ ऑस्ट्रे ब१ श्री लं ब२ भा क१ न्युझी क२ इंग्लं ड१ पाक ड२ वेस्ट हे सर्वमान्य आहे का? असे नीट विश्लेषण करून अंतिम सामन्यातील आपले दोन संघ काढुयात. श्ल कसा लिहायचा रे\ग?
|
Upas
| |
| Saturday, February 24, 2007 - 7:21 pm: |
| 
|
मुकुंद काही मिळालं तर मलाही दे रे.. करमरकर आणि पंडीतांचे समलोचन ऐकायला मजा यायची.. वानखेडेच्या प्रत्येक सामन्यात मुंबई ब वरून प्रक्षेपण असायचे.. मी ही बघतो काही मिळालं तर..
|
Farend
| |
| Saturday, February 24, 2007 - 10:36 pm: |
| 
|
मनोवैग्यानिक दबाव वाले पार्ट सोडून
|
मला अपेक्षित असलेले निकाल: गट 'अ' अ१- ऑस्ट्रेलिया अ२-दक्षिण आफ्रिका गट 'ब' ब१-भारत ब२- श्रीलंका गट 'क' क१- न्यूझीलंड क२- ईंग्लंड गट 'ड' ड१- पाकिस्तान ड२- वेस्ट इंडिज सुपर एट मधील सामने व अपेक्षित निकाल ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज-- ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका-- ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया वि. भारत्-- ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान-- ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड-- ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया वि. ईंग्लंड-- ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका वि. पाकिस्तान-- दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका-- दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिक वि. भारत-- दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वि. न्यूझीलंड-- दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वि. ईंग्लंड-- दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज-- वेस्ट इंडिज भारत वि. न्यूझीलंड-- भारत भारत वि. ईंग्लंड-- भारत भारत वि. पाकिस्तान-- भारत भारत वि. वेस्ट इंडिज-- भारत श्रीलंका वि. पाकिस्तान-- पाकिस्तान श्रीलंका वि. न्यूझीलंड-- श्रीलंका श्रीलंका वि. वेस्ट इंडिज-- श्रीलंका श्रीलंका वि. ईंग्लंड-- श्रीलंका वेस्ट इंडिज वि. न्यूझीलंड-- वेस्ट इंडिज वेस्ट इंडिज वि. ईंग्लंड-- वेस्ट इंडिज पाकिस्तान वि. न्यूझीलंड-- न्यूझीलंड पाकिस्तान वि. ईंग्लंड-- पाकिस्तान न्यूझीलंड वि. ईंग्लंड-- न्यूझीलंड उपांत्य फेरीतील अपेक्षीत संघ १.ऑस्ट्रेलिया १२ गुण २.दक्षिण आफ्रिका १० गुण ३.भारत ८ गुण ४.श्री लंका\वेस्ट इंडिज ६ गुण (अर्थात सुपर एटमधील निकालाच्या आधारे श्रीलंका उपांत्य फेरीत जाईल.) ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका-- श्रीलंका दक्षिण आफ्रिका वि. भारत-- दक्षिण आफ्रिका अपेक्षित अंतिम सामना दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका-- दक्षिण आफ्रिका
|
टिळक रस्ताच्या बाजूनी गोलन्दाजी करतोय साळगावकर.त्याला तोंड देतोय सन्दीप पाटील. संदीप पाटलांच्या धावा झाल्या आहेत पन्चवीस. मोठ्या समर्थपणे तो गोलंदाजीस तोंड देतोय तो. साळ्गावकरांनी धाव म्हनजे स्टार्ट घ्यायला सुरुवात केलीय टप्पा टाकलाय मधल्या यष्टींवर. संदीप पाटीलने तो नुसताच तटवलाय. चेंडू गेलाय कव्हर मधल्या दुकानवाले यांच्याकडे. पांडुरंग सालगावकर वेस्टशायर परगण्याच्या आल्बर्ट आईन्स्टा ईनच्या शैलीत गोलंदाजी करतोय असं नाही तुला वाटत का चंदू.? थेट तशीच ऍक्शन, तीच फेक. फक्त डोक्याचे मागचे केस जास्त हलताहेत याचे. नन्दू: होय बाळ आल्बर्ट ने दहा वर्षापूर्वी ससेक्स विरुद्ध गोलंदाजी करताना तिसर्या षटकात अगदी पांडुरंगसारखे दोन चेंडू टाकले होते त्याची आठवण झाली. मी तेव्हा तिथे पंचाची परिक्षा द्यायला गेलो होतो. बाळ्: थोडा फरक नन्दू आहेच तरी आल्बर्टचा रन अप एक दहा इंचाने जास्त असावा. ओहो!!! सुन्दर चेन्डू. साळगावकरने नुकताच सुन्दर यॉर्कर टाकला चेंडू संदीपने मिडविकेटला मारला पण तिथे तो कानिटकरने अडवला आणि फलंदाजाला एक धाव मिळलेली आहे.आणि चेन्डू गोलंदाजाकडे पोचून तो पुढचा चेंडू टाकण्यासाठी क्रीजपर्यन्तही आलाय. तर नंदू, आल्बर्ट आणि सरे परगण्याच्या लॉर्ड डलहौसी या दोघांची डावा पाय उचलण्याची शैली एकच होती असं माझं इंग्लंडमध्ये असतानाचं निरिक्षण आहे तुला काय वाटतं? नंदू. डलहौसी फार चांगला गोलंदाज नव्हता त्याच्या डाव्या.... बाळ्: हा चेन्डू फारच सुरेख होता फलंदाजाने तो उत्कृष्ट रीत्या तटवलाय. क्षेत्ररक्षक पळतोय्;पळतोय. चेंडू त्याच्या हातात येत नाहीयेय. चेंडू जातोय स्वारगेटच्या कोपर्याकडे. अखेर चेन्डू गेला सीमारेषेच्या बाहेर. आणि फलंदाजला चार धावा मिळालेल्या आहेत. म्हणजे ज्याला चौकार म्हणता येईल असा मिळालेला आहे. नन्दू या पद्धतीने सन्दीपने धावा घेतल्या तर दीडशे धावांचा टप्पा तो नक्कीच ओलांडील असे वाटते. नंदू: बाळ इथे व्ही आय पी कक्षात १५ वर्षापूर्वीचा मुम्बईचा बारावा खेळाडू सदू खापरे आलेला दिसतोय. तर त्याच्या यष्टीरक्षणाबद्दल तुला काय म्हणता येईल. बाळ्: सदूचे यष्टीरक्षण मी गयानाला पाहिलेल्या दूजाँच्या यष्टीरक्षणाच्या तोडीचे होते असे म्हनता येनार नाही पण सदूला भारतीय कॅप मिळायला पाहिजे होती. दर्म्यानच्या कालात एक फलंदाज बाद झालेला आहे. साळगावकरच्या गोलंदाजीवर दुसर्या बाजूला खेळणारा रामनारायण बाद झालेला असून तो पवेलियनमध्ये परतलाय आणि त्याच्या जागेवर रफीक जुमादिन आलेला असून त्याने आतापर्यन्त पाच धावा केल्लेल्या आहेत त्यात एक चौकार असून तो सुन्दर फटका होता. तर नंदू सदू, दूजाँ आणि न्युझी लन्डचा ग्रिफिथ यांच्या पैकी ग्रीफिथ डाव्या हाताने फलंदाजी करीत असे ते थेट सोबर्सच्या शैलीत नाही का? इथे सारसबागेच्या बाजूला असलेल्या एका झाडाची सावली हळूहळू मैदाना वर येऊ लागली आहे त्यामुळे तिथे क्ष्रेत्ररक्षण करणार्या पवारला नीट चेन्डू अडवता येत नाही ये. यावरून चंदू बारबाडोसच्या मैदानाच्या उत्तर बाजूला जे बुचाचे झाड आहे त्याच्या सावलीबाबत..... माफ करा नवीन आलेला फलंदाज जुमादीन नाहीय. त्याच्या टोपीमुळे तो नीट दिसत नाहीये. क्रमानुसार तर पोफळे असायला हरकत नाही. त्याच्या आतापर्यन्त अठरा धावा झालेल्या असून त्याने नुकताच एक चेन्डू मिडविकेट आणि थर्ड मॅनच्या पट्ट्यात टोलवलेला आहे...
|
युवराज तू मस्तच विष्लेशन केलेस पण मला त्यात एक काही प्रॉब्लेम्स वाटतायत. ऑस्ट्रेलीया न्युझीलंड, ईंग्लंड नी वेस्ट ईंडीज कडुन दनदनीत हारलीय. WI ला तर होम ग्राउंड असल्यामुळे त्याचा आणखी फायदा होनार ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज-- वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका-- ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया वि. भारत्-- ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान-- ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड-- न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया वि. ईंग्लंड-- ईंग्लंड भारत वि. न्यूझीलंड-- भारत भारत वि. ईंग्लंड-- भारत भारत वि. पाकिस्तान-- भारत भारत वि. वेस्ट इंडिज-- भारत निर्वीवाद १२ किंवा १० पॉईंटस मिळने अवघड आहे त्यामुळे प्रत्येक match ला महत्व येनार. आपल्याला श्रिलंकेला हारविने आवश्यक आहे नाही तर सेमी फायनल ला आपण येनार नाही. डार्क हॉर्स न्युझीलंड
|
Aaspaas
| |
| Sunday, February 25, 2007 - 9:37 am: |
| 
|
थोडे सावकाश जाऊयात. सुपर ८ मधे प्र्त्येक संघाचे सहा सामने, विजयी-२ गुण, पराभव- ० गुण, अनिर्णित- १ गुण. बरोबर आता, प्रत्येक आठ संघाचे उपलब्ध फलंदाज विरुद्ध उपलब्ध गोलंदाज यांची तुलना करुन त्यातील विजयी संघ ठरवायचा. अ गटापासून सुरु करु. आपल्यापैकी कोणीतरी शेवटचा निर्णय घेणारा व्हा. त्याने पुरेशी चर्चा झाल्याचे पाहून निर्णय सांगायचा. मग ठरवा पण हे चालू करण्याआधी सुपर ८ मधील १ व २ क्र. चे संघ पंचांकडून ठरवून घ्या. १ क्र. ला ६ गुण व २ ला ४ गुण. मग पुढे. वरच्याप्रमाणे क व ड मधे दोन मते जुळली आहेत, आता अ व ब साठी एक\दोन मते द्या. म्हणजे सु.८ मधी जाणारे क्रम निश्चित होईल. वरील उदा. भारत गांगुली, सचिन, द्रविड,धोनी, युवराज विरुद्ध पाक कनेरिया, रझाक, राणा नावेद, असिफ-शोएब?? याचप्रमाणे उलटे करायचे व निर्णय घ्यायच.
|
Nandya
| |
| Tuesday, February 27, 2007 - 5:52 pm: |
| 
|
Awesome ad from Nike: http://www.youtube.com/watch?v=Ib3WSzJyqVQ
|
Farend
| |
| Tuesday, February 27, 2007 - 9:36 pm: |
| 
|
भन्नाट! मागच्या वर्ल्ड कपच्या वेळी भारतात ती एक रांगोळी घालताना आपल्या खेळाडूंची नावे घेऊन भारत जिंकूदे अशा अर्थाचे काहीतरी बहुधा तमिळ मधे म्हणणारी ती जाहिरात छान होती.
|
Storvi
| |
| Wednesday, February 28, 2007 - 6:33 pm: |
| 
|
मुकुंद मेल पाठवली आहे. Please check it
|
Mukund
| |
| Friday, March 02, 2007 - 10:18 am: |
| 
|
शिल्पा... उत्तर दिले आहे.. रॉबिनहुड..एकदम सही रे... तुझी हिंदी नक्कल तर हुबेहुब... ते रवी चतुर्वेदीचे समालोचन आहे... तु केलेले. १९७८-१९७९ चा कपिल देव आठवला... अगदी शब्द न शब्द बरोबर तसाच्या तसा लिहिला आहेस..मजा आली वाचताना... फक्त एक दोन लकबी विसरलास.... और ये थॉम्सन की अगली गेंद...घुटने की उंचाइ तक आयी..गेंदने गावस्करके बल्लेका बाहरी किनारा लिया और गेंद लुडकती हुई गयी गली की तरफ़ जहा ओगीलवी ने उसे फ़ील्ड किया..... और रन लेनेकी कोई गुंजाईश नही.... भारत का स्कोर अभी भी है १ विकट पर ७५ रन्स. आणी उपास... बाळ पंडीत यांचे समालोचन आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन प्रसारीत व्ह्यायचे. रॉबिनहुड.... तु पांडुरंग साळगावकर टिळक रस्त्याच्या बाजुने की पर्वतीच्या बाजुने गोलंदाजी करत आहेत ते सांगायला विसरलास...मला आठवते....आता कप्तान बोर्डे यांनी चेंडु सालढाणा यांच्याकडे सोपवला आहे आणी आता पर्वतीच्या बाजुने सालढाणा नवीन षटक चालु करतील..त्यांना सामोरे जातील रामनाथ पारकर... बाय द वे... पांडुरंग साळगावकर सध्या महाराष्ट्र रणजी टिमचे कोच आहेत एक ऑस्ट्रेलिया सोडली तर बाकी सगळ्यांच्या मॅचेस म्हणजे १ शुट आउट आहे कोण कुठल्या दिवशी जिंकतील याचा भरवसा नाही त्यमुळे सुपर ८ मधे काय होईल याचे भाकीत वर्तवणे कठीण आहे. झक्की.. तुम्ही म्हणजे न....
|
उद्या पुण्यात हा कार्यक्रम आहे.. पहायला मजा आली असती... http://www.esakal.com/features/cricket/index.html
|
मराठी कॉमेन्टरी म्हणजे भम्पकपणाचा कळस असे. एक तर खेलाबरोबर त्यांचे सिन्क्रोनायझेशन नसे. काही तरी असंबद्ध गपा ही मंडळी मारून आपल्या'ज्ञाना'चे प्रदर्शन करीत. गैरलागू डिटेल्स आणि स्वताची टिमकी वाजविणारा तपशील.दुसरं असं की खेळाडूला अरे कारे म्हणावे की अहो जाहो याचा नेहमीचा गोंधळ.. काव आणायची मंडळी कधी कधी अगदी पुस्तकी अतिशुद्ध शब्द! कधी हिन्दी commentary लागेल असं व्हायचं...
|
Asami
| |
| Friday, March 02, 2007 - 4:43 pm: |
| 
|
अर्र्र त्या मराठीच्या BB वरच्या लोकांनी हे वाचले तर तुझे काही खरे नाही RH. वर तुझे नावही फ़िरंगी आहे.
|
Storvi
| |
| Friday, March 02, 2007 - 10:30 pm: |
| 
|
>>गैरलागू डिटेल्स आणि स्वताची टिमकी वाजविणारा तपशील>>अगदी कोणाची बरं आठवण झाली असेल मला? 
|
Aaspaas
| |
| Saturday, March 03, 2007 - 6:49 pm: |
| 
|
जाऊदे, एवढा काथ्याकुट करायची कोणाची इच्छा दिसत नाही. पण, पहिल्या फेरीत असा निकाल\गुण असू शकतात दफ्रि- ६, ऑस्ट्रे- ४ श्रीलं-६, भा- ४ न्युझी- ६, इंग्लं- ४ वेस्ट-६, पाक-४ आणि यानंतर सु- ८ मधे दफ्रि- १०, ऑस्ट्रे- ८ श्रीलं-६, भा- ६ न्युझी- ८, इंग्लं- ६ वेस्ट-४, पाक-४ म्हणजे उपांत्य फेरीत जाताना, १. दफ्रि- १६ २.न्युझी- १४ ३. ऑस्ट्रे- १२, श्रीलं-१२ ४. भा- १०, इंग्लं- १०, वेस्ट-१० यांच्यात चुरस असेल
|
Laalbhai
| |
| Monday, March 05, 2007 - 12:39 pm: |
| 
|
हे ऑस्ट्रेलिया म्हणजे मोठेच प्रकरण दिसते? सध्य विश्व चषकामुळे प्रत्येक सोम्यागोम्या मीडियामधे आपले मत मांडत असतो. असे सर्वसाधारण दिसले की प्रत्येक देशाच्या संघाने "आपणच जिंकू" किंवा "आपण जिंकण्याची पराकाष्ठा करू" असा आत्मविश्वास व्यक्त केला. ह्या पार्श्वभूमीवर द्रविड आणि सेहवाग ह्या भारताच्या कर्णधार, उपकरणधारांनी "ऑस्ट्रेलियाच जिंकण्याची शक्याता नाकारता येत नाही!!!!" असे मत व्यक्त केले. म्हटले गंमत आहे. ह्यांना ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडूनपण पैसे मिळत असावेत. ग्रेग चपेल ह्या "ऑस्ट्रेलियन" गुरुजीची शिकवणी भारतीय चमूने पूर्णपणे अपयशी ठरवलेली दिसते. मला द. मा. मिरासदारंच्या "व्यंकूची शिकवणी" ह्या कथेची आठवण झाली.
|
Zakki
| |
| Monday, March 05, 2007 - 12:59 pm: |
| 
|
ह्यांना ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडूनपण पैसे मिळत असावेत. छे, छे. आपले खेळाडू नम्र, संवेदनाशील नि प्रामाणिक आहेत. संवेदनाशीलता इतकी की वेस्ट इंडिजच्या प्रखर उन्हात प्रतिपक्षाला जास्त वेळ तिष्ठत रहावे लागू नये म्हणून लवकर लवकर बाद होतील. 'व्यंकूची शिकवणी'! अगदी तस्सेच झालेले दिसतय्.!
|
Aaspaas
| |
| Monday, March 05, 2007 - 5:18 pm: |
| 
|
बरे झाले हा विषय चालू झाला. द्रविड कुठे बोलला माहित नाही. पण सेहवाग आणि सगळ्यांचा लाडका सचिन बोलला म्हणजे कहरच म्हणायचा. मला हे कळत नाही क्रिकेट बोर्ड कसे बोलले नाही अजून या खेळाडूंना. सामने चालू होण्याआधीच हे म्हणतायत प्रतिस्पर्धी संघ जिंकणार. याचा अर्थ हे भोज्याला शिवून येण्यासाठीच गेलेत कि काय? स्वत: च्या संघाबद्द्ल किंवा स्वत्: बद्द्ल हे बोलेनात. सचिनसारख्या दिग्गज खेळाडूने असे वक्तव्य केले, तरी कोणी बोलायला तयार नाहीत. औस्ट्रेलियन संघाची किती काळजी आपाल्याला. कस व्हनार? काय व्हनार? कस व्हनार? काय व्हनार?
|
Svsameer
| |
| Monday, March 05, 2007 - 5:26 pm: |
| 
|
supereight already decided??? हे पाहिलंत का? प्रत्येक ग्रुप मध्ये नंबर १ आणि २ आधिच ठरले आहेत.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|