|
Mrinmayee
| |
| Saturday, February 24, 2007 - 3:31 pm: |
| 
|
योगी, अनुमोदन! एकच म्हणावसं वाटतं, आयुष्यातली पहिली २०-२५ वर्ष बोललेली मातृभाषा विसरणं हे माझ्या मते 'झोपेचं सोंग' घेण्यातला प्रकार आहे. त्यातून जागं करणं कठीण! सतत दुसरी भाषा वापरत राहील्यामुळे कदाचित मातृभाषेतला एखादा शब्द न आठवणं समजू शकतो आपण! आपल्या भाषेचा सार्थ अभिमान ठेवून बाकी हजार भाषा शिकाव्यात ना! त्यात गैर ते काय? यावरून एक आठवलं, ओळखीचं एक मराठी कुटुंब गेल्या ४२ वर्षांपासून अमेरिकेत आहे. अमेरिकन सैन्यात डॉक्टर असलेल्या ह्या बाई अगदी अस्खलित मराठी लिहितात वाचतात आणि बोलतात! एकदा म्हणाल्या, "अगं सॅल्वेशन आर्मिला द्यायचे झाले म्हणून काय झालं, गुंड्या तुटलेले सदरे द्यावेत का?" आजुबाजुच्या, अमेरिकेत येऊन ४-५ वर्ष झालेल्या मराठमोळ्या जीवांना पाव सेकंद विचार करावा लागला, 'सदरा' आणि 'गुंड्या' या शब्दांचा!
|
Maku
| |
| Sunday, February 25, 2007 - 7:40 am: |
| 
|
Mrinmayee मला पण तेच सांगायचे आहे. अरे तुम्ही लहानपणापासुन शिकता ती भाषा विसरणे म्हनजे खरेच हास्यास्पद आहे.
|
Maku
| |
| Sunday, February 25, 2007 - 7:46 am: |
| 
|
मागे स्वाती दांडेकर न्यू जर्सीला आल्या होत्या. तेंव्हा बर्याच जणांनी त्यांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही मराठी कसे विसरलात? तेंव्हा त्यांनी सांगीतले मी वारंवार मुंबई, पुणे इथे जाते. तिथे आजकाल सगळे इंग्रजीच बोलतात माझ्याशी. खरे तर माझ्याशीच काय, आप आपसात सुद्धा कुणि मराठी बोलत नाहीत. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> अहो zakki राव जर तुम्ही नेहमी मराठी मधुन बोलत राहीला तर समोरचे पण आपोआप मराठी चालु करतात. माज़्या मारवाडी friends ला मी मराठीतुनच बोलायला लावायचे आत्त्ता त्याचे मराठी मस्त ज़ाले आहे. आपण जर सवय नाही लावली तर लोक पण बोलत नाही .... म्हनुन आपल्या पासुन सुरुवात करावी. असे मला तरी वाटते.
|
Zakki
| |
| Sunday, February 25, 2007 - 8:34 pm: |
| 
|
अहो zakki राव जर तुम्ही नेहमी मराठी मधुन बोलत राहीला तर समोरचे पण आपोआप मराठी चालु करतात. हो, तेच तर त्यांचे पण म्हणणे होते. पण Iowa मधे कुणिच त्यांच्याशी मराठी बोलेनात! सगळे अमेरिकन, नि त्यांना मराठी येतच नाही म्हणे! म्हणून त्या भारतात गेल्या असताना त्यांनी मराठी बोलून पाहिले, पण त्या म्हणाल्या, की बहुतेक पुणेकरांना किंवा महाराष्ट्रीयांनाच तो नियम लागू पडत नाही, ते आपले इंग्रजीतूनच बोलतात. म्हणून त्यांनी आता एक निरोप पाठवला आहे की स्वाति दांडेकरांची काळजी करण्यापेक्षा, किंवा त्यांना शिकवण्यापेक्षा, जरा तुमचे लक्ष सध्या पुण्यात केंद्रित करा, नि एकदा तिथले मराठी लोक मराठी बोलायला लागले की मग इतरांचे बघा. कालच मला एक मायबोलीकर सांगत होते की 'साडे तीनशे' म्हंटल्यावर पुण्यातल्या मराठी माणसाला ते कळले नाही. मग इंग्रजीत सांगीतल्यावर कळले.
|
Alikadech ek atishay vait anubhav ala. Amayha society madhe bajula tin kutumbe ahet. Yandachya bharat vareet he lakshat ale ki tyatil 1 gharatil mulana bakiche aksharshaha 'marathi medium' vale asech adanya sarakhe vagtaat mhanun apmaan karaychit. Mhnanun mi muddam tya mulishi English madhe bolat hoto, tar tila dhad Enlish sudhdha yet navhte. Ugachaha kahi tari Hinglish cineme baghun styla marlyaa ki zaale. Ani tyaanche aai-baap tar tyaahun hi dhanya.
|
Zakki
| |
| Monday, February 26, 2007 - 2:26 pm: |
| 
|
अरे तुम्ही लहानपणापासुन शिकता ती भाषा विसरणे म्हनजे खरेच हास्यास्पद आहे. माकु, १०० टक्के खरे आहे नि मान्य. तुम्ही वर कुठेतरी लिहीले आहे की नवीन लोकांना कुणि उत्तरे देत नाहीत. अहो नशीब समजा. एका लालभाईच्या सगळ्या लेखांना मी उत्तरे दिली. ते बिचारे पळून गेले. तर अशी तक्रार करू नका, नको ते लोक नको ती उत्तरे देत रहातील नि तुम्हाला नकोसे करून टाकतील. त्यापेक्षा तुम्ही मुद्दे मांडत रहा, लिहीत जा, लवकरच लोक तुमच्याशी संवाद साधतील. तुमच्यासारखी मते असलेले इथे अनेक लोक आहेत.
|
अमेरिकन समाजात असताना, सार्वजनीक ठिकाणी 'स्वाती दाण्डेकरच' काय? तर कोपर्यावरचा दुकानातला गुज्जू, आणि पंपावरचा सरदार देखील इंग्रजी बोलतो.. कारण ती गरज आहे.. त्याला कदाचीत चांगलं इंग्रजी येत नसेल, पण तो प्रयत्न करतोच.. तेव्हा 'मी अमेरिकेत इंग्रजी बोलतो / बोलते' असं जाहीर करणं यातही काही शहाणपणा नाही... मला मराठी येत नाही, अगर मी मराठी विसरलो / विसरले आहे, असं चार चौघाना सांगणं हा निव्वळ भंपकपणा आहे.... सतत दुसरी भाषा वापरत राहील्यामुळे कदाचित मातृभाषेतला एखादा शब्द न आठवणं समजू शकतो आपण! हे मात्र पटण्यासारखं आहे...
|
Zakki
| |
| Monday, February 26, 2007 - 3:54 pm: |
| 
|
अमेरिकन समाजात असताना <....> मी मराठी समाजात असताना सुद्धा इंग्रजी बोलतो असे जाहीर करणे म्हणजे मात्र सुशिक्षितपणाचे, हुषारीचे,शहाणपणाचे लक्षण आहे. I am म्हणजे even in marathi societies also speaking inglish only हं ! मला मराठी येत नाही, अगर मी मराठी विसरलो / विसरले आहे, असं चार चौघाना सांगणं , वर 'माझे आईवडिल पूर्वी मराठी बोलत पण माझ्याशी मात्र त्यांना मी इंग्रजीतच बोलायला सांगतो' असे सांगणे हेहि 'सुशिक्षित ..... इ. चे लक्षण आहे. My papa and mom always speaking marathi, but i am telling them they must be speaking in inglish only with me. I म्हणजे not listening for free. (फुकट ऐकून घेणार नाही)
|
Zakki
| |
| Monday, February 26, 2007 - 3:57 pm: |
| 
|
तर भारतात तरी मराठी माणूस आता पुरेसा खड्ड्यात गेलेला आहे. त्यावर माती लोटून झाली. त्यावर फुले फुलली. तेंव्हा हा विषय आता बंद करायला हरकत नाही! फार तर कुणाला मराठी बद्दल अथवा मराठीतून बोलावेसे वाटले तर त्यांना NJ मधेच यावे लागेल!
|
Pha
| |
| Tuesday, February 27, 2007 - 7:46 am: |
| 
|
काय फालतू बकवास करता झक्कीबुवा!
|
तर भारतात तरी मराठी माणूस आता पुरेसा खड्ड्यात गेलेला आहे. त्यावर माती लोटून झाली. त्यावर फुले फुलली. तेंव्हा हा विषय आता बंद करायला हरकत नाही! फार तर कुणाला मराठी बद्दल अथवा मराठीतून बोलावेसे वाटले तर त्यांना NJ मधेच यावे लागेल! <<< का? झक्की, भारतातून खड्ड्यात गेलेले लोक NJ तून वर येतात का?
|
>>>>> का? झक्की, भारतातून खड्ड्यात गेलेले लोक NJ तून वर येतात का?       
|
Pha
| |
| Tuesday, February 27, 2007 - 10:24 am: |
| 
|
BTW, सतीश माढेकर यांच्या Thursday - February 22 2007 - 5:01 am: या पोस्टमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत हिंदीभाषिक नेते "हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा" आहे असे सांगून हिंदी वापरण्याचे समर्थन करतात असा उल्लेख होता. या संदर्भात वस्तुस्थिती खरं तर अशी आहे की भारतीय संघराज्याची एकही राष्ट्रभाषा नाही; तर भारतीय राज्यघटनेनुसार(कलम ३४३-३४७ आणि अनुसूची क्र. ८) सरकारमान्यताप्राप्त अशा २२ अधिकृत भाषा आहेत. त्या-त्या घटकराज्याचे राज्यसरकार यांपैकी एक / काही भाषा 'राजभाषा' म्हणून राज्यशासनव्यवहारात वापरू शकते. केंद्रसरकाराच्या व्यवहाराकरता हिंदी आणि इंग्लिश भाषा 'केंद्रशासकीय व्यवहाराच्या भाषा' या नात्याने वापरल्या जातात. आपल्याकडची भाबडी जनता मात्र 'मराठी' मातृभाषा असूनही हिंदी ही राष्ट्रभाषा मानून तिला मस्तकी धरते. कहर विनोदी प्रकार म्हणजे हिंदीच्या प्रसाराकरता आपलेच लोक 'राष्ट्रभाषा प्रसार समिती' वगैरे नावाने संस्था काढून लष्कराच्या भाकर्या भाजत बसतात.
|
झक्की, बहुतेक मराठी माणसांमध्ये बरेच न्यूनगंड असतात. आपण आपल्या भाषेचा किंवा मराठी संस्कृतीचा अभिमान दाखविला, तर, आपण प्रतिगामी समजले जाऊ अशी त्यांना सारखी भीती वाटत असते. त्याचप्रमाणे आपण समूहात मराठीत बोललो, तर, आपल्याला अडाणी समजले जाईल असे त्यांना वाटते. म्हणुन ते समूहात इंग्लिशमध्येच किंवा हिंदीत बोलतात. माझ्या माहितीतली बरीच मंडळी ५-६ महिने इंग्लंड किंवा अमेरिकेत राहून येतात आणि "मराठी वर्डस रिमेंबर करायला डिफिकल्ट जातं" असं सांगून इंग्लिश मध्ये बोलून आपण दुसर्यांना कसं इंप्रेस केलं या भ्रमात राहतात. मी अनेक वर्षांपूर्वी सिंगापूरमध्ये असताना, माझ्याबरोबरच्या पुण्यातल्या देशपांडे नावाच्या मित्राचे आईवडील त्याला भेटायला तिथे आले. मी त्यांच्याशी बोलताना मराठीत बोलत होतो, पण त्याचे वडील पूर्ण वेळ इंग्लिशमध्ये माझ्याशी बोलत होते. काय बोलायचं आता असल्या माणसांपुढे! असे "निवासी अ-भारतीय" भारतातून जेवढ्या लवकर बाहेर स्थायिक होतील तेवढे चांगलं!
|
Zakki
| |
| Tuesday, February 27, 2007 - 2:18 pm: |
| 
|
का? झक्की, भारतातून खड्ड्यात गेलेले लोक NJ तून वर येतात का? भौगोलिक दृष्ट्या शक्यता आहे! कारण आजकाल इतके मराठी लोक वाढले आहेत NJ मधे! पूर्वी आम्हाला NJ तले सगळे लोक माहित होते. आजकाल मात्र शंभर दोनशे लोकांच्यात एखाद दोनच ओळखीचे असतात. बाकीचे सगळे नवीन, नि ते मोठ्ठ्या उत्साहाने मराठी गाण्यांचे, नाटकांचे प्रोग्रॅम्स करत असतात. बरेच न्यूनगंड अहो मग निदान आपल्याच महाराष्ट्रात तरी तसा न्यूनगंड असू नये. बाहेर गेल्यावर आहेच मार खाणे!
|
Mahaguru
| |
| Tuesday, February 27, 2007 - 3:22 pm: |
| 
|
मराठीवरील संकट हे अस्मितेवरील संकट
|
Yogy
| |
| Wednesday, February 28, 2007 - 5:21 am: |
| 
|
आपल्याकडची भाबडी जनता मात्र 'मराठी' मातृभाषा असूनही हिंदी ही राष्ट्रभाषा मानून तिला मस्तकी धरते. कहर विनोदी प्रकार म्हणजे हिंदीच्या प्रसाराकरता आपलेच लोक 'राष्ट्रभाषा प्रसार समिती' वगैरे नावाने संस्था काढून लष्कराच्या भाकर्या भाजत बसतात. हे अगदी खरे आहे. भारत सरकारचा महसूल हा प्रामुख्याने अहिंदीभाषक राज्यांमधून येतो. ह्या महसूलाचा काही भाग दयाळू केंद्र सरकार केवळ हिंदी भाषेच्याच प्रसारासाठी वापरते. स्थानिक भाषांना महत्त्व दिले जात नाही. भारतसरकारच्या सगळ्या संस्था, लष्कर यांना हिंदी भाषा दिवस साजरा करण्याची सक्ती केली जाते. मग भले त्या संस्था कोणत्याही राज्यात असो. हे करण्यापेक्षा जी भाषा पुढे पोटापाण्यासाठी उपयोगी पडेल अशा इंग्रजी भाषेचे शिक्षण तळागाळात देण्यासाठी सरकार का वापरत नाही हे कळत नाही. जी राज्ये हिंदीभाषक आहेत त्यांनी त्यांच्या वाट्याला येणारा पैसा वाट्टेल तिथे खर्च करावा त्याबाबत काही आक्षेप नाही. मात्र केंद्र सरकारने असा दुजाभाव करणे बंद केले पाहिजे. फ यांनी लिहिलेलेही खरे आहे. पण भारतीय रेल्वे, पोस्ट खाते ही केंद्र सरकारची खाती हे लोक सर्रास 'हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. व्यवहारात केवळ त्याचाच वापर करा' असे नेहरु, गांधी यांच्या फोटोसोबत मोठेमोठे फलक लावून महाराष्ट्रात खुशाल जाहिराती करतात. महागुरु मराठी अस्मितेचे कधीच श्राद्ध झाले आहे. मराठी अस्मिता असती तर ही वेळ आलीच नसती. सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे मराठी भाषक लोक इतर भाषिकांनी आपली भाषा शिकावी, तीच वापरावी याचा आग्रह तर सोडाच पण मराठी भाषिकांनी तरी मराठीच वापरावी यासाठी आग्रही नसतात. इतरांना दोष देऊन काही उपयोग नाही.
|
Mansmi18
| |
| Wednesday, February 28, 2007 - 5:46 am: |
| 
|
नमस्कार, मला एका प्रश्नाचे उत्तर ईथे पोस्ट करणर्यापैकि देइल का? तुमचि मुले कुठल्या शाळेत जातात एन्ग्लिश का मराठि माध्यमात? जर एन्ग्लिश माध्य्मात असतिल तर त्यतिल कितिनि मराठी दुसरि किव्वा तिसरि भाशा घेतली आहे आणि कितिनि फ़्रेन्च किव्वा जर्मन ग्घेतलि आहे? किन्वा जर तुम्हाला मुलाना शळेत घलयचे असेल तर किति लोक मराठि माध्य्मात घालतिल?त्या ठिकणि मराठिचा अभिमान आड येत नाही का? आपण जे बोलतो त्याचे आचरण केले नाही तर तो खोटेपणा होत नाहि का? माफ़ करा हा प्रश्न मी काहिसा तुम्हाला आणि स्वतहला पण विचारला आहे कारण जेव्हा मी माझ्या मुलिला शाळेत घालिन तेव्हा बहुतेक एन्ग्लिश मधेच घालिन.
|
Yogy
| |
| Wednesday, February 28, 2007 - 6:08 am: |
| 
|
http://www.hsrc.ac.za/about/HSRCReview/Vol3No3/mothertongue.html http://www.hsrc.ac.za/about/HSRCReview/Vol4No3/6language.html हे दोन्ही रिपोर्ट वाचा. कोणत्याही मुलाला त्याच्या मातॄभाषेतूनच शिक्षण देणे हे योग्य व त्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असते. जगभरात ठिकठिकाणी संशोधन होऊन असे सिद्ध झाले आहे की मातृभाषा हेच शिक्षणाचे योग्य प्राथमिक माध्यम आहे. मात्र यासोबत इतर भाषा शिकणे हेदेखील त्या व्यक्तीच्या सर्वांगीण बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे. माझी मुले कोणत्याही शाळेत जात नाहीत कारण माझे लग्न झालेले नाही व मला मुले नाहीत
|
Mandard
| |
| Wednesday, February 28, 2007 - 7:30 am: |
| 
|
मुलांना कुठल्या शाळेत घालायचे हे स्थानसापेक्ष आहे. मी दिल्लीत रहातो व माझ्यामुलाला इग्लिश मिडीयम च्या शाळेत घालावे लागेल. तसेच तीसरी भाषा हिंदी घ्यावी लागेल. त्याला मराठी शिकवणे ही जबाबदारी आमच्यावर आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|