Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 24, 2007

Hitguj » Views and Comments » General » तर, मराठी माणूस खड्ड्यात गेलेलाच बरा » Archive through February 24, 2007 « Previous Next »

Robeenhood
Saturday, January 10, 2004 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maga [qao kuNaI cacaa- krayacaIÆ itkDo tr ekmaokaMcyaa gacaaMD\yaa QarNyaacaa kaya-Ëma caalaU Aaho ²²

Wakdya
Saturday, January 10, 2004 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

gacaaMD\yaaÆ Co Co Co AsaMsadIya XabdÊ jara caaMgalaa Xabd vaapra kI rava :-)
btw pÜiNa-maa Amaavaasyaocyaa Aasapasa majakuraMsa ( mhNajao vya>I navho tr To@sT ) AXaI ]QaanaacaI BartI yaoto ka %yaacao saMXaÜQana krayalaa hvao

Bee
Thursday, December 29, 2005 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

he waachaa paahoo ....
http://www.deshonnati.com/29dec/mpra.htm

Mumbaimarathi
Wednesday, February 21, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

marathi manush asa vichar kartil tar kay phayda??

Zakki
Wednesday, February 21, 2007 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फायदा काही नाही. लोकांना आजकाल निरनिराळ्या कारणांनी मराठी, देवनागरी हे प्रकार सोयीचे वाटत नाहीत. शिवाय आपल्याला इतर भाषाहि येतात हे दाखवायचे असेल तर मराठीत बोलून काय उपयोग? म्हणून बरेच लोक मराठी बोलत नाहीत. मायबोलीवर येऊन देवनागरी, मराठी लिहायला, वाचायला मिळावे म्हणून बरेच लोक इथे लिहीतात. पण काहींना नाही जमत ते.

त्यात काही नवीन नाही. पूर्वी संस्कृत कठिण म्हणून हळू हळू अर्धमागधी, इ. भाषा आल्या. त्या काळाच्या उदरात लोपल्या. आता मराठीचे पण तसेच झाले तर नवल नाही!

'अतर्क्य ना झाले काही, जरी अकस्मात्'


Satishmadhekar
Thursday, February 22, 2007 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी माणसं सर्वात जास्त 'संकुचित मनोवृत्ती' या शिक्क्याला घाबरतात. आपण आपल्या भाषेचा अभिमान चारचौघात दाखविला, शिवसेनेसारख्या तथाकथित 'जातीय' पक्षाला पाठिंबा दिला, आपण काम करतो तिथे मराठी माणसांना काम देण्याचा आग्रह धरला, तिथे मुलाखतीत मराठी माणसांची निवड केली, अमराठी माणसांनी मराठी शिकावे असा आग्रह धरला, आपल्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला, किंवा रंगपंचमी सारखे सण होळीपौर्णिमेच्या दिवसाऐवजी पंचमीच्याच दिवशी साजरे करण्याचा आग्रह धरला, तर आपण कर्मठ, घाटी, संकुचित मनोवृत्तीचे इ. गणले जाऊ या भीतीने तो गप्प राहतो.

म्हणूनच महाराष्ट्रातून अनेक अमराठी व्यक्ती राजरोस लोकसभा, राज्यसभा, विधानसभा इ. ठिकाणी निवडून जातात. तामिळनाडूतून अतामिळ किंवा बंगालमधून कधी अबंगाली निवडून आलेला पाहिला आहे का? पण त्यांच्यावर कधी कोणी संकुचितपणाचा शिक्का मारला नाही. महाराष्ट्रात मात्र कृपाशंकर सिंग, दुबे, शेट्टी, चतुर्वेदी या नावाची लोकं राजरोस मंत्री होतात आणि विधानसभेत हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचं सांगून हिंदीत बोलण्याचं समर्थन करतात. राजीव शुक्ला, पी व्ही नरसिंहराव, गुलाम नबी आझाद, प्रीतीश नंदी इ. येथून निवडून येतात आणि उघडपणे त्यांच्या मूळ राज्यासाठी काम करतात.

यात त्यांचा काहीही दोष नाही. त्यांना निवडून देणारेच या साठी कारणीभूत आहेत. जर मराठी माणसे आपली भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी जागरूक झाली नाहीत, तर ह्या भाषेचा आणि संस्कृतीचा मृत्यु अटळ आहे.


Yogy
Thursday, February 22, 2007 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पालथ्या घड्यावर पाणी...

सतीशसाहेब,

मराठी माणसांना भाषेबाबत काहीही समजावणे हे दगडावर डोके आपटून घेण्याचे काम आहे.

माय मरो पण मावशी जगो या उक्तीला अनुसरून हिंदी ही पूतनामावशी जगवण्यासाठी मायमराठीचा बळी घेण्याचे काम मराठी बांधवच करत आहेत.

जमेल तेवढे प्रयत्न करत राहणे व शेवटपर्यंत चिकाटी न सोडणे हेच आपल्या हातात आहे.

Maku
Friday, February 23, 2007 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माज़्या मित्राची बायको पुन्या मध्ये लहानपणा पासुन रहते तरी तिला मराठी येत नाही. ती UP ची आहे. ती शहाणी हिन्दि सोडत नाही मग आपण का मराठी बोलने सोडवे. तिची आई तर शहाणी मला बोलते ishika तु हिन्दि का नाही बोलत कधी पन बघावे मराठीच बोलते.
मी पण माज़ी भाषा सोडत नाही .
माज़्या मुळे माज़ा भाऊ पण सरळ कुठेही मराठी चालु करतो.
मग ते पुन्यातले pizz hut
असु दे.

सगल्यानी जर मराठी बोलणे सोडुन दिले तर कसे होइल.


Maku
Friday, February 23, 2007 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगल्यानी जर मराठी बोलणे सोडुन दिले तर कसे होइल.

मला तर स्वाती दांडेकरचे पण आवडले नाही.
अरे तुम्ही लहानपणा पासुन मराठी शिकता आनी US मध्ये गेला तर विसरुन जातात.
खरेच वाईट आहे.
भले तुम्ही तिथे खुप वर्शापासुन जरी असला तरी तुमची भाषा येत नाही.
म्हनजे फ़ारच ज़ाले.



Maku
Friday, February 23, 2007 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगल्यानी जर मराठी बोलणे सोडुन दिले तर कसे होइल.

मला तर स्वाती दांडेकरचे पण आवडले नाही.
अरे तुम्ही लहानपणा पासुन मराठी शिकता आनी US मध्ये गेला तर विसरुन जातात.
खरेच वाईट आहे.
भले तुम्ही तिथे खुप वर्शापसुन जरी असला तरी तुमची भाषा येत नाही.
म्हनजे फ़ारच ज़ाले.


Mandard
Friday, February 23, 2007 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाऊ द्या हो स्वाती दांडेकरांचे त्यानी अमेरीकेत मराठी सोडले. लोक आता पुण्यात पण मराठी सोडुन देतात. त्याचे काय.

Yogy
Friday, February 23, 2007 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती दांडेकरांनी अमेरिकेतील जीवनाशी समरस होण्यासाठी इंग्रजी स्वीकारले ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे.

स्थानिक लोकांशी मिळून मिसळून राहणे, त्यांची भाषा आत्मसात करणे हीच शहाण्या माणसांची लक्षणे आहेत.



Mansmi18
Friday, February 23, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,

मला एका प्रश्नाचे उत्तर ईथे पोस्ट करणर्यापैकि देइल का? तुमचि मुले कुठल्या शाळेत जातात एन्ग्लिश का मराठि माध्यमात? जर एन्ग्लिश माध्य्मात असतिल तर त्यतिल कितिनि मराठी दुसरि किव्वा तिसरि भाशा घेतली आहे आणि कितिनि फ़्रेन्च किव्वा जर्मन ग्घेतलि आहे?

किन्वा जर तुम्हाला मुलाना शळेत घलयचे असेल तर किति लोक मराठि माध्य्मात घालतिल?त्या ठिकणि मराठिचा अभिमान आड येत नाही का?

आपण जे बोलतो त्याचे आचरण केले नाही तर तो खोटेपणा होत नाहि का?

माफ़ करा हा प्रश्न मी काहिसा तुम्हाला आणि स्वतहला पण विचारला आहे कारण जेव्हा मी माझ्या मुलिला शाळेत घालिन तेव्हा बहुतेक एन्ग्लिश मधेच घालिन.



Vinaydesai
Friday, February 23, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका भाषेची कास धरायला दुसरी भाषा सोडावी लागत नाही...

सात सात भाषा बोलणारी माणसं मला माहीत आहेत (मला पाच येतात).

इंग्रजी यायलाच हवं, पण त्यामुळे मराठी विसरलो / विसरले यात कसलं शहाणपण....?


Mahaguru
Friday, February 23, 2007 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, यु आर म्हणींग करेक्ट

Arch
Friday, February 23, 2007 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महागुरु, ही तुला येत असलेली सातवी भाषा का रे?

Mahaguru
Friday, February 23, 2007 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही , हीच माझी पहीली भाषा :D


Maku
Saturday, February 24, 2007 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती दांडेकरांनी अमेरिकेतील जीवनाशी समरस होण्यासाठी इंग्रजी स्वीकारले ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे.

स्थानिक लोकांशी मिळून मिसळून राहणे, त्यांची भाषा आत्मसात करणे हीच शहाण्या माणसांची लक्षणे आहेत. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


अहो Yogy राव . आपण जी भाषा लहानपणापासुन शिकतो आणि लग्न ज़ाल्यावर आपण US ला गेलो की लगेच आपली भाषा विसरतो म्हनजे काय .
जो माणुस लहाणपणापासुन जी भाषा शिकतो तो ति भाषा कधिच विसरत नाही.

मला Yogy तुमचे बोलणे बिलकुल पण पटले नाही.

Zakki
Saturday, February 24, 2007 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे स्वाती दांडेकर न्यू जर्सीला आल्या होत्या. तेंव्हा बर्‍याच जणांनी त्यांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही मराठी कसे विसरलात? तेंव्हा त्यांनी सांगीतले मी वारंवार मुंबई, पुणे इथे जाते. तिथे आजकाल सगळे इंग्रजीच बोलतात माझ्याशी. खरे तर माझ्याशीच काय, आप आपसात सुद्धा कुणि मराठी बोलत नाहीत. म्हणून मी विसरले. आता मी न्यू जर्सीत येत जाईन, मग माझे मराठी सुधारेल.

Yogy
Saturday, February 24, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो Yogy राव . आपण जी भाषा लहानपणापासुन शिकतो आणि लग्न ज़ाल्यावर आपण US ला गेलो की लगेच आपली भाषा विसरतो म्हनजे काय .
जो माणुस लहाणपणापासुन जी भाषा शिकतो तो ति भाषा कधिच विसरत नाही.

मला Yogy तुमचे बोलणे बिलकुल पण पटले नाही.


मी कोठेही स्वाती दांडेकरांनी मराठी विसरल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेले नाही. त्यांनी अमेरिकेतील जीवनाशी समरस होण्यासाठी इंग्रजी भाषा स्वीकारली व तसे सार्वजनिक ठिकाणी बोलून दाखवले हा शहाणपणा (चांगल्या अर्थाने) आहे असं म्हटलं आहे.

एका भाषेची कास धरायला दुसरी भाषा सोडावी लागत नाही हे खरे असले तरी आपण एका वेळी एकच भाषा बोलू शकतो. (एका वेळी म्हणजे एक वाक्य म्हणताना.)
महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणे योग्य, समजूतदारपणाचे व समंजसपणाचे लक्षण आहे याचे कारण ती इथल्या बहुसंख्य समाजाची भाषा आहे. जर उत्तर प्रदेशातून आलेल्या व दहा बारा वर्षे इथे राहिलेल्या व्यक्तीने हिंदीऐवजी मराठीचा सार्वजनिक ठिकाणी वापर करण्याचा आपण आग्रह धरतो (तसा तो पुण्यात कोणी धरत नाही ती गोष्ट सोडा) तसाच दांडेकरांनी स्वत:हून इंग्रजीचा वापर केला, जी अमेरिकन समाजाची व्यवहाराची भाषा आहे, व आपण आग्रहाने इंग्रजीच वापरतो हे सार्वजनिक ठिकाणी सांगितले. ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators