|
Yogy
| |
| Thursday, February 15, 2007 - 8:15 am: |
| 
|
सगळ्या मालिका संपवल्यावर चॅनेलवर काय दाखवणार, आमची माती आमची माणसं?
|
Badbadi
| |
| Thursday, February 15, 2007 - 8:17 am: |
| 
|
तात्या, मायबोलीवर तुमचे स्वागत आहे!!! मनोगता प्रमाणे तुम्हाला इथेहि दणदणीत लोकप्रियता मिळावी यासाठी शुभेच्छा!!!
|
Lakshy
| |
| Thursday, February 15, 2007 - 8:27 am: |
| 
|
बरे झाले अभिजित ला फ़ाईन्लला थेवले. हरिप्रसाद्जीनी प्रेक्शकान्चे मत बरोबर च आहे हे निप क्श पने मन्गेश चि नीवद करुन सिद्ध केले. आता तरी अभिजित ला ४ कप मीलयाल्यामुले जो गर्वअहन्कार आला होता तो उतरला आसेल.विद्या वीनयेन शोभते. मन्गेश चि वागनुक,बोलने,स्वर, हे सर्वच अभिजित पेक्स्या सरस आहे.सुजान प्रेक्शकान्चि नीवद पद्धति सुद्धा अवधूत,देवकि पेकशा काकन भर सरस आहे.
|
बडबडीजी, आमच्या लोकप्रियतेचं श्रेय आपल्या सारख्या चोखंदळ रसिकांनाच आहे! /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=921503#POST921503 तात्या.
|
तात्या अहो सगळ्या मालिका संपवून कसं चालेल? म्हातार्यांना timepass तर हवा की नको?
|
Nilsat
| |
| Monday, February 19, 2007 - 7:36 am: |
| 
|
आभिजीत ला महाअन्तीम फेरित गान्याचि सन्धि देने हा एक योग्य निर्नय आहे.
|
Prady
| |
| Monday, February 19, 2007 - 7:27 pm: |
| 
|
डांगे तुम्ही प्रोफेशन entertainment channel लिहीलय. तुम्ही झी टी व्ही वरच काम करता का? नाही तसं असेल तर चांगलच आहे. ईथल्या सभासदांच्या प्रतिक्रीया तिकडे जरूर कळवा.
|
Mansmi18
| |
| Monday, February 19, 2007 - 8:29 pm: |
| 
|
नमस्कार कोणिहि चुकुन झी मराठिच्या साईटवर असम्भव च्या लिन्कवर जाऊ नका. त्यान्नि पुर्ण महिति दिलि आहे काहि रहस्य वगैरे बाकी ठेवले नाही. जर अभिजित ला सन्धि दिलि तर मग आनन्दिला का नको? विजयला का नको? नियम पाळले तर पुर्ण पाळा नहितर नियमच नकोत.
|
Suvikask
| |
| Tuesday, February 20, 2007 - 7:51 am: |
| 
|
दोन दिवसापसुन माझ्याकडे चुकुन केबल दिसायला लागले.. म्हणुन म्हंटल चला बघु या झी मराठी, ई मराठी वगैरे वगैरे..पण दोन दिवसात डोक जाम वैतागल... अरेरे काय त्या मालिका, काय ती कथानक, काय ती सूडभावना. सगळ्या मालिकांचे कथानक म्हणजे सुड घेणे, मग कोणी भावाचा घेत, कोणी सावत्र मुलगा/ आईवडील्बहिणीचा घेत, तर कोणी मित्राचा, कोणी मैत्रिणीचा तर कोणी सासुचासुनेचा. सगळ फक्त पैशासाठी!!! आणी हे सगळ प्रेक्षक सहन करतात, अगदी एकही भाग चुकवत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. एवढच नाही तर, त्यातल्या पात्रंचे पुढे काय होईल, कोण काय चाल करेल या विषयांवरही चवीने चर्चा करतात!!!! कमाल आहे!!! काही हलक फुलक, दर्जेदार नाहीच!!! केबल नाही याचा कोण आनंद झाला मला!!!
|
Nilsat
| |
| Tuesday, February 20, 2007 - 2:59 pm: |
| 
|
Ms. Karmarkar नाही मी ज़ी मध्ये नाही. कदाचीत तुम्हाला आच्चर्य वाटेल की मी स्टार टीव्ही मध्ये आहे.
|
Sayuri
| |
| Tuesday, February 20, 2007 - 7:06 pm: |
| 
|
Hi Suvikask, I agree, serials are not worth watching with few exceptions. श्रीयुत गंगाधर टिपरे नक्कीच चांगली आहे. No सूड, द्वेषभावना nothing. Apart from these daily soaps are other programs which are really good. eg, घडलंय बिघडलंय (चालू सामाजिक घटनांवर आधारीत विडंबनात्मक प्रोग्राम) भटकंती (महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांवर आधारीत प्रोग्राम) मानसी तुमच्या घरी (for receipes) हॅलो सखी (विविध विषयातील तज्ञांशी फ़ोनद्वारे केलेली चर्चा) अलिकडेच प्रशांत दामलेचा आरोग्यविषयक कार्यक्रमही चालू झाला आहे. शिवाय घर/property संबंधित होम स्वीट होम हाही एक कार्यक्रम असतो. At least I dont feel zee marathi is useless, we can decide anyways what to watch and not.... 
|
Neelu_n
| |
| Wednesday, February 21, 2007 - 7:38 am: |
| 
|
हो सयुरि अनुमोदन तुला श्रीयुत गंगाधर टिपरे खरच एकदम छान मालिका आहे. आणि आता पुन्हा रीपीट भाग बघताना अज्जिबात कंटाळा येत नाही. मागे एक ४०५ आनंदवन म्हणुन एक मालिका होती ती पण छान होती ती पुन्हा चालु केली पाहिजे.
|
Nilsat
| |
| Wednesday, February 21, 2007 - 2:50 pm: |
| 
|
झी टीव्ही वर काही मालिका खुपच छान आहेत. उदा.- या सुखानो या, होम मिनिस्टर, आयडीया सारेगमप, श्रीयुत टीपरे, अवन्तीका व ईतर खुप सार्या. असम्भव मालिका हळुहळु पकड घेते आहे. "काही हलक फुलक, दर्जेदार नाहीच!!!" हे म्हणणे बरोबर नाही.
|
Mansmi18
| |
| Wednesday, February 21, 2007 - 2:57 pm: |
| 
|
नमस्कार कोणाला असम्भव मधे ती चीज़ म्हणणार्य गायिकेचे नाव माहीत आहे का? अतिशय सुन्दर म्हटलि आहे ती.
|
Mansmi18
| |
| Wednesday, February 21, 2007 - 4:16 pm: |
| 
|
तुमच्या मुलान्ना मराठि कळते का? मग शक्यतो त्यान्ना वहिनिसाहेब हि मालिका पहु देउ नका. काल्च्या भागात तो मामा त्या बाईला म्हणतो "तु माणुस जळताना पाहिला आहेस का? खुप मजा येते." माझा विश्वासच बसेना मी कय ऐकतो आहे त्यावर. मला वाटते आपल्याएथेहि पीजी १३ वगैरे रेटिन्ग दाखवायचि वेळ आलि आहे. दुसरा म्हणजे अवघाचि सन्सार मधला हर्शवर्धन अनि तो विजु खोटे सरखा दिसतो तो मवालि मणुस. एतकि घणेर्डि आणि उद्द्धत भाशा अजुन लोक वापरतात???
|
सध्या झी मराठीवर चालू असलेल्या असंभव या मालिकेमधून लोकांच्या अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातंय असं नाही का वाटत? तीच गत यासुखांनो या मालिकेची, या मालिकांमधून बुवाबाजीचा प्रसार केला जातोय कळत-नकळतपणे.
|
Atul
| |
| Thursday, February 22, 2007 - 12:58 am: |
| 
|
झी टिव्ही वर कथोकथी नावाची मालिका लागते, बरेचदा चान्गल्या कथा असतात. शिवाय भटकन्ती, बुकशेल्फ, युवा, मानसी तुमच्या घरी ई. मालिका पण चन्गल्या आहेत. इतर काही मलिकान्बद्दल न बोललेलेच बरे उदा. वहिनीसाहेब, अधुरी एक कहाणी इ.वहिनीसाहेब तर खूपच भडक वाटते. मराठीत पण असल्या 'K' टाइप मालिका आल्याचे खूप वाईट वाटले.
|
Mahesh
| |
| Thursday, February 22, 2007 - 5:20 am: |
| 
|
आम्ही ती वहिनीसाहेब नावाची भंगार मालिका पहात तर नाहीच, पण त्याची जाहिरात जरी सुरू झाली तरी चनेल बदलतो. मालिकांना सेन्साॅर करत नाहीत का ? खरतर या असल्या मालिका तयार करणार्या आणी दाखविण्याचा निर्णय घेणार्या माणसांना जबरी शिक्षा झाली पाहिजे. काय करता येईल त्यासाठी ? खटला भरूनही उपयोग होणार नाही, कारण निकाल लागेपर्यंत अनेक मालिका अनेक वेळा प्रसारित होतील.
|
Neelu_n
| |
| Thursday, February 22, 2007 - 7:21 am: |
| 
|
>>>>वहिनीसाहेब नावाची भंगार मालिका महेश अगदी अगदी खरय.. भंगार, फालतु, बथ्थड सीरीअल आहे ती. त्या सीरीअलच्या निर्माता, दिग्दर्शक, आणि त्यात काम करणारे कलाकार यापैकी कुणालाही हे आपण प्रेक्शकांना काय दाखवतोय ह्याचे मुळीच भान नाहिय याचा तोव्र खेद वाटतोय. काही सुजाण प्रेक्षक चॅनॅल बदलुन अथवा टीव्ही बंद करुन गप्प बसतील. पण डोके बाजुला ठेवुन बघणारे ईतर प्रेक्षक हेच म्हणजे खरं आणि योग्य असे मानतात.(हा माझा अगदी चांगला अनुभव आहे.) म्हणजे समाजात किती वाईट गोष्टी आपण रुजवतोय याचे भान यापैकी कुणालाच नाहीय. महेश तुम्ही म्हणताय तसे खरच या असल्या मालिका तयार करणार्या आणी दाखविण्याचा निर्णय घेणार्या माणसांना जबरी शिक्षा झाली पाहिजे.
|
महेश, नीलू तुमचा राग मी समजू शकते पण अहो ट्रेलर बघायला फार मजा येते. असल्या मालिकांचे ट्रेलर भयंकर विनोदी असतात. कथाकथी खरंच छान असते. गंगाधर टिपरे तर मस्तच. दिलिप प्रभावळकर अतीच म्हातारा दाखवलाय म्हणा. पण तरीही. शुभांगी संगवईला सलाम. काय काम केलेय! >> समाजात किती वाईट गोष्टी आपण रुजवतोय याचे भान यापैकी कुणालाच नाहीय. नीलू अगदी खरंय गं. पूर्वी किती छान मालिका असायच्या टिव्हीवर. त्याही तेंव्हा लोक बघायचेच. विनोदी सिरियल्स मधला विनोद तर अवर्णनीय असतो. ती खिचडी मालिका. खूप विनोदी आहे म्हणून लावली तर ५ मिनिटात डोके दुखायला लागले. खरंतर सामान्य जन्ता दाखवाल ते बघते. अशावेळी चांगले दाखवून लोकांचे प्रबोधन करणे, चांगल्याची आवड लावणे हे सोडून मिडीया भलताच उथळपणा करतेय. हे करमणुकीचे तर सोडाच पण बातम्यांचे चॅनेल ही काय तद्दन फालतू आहेत. ऐश्वर्याच्या पूजा पाठावर अर्ध्या तासाचे कवरेज. वा. आणि काय तर एका गावात म्हणे झलक दिखला जा गाणे म्हटले की भूत दिसते. ऐ. ते. न. ते अंधश्रद्धा निर्मूलन वाले तिकडे जीव तोडून सांगतायत आणि हे बातम्या देतायत भुतांच्या आणि मांत्रिकांच्या.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|