Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 24, 2007

Hitguj » Views and Comments » General » Cricket » Archive through February 24, 2007 « Previous Next »

Satishmadhekar
Tuesday, February 20, 2007 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज न्यूझीलंडने आॅस्ट्रेलियाला लागोपाठ तिसर्‍यांदा हरविले.

आॅस्ट्रेलिया ५० षटकात ५ बाद ३४६
न्यूझीलंड ४९.३ षटकात ९ बाद ३५०

आॅस्ट्रेलियाचा हा लागोपाठ पाचवा पराभव! जरी पाॅटिंग, मॅकग्रा, ब्रेट ली आणि गिलख्रिस्ट नव्हते तरी हा विजय महत्वाचा ठरतो.

बहुतेक जगज्जेत्यांची शिखरावरून घसरण सुरू झालेली दिसतेय!


Satishmadhekar
Tuesday, February 20, 2007 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाॅटिंग आणि गिलख्रिस्टच्या अनुपस्थितीतही आॅस्ट्रेलियाची फलंदाजी भक्कम आहे. आताच्या मालिकेत न्यूझीलंड बरोबरच्या दोन सामन्यात त्यांनी ३३५ पेक्षा अधिक धावा केल्या. परंतु मॅकग्रा आणि ब्रेट ली नसताना त्यांची गोलंदाजी मात्र दुबळी होते.

२००७ विश्वचषकामध्ये ब्रेट ली किंवा मॅकग्रा यांपैकी एकजण जरी अपयशी ठरला, तर आॅस्ट्रेलियाला जिंकणे अवघड जाईल. सध्या इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड चांगलेच भरात आहेत. बहुतेक या वेळी नवीन जगज्जेता बघायला मिळेल असं वाटतंय.


Yuvrajshekhar
Tuesday, February 20, 2007 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यावेळच्या वेळापत्रकावर नजर टाकली तर दक्षिण आफ्रिकेला विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. कारण साखळीमध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या ग्रुपमध्ये आहेत त्यामुळे सुपर एट मध्ये त्यांआ ऑस्ट्रेलियाबरोबर सामना होणार नाही.

ऑस्ट्रेलिया सुपर एट मधले सगळे सामने जिंकून पहिल्या क्रमांकाने सेमी फायनलमध्ये पोहोचतील,दक्षिण आफ्रिकेचा सध्याच फ़ॉर्म पाहता ते सुद्धा सगळे सामने जिंकून दुस-या क्रमांकाने सेमी फायनलमध्ये पोहोचतील उर्वरीत दोन जागांसाठी भारत,श्रीलंका आणि वेस्ट इंडीज यापैकी दोन संघ येतील असा माझा अंदाज आहे. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला शक्यता श्रीलंका किंवा वेस्ट इंडीज यांच्यापैकी एकाबरोबर खेळावे लागेल,वेस्ट इंडीजला होम टीम असण्याचा तसेच लारा फॅक्टर व लंकेला मुरलीधरन आणि जयसूर्या संघात असण्याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. आणि जरी ऑस्ट्रेलिया फायनल मध्ये गेली तर त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळावं लागेल याची दाट शक्यता आहे आणि ४३४ धावांचा पाठलाग केलेल्या सामन्यामुळे दक्षिण आफ्रिकेला मानसिक फायदा मिळेल म्हणून ऐनवेळी जर दक्षिण आफ्रिकेने कच खाल्ली नाही तर यावेळी विश्वचषक जिंकण्याची त्यांना नामी संधी आहे.

मला वाटतं मी फार चांगला क्रिकेट समीक्षक होऊ शकतो नाही?


Zakki
Wednesday, February 21, 2007 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो पण ते भारताचे काय? द्रविड, सचिन, कुंबळे, गांगुली, सेहवाग, हरभजन, हे सगळे आहेतच की! त्यांचे काय? त्यांनी वेस्ट ईन्डिजला हरवले होते, श्रीलंकेला सुद्धा! मागच्या वेळी नाही का फायनल पर्यंत पोचले होते? मग?

Robeenhood
Wednesday, February 21, 2007 - 2:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोवाजी आप इंडियाके टीमको अच्छी तरहासे जानते नही हो!!!

Kedarjoshi
Wednesday, February 21, 2007 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ये हूई ना बात.
मला वाटत भारताला पण चांसेस आहेत त्यासाठी खेळाडुनीं ईकडे तिकडे लक्ष न देता फक्त खालील टिमस ला हारवावे लागेल. पहीले श्रिलंका ( हारविने काहीच कठीन नाही).
पाकडे वल्डकपला नेहमीच हारतात.
विडींज जास्त कठीन काम नाही.
ईंग्लंड फक्त फिल्टॉंफ ला काढले की झाले.
साऊथ अफ्रिका काय खर नाही
ऑस्ट्रेलिया कदाचित आपनच हारु
न्युझीलंड हम ही जिंतेंगे

अजुन बाकी सटर फटर टिमची काही गणना नाही. एकुन काय आपल्याला संगळ्यांना हारवावे लागेल.

सचिन, सोरभ व द्रविडचा हा शेवटचा वल्डकप आहे त्यामुळे तिघेही छान खेळन्याचा प्रयत्न करतील. नी आजकाल दादा मस्त फार्मात आहे. बघु काय होते ते.


Mukund
Wednesday, February 21, 2007 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी... उथप्पाने श्रिलंकेबरोबर घेतलेले कॅच बघुन तुझे म्हणणे खरे वाटले की तो एक चांगला क्षेत्ररक्षक आहे पण गंगुली,सेहवाग,तेंडुलकर व उथप्पा असे ४ सलामीचे फलंदाज घ्यावेत का या विचाराने मी म्हटले होते की तोच-तोचपणा नको म्हणुन त्या चारापैकी कुणाला काढायचे असेल तर उथप्पाला काढुन त्याच्याऐवजी कैफ़ला घ्यावे असे मी म्हटले होते.आणी इंग्लंडचे म्हणशील तर मी याकरता अस म्हटल होत की व्ही. बी. कप फ़ायनलच्या आधी त्यांनी अधोगतीचा तळ गाठला होता. अशा परीस्थीतीत इंग्लीश खेळाडु कॉर्नर केलेल्या श्वापदासारखी व्रुत्ती दाखवतात...त्यांची चिकाटी वाखाणण्यासारखी असते. आता ऑस्ट्रेलिया फ़ायनल मधे हरल्याचे श्रेय इंग्लंडला द्यावे की ऑस्ट्रेलियाच्या बेसावधपणाला व मग्रुरतेला द्यावे ही वादाची बाब होउ शकेल पण कॉलींगवुडच्या चिकाटीला तुम्ही कधीच दुर्लक्षीत करु शकणार नाहीत... Collingwood is a classic personification of British mentality..

आणी आपल्याकडे एक आहे.... एखाद्याने एखादी दुसरी चांगली खेळी केली की लगेच त्याने अशा खेळीने आपली जागा वर्ल्ड कप साठी नक्की केली असे मानले जाते...त्याचा मला तिटकारा आहे. उथप्पा व दिनेश कार्तीक या दोघांनी दोन चार चांगल्या इनींग्स खेळल्या हे मान्य आहे पण लगेच लोकांची असे म्हणण्याची घाइ होते की त्याने त्याची जागा पक्की केली. उथप्पा रणजी मधे फ़ॉर्म मधे होता हे खर आहे पण मग तोच जर निकष लावायचा तर बंगालचा मनोज तिवारी रणजी मधे सुप्रीम फ़ॉर्म मधे होता... असो.(इथे हे नमुद करावेसे वाटते की मनोज तिवारी व चितेश्वर पुजारा हे दोघे लवकरच भारतासाठी खेळतील असे मला वाटते..) उथप्पाने जे प्रॉमीस दाखवले आहे ते जर त्याने मोक्याच्या सामन्यांमधे निभावले तर १९९६ च्या वर्ल्ड कप मधे जयसुरीया-कालुवितर्णने जसे पहिल्या १५ षटकांमधेच श्रिलंकेला विजयाचा मार्ग बहुतेक सामन्यात सुकर करुन दिला होता तसेच काम फ़ॉर्म मधे असलेला गांगुली व उथप्पा भारतासाठी या वर्ल्ड कप मधे करुन देउ शकतील.

ग़ांगुलीचे खरोखरच दणक्यात पुनरागमन केल्यासाठी अभिनंदन केले पाहीजे. त्याचे ते बंदाराला मारलेले षटकार बघताना वाटत होते की फिरकी गोलंदाजांना मिड ऑन मिड ऑफ़ च्या पट्ट्यात गांगुलीसारखे शैलीदार षटकार मारणारा आज जगातल्या सगळ्या खेळाडुंमधे एकही नाही.. उत्क्रुष्ट पददालित्य दाखवत तो जेव्हा नाचत पुढे येतो ते...... व षटकार मारताना त्याच्या बॅटीचा होणारा आर्क... अगदी बघण्यासारखा असतो.. अगदी टायगर वुडला जेव्हा टी ऑफ़ वरुन शॉट मारताना बघताना जसा आनंद मिळतो तसाच आनंद गांगुलीला बघताना त्यावेळेला होतो...:-)

सुर सापडलेले गांगुली,तेंडुलकर,द्रवीड व युवराज ही चौकडी वर्ल्ड कपमधे प्रतिस्पर्ध्यांची खरी डोकेदुखी ठरु शकतात.. आणी सेहवाग,धोनी व उथप्पांच्या कॅमीओ खेळींची भर जर त्यात पडली तर
watch out for India...they just might repeat the success similar to last world cup....आणी जहीर,आगरकर व मुन्नाफ़ खरच चांगले गोलंदाजी करत आहेत. वर्ल्ड कपच्या स्टेजने जर ते भांबावुन गेले नाहीत तर आपली गोलंदाजीही गेल्या वर्ल्डकप पेक्षा उच्च दर्जाची वाटते. असो. पाहुया काय होते ते....

ऑस्ट्रेलियाची चाललेली ससेहेलपाट पाहुन बाकीचे सगळे संघ आपापले पंजे चाटत असतील... पण पॉंटींग,गिलख्रीस्ट,ली,क्लार्क,सीमंड्स हे पाची जण तंदुरुस्त होउन परत संघात आले तर अजुनही तेच फ़ेव्हरेट आहेत असे मी म्हणेन. न्युझीलंडने जखमी वाघाला जरुर ओरबाडले आहे पण तोच डिवचलेला वाघ बरा झाल्यावर कसा वागतो ही एक उत्सुकतेची बाब असेल.


Zakki
Wednesday, February 21, 2007 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाय भारतीयांनी आता नविन गणवेष घेतला आहे. आता केशरचना, चेहेर्‍याची रंगपट्टी झाले, अद्ययावत फॅशनचे उंच टाचांचे बूट घेतले की भारताची तयारी जोरात होईल.

आजकाल भारतातहि cheerleaders असतात म्हणे. त्या मुलींना सुद्धा न्यायला पाहिजे. शिवाय एक दगड घेऊन जावे. आपण हरत असलो तर त्याला जोडे मारणे, नि आपले बरे चालले असले तर त्याला फुले पाने वाहणे ह्या कामासाठी दगड व काही लोक नेणे आवश्यक आहे.

तसेच एक डॉक्टर पुरणार नाही.

जमल्यास खेळून दमल्यावर मनोरंजनासाठी बार व बारबाला घेऊन जाणेहि जरूरीचे आहे.

या सगळ्यासाठी पैसा तर भरपूर आहेच. शिवाय क्रिकेटसाठी भारतीय अंगावरचा सदरा सुद्धा काढून देतील.

आणि शेवटचा उपाय म्हणून चॅपेल ऐवजी हर्शेल गिब्ब ला कोच करावे. त्याला माहित आहे मॅचेस कश्या जिंकायच्या!



Saco
Thursday, February 22, 2007 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि शेवटचा उपाय म्हणून चॅपेल ऐवजी हर्शेल गिब्ब ला कोच करावे. त्याला माहित आहे मॅचेस कश्या जिंकायच्या! >>>>त्याला matches कशा जिंकायच्या ते माहित नाही, कशा हारायच्या ते माहीत आहे

Aaspaas
Thursday, February 22, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

द. अफ्रिका, न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया सारख्या जबरदस्त मानसिक ताकदीचे, सातत्यपूर्ण खेळ करणारे संघ पाहता, फक्त मायदेशातच छान खेळ करणार्‍या भारतीय संघाला तुलनेने कमी संधी आहे. नाही का?

Nandya
Friday, February 23, 2007 - 1:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aaspaas, some interesting facts surface if you see the 'away' performance of all the major cricketing nations, since the last world cup.

If matches against minnows like Bangladesh and Zimbabwe are excluded, it is quite evident we are looking at a world cup of culpably poor tourists :-)

When a superpower like Australia itself tours at a little above 50% success contrary to its abominable, all-conquering aura, need one say more about others?

* Australia have had 56% success as tourists since the last world cup....

* Pakistan......41%...

* South Africa..39%...

* Sri Lanka.....37%...

* .India.........31%...

* England.......26%...

* West Indies...25%...

* New Zealand...21%...


Funnily enough the 2 of the 3 worst touring nations in this list have recently beaten the best team quite convincingly... and the third is is playing the WC at its home :-)

प्वायंटाचा मुद्दा, lets leave cricket to its enigmatic indeterminateness and enjoy its vagary instead काय? लंगर छाप आसल तर काडा येक...


Farend
Friday, February 23, 2007 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nandya ' away' चे लॉजिक वर्ल्ड कपला लागेल असे नाही. भारताची दक्षिण आफ्रिकेतील एरव्हीची कामगिरी व २००३ मधली कामगिरी यात किती फरक आहे!

मला वाटते असे चान्सेस आहेत्:

१. ऑस्ट्रेलिया (कदाचित पूर्णपणे अपराजित राहणार नाहीत २००३ सारखे)

२. वेस्ट इंडीज किंवा श्री लंका (घरचे मैदान, संथ व बाउन्स नसलेल्या विकेट्स)

३. भारत (कधी काय करतील सांगता येत नाही)

४. दक्षिण आफ्रिका (विंडीज मधे फार काही करतील असे वाटत नाही)

५. न्यूज़ीलंड (परदेशात किती सातत्या दाखवतात शंका आहे) किंवा पाकिस्तान (कोणीतरी जबरी डिवचल्या शिवाय जागे होणार नाहीत) किंवा ईंग्लंड (पुन्हा सातत्याबद्दल शंका)


Satishmadhekar
Friday, February 23, 2007 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आॅस्ट्रेलियाला अजून एक धक्का! ब्रेट लीची दुखापतीमुळे विश्वचषकातून माघार.

आता त्यांच्याकडे एकच चांगला गोलंदाज शिल्लक आहे, तो म्हणजे मॅकग्रा. बाकीचे काही विशेष चांगले नाहीत. नुकताच न्यूझीलंडने ब्रेट ली आणि मॅकग्राच्या अनुपस्थितीत त्यांचा दणदणीत पराभव केला. एकटा मॅकग्रा फार काही करू शकणार नाही. आता दक्षिण आफ्रिका आणि इतरांना चांगली संधी आहे.


Nandya
Friday, February 23, 2007 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Farend, trend दाखवला हो फ़क्त. एक जो जनरल समज आहे ना की भारताचा ( च ) संघ फ़क्त घरी ( च ) चांगला खेळतो बाहेर नाही, त्यावर तस्कायनायकाय अशी कोणीही न मागता टिप्पणी करीत होतो, बाकी काय नाय.
आत्ता SA by virtue of its excellent current form and Australia by virtue of its legacy असे केवळ २ संघ वरच्या मजल्यावर आहेत. बाकी उरलेल्या ६ संघांमधे विषेश काहीही फ़रक नाही. गंमत म्हणजे ICC ranking पाहिले तर माग्च्या WC प्रमाणेच ह्या वेळेसही the teams ranked 3rd thru' 8th lie within just 12 points of each other .


झक्की :-) ... काहो यंदा सुपारी कातरत शिव्या देणार की शिव्या देत सुपारी कातरणार?

Storvi
Friday, February 23, 2007 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या त्यान्चा आडकित्ता सापडत नाहिये असे म्हणाले ते त्या मुले नुस्त्याच शिव्यांची लाखोली वहाणार आहेत ते. :-O

Zakki
Saturday, February 24, 2007 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ता! शिव्या कधी दिल्या? मला क्रिकेटबद्दल जे माहीत आहे त्याप्रमाणे मी माझ्याकडून भारताला विजय कसा मिळवता येईल हे लिहीले! सगळेच काय तुमच्यासारखे हुष्षारच असले पाहिजेत असे कुठे लिहीले आहे? पण शिव्या देत नाही मी!

Farend
Saturday, February 24, 2007 - 3:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nandya बरोबर आहे. मग तो समज बहुधा टेस्ट च्या कामगिरीवर असावा, कारण १९३२ ते २००० आपण फक्त १३ मॅचेस बाहेर जिंकल्या, आणि त्यानंतर आणखी १४.

बाकी त्या खेळपट्ट्या श्रीलंकेसारख्या आहेत असे म्हणतात ते कितपत खरे आहे? तसे असेल तर विंडीज आणि लंका दोघेही डेंजरस आहेत.


Mukund
Saturday, February 24, 2007 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलिवरचे जे क्रिकेट प्रेमी व दर्दी आहेत त्यांना विनंती...

माझ्या लहानपणी म्हणजे ७० च्या दशकात टीव्ही घरोघरी नसल्यामुळे मी रेडिओ समालोचन ऐकायचो. माझ्या लहानपणी मला ऑल इंडिया रेडिओ वर अनंत सेटलवाड, सुरेश सरय्या व राजु भारतन यांचे इंग्रजी समालोचन आठवते,तसेच सुशील दोशी यांचे हिंदी समालोचन व बाळ पंडित यांचे मराठी समालोचन आठवते. जर कोणाकडे या समालोचकांच्या समालोचनाचे आर्काइव्ह्स असतील किंवा कुठे मिळु शकतील याची माहीती असेल तर क्रुपया मला इ मेल करुन कळवले तर मी तुमचा फार आभारी राहीन.झालच तर ६० च्या दशकातील प्रख्यात भारतिय समालोचक बॉबी तल्यारखान, बॅरी सर्बाधीकारी व पिअर्सन सुरिता यांचेही आर्काइव्ह्स मिळाले तर फार बरे होइल. तसेच बी बी सी वरचे जुने प्रख्यात समालोचक जॉन अर्लॉट, ब्रायन जॉन्स्टन व हेन्री ब्लोफ़ील्ड यांचेही आर्काइव्ह्स मला हवे आहेत. इंटरनेट वर खुप शोधले पण कुठेच तशासाठी लिंक सापडत नाही. इंटरनेट तज्ञ व मायबोलिवरचे क्रिकेटप्रेमी यात मला मदत करु शकतील काय?

मुकुंद


Aaspaas
Saturday, February 24, 2007 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंदा, अवघड आहे, भारीच शौक तुला. त्याचे काय करणार आहेस तू?

Robeenhood
Saturday, February 24, 2007 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. कपिलदेव फिर एक बार अपने बोलिंग मार्क पर जाते हुए..
कपिलने अब तक अठारह ओव्हर्स किये है उनमेसे पाँच मेडन रहे है, बाईस रन देकर उन्होने एकमात्र विकेट हासिल किया है ग्रीनिजका..
कपिल देवकी अगली गेन्द, दाहिने हाथसे ओव्हर द विकेट, मिडल स्टम्पपर जाती हुई इसे खेलनेका कोइ प्रयास नही किया रिचर्ड्सने. गेन्द जाने दी विकेटकीपर किरमानीके पास.कोइ रन नही. वेस्ट इन्डीजका स्कोअर अभीभी टिका हुआ है तीन विकेटपर एकसौ दस रन.

कपिलकी गेन्दोमे आज उछाल कम है लेकीन उसका फायदा नही उठा पा रहे है बॅट्समन
इस बीच कपिलदेवकी अगली गेन्द, टिप्पा खाती हुई ऑफ स्टम्पपर जाती हुई, जिसे खेलते पूरी तरह चूके इस बार रिचर्डस. एक हल्कीसी अपील भी हुई विकेटकीपर द्वारा लेकीन उत्साहमे ज्यादा और आत्मविश्वासमे कम. अम्पायरने उसे नकार दिया
आसमानमे कुछ सफेद बादल मँडरा रहे है. बहुत अच्छी धूप खिली है यहाँ फिरोज शहा कोटला मैदान दिल्लीमे. काफी संघर्षपूर्ण क्रिकेट

ओह.. पूरी तरहसे बीट हुए रिचर्ड्स इस बीच, कपिलकी अगली गेन्दपर. पर कोइ नुकसान नही...


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators