Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 29, 2007

Hitguj » Views and Comments » General » माझी आवडती मराठी मालिका » Archive through January 29, 2007 « Previous Next »

Kedarjoshi
Tuesday, January 16, 2007 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

and why was he talking in english???Tyala marathi speak karayala difficult hote ka???" >>>
असे माणसं घरी पण मराठी बोलत नसतात. त्यामुळे बाहेर ते काय बोलतील. जन्मल्यावर आपोआप बापाचे नी आडनाव लागते त्यामुळे त्याचे नाव मराठी आहे ईतकेच.

त्यांनी पण त्याला गायला का सांगीतले कळले नाही. का उगीच गायनाचा अपमान करतात लोक? उद्या च्यायला अजय देवगन ला ही बोलवतील नी म्हणतील गा म्हणून.


Prady
Tuesday, January 16, 2007 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खटकलं हे की आता अंतीम फेरी सुरू असताना ज्याला गाण्यातलं काही कळत नाही अशा माणसाला परीक्षक म्हणून का बोलावतात. उगीच आपल्याला फार कळतं असा आव आणून स्वत्:ची मतं सांगत होता. आता आज सचीन येतोय परीक्षक म्हणून.

Sayuri
Tuesday, January 16, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Exactly Prady! संगीताशी डायरेक्ट संबंध नसणार्‍यांना कशाला बोलावतात! त्यातून मांजरेकरसाहेब म्हणजे 'चुकुन मराठी म्हणून जन्माला आलेल्यांपैकी'!
सचिन is worth as judge as he himself is a good singer.
judge म्हणून बोलावताना जरातरी तारतम्य बाळगणे एव्ह्ढीच अपेक्षा आहे झीमराठी कडून.

Psg
Wednesday, January 17, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सचिनला काल बोलावलं होतं, पण कालचा एपिसोड पाहिला का? तो जरा जास्तच बोलत होता.. तेही विषयाला सोडून! तो इतका talented आहे, उत्तम अभिनेता, दिग्दर्शक आहे, गातोही.. पण त्याचे comments काहीतरी वेगळेच होते.. माझे बालपण, मी कसा मोठ्या लोकांमधे वावरलो आहे.. असेच होते सगळे! अर्थात महेश मांजरेकरपेक्षा सचिन शंभर पटींनी चांगला! :-)

असो.. आनंदी सुरेख गायली.. मंगेश मला पहिल्यापासूनच आवडतो! final चांगली होईल..


Himscool
Wednesday, January 17, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम अनुमोदन, सचिन कडून गाण्याबद्दल जास्त Comments अपेक्षित होत्या. त्याचे Beating Around the Bush असेच जास्त चालले होते...

आता स्पर्धक कमी आणि वेळ जास्त असे झाल्यामुळे वेळ कसा घालवायचा असाही प्रश्न पडला असेल म्हणून मधली बडबड फारच वाढल्यासारखी वाटली

खरे बघायला गेले तर खळे काकांची गाणी हा अत्यंत अवघड प्रकार आहे... त्यात सगळ्यांनी प्रयत्न चांगला केला...

आनंदी गायली चांगली पण गाण्याचे Selection जरा चुकल्यासारखे वाटले... कोसंबीला उगाच डोक्यावर चढवत आहेत असे वाटते आहे... मंगेश छान गायला पण त्यामनाने गुण कमी मिळाल्यासारखे वाटले... अनिकेत परत एकदा बहुतेक प्रेक्षकांच्या मतांवर तरेल असे वाटते आहे... पुढच्या वेळेस अनघा किंवा आनंदी बाहेर जायचे चान्सेस वाटत आहेत...

गेल्यावेळची मते बघता.. मुली शेवट पर्यन्त जातील की नाही याची शंका आहे त्यामुळे आनंदी चांगली गायली तरी Final ला जाईल असे वाटत नाही


Badbadi
Wednesday, January 17, 2007 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर काल सगळ्यात जास्त खटकलं ते म्हणजे काल चा एपिसोड काय "खळे गौरव" होता का? मला मान्य आहे ते खूप महान संगीतकार आहे... माझा आक्षेप काल झालेल्या त्यांच्या गुणगायनाला आहे. (या सगळ्यासाठी "नक्षत्रांचे देणे" सारखे कार्यक्रम आहेतच कि) कुठलाहि स्पर्धक काल गाणे गायला कि परिक्षक खळ्यांबद्दल १० वाक्ये आणि गाणार्‍याबद्दल १ - २ वाक्ये बोलत होते. हा स्पर्धकांवर अन्याय आहे.

त्यात काय ती पल्लवी जोशी, काय तिचे कपडे... आणि भरीस भर म्हणून तो अवधूत गुप्ते :-(


Deemdu
Wednesday, January 17, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि भरीस भर म्हणून तो अवधूत गुप्ते >>>>>>
rather मला वाटतं बडे AG निदान मनापासून दाद तरी देतो, देवकी पंडीत खुप छान क्रिटिसाईज करते.
पूनम तुला अनेकमोदक
काल खरच एपिसोड बघताना अगदी अस वाटत होत कि कोणीतरी सचीनला सांगावं की अरे तु स्वतचं नाही त्या मुलांच कौतुक बघायला इथे आला आहेस.
खर तर त्याचा गाण्याचा आणि सचिनचा एव्हढा जवळाचा सबंध असताना तो इतर विषयावर का बोलत होता कळलं नाही

मांजरेकरांचा महेश तर आईची भाषा ( पक्षी मातृभाषा ) विंग्रजी असल्यासारखी वापरत होता.

एपिसोड काय "खळे गौरव" होता का?>>>>>>>
आणि खळे गौरव वगैरे काही नाही ग बडे काहीतरी नवी एक टूम म्हणुन सगळी त्यांची गाणि, आणि म्हणुन त्यांच्या विषयी बोलण अस मला तरी वाटतं, बाकी जे काही ते ह्या मुलांबरोबर बोलताना दाखवले ते अगदीच निर्लेप होतं कुठेही अहंकार नाही काही नाही.

आणि final विषयी बोलायच तर निदान मलातरी अनघा आणि मंगेश हे दोघ यावेत अस मनापासून वाटतं
आणि अभिजीत पेक्षा गटलेवार कधीही चांगला गातो.
अर्थात ही माझी मतं:-)


Badbadi
Wednesday, January 17, 2007 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणुन त्यांच्या विषयी बोलण अस मला तरी वाटतं, बाकी जे काही ते ह्या मुलांबरोबर बोलताना दाखवले ते अगदीच निर्लेप होतं कुठेही अहंकार नाही काही नाही. >> पण बोलतना weightage ला काहि महत्व हवं कि नको?? खळेंबद्दल मी बोलतच नाहिये...ते छान च बोलले सगळ्या स्पर्धकांशी... असो. <I guess I was not able to put what I wanted to say>

<rather> मला वाटतं बडे <AG> निदान मनापासून दाद तरी देतो, देवकी पंडीत खुप छान क्रिटिसाईज करते.>> दीम्स, त्याला तिथे दाद द्यायला बसवलेलं नाहिये. त्याचं काम चांगल वाईट ओळखून योग्य ते मार्गदर्शन आणि गुण देणे आहे. त्याच्या प्रतिक्रिया नेहमीच काळजात घुसलं, मर्दा जिंकलस अशा प्रकारच्या असतात... AG बद्दल बोलायचं तर मला blog च लिहावा लागेल :-)


Himscool
Wednesday, January 17, 2007 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठलाहि स्पर्धक काल गाणे गायला कि परिक्षक खळ्यांबद्दल १० वाक्ये आणि गाणार्‍याबद्दल १ - २ वाक्ये बोलत होते. हा स्पर्धकांवर अन्याय आहे.
बडे पूर्णपणे मान्य. पण हे असे व्हायचे कारण काय आहे ते लक्षात घे.. प्रत्येक स्पर्धक १ गाणे गातो. मुखडा आणि एक कडवं... पूर्ण गाणे म्हणायला लागणारा वेळ ४ मिनिटं. एकूण सहा स्पर्धक. म्हणजे गाणि म्हणायचा एकूण वेळ २४ ते २५ मिनिटं.. उरलेली ३५ मिनिटं काय? जाहिरातीही फार नाहीत त्यामुळे त्यात जाणारा वेळही जास्तीत जास्त १० मिनिटं तरी २५ मिनिटं उरतातच की.. त्यात स्पर्धकांबद्दल बोलून बोलून किती बोलणार... आजून दोन चार वाक्यं जास्त बोलायला पाहिजेत हे मान्य आहे पण जर काही बोलण्यासारखं नसेल तर काय? मग हा वेळ कसा भरून काढायचा तर असा काहीतरी प्रकार करून..
अजून दोन भागांनार उरलेले सगळे दोन दोन गाणी म्हणतील बघ...


Kedarjoshi
Wednesday, January 17, 2007 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवकी पंडीत खुप छान क्रिटिसाईज करते>>>>>>
येस. स्तिथप्रज्ञा सारखी ती गुण व रिमार्क देते. खरच परिक्षक असावा तर असाच.

AG ला अजुन पुर्ण परिक्षक व्हायच. पण तो बरेचदा खरी " दाद " देतो अगदी मनापासुन. त्याने देवकी कडुन बरेच शिकायला पाहीजे.


अजून दोन भागांनार उरलेले सगळे दोन दोन गाणी म्हणतील बघ>>>

रादर म्हणायला पाहीजेत. फालतु बडबडी पेक्षा तेच चांगले.

Mansmi18
Wednesday, January 17, 2007 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

My thoughts(on contestants)..what do you think..
1. Anagha - She was good yesterday I dont know why she is in bottom 2.

2. Anandi- She is good but dont know if she is a finalist material.

3. Abhijit - He was good yesterday. He should remove his headgear:-) Finalist contender.

4. Gatalewar-He was ok yesterday. He is underdog.

5. Mangesh - He was good..maybe final contender.

6. Aniket- He was ok yesterday. But he is weak on SMS. (just wondering why did he sing female song yesterday..)

now it is all on SMS. I wonder how their computer "calculates" the combined marks.

and anyone knows what new Khale CD they were talking about? I would have loved to hear "Jevha tuzya Batanna udhali mujor wara". (I guess abhijit already sang this one sometime previously).



Mansmi18
Monday, January 22, 2007 - 8:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aniket gone..

who is next

Psg
Tuesday, January 23, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, आता स्पर्धा चुरशीची होईल असे वाटत आहे! सर्व काही performance वर अवलंबून असेल. अभिजित अजूनही मोकळ्या आवाजानी गात नाही, मंगेश थोडंऽऽ नाकात गातो, अनघाला सूर आहे, पण भाव नाही, विजय कोणतं गाणं निवडतो त्यावर आहे, आनंदीनी overconfidence दाखवायला नको! अरे, सगळ्यांचे मायनस पॉइंट्सच आले का? :-) पण episode चांगला होईल, चांगली गाणी ऐकायला मिळतील! :-)

Himscool
Tuesday, January 23, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच्या भागात सगळ्यांना मस्त मार पडला परिक्षकांकडून..
कालचा रिझल्ट गुणांसह..
१) अभिजीत १९८०० मते ३०० गुण
२) मंगेश ४३२९८ मते २२५ गुण
३) अनघा ५८९७८ मते १८२ गुण
४) विजय ४३२३७ मते २११ गुण
५) आनंदी ४५८७० मते १९६ गुण
६) अनिकेत ५०४१९ मते १८२ गुण

अभिजीत केवळ परिक्षकांच्या गुणांमुळेच वाचला.. जर ते थोडे जरी कमी असते तर तो बाहेरच होता.. काल तर त्याला फारच कडवट प्रतिक्रिया दिल्या.. पुढच्या राऊंडमध्ये जर परत परिक्षकांनी गुण जास्त दिले तरच तो तरेल.. अन्यथा तोच बाहेर जायची शक्यता जास्त वाटते आहे..

मला फक्त एकच प्रश्न आहे की परिक्षक नक्कि कुठल्या बेसिसवर गुण देतात.. अभिजीतचा Performance जर सगळ्यात जास्त गुण मिळण्यासारखा होता तर प्रेक्षांना तसे का वाटले नाही आणि त्यांनी त्याला सगळ्यात कमी मते का पाठवली... प्रेक्षकांना काहीच कळत नाही असे म्हाणावे का परिक्षक अभिजीतला उगाच डोक्यावर चढवत आहेत असे समजायचे...



Badbadi
Tuesday, January 23, 2007 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिम्स, सगळ्याच प्रेक्षकांना गाण्यातलं कळतं अशातला भाग नाहि. माझ्यामते बर्‍याच वेळा प्रेक्षक sentimental असतो. गाण्याची निवड, दिसणे इ. गोष्टिंवर अनेक लोक SMS करतात. या अशा प्रकारामुळेच Indian Idol मधून राहुल वैद्य बाहेर पडला आणि अभिजीत सावंत तरला... लोकांना डोकं असतं तर हिमेश रेशमिया आज इतका प्रसिद्ध झाला नसता.
सगळेच जण असे असतात असं नाही पण सर्वसामान्यपणे असंच असतं.


Sayuri
Tuesday, January 23, 2007 - 9:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विशेषत: sms करुन गायक/गायिका निवडण्याच्या प्रक्रियेत स्पर्धकाची फ़क्त गायकी लक्षात घेऊन sms करणारे प्रेक्षक कमी असतात. त्यादिवशी तिथे आलेल्या होम मिनिस्टर वहिन्यांपैकी एकीने की कोणीतरी प्रेक्षकाने सरळ सरळ मी पण मुंबईची, आनंदीपण मुंबईची (त्यामुळे माझं व्होट तिला)यासारख्या निकषावर मत देण्याविषयी बोलून दाखवले. त्यामुळे regional criteria based बरीच मतं असतात, याव्यतिरिक्त स्पर्धकाचा appearence (ज्याला माझ्या मते तरी अवास्तव महत्त्व दिलं जातं अशा कार्यक्रमात), mannerism, attitude (आनंदीचा overconfidence खटकला पब्लिकला), opinions by judeges यावरही मतं ठरतात.

Mansmi18
Friday, January 26, 2007 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

All,

Gatalewar is gone, and now there are 4.

Svsameer
Friday, January 26, 2007 - 8:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोज

हे तुला आजच कसं कळालं


Mansmi18
Friday, January 26, 2007 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Can you believe it? They showed it in Baatmya. Strange. They also showed next weeks guest is usha mangeshkar. I was baffled also. When my wife told me I thought he voluntarily left.

Darshetkarsmita
Monday, January 29, 2007 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oh, i was thinking of ANANDI, gatlewar was much better but...If it is true than ...bad luck nothing else

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators