|
Zakki
| |
| Friday, February 02, 2007 - 4:58 pm: |
| 
|
बरं, लोक भडकल्यामुळे नाही, समाजातील एक हिस्सा (त्यात कुणि लोक नसावेत बहुधा?) माथेफिरू झाला, भडकला नाही! संपूर्ण समाजाने हत्या केली असे मी म्हंटलेले नाही. कुणि हत्या केली, तेहि मी काही लिहीलेली नाही. पण संपूर्ण समजातल्या लोकांना नेत्यांची हत्या होते, 'हे समजून घ्यायला हरकत नाही,' असे म्हंटले तर समाजाला दोष दिला असे कसे म्हणता तुम्ही? केवळ एकदा लिहीले की अट्टाहास होत नाही. उगीच दुसर्यांच्या लिखाणातून नसते अर्थ काढून भडकवा भडकवी करू नका. जरा नीट वाचून विचार करत जा, नि मग लिहा!? तुम्ही एक डूख धरून बसला आहात, नि कुठे तरी लिहीलेले संदर्भाशिवाय वापरून उगीचच भडकवा भडकवी करता आहात. इथे मी परत लिहीतो. तुम्ही फुक्कट कुठून तरी खुन्नस घेऊन मायबोलीवर येऊन पॅरॅनॉईड असल्यासारखे कुठूनहि कसलेहि अर्थ काढून शब्दांच्या कसरती करता. बर्याच लोकांनि, तुमच्या मतांचा नव्हे, तर तुमच्या फुकटच्या अकांडतांडव करण्याबद्दल, नुसता शब्दांचा कीस काढून त्यातून भलभलते अर्थ काढण्याबद्दल, आक्षेप घेतला आहे. यापुढे मला तुमची मते वाचायची मुळीच इच्छा नाही. मी मायबोलीवर कुठेहि लिहीतच रहाणार. तेंव्हा आता तुम्ही जरा शहाणे व्हावे, नि लिहीण्या आधी जरा विचार करून, लिहावे. शक्यतो काहीच लिहू नये हेच बरे. या वरच्या सगळ्यात तुम्हाला तुमचा पुन: अपमान झाला असे वाटत असेल तर त्याला माझा इलाज नाही. पण मी माफी मागणार नाही!
|
झक्किकाका एकदम झकास काम केलेत.कुणितरि असे उत्तर देणे भागच होते.वाचताना माझेच शब्द वाचतेय कि काय असे वाटले?. काहि माणसांना निरर्थक लिहायचि आणि शब्दांचा किस पाडत रहाण्याचि सवय असटे, जित्याचि खोड ति कशी जाणार.उगिच शब्दांचे खेळ करुन चर्चेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करायचा अजुन काहि नाहि. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Zakki
| |
| Friday, February 02, 2007 - 11:05 pm: |
| 
|
जयमहाराष्ट्र, धन्यवाद. एरवी मी लिहीले नसते तसे, पण मला नाही वाटत की मी सर्व समाजाला दोष दिला आहे. तरी उगीचच जो असे लिहीतो, त्याला दरडावलेच पाहिजे. नेहेमीच शब्दाचा कीस पाडून त्यातून फक्त वाईट निघणारे अर्थ काढून काहीतरी लिहीत बसायचे याला चर्चा म्हणत नाहीत.
|
इराकमधे हस्तक्षेप करायचा अधिकार अमेरिकेला कुणी दिला? ह्या देशात कायद्याचे राज्य नाही. ज्याच्या हातात लाठी त्याची म्हैस असा सरळ हिशेब आहे. सद्दाम असाच सत्तेवर आला. त्याने कितीतरी लोकांना निर्दयपणे मारले. फायद्याचे होते तेव्हा अमेरिकेची मदत घेतली. मग अमेरिकेने वेळ आली तेव्हा त्याचा निकाल लावला. बुशने मूर्खपणा केला आणि अमेरिकेला ते महाग पडते आहे. पण इराक काय वा अफगाणिस्तान काय. जिथे कायद्याचे राज्य नाही तिथे महासत्ता घुसणारच. त्यातून आज अमेरिका सर्वात शक्तीशाली देश आहे. तेव्हा हा हक्क त्यांना त्यांच्या शक्तीमुळे मिळाला आहे.
|
Zakki
| |
| Saturday, February 03, 2007 - 2:00 pm: |
| 
|
न्याय करायचा किंवा हल्ला करायचा हक्क, अधिकार अमेरिकेला काही नाहीये. युनो मधे खोटेच सांगत होते की इराकमधे WMD आहेत, पण जगातील कुणि इतर देश एकत्र येऊन त्यांचे विधान खोटे सिद्ध केले का कुणी? नाही! का? अमेरिकेचे पैसे पाहिजेत त्यांना म्हणून. केवळ बुश, रम्सफ़ेल्ड, छेनि या त्रयीने तेल मिळवण्यासाठी बेधडक हल्ला केला. अफगाणिस्तानवर हल्ला करून भारत रशिया चीन यांच्या कडे जाणार्या तेलावर control नि इराक चे तेल अमेरिकेला. छेनि च्या हॅलिबर्टनला No biD contract. आता जगभर लोक बोंबलतात अमेरिकेने अन्याय केला. हो. पण त्यांना विरोध करण्याची ताकद आहे का कुणाकडे? जोपर्यंत त्यांच्या पैशाची लालच जगाला सुटत नाही तो पर्यंत अमेरिकेचे असेच चालणार. माझ्या मते Outsourcing च्या Critical point पर्यंत अमेरिका पोचली की सर्व जगाला मोठ्ठी संधी आहे, त्यांची नाकेबंदी करण्याची!!! पण मग इथले माथेफिरू त्यांचे अणूबाँब टाकतील त्याचे काय??
|
झक्किकाका पुन्हा एकदा अगदि अचुक लिहिल्या बद्दल धन्यवाद.ईराक मधे सद्दाम काय करतो ह्याच्याशी अमेरिकेला काय सोयरसुतक त्यांना मतलब फ़क्त तेलाशी आहे.? अहो!शेंडे तुम्हि रहाता कुठे मी स्वतःहा गेलि ८ वर्षे कुवैत मधे आहे.सत्यपरिस्थिति काय हे आम्हि जास्त चांगल्या प्रकारे जाणतो. अमेरिकेने जे काहि केले ते फ़क्त आणि फ़क्त तेलासाठि केले. सर्व प्रथम सद्दामचा वापर इराण विरुद्ध करुन घेतला आणि जेंव्हा सद्दाम डोईजड होतोय असे वाटले तेंव्हा जैविक अस्त्रांचि भिति दाखवुन आक्रमण केले.तसेच कुवैत वर सद्दामने केलेले आक्रमण हे देखिल अमेरिकेच्या सांगण्यावरुन केलेले होते. तुम्हि मारल्या सारखे करा आम्हि मेल्या(वाचवल्या) सारखे करतो. कुवैतला वाचवण्याचे नाटक करुन आज अमेरिकेनि आपल्या सेने साठी मिलिटरि बेस कम्प बनवला आहे. आणि शिवाय कुवैतकडुन आर्थिक आणि तेलाच्या रूपाने पैसा वसुल करत आहे. हे शोषण १९९१ चालु आहे.इथे कुवैति नागरिक अमेरिकेला किति शिव्या घालतात ते आम्हि बघतोच आहोत.९-११ च्या हल्ल्या नंतर इथे फ़क्त दिवाळी साजरि झाली नाहि इतकच. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
जय महारष्ट्र, तुमचे म्हणणे बरोबर. अमेरिकेने स्वार्थाकरता इराक प्रकरण हाती घेतले आणि आता ते त्यांना जड जाते आहे. पण बळी तो कानपिळी अशी परिस्थिती सद्दमने निर्माण केली आहे. सध्या अमेरिका बळी आहे म्हणून ती इराकमधे ठाण मांडून बसली आहे. आणि म्हणून सद्दामचा निकाल लावला. सद्दामसारख्या क्रूर माणसाला फाशी दिले म्हणून मला काहीही वाईट वाटत नाही. करावे तसे भरावे. अमेरिका दादा देश आहे. तेलावर तो इतका अवलंबून आहे की त्याकरता तो वाट्टेल ते करणार. तेलवाल्यांची लाबी चांगली ताकदवान आहे आणि ती अमेरिकेला हे सगळे करायला भाग पडते आहे. चालायचच.
|
Zakki
| |
| Sunday, February 04, 2007 - 2:41 pm: |
| 
|
माझी आशा भारतावर! एकतर ते भारतातच कुठेतरी तेल शोधून काढतील, किंवा तेलाला पर्याय शोधून काढतील. म्हणजे त्यांना तरी मुसलमान राष्ट्रांच्या दबावामुळे भारतात मुसलमानांचे लांगुलचालन करावे लागणार नाही.
|
झक्कि काका, तुम्हि उपरोधाने लिहलय हे माहिति आहे मला पण खरच भारतियानि पर्याय शोधलाय! त्याचि link देतेय खालि. मी हिच link 'बातम्यांचे संकलन' मध्ये टाकलि होति पण तिथे बरिच गहन चर्चा सुरु होति तेंव्हा त्यामुळे या बातमि कडे कोणाच लक्शच गेल नाहि. असो अलका झाडगावकर ह्या नागपुरकर असल्यामुळे तुमचि आणि माझि coller ताठ व्हायला हरकत नाहि! http://www.goodnewsindia.com/index.php/Magazine/story/alkaZ/
|
Zakki
| |
| Monday, February 05, 2007 - 1:43 pm: |
| 
|
नाही हो. उपरोधाने नाही. माझा भारतावर विश्वास आहे. अनेक चांगले लोक तिथे आहेत. झाडगावकरांबद्दल मी पूर्वीच वाचले होते. मला पण आनंद झाला. राजकारणी लोकांचे वर्चस्व कमी करायचे असेल तर जनतेने स्वत:च पुढाकार घेतला पाहिजे. पण प्रत्येक बाबतीत (उदा. नुकतेच मराठी साहित्य संमेलनात म्हंटले गेले, 'हे शासनाने केले पाहिजे') अशी वृत्ति ठेवली तर कसे होणार? मग सगळी सत्ता त्यांच्या हातात! जनतेला कोण विचारणार? माझ्या ओळखीच्या अनेक लोकांनी त्यांना काय करायचे ते सरकारच्या नादी न लागता स्वत:च सुरु केले. उदा. डॉ. अभय बंग यांचे काम. आणि असेहि अनेक आहेत.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|