Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
What to do-काय करावं ...

Hitguj » Views and Comments » Relationships » इतर » What to do-काय करावं « Previous Next »

Sas
Thursday, December 28, 2006 - 7:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय कराव ज्यावेळि आपले सारे प्रयत्न फोल ठरतात?? आपण एखाद्या गोष्टि साठि (चांगल्या गोष्टि साठि) जिवापाड दिर्घ काळ प्रयत्न करतो पण हाति केवळ निराशा येते. आशा किति काळ ठेवायचि?? काय कराव जेव्हा समोरच्याला आपल्या प्रयत्नांचि, भावनांचि जरा हि किंमत नसेल. जर समोरचि व्यक्ति आपल मन सारख दुखवत असेल (Knowingly oe Not Knowingly). काय कराव जर समोरच्याला अगदि साधारण गोष्टि समजत नसतिल.

जिवनात अनेक नाति व्यक्ति अश्या असतात कि त्यांचा कितिहि उब आला तरि आपल्याला त्यांना सोडता येत नाहि मग अश्यावेळि काय कराव आयुष्य भर झुरत-कुढत रहाव?

किति काळ समोरच्याला समजवत रहाव, हे करा, ते करा, हे करु नका, ते करु नका, अस बोलु नका...जर समोरच्याच्या मनात डोक्यात काहिच जात नसेल तर काय कराव? किति काळ त्या
व्यक्तिला समजावत रहाव प्रेमाने, शांतिने, रागाने, ओरडुन जर काहिच फरक पड्त नसेल.

आपल मन,भावना, त्रास, वेदना, दु:ख समोरच्या वक्तिला आपण बोलुन दाखवुन हि समजत नसतिल
तर काय कराव.

आपण समोरच्याच्या भल्याच सांगतो त्या व्यक्तिला ते समजत पण उमगत नाहि म्हणज़े ती व्यक्ति ते आचरणात आणत नाही ह्या साठी काय कराव.


Yog
Thursday, December 28, 2006 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते निष्काम कर्मयोग का काय म्हणतात ते हेच बहुतेक. स्वताच्या बाबतीत कठीण, दुसर्‍याच्या बाबतीत महाकठीण.
आपण चान्गल काम करत रहायच. अगदीच सहन होत नाही आणि सान्गताही येत नाही अशी "कैलास जिवन" च्या जाहिरातीसारखी अवस्था झाली तर इथे येवून "लाल" पोस्ट्स वाचाव्यात. ताण हलका होईल..
:-)
~d

Shrini
Friday, December 29, 2006 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाद्या व्य्कतीची बुद्धी आपणच काय, पण मानवी रुपातील देवही पालटू शकत नाही. श्री राम रावणाची बुद्धी पालटू शकले नाही किंवा श्री कृष्ण दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाही. उलट दुर्योधनाने तर श्री कृष्णाला "मला धर्म अधर्म कळतो, पण माझी प्रवृत्ती धर्माची नाही तर अधर्माचीच आहे" असे उत्तर दिले होते..
तेव्हा आपण आडमुठ्या लोकांना बदलू शकत नाही, अगदी त्यांच्या हिताकरता असले तरी, हे स्वतःशी स्वीकारून घ्यावे, त्रास कमी होतो.
(वरील पोस्ट केवळ 'फंडा' मारण्याकरता लिहीलेले नाही, हा स्वानुभव आहे.)


Vinaydesai
Friday, December 29, 2006 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीनी तू? Welcome back .. पण 'व्यक्ती' हा शब्द असा लिहिलेला बघून विश्वास बसला नाही एक क्षण...

Sorry.. चालू द्यात....


Divya
Friday, December 29, 2006 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सास माणसाच मन हे त्याला निराश करणार असत. तुझ मन ज्या अपेक्षा करते आहे ते तस होत नाही म्हणुन किंवा तसे प्रयत्न करुनही मनासारख होत नाही म्हणुन. हे प्रयत्न, समजावण हे सगळ तु तुझ्या बुद्धीला सुचेल तसे प्रयत्न तु केले असतील. पण हीच बुद्धी त्या अपेक्षा सोडुन देण्याकरताच वापरली तर. माझा स्वानुभवही हाच की आपण आपल्याला बदलु शकतो पण दुसर्या व्यक्तीच्या विचारांवर आणी मनावर आपण कंट्रोल करु शकत नाही जोपर्यंत ती व्यक्ती मनापासुन बदलायच ठरवत नाही. आणी अशा लोकांना बदलावस तेव्हांच वाटत जेंव्हा पश्चातापाची नाहीतर केलेल्या चुकांची जाणीव होते, काहीतरी नुकसान होते तोपर्यंत कोणी काही सांगीतले तरी ते न पटणारेच असते त्यात ego जास्त असतो.
पण दुसर्याने काय करायच या पेक्षा आपण काय करायच हे आपल्या हातात नक्कीच आहे. पहीली गोष्ट ज्या व्यक्ती कडुन बदलाची किंवा आपल्या मनाची अपेक्षा आहे त्या बंद करुन त्याचा जास्त न विचार करता आपण आपला विचार करावा. आपल्याला मिळालेल आयुष्य हे आपण कस घालवायच? मग खुप गोष्टी दिसतात करायला.


Ashwini
Friday, December 29, 2006 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीनी, welcome back... . एखादी झेनकथा पण नक्कीच असेल या विषयावर.. :-)

Disha013
Friday, December 29, 2006 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते, 'दुसर्याला बदलणे' ही संकल्पनाच चुकीची आहे. आपण कोण बदल्णारे?
आपल्याला जे पटते ते दुसर्याला पटावेच हा अट्टाहास का?
समोरच्याला अक्कल नाही, मग आपण तरी सर्वगुणसंपन्न आहोत का? सारखी कटकट केली ना, की समोर्च्या माणसाला आपण नकोसे होतो. तक्रारींना पण मर्यादा असावी. सततची भुणभुण दुरावा निर्माण करते. स्वताला त्या व्यक्तीच्या जागी imagine करुन बघावे.
मग कळ्ते,समोरचा का बदलत नाही ते....:-)


Shrini
Saturday, December 30, 2006 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय : माझ्या मशिनवर फॉंट चा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी अंदाजाने देवनागरीमध्ये लिहितो, त्यामुळे झाले असेल कदाचित.

अश्विनी, हा प्र्श्न झेनच्या कक्षेबाहेरचा आहे! :-)

दिशा : काही प्रसंगांमध्ये, समोरचा माणूस उघड्या डोळ्याने खड्ड्यात चालला आहे हे नुसतेच लख्ख दिसत नाही, तर वस्तुनिष्ठपणे सिद्धही करता येते. आता, हा माणूस जर आपल्या जवळचा असेल तर त्याचे भले व्हावे, किमान त्याचे नुकसान तरी होऊ नये याकरता जीव तुटणारच... मग अशा वेळी त्याने बदलावे असे वाटणे ही मानवी सहजप्रव्रूत्ती आहे.


Savyasachi
Tuesday, January 02, 2007 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shrini, don't know where u r, but in India, u can watch sherlock holmes (jeremy brett) on history channel every tuesday, 9 pm.

Mansmi18
Wednesday, January 03, 2007 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Happy New Year,

Amachya Guru Sangatat
"Apan dusryala asach vaga tase vagu naka ase sangu naye. Tyapeksha apan swataha vyavasthit vagave. Kriyecha Bodh acharanech zala pahije."

I suppose you should just stop telling others to change. If they observe you doing the right thing..eventually they will change their ways. So you need to be patient with such people.(even though they are our near and dear ones!)

just my 2 paise.

Regards



Asm
Friday, January 05, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hasu hi aale aani vait hi vatle.... magil messages madhye Live-in-relationship var uhapoh chalu hota.
Ya ashyach lokansathi vatte ki Live-in-relationship asavi... patal tar rahav...nahitar sodun dyav....
ya lokanna samzun-umazun rahave evadhech tar aayushya nahiye na.

Akhi
Wednesday, November 14, 2007 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मैत्रीणी चा अनुभव. कुठलास सण होता, माझी मैत्रीणी आणी तिचा नवरा गोड आणयला बाहेर गेले. आल्यावर नवरा आइ ला म्हणे भुक लागली आता जेवायला बसु... त्यावर मैत्रीणी ची सासु बोलते की, स्वयंपाक तयार आहे केव्हा घेउ पान जेव्हा काही स्वयंपाक तयार नसताना. सकाळ पासुन मैत्रीणी कामातच होती. जास्त उशीर पण झाला नव्हता. आणी तिची सासु देवघरामधे निघुन गेल्या.
१ तर सांगायच कशाला कि स्वयंपाक तयार आहे म्हणुन आणी मग सुने ला जरा पण मदत केली नाही....... मैत्रीणी fast असल्यामुले १२ मधे तिने जेवायला साग्र संगीत वाढल पण अस कस कोनि मुद्दामुन अस का वागत???


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators