|
आर्च, गंमती 'चालायच्या' म्हणजे काय?.. चालतात! गमतीचाच भाग म्हणजे लग्नानंतर मुल होण्याचं टाईमींग पण वेगळं असतं! आठवलं? आज्या मंडळी नातवंडांना 'रामटेकला' घेऊन गेल्यानंतरचा तो किस्सा! (मेमरी चांगली आहे हो मुलीची! ) आमच्या कॉलनीत सनसनाटी खबर म्हणजे फारतर अमक्याची मुलगी (किंवा मुलगा) कुणाचा हात पकडून पळून गेली! आता देव्यांच्या भेटीचा हा असा अपूर्व सोहळा असा पुन्हा पुन्हा थोडीच घडतो!
|
पण ते अन्गात भुत सन्चारत अन ते उतरवायला कुठल्याश्या दत्त मन्दिरात बरीच मण्डळी जमतात, ते कुठ हो??? ते गाणगापुर. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आहे ते. माझ्या बालपणी बरेच वेळा गेलो आहे मी तिथे. तिथले द्रुष्य मात्र भयन्कर असते. ते पाहून भूत वगैरे खरे आहे का असे वाटून जाते. http://www.shreeswami.org/gangapur-sangam.htm
|
म्रुण्मयी, छान युक्ती सान्गितलीस. आता एखाद्या सुन्दर स्त्रीच्या अन्गात येवूदे.
|
Shyamli
| |
| Sunday, August 26, 2007 - 7:42 pm: |
|
|
मृ जबरीचे आहे देवि
|
कुठल्याही संतापदाला पोचलेल्यांच्यासुध्दा अंगात विठ्ठल किंवा आणि कोणी आलेले ऐकीवात नाही. त्यामुळे सामान्यांच्या अंगात येणे दूरच. विजय दादा, '''छान युक्ती सान्गितलीस. आता एखाद्या सुन्दर स्त्रीच्या अन्गात येवूदे.'' -- बापरे! तिथल्यातिथे तुमच्या "सौं" च्यापण अंगात येइल आणि मग तुमची खैर नाही.
|
Akhi
| |
| Wednesday, October 24, 2007 - 6:06 am: |
|
|
मला काही नक्की हे बरोबर आहे की नाही माहीती नाही. पण कदाचीत ही तल्लीनता तर नसेल?
|
Chchotu
| |
| Thursday, November 08, 2007 - 9:06 am: |
|
|
आमच्या घराजवळ एका मानसाच्या अंगात दुर्गामाता यायची. साद्या, ओट्या, नारळ यान्ची तर रेलचेल असायची त्याच्या घरी. हा सर्व कार्यक्रम दांडीया खेळता खेळता मध्येच चालु व्हायचा. गल्लीतल्या टग्या पोरांनी(अर्थात त्यात मी सुध्दा) देवीला "मटक्याचे आकदे" "बारावीच्या पेपरमधील प्रश्न" "इलेक्शन मधे कोण जिंकनार" इ. इ. विचारायला सुरु केल्यावर तुर्तास गेली ५-६ वर्षे देवी फ़िरकल्याच नाहीत एकडे.
|
कुठल्याही संतापदाला पोचलेल्यांच्यासुध्दा अंगात विठ्ठल किंवा आणि कोणी आलेले ऐकीवात नाही. त्यामुळे सामान्यांच्या अंगात येणे दूरच. हे अगदी बरोबर!!!हे अंगात येण काय आहे मला माहिती नाही पण गेल्या वर्षी भोपळमधील उच्चभ्रु वस्तीतिल मिशिनरी स्कुलमधे एक माणुस आणला होता ज्याच्या अंगात येशु ख्रिस्त यायचे. काही पालकांनी विरोध केल्यावर शाळा म्हणाली की खरेच ख्रिस्त अंगात येतात त्यामुळे त्या माणसाला आम्ही बोलावणारच तुम्हाला जर आवडत नसेल तर स्वत्:च्या मुलाला दुसर्या शाळेत घाला. त्या अंगात येण्याच्या प्रकरणाच्या वेळी बरिच मुल घाबरुन जात,काही बेशुध्दही पडत.
|
Aashu29
| |
| Monday, November 12, 2007 - 9:39 am: |
|
|
एकदा वैष्णो देवीच्या दर्शनास गेलेले असताना तिथे एका बाईच्या अन्गात आले, गाभार्याच्या आत लाइन होती ती स्त्री ती लाइन मोडुन सरळ आत गेली, तिला कोणि काहि बोलले नाही, त्या स्थीतीत!! मग आम्हि असेच मजा घेत होतो, एकमेकांची कि ए आता माझ्या अंगात येणार आणि मी तुम्हा सर्वांच्या आधी दर्शन घेणार वगेरे!! माझ्या मते हा अतीरेक साधनेचा परिणाम असावा, आणि काहिंच्या बाबतीत अर्थातच थोतांड.
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|