Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 30, 2006

Hitguj » Views and Comments » Relationships » नवरा, बायको, संसार, तडजोड इ. » नवरा-बायको » Archive through November 30, 2006 « Previous Next »

Mrinmayee
Wednesday, November 29, 2006 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येताना मुंग्यांची पावडर आणा! नवरा उलट ओरडून म्हणतो 'कशाला? फुकटचे लाड! आज पावडर, उद्या लिपस्टिक मागतील!... कमित कमी 'पावडर' शब्द ऐकला म्हणायचा!
लोणच्याच्या बाटलीच्या झाकणाचा किस्सा मस्तच!
मी प्रेग्नंट असताना माझ्या नवर्‍याला सांगीतलं,
"चला, हॉस्पिटलला जायचं!" "काय खावसं वाटतंय एव्हड्या रात्री?" तो विचारतो. त्यानी 'हॉटेल' ऐकलं.
कळा येताना कुणी 'हॉटेलला जाऊ' म्हणेल का?


Robeenhood
Wednesday, November 29, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साप म्हणू नये धाकला,
अन नवरा म्हणू नये आपला!!


Manyah
Wednesday, November 29, 2006 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maze pan navin ch lagna tarale aahe.. mazi pan tichya sobat far bhandane hotat... mala kadhich kalat nahi ya baykaanchya manat kay asate... ti far senti aahe ani me far practicle....
ethalya anubhavi striya mala sangu shaktil ka ki baykaanshi kase vagakle mhanaje tyanna aavadate?
i relly care for her nad dont want to hurt her... but....
anyways suggestions welcome....

Chyayla
Wednesday, November 29, 2006 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, तु एकदम बरोबर बोललीस, मला मान्य आहे सध्या मी सुपातलाच म्हणुनच ह्या BB वर भेट देतोय.

झक्की तुमचा लोणच्याच झाकण बाथरुम मधला आणी मुन्ग्याची पावडर... ह. ह. पु. वा. मला पण एक जोक आठवला.

मुलगा अभ्यास करत असताना त्याच्या बाबान्ना विचारतो : "बाबा ताजमहाल कुठे आहे हो?"
बाबा: तुझ्या आईला विचार तीच ईकडच्या वस्तु तिकडे उचलुन ठेवत असते नेहमी, मला नाही माहिती जा.


Vinaydesai
Wednesday, November 29, 2006 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला कोणी बाटलीतल्या जिनीचा विनोद नाही सांगितला का? तर ऐक...

एका माणसाच्या हातून एक बाटली फुटते आणि त्यातून जीनी बाहेर पडतो.. तो नेहमी प्रमाणे एक वर द्यायला तयार होतो...

माणूस: मला इथून म्हणजे अमेरिकेतून हवाई पर्यंत Highway बांधून दे.. मला विमानाची बसायची भीती वाटते...

जीनी: एवढा मोठा highway ? जमणार नाही.. दुसरं काहीतरी माग...

माणूस: मला बायकांच्या मनात काय असतं ते कळेल असं काहीतरी कर....

जीनी: (थोडा विचार करून) तुला किती Lane असलेला Highway हवाय?....



Disha013
Wednesday, November 29, 2006 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय,
माझी एक मैत्रीण भलती वार्त्रट! नवरा असे वागला की म्हणते,' अजिबात वळण लावलेले नाही सासुने! अशा गोष्टींची सवय लहानपनापसून लावायला नको का?'!


Sas
Wednesday, November 29, 2006 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manyah
मदत म्हणून काहि सल्ले पट्लेतर बघा कारण हे सार मला माझ्या नवरोबा कडुन expected आहे.
१. त्याने मी काय सांगतेय ते listen carefully व ते implement कराव. (बायको नवर्‍याच्या चांगल्याचच सांगते ना जर ति काही चुकीच सांगल असेल तर करु नये पण तुमच्या काहि सवयी बदला, हे improve करा ते improve करा हे तुमच्या हिताच तुम्हि ऐकल आणि तर तिला छान वाटत)
२. बायको जस नवर्‍यासाठि त्याच्या आवडिच करुन त्याला Surprise देते तस नवर्‍याने ही तिला Surprise द्यावे.
३. खूप महत्वाच "Do not forget her B'day"
४. सेनसिटिव्ह लोक कुठ्ल्याहि गोष्टिचा खुप खोलवर विचार करत बसतात (स्वानुभव) तेव्हा do not
Do n Say things which will hurt her.
५. बायको उदास, नाराज असेल तर तिचा मुड ठिक करावा, तिला हसवाव.
६. प्ल्यान करावेत for Weekend, Holidays...
7. Do give your genuine opinion suggestions to wife; point out if she is wrong.

u can do atleast few thing out of all above.

'विवाह' पाहिलाच असेल "सगाई और शादि के बिच का समय
अदभुत होता है" so enjoy it n make it your sweetest memory.

कुणाला ह्यातल काही चुक वाटल असेल तर चु.भु. माफ करणे.

Sunidhee
Wednesday, November 29, 2006 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा, तु म्हणालीस ना की जरा वरखाली करुन वस्तु शोधण्याचा नवरे लोक त्रास घेत नाहीत.. अग आमच्या घरी तर डोळे वरखाली करायचा पण त्रास घेतला जायचा नाही.. नजर जिथे पडेल तिथे वस्तु दिसली नाही की हाका सुरु. :-) आता खुप सुधारणा आहे. :-) परी, एकदा सांगुन बदल होणार नाही, बर्‍याचदा सांगत रहा. फरक होइल.
बहुतेक मुलांच्या आणी आपल्या priorities चे क्रम थोडे वेगळे असतात म्हणुन होतं असं.


Vinaydesai
Wednesday, November 29, 2006 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एवढं वाईट वाटायचं काही कारण नाही... बरेच नवरे तश्याच बर्‍याच बायका पण गबाळ असतात, आळशी असतात, कामचुकार असतात..

माझ्या एका माहितीच्या व्यक्तीने त्याच्या बायकोच्या गबाळपणाला कंटाळून तिला सोडलेलं मी पाहिलं आहे. ही बाई नंतर Divorce केससाठी भारतातून आली, तेव्हा बcगेत कपडे असताना, आणि घरात Washing-Machine असताना, २४ तास प्रवासात वापरलेले कपडे पुढचे दोन दिवस घालून तशीच फिरत होती. शेवटी जे मदत करणारे होते, ते कंटाळले आणि त्यांनी तिला स्वतःच्या घरातून बाहेर काढलं....

पुरुषांना नीट सांगितलेली कामं शक्यतो आवडतात (अपवाद आहेत), तर बायकांना त्यांच्या मनात असलेल्या गोष्टी न सांगता नवर्‍याला कळावं असं वाटत असतं (अपवाद आहेतच)..

If you don't know why I am angry, then there is no point Explaining म्हणजे काय ते आपल्याला माहीत आहेच..

तेव्हा चालायचं..

हल्ली, म्हणजे गेल्या काही वर्षात नवर्‍याला बावळट, मूर्ख, गबाळ काहीही म्हटलं तरी चालतं, पण तेच बायकांना म्हटलं तर लगेच वादळ उभं रहातं.. हा माझा नाही इथल्या American-Radio Station चा अनुभव आहे....

(वि.सू. आम्ही दोघं घरात एकत्र काम करतो, घर स्वच्छ करतो, विक्स आणतो.. शंका नसावी...)


Shonoo
Wednesday, November 29, 2006 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वस्तू शोधण्याच्या संदर्भात्-
माझ्या लग्ना अगोदर कम्पनीमधल्या लोकांनी एक सरप्राइज पार्टी केली होती. त्यावेळी एका सिनियर बाईने सांगितलेली गोष्ट मला अजूनही आठवते. ती म्हणाली होती uterus is a tracking device. त्यामुळे रेझर, शेव्हिंग क्रीम पासून ते फ़्रीजच्या दारातच असलेल्या बीयरच्या बाटल्यांपर्यंत नवर्‍यांना काहीही सापडत नाही कारण देवाने त्यांना हा tracking Device दिलेला नाही!


Disha013
Wednesday, November 29, 2006 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधी,अग,आमचे पहिल्या वर्षी बरे चालले होते...काळ गेला तसे तसे जास्त बिघडले.:-) मुले झाल्यावर तर विचारुच नका..
आणि माझ्या नवर्याचे फ़क्त माझ्याच बोलन्याकडे लक्ष नसते हं...... टीव्हीवरचा एकेक शब्द व्यवस्थीत ऐकु येतो


Parinitawife
Wednesday, November 29, 2006 - 10:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंग्या, बरणीच झाकण ई.... वाचुन माझी हसुन हसुन पुरेवाट झाली;:-):-):-)... माझ्या नवर्‍या सारखे नवरे आहेत तर हं, पण हे मी त्याला सांगणार नाही अजिबात. लग्नाच्या ३-४ वर्षां नंतर सार ठिक होत अस मी एकलय; पण तेवढी हिंमत ठेवण सार सहन करण्याचि, समजाविण्याचि म्हणजे शुरच व्हायला हव.आपल्या देशात एक बरय नवर्‍याचा राग आला, वैताग आला तर काहि दिवसांसाठि माहेरि तरि जाता येत, इथे कुठे जायची सोय ही नाहि; मायबोलीचा खुप आधार झालाय मला.

Parinitawife
Wednesday, November 29, 2006 - 10:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे आई-बाबा खुप सच्छ, निटनिटक्या स्वभावाचे आहेत. शिस्तप्रिय आहेत. रात्री १० नंतर आम्हि कुणाला फोन करायचो नाही. आज हि घरात ही शिस्त आहे. पण इकडे अस नाही.Total opposite, so it is difficult for me.But I hv got lot support now from all of u.




Surabhi
Thursday, November 30, 2006 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथले एक एक किस्से म्हणजे ह. ह. पु. वा.
आमच्या शेजारच्या एक आजी आहेत. त्यांची अजोबांशी नेहमीच प्रेमळ भांडाभांडी चालू असते. जितक्या त्यांना बडबडतात, हाताने मात्र तितक्याच मायेने त्यांचे करतात. आजोबापण आजीची कळ काढण्यात काही कमी नाहीत.
आजी दर वर्षी वटपौर्णिमेचा उपास-पुजा न चुकता करतात. वर म्हणतात, काय करू हा नवरा सवयीने सोसवतोय. पुढच्या जन्मी ह्याहून भारी ध्यान भेटले तर पंचाईत. म्हणून देवापाशी जन्मोजन्मी हाच नवरा मागतात. बिचार्‍या आजोबांचे मात्र आजी शिवाय जरा सुद्धा पान हलत नाही. संसार बहुतेक असाच लोणच्याप्रमाणे मुरत असावा.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators