|
Zakki
| |
| Friday, December 01, 2006 - 1:45 pm: |
| 
|
वरील सर्व विचारी नि विश्लेषण करणार्यांची क्षमा मागून लिहितो. मला असे वाटते की तुम्ही या सर्व घटनांचा अभ्यास तर केला आहेच असे दिसते, पण प्रत्यक्ष घटना घडवून आणणारे यांना तुमच्या एक दशांश जरी विचारक्षमता असती, तर असे प्रकार घडले नसते. माझ्या मते भारतातील प्रचंड लोकसंख्या, प्रचंड अज्ञान, प्रचंड दारिद्र्य यांनी निराश नि हतबल झालेले लोक विचार कसला करणार? एकंदरीत आपल्या मनातील राग ते समाजावर सूड उगवण्यासाठी वापरतात नि सतत कुठेतरी दंगली करत सुटतात, त्यांना कारण लागत नाही! अर्थात् त्यांना भडकवणारे असतात, पण जसे वाळलेल्या गवताला ठिणगीचे निमित्त पुरते तसे, किंवा स्फोटक पदार्थ नुसते तापले तरी पेट घेतात तसे हे लोक बारीकसे कारण पाहून आपला राग व्यक्त करतात. आता असे म्हणतात की कुणि दलितानेच दारूच्या नशेत पुतळ्यावर हल्ला केला! अहो दारू प्यायल्यावर सामाजिक अन्याय, इ. विचार कुठून सुचणार? उगीच आपली अंगात मस्ति, करायला काम नाही, खायला पुरेसे मिळत नाही, याचा राग म्हणून त्या पुतळ्यावर काढला. त्याच्यात काय नेतृत्वाचे गुण होते की त्याच्यामागे लोकांनी लागावे?
|
|
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|