|
नाट्या, आपल्या पद्धती अशाच आहेत अरे. मुलगी तर दान द्यायचीच वर आणि वरदक्षिणा सुद्धा द्यायची! मुलाकडच्या लोकांचे पाय धुवायचे आणि वर पाय धुवून घ्यायचे उपकार केले म्हणून त्यांना आहेरही करायचा!. तसेच कानपिळीचे! मला वाटतं हा एकमेव विधी असेल ज्यात मुलीकडच्या कुणालातरी काहीतरी अधिकार दिलेला आहे.
|
अगदी खरं आहे की तो एकच असा विधी आहे की ज्यात मुलाकडचे काहीतरी देतात नाहीतर ते फ़क्त घेण्याचंच काम करत असतात...
|
मला काय वाटतं माहीतेय की जर एकत्र कुटुंब ठेवणार असाल तर मुलीचे आणि मुलाचे आई वडील दोघांना एकाच घरात रहाता आलं पाहिजे आणि नाही तर नवरा बायकोनी वेगळं रहावं पण भेदभाव नाही पाहीजे दोन्ही आई वडिलांमधे आणि अशा प्रथा असाव्यात लग्नात. ते पाय धुणं आणि दान देणं आपल्यसारख्या सुशिक्षित लोकांनी तरी बंद करावं आणि सगळ्यांना सारखा मान द्यावा..
|
Deshi
| |
| Friday, November 17, 2006 - 5:24 pm: |
| 
|
अस्मानी मूळात मी दान करा असे म्हणतच नाहीये. फ्क्त माझे असे म्हणने आहे की ते मुळ मंत्र किंवा विधी विरोधे करन्याआधी समाजावुन घ्या. आणी वरदा ने म्हणल्या प्रमाने काही प्रथा बंद कराव्यात. तसेच मला नाही वाटत की नवरा मुलगा पाय धुवुन घेतो आता. मी पाहीलेल्या माझ्या सहीत कुठल्याही लग्नात (आमच्या नातेवाईकांचे) पाय धुताना पाहीले नाही. आम्हीच नको म्हणालो. विरोध करताना सर्वच पुरुष सर्व स्त्रियांना क्:दाथे लेखतात असा जो सुर आहे तो मात्र मला मान्य नाही.
|
पुरुष बायकांना क्:पदार्थ लेखण्यापेक्षा ते काही प्रथांना विरोध का करत नाहीत हा मूळ मुद्दा आहे आणि मी तरी अजुन कुणाला पाय धुवायला नाही म्हटलेल पाहिलं नाही (तुम्ही नाही म्हटलं असेल तर तुम्हि नक्किच great आहात )ह्याचा अर्थ माझा नवरा मझ्या आई वडिलांना मान देत नाही असा मी काढत नाही पण मग ह्या प्रथा बंद करायलाही तो धजावत नाही हेही तेवढच खरं...म्हणजे म्हणण्याचा अर्थ हा की आपल्यासरखे ४ लोक पुढे येऊन हे बंद करतील तर फार बरं होईल...
|
Deshi
| |
| Friday, November 17, 2006 - 5:43 pm: |
| 
|
वरदा बरोबर. पण सुरुवात कुठुन करनार. स्व्:तच्या घरच्या लग्नापासुनचना. लग्न झाल्यवर विरोध करुन काय फायदा. म्हणुन मी विचारले चंद्रकोरला की त्यांचे लग्न झाले का? आणी मी काही ग्रेट वैगरे नाही. माझ्या सारखे अनेक लोक आहेत. रादर माझा लहाना भाउ जो दर महीन्यात पैशाने पण सपोर्ट करतो कधी कधी बळजबरी पण कारण त्याची बायको त्याला भाग पाडायला लावते म्हणुन. पण मग तुम्ही (ज्यांना गरज आहे ते) असे काही नाही करत. मला वाटत तुम्ही त्यांना पटवुन देऊ शकाल. ( नवर्यांना). हा बदल स्वत्: पासुन करायचा असतो असे वाटत. ( जसे तुम्ही का तुमच्या लग्नात विरोध केला व तो मान्य झाला). आणी मलाही एक मुलगी आहे. मला नाही वाटत मी तिच्या नवर्याचे पाय धुईल.
|
हे पटलं कमीतकमी आपल्या मुलांच्या वेळी तरी आपण सुधारु शकतो. पण ते आपल्या समाजात सगळ्यांना पटावं अशी अपेक्षा...लग्न केल्यावर विरोध करतोय कारण आधी करून काही फायदा नाही झाला...कन्यादान पवित्र आहे म्हणून आमचंही कुणीतरी दान केलं आणि कुणीतरी ते घेतलं..ते मनात सलतंय म्हणून...आणि इतरांनी तरी विचार करावा म्हणून....
|
Sashal
| |
| Friday, November 17, 2006 - 6:06 pm: |
| 
|
मला वाटतंय पुर्वीच्या प्रथा, विधी हे सगळं पुरूषप्रधान संस्कृती ला अनुसरून होतं ह्यात वाद नाहि .. पण ह्यात बदल स्त्रीयांनीच करायला हवा .. इतर लोकांनी बदललं पाहिजे ही अपेक्षा ठेवली तर काहिच होणार नाहि .. जोपर्यंत स्त्रीया पुरुषांवर dependent आहेत तोपर्यंत हे होणार नाहि .. स्त्री ही त्यागाची मुर्ती वगैरे समजूती जोपर्यंत रूढ आहेत तोपर्यंत ह्यात बदल नाहि .. मुलीने आपल्या आइ-वडिलांना सुध्दा हे पटवून दिलं पाहिजे .. फ़क्त मुलीच आहेत अशा आइ - वडिलांना जावयाने मदत करावी ह्यापेक्शा, नवरा बायको दोघांनीही दोन्हीं आई-वडिलांचा सारखाच मान ठेवावा, काळजी घ्यावी .. मुलीनेच फ़क्त घर सोडून सासरी येण्यापेक्षा मुलगा मुलगी दोघांनीही आपपली घरं सोडून नवीन संसार थाटावा .. त्याने कोणत्याही parents चा interference पण रहाणार नाहि .. पण ह्याचा अर्थ असा नाहि, की आई - वडीलांना साफ़ वेगळं करावं .. पण सध्या आहे (फ़क्त मुलीने सासरी जाणे), त्या पध्दतीने मुलीची individuality च नाहिशी होते, काय adjustments, compromises असतील ते सहसा मुलीला करायला लागतात, तीला नविन घरात जायचं असतं म्हणून .. मग ह्यापेक्षा दोन्ही घरांनी बदल accept करावा .. पण ह्यासाठी सगळ्यांत महत्वाची गोष्ट म्हणजे मुलगी independent हवी .. पैशासाठी किंवा कुठल्याही बाबतीत एकमेकांवर असलेली dependency नवरा बायकोत balanced हवी .. या गोष्टी लग्न ठरवायच्या आधी होणार्या नवर्याशी वेळीच clear कराव्यात ..
|
Milindaa
| |
| Friday, November 17, 2006 - 6:24 pm: |
| 
|
मला वाटतं, आता ही चर्चा हळू हळू रुढ मार्गाने जाणार आहे.. जो विषय यापूर्वी अनेक बीबींवर मांडला गेला आहे.. जसे की my money, his money lagnantar maherachi jababdari, yes or no lagnanantar tumachi aamachi chul vegali in laws, tyache aani tiche he kadhi badalanar इ. माझ्या असल्या पोस्ट्स च्या पुनरोक्ती चा धोका पत्करुन, या विषयाची पुनरोक्ती टळावी म्हणून हे पोस्ट
|
Sashal
| |
| Friday, November 17, 2006 - 6:30 pm: |
| 
|
मिलिंदा ह्याला उपाय काय बरं मग .. जे लोक पुर्वीच्या चर्चेत सहभागी नव्हते त्यांना वाटतं ही चर्चा व्हाची असं .. पुर्वीच्या posts पण धड वाचता येत नाहित आता, unicode trasition नंतर .. अंताक्षरी वर कसं, जे पुर्वीपासून आहेत त्यांना सगळी लॉजिक्स झाली आहेत असं वाटतं, पण जे नवीनच आलेत त्यांना मात्र ते लॉजिक नविन आहे असं वाटतं .. आणि जुनी चर्चा असली तरी कोणाला त्यावर नव्याने मतं मांडायची असतील तर? हे post पण विषयाला संबंधीत नाहि, पण दुसरीकडे लिहीलं तर मिलिंदा कसं वाचेल म्हणून इकडेच लिहितेय .. मग delete करते ..
|
Sashal
| |
| Friday, November 17, 2006 - 6:42 pm: |
| 
|
ह्यावर हा उपाय करता येईल का, की असे जे सगळे संस्कृती आणि प्रथा परंपरा यातले बदल discuss करणारे BBs club करून 'बदल : समाजातले, प्रथांमधले, परंपरांमधले .. ' अशा प्रकारची parent directory करून त्यात हलवता येतील?
|
Asmaani
| |
| Friday, November 17, 2006 - 7:17 pm: |
| 
|
तुझं म्हणण पटलं सशल! बदल स्त्रियांनीच करायला हवा. मुळात स्त्रियांनी स्वत्:ला inferere समजणं बंद करायला हवं. लग्नासारख्या पवित्र समारंभामध्ये, "आम्ही मुलाकडचे" म्हणून जे लोक माज करतात त्यात बहुसंख्येने मुलाकडच्या स्त्रियाच असतात हे कटू असले तरी सत्य आहे. का नाही आपण बायका असं ठरवत की माझ्या भावाच्या किंवा मुलाच्या लग्नात मी कन्यादानाला विरोध करेन, माझ्यापेक्षा वयाने मोठ्या किंवा बरोबरीच्या असलेल्या माणसांकडून ते केवळ एका मुलीचे जन्मदाते आहेत म्हणून पाय धुवून घेणार नाही. स्वत्:च्या लग्नात हे करणं कदाचित अवघड आहे. पण स्वत्:च्या मुलाच्या लग्नात तुम्ही असे विचार मांडले तर तुमची होणारी सून नक्कीच खूष होईल.
|
Zakki
| |
| Friday, November 17, 2006 - 10:16 pm: |
| 
|
अहो मायबोलीवरचे जुनेच काय, माझ्यासारख्या माणसाला इथे होत असलेले सगळेच पूर्वी आम्ही लहान असताना देखील झालेच होते हे लक्षात येते. अगदी नाव दहशतवाद नसले तरी पुण्यात, मालेगावात हिंदू मुसलमानांचे दंगे, भारतीय क्रिकेट टीम चे अपयश, तेंव्हाहि आरक्षण हा वाद होताच. मराठी भाषेचे काय होणार हाहि प्रश्नच होता (नि अपेक्षेप्रमाणे गेल्या चाळीस वर्षात ओळखू न येण्याजोगा फरक पडला आहे). अगदी पोळी भाजी कशी करावी एव्हढ्या बेसिक रेसिपिज नाही तरी पाककृति होत्याच. नि हो, पुणेकरांची गंमत तेंव्हा सुद्धा जोरात होती (ते सुद्धा अजून बदलले नाहीत!), सिनेमांची चर्चा होतीच. टीव्ही, इंटरनेट नव्हतेच म्हणा, पण जोपर्यंत पुणेकर आहेत तोपर्यंत वाट्टेल त्या विषयावर वाद घालणे, कितीही हास्यस्पद असले तरी तात्विक किंवा theoretically म्हणून मुद्दे उकरून काढणे, हे चालूच राहिल नि तसे चालूच रहावे. आणि लग्न नि त्याबद्दलचे मिलिंदाने लिहिलेले सगळे विषय चाळीस वर्षापूर्वी सुद्धा चावून चोथा झालेले होते. फार थोडा बदल पडतो चालीरीतीत चाळीस वर्षात. तेंव्हा हे असेच चालायचे. बदल होतील, पण अगदी हळू हळू.
|
Maku
| |
| Friday, December 08, 2006 - 8:56 am: |
| 
|
Chandrakor चे बोलने मला तरी चुकिचे वातते .. कारन की मज़्या बहीनीच्या लग्ना मध्ये सुद्धा माज़्या आई ने पाय धुतले होते. पन मज़्या जिजाजिनि सन्गितले की मी पन तुमच्या मुलीचे पाय धुनार.
|
इशिका मला वाट्टं तुझे जीजाजी gr8 आहेत मी तर अजुन कुणालाही असं म्हणताना नाही पाहीलं.
|
Disha013
| |
| Friday, December 08, 2006 - 5:47 pm: |
| 
|
मी माझ्या मुलीच्या नवर्याचे पाय धुणार नाही.....आणि मी माझ्या सुनेच्या आई-वडीलांकडुन्ही पाय धुवून घेणार नाही असे ठरविने जास्त चांगले.
|
Asmaani
| |
| Friday, December 08, 2006 - 8:55 pm: |
| 
|
माझ्या मते "कन्यादान योग्य की अयोग्य" अशी चर्चा चालू होती इथे!
|
Disha013
| |
| Friday, December 08, 2006 - 10:03 pm: |
| 
|
ते आहेच गं, पण त्या अनुषंगाने पोटचर्चाही आल्याच!
|
मुलीचे सुध्दा पाय धुतात लग्नात , मुला कडच्या करवल्या आणि जाउ असेल तर सगळ्या मिळून धुतात आणि कुंकवाने स्वस्तिक काढतात . शिवाय सत्यनारायणालाही ! पण मुलीच्या आईचे मात्र पाय धुणे नाही पहिले कुठे !
|
नाहि गं दीपांजली माझं तर आत्ताच लग्नं झालं आणि त्यानंतर २ वेळा सत्यनारायण पण पण कुणीच माझे पाय धुतले नाहीत माझ्या आइचे तर सोडाच...मला आठंवतय लहानपणी कुमारीका म्हणून बोलवायच्या काही शेजारच्या काकू त्या कुंकवाचं स्वस्तिक काढायच्या पायावर त्यानंतर ते पाहिलं नाही.. खरं आहे की मुद्दा कन्यादानाचा आहे..पण त्यासारखेच इतर अपमानस्पद वाटणारे विषयही येणारच ना आपोआप..
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|