|
विनय, अगदी बरोबर. १-५ वर्षांच्या मुलांवर येवढ्यातच स्पर्धात्मक जगाचा ताण पडणं योग्य नाही वाटत न?
|
विनय, शेवटचे वाक्य केवळ कित्येक देसी आणि चायनीज पालकांना हे समजून घ्यायची गरज आहे. वय ५ च्या मुलांना एकाच वेळी पियानो, सॉकर, क्युमॉन, ice skating , देसी संस्कार वर्ग इतक्या सगळ्यात अडकवणे हे अगदी common आहे देसी कुटुंबात! अभ्यासाचा ताण इथे नसतो तर हा असा ताण त्यांना देऊन बेजार करतात आईबाप! असो. पुन्हा विषयान्तर होत आहे
|
प्रजक्ता, Pre-school, Montesorry हे सगळन साधारणपणे तीन वर्षांपासून. Out of diapers ही अट बहुतेक ठिकाणी असते.. काही ठिकाणी या अटी नसतात त्यांना Day Care+ Preschool किंवा dayCare+Montesorry म्हणा हवं तर... मुलं तीन, चार, पाच वर्षांची असताना त्यांना खूप काही आवडतं आणि ते क्षणाक्षणाला बदलतं मित्राचा / मैत्रिणीचा मुलगा / मुलगी अमूक करतो, करू शकतो, किंवा 'अमूक करतो / करते असं सांगण्यात येतं' (उगाचच थापा मारणारे आईबाप हा वेगळाच विषय होईल पण सगळीकडे भेटतात) म्हणून आपल्या मुलांना त्याप्रमाणे किंवा त्यांच्यापेक्षा वरचढ करण्यासाठी जीवाचा आटापिटा करू नये हे खरं आयुष्यभर शिकायचं आहे, तेव्हा चांगले संस्कार शिकायला मिळतील तिथे जावं.. मुलांनी उत्साह दाखवला तर त्यांना प्रोत्साहन द्यावं, पण लगेच अपेक्षा करू नये... हे सांगणं सोपं आहे, करणं कठीण, पण म्हणूनच जाणीवपूर्वक आपल्या अपेक्षांचा भार एवढ्या लहान वयात मुलांवर टाकू नये. सर्वसाधारणपणे Pre-school स्वस्त असतं, काही Co-operative असतात (जिथे महिन्यातून एक वेळ आई / वडिलांना मदतीला बोलावतात). आणि तिथे मुलांना अभ्यासापेक्षा सहजीवन शिकवतात.. जे घरी होत नाही.. अभ्यास या वयात दुय्यम.. मुल अतिहुषार असेल तर प्रश्न वेगळा... पण हजार्क़त एक असतं.. (आता प्रत्येक आईबापाला आपलं मुल लाखात एक वाटतं त्याचं काय?)
|
विनय!उत्तराबद्द्ल धन्यवाद! " मुलांची प्रगती ही आईवडिलांची इतर पालकांबरोबर चढाओढ होऊ नये हे मात्र महत्वाचं " हे वाक्य फ़ार पटल.
|
Zakki
| |
| Friday, May 19, 2006 - 10:20 pm: |
| 
|
storvi तू असे कर. आरोहिला पाठवण्या आधी तूच निरनिराळ्या शाळेत मूल म्हणून जा. तुझ्याशी बोलल्यावर त्यांना पण वाटेल की कदाचित् वयाच्या मानाने मोठी दिसत असेल, पण बाकी बाबतीत इतर मुलांसारखीच आहे ही. मग तुला जी शाळा चांगली वाटेल तिथे आरोही ला घाल. मी नाही का तुझ्या शाळेत बिगारी ढ मधे बसलो होतो. मला तिथले धंदे आवडले नाहीत, म्हणून माझ्या मुलांना मी Carnegie Mellon ला घातले. नाहीतर माझ्या मुलीला ballet, Tap इ. नाच शिकायची आवड अजूनहि आहे. फक्त आता ती स्वत: मिळवलेले पैसे खर्च करून जाते शिकायला.

|
Storvi
| |
| Monday, May 22, 2006 - 7:42 pm: |
| 
|
झक्की तुमचं ऐकून मी गेलेच आज एक montessori बघायला तर मी observe केलेल्या काही गोष्टी खेळणी खरच चांगली आहेत, पण २ वर्षांच्या मुलांपेक्षा तीन वर्षांच्या मुलांना ती जास्त चांगली आहेत. २ वर्षांच्या मुलांची खेळणी एवढी ग्रेट नाही वाटली मला. सगळी मुलं आपापली एकटी एकेका आयताकार बस्करावर खेळत होती त्या बस्कराच्या बाहेर खेळ जाउ द्यायचा नाही. एका वेळी एकच खेळणे खेळायचे. ते खेळुन झाले की ते आधी ठेवायचे आणि मग दुसरे घ्यायचे. एकमेकांची खेळणी घ्यायची नाहीट. मला हे दोन वर्षांच्या मुलांना एवढे तालमीत ठेवणे काही रुचले नाही. is it natural for two year olds to play so quietly without much interaction with anybody? सकाळि आणि संध्याकाळी अर्धा अर्धा तास बाहेर play time बाकीचा वेळ circle time किंवा संगीत किंवा वर नमुद केलेल्या activities . त्यामुळे मुलं तशी संयमी वागतात ठीक आहे पण मला प्रश्न पडतो की घरी आल्यावर ही मुलं सगळी energy बाहेर काढतात की काय? शिवाय वेळ बघुन बाहेर नेणार नाहीट कारण शाळा एवढी मोठी आहे की सगळ्यांना बाहेर वेळ मिळायला हवा असेल तर आळिपाळीनेच जावे लागेल. म्हणजे सध्या तिला बहेर उन पडल की खेळायला नेतात त्या ऐवजी हे घड्याळाप्रमाणे नेणार. एखाद छोटं सेटींग बघायला हवं कसं असतं ते. पाठवाय्चच तर तीन वर्शांचे झाल्यावर जास्त फ़ायदा होईल असं वाटल. पण मला वाटलं की त्यापेक्षा घरी montessori kits आणुन त्याने शिकवण बर पडेल, रोज इतक्या बन्धनात वावरण्या पेक्षा. ते रागावत नाहीत पण तरी नियम enforce करतात असे दिसले. शाळेत एक आवाज नाही. सगळी मुला गुणी बाळांसारखी खेळत होती. खेळातही दोन मुलं TAyar ढकलायचा खेळ खेळत होती ती सुधा एका रेशेत टायर ढकलत होती. यार मला तरी हे फ़ार restrictive वाटलं अजुन एखदं छोटं सेटींग बघुन कळवीन.
|
Seema_
| |
| Monday, May 22, 2006 - 8:22 pm: |
| 
|
Sto जरा कडकच वाटती आहे ही montesori . इतर मुलांबरोबर share का नाही करु देत ते toys? मी बघुन आलेल्या montessori मध्ये भरपुर दंगा धुडगुस होता आणि अति नियम वगैरे काही फ़ार नव्हत . छान वाटलेल मला ते school . अगदी आताच जे school आहे तसच वातावरन वाटलेल . फ़क्त खेळणी आणि शिकवण्याची method मात्र वेगळी वाटली . बाकीच same . मी अजुन एका ठिकाणी पाहिल तीथ मात्र मलाही थोड शांत शांतच वाटल . http://www.montessori.edu/ या site वर स्पष्ट दिलय कि The name Montessori is not legally protected, and can be used by anyone, त्यामुळ मला वाटत कि प्रत्येक school चा वेगवेगळा दर्जा असणार आहे आणि fees च structure सुद्धा . त्यामुळ सरसकट प्रत्येक montessori चांगलीच असेल अस ग्रुहित धरण ही योग्य ठरणार नाही . individual विचार करावा लागेल . BTW इथ काही montessori मध्ये २००७ पर्यंत admission चक्क close झाली आहे .
|
Storvi
| |
| Monday, May 22, 2006 - 8:54 pm: |
| 
|
सिमा ते तर झालच. प्रत्येक स्कूल वेगळ असणार. मी त्या स्कूल मध्ये गेले कारण आमच्या office मधल्या एक दोघांची मुलं तिथे जात होती.
|
Mbhure
| |
| Monday, May 22, 2006 - 9:36 pm: |
| 
|
आम्ही प्रीस्कूलच्या वेळी विचारात घेतलेल्या गोष्टीः १. दोघेही नोकरी करत असतील तर, प्रिस्कूल हे आपल्या कामाच्या आणि घराच्या मध्ये हवे. कारण ईमर्जन्सीच्या वेळी ते सोपे असते. नोकरीचा प्रश्न नसेल, तर ते घराच्या जवळच असावे. अर्थात पहिल्या कंडीशनमध्येही, ते घराजवळ असले तरी चालेल्; कारण दोघांनाही कामावरुन ताबडतोब निघणे अशक्य असेल तर कोणा ओळखीच्याला त्या मुलाला पिक - अप करणे सोपे पडते. २. मुलाला ती शाळा आवडणे महत्वाचे. ही गोष्ट लगेच लक्षात येते. आम्ही Ann Arbor, MI वरुन Milwaukee, Wi ला गेलो तेंव्हा सुरुवातीला एका डे - केअर मध्ये मुलीला घातले होते. एकदा तीला जरा बरे वाटत नसताना घरी रहायला सांगितले. पुर्वी अराडाओरड करणारी ती लगेच घरी रहयला तयार झाली. खोदुन विचारल्यावर तिने सांगितले की त्याशाळेत काहीच शिकवत नाहीत, नुसतेच कागद आणि खडू देऊन किंवा इतर काही देऊन सोडुन देतात. मुलांना आभ्यास नसला तरी डोक्याला जराही चालना नसेल तर कंटाळा येतो.त्यामुले तेथे थोडा अभ्यास आणि बाकी मजा असावी. ३. तेथील शिक्षक / शिक्षिका जरा कडक असले तरी रुक्ष नसावेत. तुमच्या मतांबद्दल त्यांना आदर हवा. त्याच बरोबर (काही) पालकांना कडक तंबी देता आली पाहिजे. कारण ह्या देशात मुलाने काही केले तरी दात काढून " Its OK. He/ she is doing good" वगैरे उगाचच (तोंडदेखल)गोड बोलण्याची सवय असते. थोडक्यात खेळीमेळीचे वातावरण हवे. एक दोन भेटीतच ते आपल्याला जाणवते. शिल्पा, जर मुलीला तिची शाळा आवडते आणि जर ती शाळा शैक्षणिक दृष्ट्या ७० - ८० % लेव्हलची असेल तर उगाच कशाला बदलतायत? जो परयंत मुल A, F, N, S शब्द बोलत नाही / शिकत नाही तो पर्यंत ठीक. आणि आरोही फक्त २ वर्षाची आहे आणि केव्ह्ढा हा विचार!!!! विनयने लिहील्याप्रमाणे तीला जरा एंजॉय करु दे, अभ्यास आहेच की मग.
|
Karadkar
| |
| Monday, May 22, 2006 - 10:45 pm: |
| 
|
Shilpa, that Rainbow Montessori is total Desi jungle. Why don't you look for something else?
|
Storvi
| |
| Monday, May 22, 2006 - 11:20 pm: |
| 
|
भुषण, मिनोती I know . मी इतरही शाळा बघतिये. मला बदलण्याची फ़ारशी इच्छा नाही पण at the same time सगळे मला सांगतात की हि हुशार आहे, स्मार्ट आहे, तसं जर खरंच असेल तर तिच्या बुद्धीला चालना देणारी शाळा बघावी नुसतीच बोलबच्चन होऊ नये असं वाटतं. अता तिला कही alphabets कळतात. शेप्स मध्ये circle आणि oval मधला फ़रक आणि square आणि rectangle मधला फ़रक कळतो. पण शाळेत सध्या colors वर भर आहे. colors कडे तिचा तेवढा कल नाही पण अकडे मोजणे alphabets हे तिला शिकवले तर ती ते नक्की शिकेल. पण ह्या गोष्टी मी तिला शिकवते आहे, आणि ती माझ्या कडुन शिकते आहे, पण शाळेतुन नाही. तेंव्हा मुलांच्या कलाने शिकवणारी शाळा असेल तर बरे. शिवाय हा दुसरा पर्याय समोर आहे हे कळल्यावर त्याला पूर्ण अभ्यास केल्याशिवाय कसा सोडुन द्यायचा?
|
फ़रक नाही फ़रक नाही असे म्हणत म्हणत जेव्हा मुलांची एकंदर संपूर्ण वर्षभरतील प्रगती पहातो तेव्हा महाग असेल तरी पण शक्य असेल तर मुलांना जरूर मॉन्टेसरीत घालावे नक्कीच फरक पडतो असे मला तरी वाटते....माझा मुलगा दोन्ही ठिकाणी गेला आहे... आधी मॉन्टेसरी आणि मग एक नामांकीत प्रिस्कूल्मध्ये, पण मग आम्ही त्याच्या वागण्यात पडणारा फ़रक बघून मग परत आम्ही त्याला मॉन्टेसरीतच घातले. आणि मॉन्टेसरी मध्ये मुलांवर प्रेशर येते आसे मला वाटत नाही...कारण तिथे सर्व शिकवतात ते त्यांच्या कलाकलाने घेऊनच शिकवतात...खेळत बागडतच मुलांना नकळत थोडी शिस्त लागते. मॉन्टेसरीतील टिचर्स ट्रेन्ड असतात त्याचा कोणी कितीही नाही म्हणले तरी काही प्रमाणात का होईना नक्कीच फ़ायदा होतो मुलांना...त्यांच्या डेली रुटीन मध्ये खरचच वेगवेगळे सेशन्स आसतात सर्कल टाईम वगैरे...प्रिस्कूल मध्ये मात्र अम्ही पण तसे सगळे करतो असे सांगतात पण खरे तर बरचसा वेळ मुलांना नुसती खेळणी टाकून सोडून दिलेले असते.... आणि मुलांना पण फ़क्त तेच हवे असते या वयात...त्याना कुठलेही कंपल्शन नको या वयात लगेच रमतात कुठेही.... आणि बहुतेक पालकांचे पण असेच मत आसते की त्यांच्या सध्याच्य वयाला मॉन्टेसरी काय आणि प्रिस्कूल काय कही फ़रक पडत नही... पण खरे तर ती कुठे समवयस्क मुले आणि खेळणी बघून रमतात त्याचाच फ़ायदा करुन घेऊन सुरवतीलाच त्यान जास्त योग्य वतावरणात रमवणे चांगले. मुलांना या वयापासूनच थोडे वळण आणि थोडा आभ्यास याची आवड निर्माण करणे हे काम प्रिस्कूल पेक्शा मॉन्टेसरीत जास्ती सरस रित्या केले जाते.... आणि ते जर या वयात झाले तर त्याचे त्याना कंपल्शन वाटत नहीच उलटी आपोआप सवय लागून जाते..... आणि दिवसतील २-३ तास चांगल्या कारणानी कंपल्शन झाले तर काहिही हरकत नसते बाकीचा वेळ जेव्हा ते घरात आसतात तेव्हा मोकळेच आस्तात की खेळाय्-बागडायला. त्यामुळे प्रिस्कूल पेक्शा मॉन्टेसरी कधीही चांगलीच. मॉन्टेसरीत पुढील शाळेच्या द्रुष्टीने पण मुलांची नक्कीच जस्त चंगली तयारी होते. पण हे ही तितकेच खरे आहे की कंप्यारेटिव्हली फ़ी जास्ती असते...पण शक्य असेल तर चंगल्या गोष्टीसाठी थोडे जास्ती पैसे खर्च झाले तर काय हरकत आहे?
|
Fulpakhru
| |
| Tuesday, October 03, 2006 - 10:57 pm: |
| 
|
स्टोरवी आरोही कोणत्या day care ला जात होती? मी पण निलय साठी सध्या day care च्या शोधात आहे. आरोही च्या day care मधे potty trining करतात असे वाचले म्हणुन तुला विचारते आहे आणि तू santa clara लाच राहतेस बहुतेक.
|
Storvi
| |
| Tuesday, October 03, 2006 - 11:21 pm: |
| 
|
फ़ुलपाखरु आरोही चे डे केअर होते My Preschool Inc. हे saratoga वर आहे. इथले शिक्षक खुपच छान आहेत आणि प्रेमळ पण आहेत. सध्या आरोहीला एक चोट्या मॉन्टेसरी मध्ये टाकले आहे, पण to be quite honest उगाच हलवले असेच मला आजुनही वाटत आहे. ती तसेही सगळे छान pick up करतच होती. आता आणखी करते आहे. but I would not attribute that to montessori वय वाढतय तसे ते होणारच. फ़क्त इथे एक फ़ायदा म्हणजे माझ्य दोन मैत्रिणींच्या मुली तिथेच आहेत आणि तिच्य pediatrician ची मुलगी पण तिथेच आहे. हा फ़रच मोठा फ़ायदा झाला. एकदा आरोही त्याच शाळेत आहे कळल्यावर त्यांनी मला सांगितले, ही potty trained आहे तर हीच वर्ग बदला म्हणुन बघु अत्तशी दोन महिने झालेत. नवीन updates देतच राहीन म्हणजे इतरांना काही फ़ायदा झाला तर तेवढेच बरे.
|
Farend
| |
| Wednesday, October 04, 2006 - 2:22 am: |
| 
|
sunnyvale montessori चा आमचा अनुभव चांगला आहे. storvi तुम्ही त्याच मॉंटेसरी बद्दल म्हणत आहात का? तिथे मुलगामुलगी potty training नसली तरी चालते.
|
Bee
| |
| Wednesday, October 04, 2006 - 4:28 am: |
| 
|
What is this potty training means?
|
Maitreyee
| |
| Wednesday, October 04, 2006 - 1:00 pm: |
| 
|
google सर्च करता येत असेल तर असे प्रश्न टाईपण्यात जो वेळ लागतो त्यापेक्षा फ़ार कमी वेळात उत्तर मिळतं बी 
|
Chum
| |
| Wednesday, October 04, 2006 - 1:20 pm: |
| 
|
Hya Bee la sagala mahit asata. Ugichach nako te prashna vicharat asato time pass mhanun.
|
Storvi
| |
| Wednesday, October 04, 2006 - 7:25 pm: |
| 
|
>>तिथे मुलगामुलगी potty training नसली तरी चालते>>माझा प्रोब्लेम असा होता की माझी मुलगी लवकर potty train झाली आणि ह्या लोकांना ते manage करता येत नाही. Any ways हा प्रश्न आता सुटलाय.
|
Fulpakhru
| |
| Wednesday, October 04, 2006 - 7:34 pm: |
| 
|
thanks storvi i will check this My Preschool Inc
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|