|
Aaftaab
| |
| Wednesday, September 27, 2006 - 9:20 am: |
| 
|
धर्माच्या नावावर थोतांड (सोवळे, स्पृष्यास्पृष्यता, कर्मठपणा वगैरे) तुम्हाला असे अनुभव आलेले आहेत का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? अजूनही बर्याच घरांमधे सोवळे, स्पृष्यास्पृष्यता, बर्याच अंध चालीरीती चालू आहेत. इथे तुमचे अनुभव आणि विचार लिहा. तसेच याबाबत काय करता येईल हेही लिहा.
|
सोवळे वापरणे, पूजा करणे, प्रार्थना करणे ई. प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. जोपर्यंत तुम्ही दुसर्याला त्रास देत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या पध्दतीने उपासना करू शकता. परंतु, अस्पृश्यता पाळणे, जिभेचे लाड पुरविण्याकरता हलाल किंवा इतर तर्हेने प्राणी अथवा पक्षी मारुन खाणे हे पाप आहे. ईद, नवरात्र अशा दिवशी बळी देणे तर घोर पाप आहे.
|
Meggi
| |
| Wednesday, September 27, 2006 - 12:33 pm: |
| 
|
कुठलीपण गोष्ट अती केली तर वाईट, मग तो धर्माच्या नावावर चाललेला कर्मठपणा असो किवा modern दाखवण्यच्या साठी केलेला आटापीटा असो. आपल्या प्रत्येक रिती - रिवाजा मागचा उद्देश बघितला तर त्या रिती किती योग्य होत्या ते कळेल. ' सोवळे पाळणे ' मात्र मला चुक वाटत नाही. स्वछता हा एकमेव उद्देश असतो त्यामागे. अतिरेक वाईट. उपास, मनावर ( विशेषत: जिभेवर ) control करायला शिकवण्यासाठी. पुर्वीच्या काळी नवरात्रीत ९ दिवस बिन मिठाचं खाउन उपवास करायचे, तर नवीन काळात लोक 7 days diet करतात. उद्देश एकच फ़क्त पद्धत वेगळी. आपल्याला काय झेपतं, काय योग्य काय अयोग्य हे ठरवण्याची विवेक बुद्धी जागृत ठेवावी एवढचं.
|
|
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|