|
Bee
| |
| Thursday, October 05, 2006 - 4:46 am: |
| 
|
समुवाई, तुमचे विचार खूप प्रभावशाली आहेत. तुम्ही इथे जे जे लिहिता ते ते मी वाचतो पण हिम्मत होत नाही तुमच्यापुढे बोलण्याची.
|
Bee
| |
| Thursday, October 05, 2006 - 5:01 am: |
| 
|
तुम्ही म्हणता अगदी त्याच प्रकारे श्रीक्रुष्णाच्या सल्ल्याप्रमाणे युद्ध करावे असेच मला वाटते, कारण सगळे उपाय झाल्यावरच विचारपुर्वक अगदी शेवटची क्रुष्ण शिष्टाई सुद्धा अयशस्वी ठरली तेन्व्हाच श्रीक्रुष्णानी युद्ध कर म्हटले होते. पण हे निश्चितच गान्धीगिरीच्या विरुद्ध आहे. >> च्यायला, मला ही कृष्णशिष्टाई काय होती ती थोडक्यात समजवून द्याल का? किंवा एखादी लिंक दिली तरी चालेल.
|
Samuvai
| |
| Thursday, October 05, 2006 - 5:08 am: |
| 
|
तुम्ही इथे जे जे लिहिता ते ते मी वाचतो पण हिम्मत होत नाही तुमच्यापुढे बोलण्याची. Bee , मी ईतका भयंकर आहे काय? तुम्ही म्हणत असाल तर काहीही लिहीत नाही महिनाभर फक्त वाचतो ईतरांनी लिहीलेल - आता तरी लिहा. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच उत्तर्: अपरिग्रह म्हणजे भौतिक जगापासून ची अलिप्तता. अगदी तेवढ नाही जमल तरी काही पाळता येणारी तत्वे: जरुरीपेक्षा धनाचा संचय न करणे. "तेन त्यक्तेन भुन्जिथा" वा तुकाराम महाराजांनी सोप्या (पण अत्यंत प्रभावी) शब्दात सांगितलेले: जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. अस्तेय म्हणजे ब्रह्मचर्य. थोडक्यात गरजा जास्तीत जास्त कमी करुन संयत उपभोग घेणे. म्हणजे आपोआपच द्वेष, ईर्षा, मत्सर कमी होवून मन:शांती आणि पर्यायाने जागतिक शांतता!
|
Bee
| |
| Thursday, October 05, 2006 - 5:13 am: |
| 
|
वा असे वाटते देवालयात सात्विक प्रवचनाला बसलो आहे :-) समुवाई, धन्यवाद माझ्या प्रश्नाचे त्वरीत उत्तर दिल्याबद्दल.
|
Sanurita
| |
| Thursday, October 05, 2006 - 6:05 am: |
| 
|
थोडक्यात म्हणजे, गान्धीज़ीन्च्या विचारान्ची देशाला आता गरज उरली नाही. समुवाइ यान्च्या म्हणण्याप्रमाणे आपण याच सामरोपा वर आलो आहोत.तेन्व्हा आता सर्व प्रश्नान्ची उत्तरे हिन्सेतच आहेत असेच इथल्या बर्याच जणान्चे मत दिसते.
|
Samuvai
| |
| Thursday, October 05, 2006 - 7:31 am: |
| 
|
sanurita , माझा आक्षेप प्रामुख्ख्याने गांधीवादातील शत्रूशी / दुर्जनांशी लढण्याची पद्धत ह्या गोष्टीवर होता. "मुन्नाभाई च्या निमित्ताने" अस ह्या BB च नाव असल्याने त्या चित्रपटात जे तत्व highlight केल गेल त्यावर बोललो. तेव्हा गांधीजींचे सगळेच विचार टाकावू अस मी कुठेही म्हंटलेलो नाहीये. मला गांधीजींनी लावलेला अहिंसेचा चुकीचा अर्थ, मुस्लिम लांगूलचालन, हेकट राजकारण हे कधीही आवडणार नाही कारण त्यामुळे देशाचे अपरिमित नुकसान झालेले आहे. पण त्यांचे मला अनुकरणीय वाटणारे विचार (ज्यावर चर्चा झालीच नाही) ते असे: १. स्वदेशी २. स्वावलंबी ग्राम (आणि ते घडवण्यासाठी खेड्यांकडे चला) मला वाटत वरील दोनीही विचार जर आजच्या context मध्ये विचारपूर्वक आचरणात आणले तर हिंदुस्थान पुन्हा बलशाली होईल.
|
Prashantl
| |
| Thursday, October 05, 2006 - 4:10 pm: |
| 
|
Samuvai, agreed on the last post Few points- 1 A nations army (a soldier to be specific) has it's duty and responsibility to fight the enemy/external threats with courage and confidence. One need not bring gandhigiri here 2 Police and law system has it's duty and responsibility to prevent and punish crime internally. One need not bring Gandhigiri here If they are not doing this, Gandhigiri can be brought in to make them understand and follow the system/law and do justice in a peaceful way. Something similar was shown in the hindi movie - "dhoop". 3 For law breakers in society (common man breaking laws), it's a citizen's duty and responsibility to make them understand and if that doesn't help report it to approp authorities instead of taking law in own hands and do violence. Gandhigiri can be helpful here. 4. For life threatening situations it will be a spontaneous response by every individual (type 1 or 2 or 3 as mentioned earlier) at that moment. Self defense is not violence. But again, as I mentioned earlier, Gandhigiri is not a permanent solution to all problems and not a guarantee for success in all tasks. It's more of a constant struggle against injustice and our enemies of mind, to reach the truth or love or peace ultimately. Past has happened..we do not have control over it. Ofcourse there are things in past that one may not like or agree fully, but again that's what has already happened. Why cry over spilled milk? What we have now is just this moment. We certainly have capability to learn from the past and improve ourselves. "Be the change you wish to see in others" * Gandhi-giri has popped up in context to bhai-giri. It's only to fit with the modern time -a revised version! Call it refined Gandhivaad or anything, what matters is if we really start applying it in our DAILY life NOW! Be good with yourself, your kids, your spouse, your friends, everyone. Watch your thoughts and words. Don't just tolerate but appreciate others point of view as well. Get connected...
|
Chyayla
| |
| Thursday, October 05, 2006 - 5:04 pm: |
| 
|
समुवै, "आपने तो गागर मे सागर भर दिया" अगदी नेमक्या शब्दात सान्गितले. अजुन एक, गान्धीजीन्च्या अहिन्सेमधे शत्रुवर प्रेम करताना स्वजनान्चा घात होत आहे याचा विचारच केला गेला नाही. सानुरिटा, तु एक तर दोन्ही टोकाच्या भुमिका घेत आहेस, एकतर आन्धळेपणे पुर्ण गान्धीवाद त्याच्या गुणदोषासकट किन्वा हिन्सा, त्यामानानी प्रशान्तचे उत्तर व्यवस्थित पटतय, प्रशान्त तुम्ही खरच सुरेख लिहीता. बी, क्रुष्ण शिष्टाईची लिन्क नाही माहित पण थोडक्यात सान्गतो महाभारतात जेन्व्हा द्युतामधे हरल्यानन्तर, कौरवान्च्या अटीप्रमाणे पान्डवान्नी वनवास पुर्ण केला तेन्व्हा त्यान्चा अधिकार परत मागण्यासाठी क्रुष्णानी पान्डवान्चा दुत बनुन शिष्टाई केली व तो कौरवान्कडे गेला, तेन्व्हा पान्डवान्ना सुई च्या टोकाएवढी सुद्धा भुमी देणार नाही असे उत्तर दुर्योधनाने दिले, याप्रकारे सरळ मार्गाने अधिकार नाकारण्यात आल्या नन्तरच श्रीक्रुष्णाने युद्धाचा सल्ला दीला होता.
|
सामुवै, पटली बुवा तुमची शेवटची पोस्ट.
|
Bee
| |
| Friday, October 06, 2006 - 4:54 am: |
| 
|
हे होय.. धन्यवाद च्यायला! प्रशांत तुम्ही इतके छान लिहिता मग देवनागरीमध्ये लिहिण्याचा प्रयास का नाही करत.. सुलभ मराठी केंव्हाही चांगली. परंतू काही अडीअडचनी असतील तर चालेल मला ईंग्रजी..
|
Samuvai
| |
| Friday, October 06, 2006 - 5:42 am: |
| 
|
पूर्ण अनुमोदन प्रशांत. मराठीत लिखाणासाठी शुभेच्छा
|
Sanurita
| |
| Friday, October 06, 2006 - 9:47 am: |
| 
|
समुवाइ, तुमच्या पोस्ट वरुन तुम्हाला गान्धीवादातली काही तत्वे तरी पटतात. हे वाचून बरे वाटले.मला तुमच्या बाकीच्या पोस्टवरून तुम्हाला गान्धी या" व्यक्ती" बदद्ल काही आस्था असेल असे वाटत नव्हते. च्यायला, मी अजिबात टोकाची भूमिका घेतली नाहिये. मला पण मान्य आहेच की आत्ता सर्व ठिकाणी गान्धीवाद चालेल असे नाही. मी माझ्या एका पोस्ट मधे हे मान्य देखिल केले आहे.पण चर्चा अशी सुरु होती की ही तत्वे टाकावू आहेत. म्हणून मी अतिशय उद्वेगाने तसे म्हणले.कदचित माझा चा विषय द्यायला चुकला असेल. पण. माझा हेतू गान्धीजीच्या सर्व तत्वे आता लागू होतात का? यावर चर्चा व्हावी असा होता. असो, सामुवाइ, आपल्याला सगळ्याना आपली मते मान्डयचा हक्क आहे. म्हणून वादाच्या ओघात थोडे जास्त बोलले असेन तर माफ़ करा. मी तुमच्यावर माझी मते लादू शकत नाही. आणि तुमची पोस्ट मलाही पटली आहे. प्रशान्त तुम्ही खरेच खूप छान लिहीता.
|
सानुरिता.. सुंदर.. तु लिहिलेले सगळे वाचले... तु एकटी जो काही विचार कतेय ते वाचणारे भरपुर आहेत. उद्वेगाने म्हणालिस म्हणून म्हटले एखादि post टाकावी..!!! लिहित रहा... मी गान्धीजिंची विचारसरणी अमलात आणु शकत नाही तितका पेशन्स माझ्यात नाही पण म्हणुन मी त्या देव माणसाचा तिरस्कार करु शकत नाही...!!! रोजच्या जीवनात म्हनजे नातेवाइकाशी वागण्यात गांधी तत्वांचा खुप उपयोग होतो... पण निर्लज्ज लोकापुढे तसे वागणे जमत नाही जे त्याना जमले म्हणुन मी त्याना देवाच्या रॅन्क मध्ये बसवलेय..!!!! (मी हे लिखाण फ़क्त सानुरीता साठी टाकलेय)....
|
Chyayla
| |
| Friday, October 06, 2006 - 5:15 pm: |
| 
|
मायबोलीकरान्नो, फ़क्त सानुरिटा साठी लिहायचे असेल तर वैयक्तिक सन्देश पाठवता येतो... बाकी सगळ माहिती आहेच...
|
Prafull
| |
| Saturday, October 07, 2006 - 3:28 am: |
| 
|
One more eg. of gandhigiri http://www.saamana.com/2006/Oct/07/Link/pradeshik1.htm
|
तुम्हाला पण च्यायाला(हा शब्द म्हणुन कधी वापरला नाही ये आज ही नाव म्हणुन वापरतेय)... जर सन्देश एकालाच द्यायचा असेल तर एकालाच लिहिता येते!!!सगळ्या मायबोलिकरांना कशाला.. उगाच फ़ुकटचा सल्ला...
|
लोकहो, BB च्या विषयाला अनुसरुन लिहा.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|