|
Bee
| |
| Monday, August 28, 2006 - 7:20 am: |
| 
|
मंडळी, आपण मोठे ज्यांनी देशातून मराठीमध्ये शिक्षण घेतलं. त्यावेळी मराठी भाषा इतकी जवळची होती की घरातूनच ती आधी चांगल्या प्रकारे आत्मसात केली गेली. शाळेत तिचा एक वेगळा विकास झाला. आज मात्र आपली मुलंबाळं english शाळेत जातात, ती परदेशात रुजतात. मग त्यांना मराठी येईल का? की बळजबरीकरून किंवा प्रिय पालक म्हणतात म्हणून आपल्याकडून ती चार दोन मराठी शब्द शिकतील. पुढे त्याचा उपयोग किती सार्थ अभिमानाने करतील ह्यात बर्याच शंका आहेत. ती लहान असली, की घरी आपण मराठी बोलतो म्हणून तीही बोलतात. पुढे पाय फ़ुटले की त्यांच जग त्यांना गावतं. मग नविन मित्रमंडळी, नविन तांडा, नविन भाषासमूहातील मित्रमैत्रणी ह्या सर्वांचा मुलांच्या मातृभाषेवर चांगलाच परिणाम होतो. मग आपली मातृभाषा मुलांपासून दुरावते आणि अगदी रोजच्या व्यवहारातील व्याकरण देखील मुलांना नीट वापरता येत नाही. शब्दसंपदा तर खूप दुरची गोष्ट आहे. त्याकरिता आईवडीलांनी आधी स्वतः मराठी पुस्तके वाचायला हवी म्हणजे मुलही ती कधीतरी हाती घेऊन चाळतील. पण जे साहित्य आपल्याला आजही आवडते ते आजच्या मुलांना आवडेल की नाही? त्यांच्यासाठी ते साहित्य संदर्भहीन, बोजड, कंटाळवान ठरत असेल. उदा. पुलंचे व्यक्ती आणि वल्लीतले विनोद आणि उपहास हल्लीच्या मुलांना कळत नाही. निदान परदेशातील मुलांना तरी पुलंनी केलेला विनोद लक्षात येत नाही. हीच गत चित्रपट, संगीत, नाटकं ह्यांच्याबद्दलही आहे. जसे संगीत नाटकं आपल्यापैकी कुणाला आज रुचणार नाही. ही वस्तुस्थिती आहे पण आपण इथेच जर माघार घेतली तर आपली मुले मराठी कधीच होऊ शकणार नाही. हा विषय चांगल्या प्रकारे analyse करू शकतो. मला इथे उपाय अपेक्षित आहे जेणेकरुन त्यांना अमलात आणण्याचा प्रयास करता येईल. इथे आम्ही मराठी विषय सुरू केला होता पण प्रतिसाद खूपसा मिळाला नाही. मुळात विद्यार्थीच नाहीतर शाळा कशी चालणार म्हणून आमचा हा उपक्रम बारगळला. सांगायला नक्कीच यातना होतात पण पुढच पाऊल मागे राहू देत नाही. असे वाटते अजून काहीतरी करून बघावे. तुम्ही काही खास प्रयोग मुलांवर करुन बघितलेत का? ते कितपत यशस्वी झालेत? तुम्ही तुमचे मुद्दे जरुर लिहा. तुमच्याच मुलांना जर मराठी येत नसलं किंवा त्यांना ह्या भाषेचा जराही गंध नसला तर तुमच्या नातवांन्चे काय होईल. ते तर अलिप्तच राहतील ह्या भाषेपासून. आमची पाळमुळं टिकवून धरण्यासाठी मुलांमध्ये मराठी रुजली पाहिजे ही खरच नितांत आवश्यक बाब आहे. परदेशात राहून विलास उपभोगताना निदान ऐवढा तरी विचार आम्ही नक्की करायला हवा..
|
Bee
| |
| Monday, August 28, 2006 - 7:21 am: |
| 
|
वरील शीर्षकात एक चूक आहे. मला 'मराठीमधून' असे लिहावयाचे होते तेंव्हा तो तेवढा भाग समजवून घ्या ही विनंती.
|
शिर्षक बदलले आहे.
|
जिव्हाळ्याचा विषय... एक लक्षात घेतलं पाहिजे की बर्याच पालकांची 'सार्वजनिक' इच्छा आपल्या मुलांनी मराठी बोलावं अशी असली, तरी ते स्वतः त्यासाठी कष्ट घेत नाहीत. चार चौघात मुलांशी मराठी न बोलणे, मराठी सारखे काहीतरी बोलून त्यात वारंवार इंग्रजी शब्द घुसडणे... किंवा 'मुलं इंग्रजी बोलत नाही', ही तक्रार त्यांच्याच समोर इतराना कौतुकाने सांगणे ह्या पालकांच्या सवयी मी स्वतः अनुभवल्या आहेत. 'तो ना मराठी( रा साठी जीभ टाळ्याला चिकटवून) टॉक करायलाच रेडीच होत नाही' असल्या तक्रारी करताना पालकच दिसतात. ....... मी दरवर्षी इथली काही मुलं घेऊन त्यांचासाठी वेगवेगळ्या लेखकांच्या कथा, एकांकिका घेऊन एकांकिका बसवतो. अगदी पु. लंपासून माझ्या पर्यंतच्या एकांकिका बसवताना, प्रत्येक वाक्याचा अर्थ, त्यात असणारा विनोद, त्यातले द्वैअर्थी शब्द इत्यादीची नीट माहीती मुलांना देतो. यात इथे वाढलेली मराठी माणसांची मुलं असतात. एकदा सुत्र आणि विनोद लक्षात आला की मग ती मुलं समरसून काम करतात. आणि त्यातून उभा रहातो एक छान नाट्य प्रयोग. मला दरवर्षी मिळणार्या शाबाशकी मध्ये 'तुमची मुलं एवढं छान मराठी कशी काय बोलतात?' हा प्रश्न नेहमी येतो. त्याचं कारण त्या आईबाबांनी मुलांशी मराठी बोलायचा सराव ठेवलेला असतो. आमच्याकडेही 'ट्यू मला माझि टोपी डेशिल का? (हे वाक्य जीभ आडवी धरून बोलल्यावर)' असं बोलणारी मुलं असतात. त्यांना तिथल्या तिथे चूक दाखवून दुरुस्त करून घ्यावी लागते. चार वर्षांपूर्वी सांगितलेले पु. लंचे विनोद ही मुलं अजूनही आपल्या पालकांशी बोलताना वापरतात तेव्हा त्यांना तो विनोद कळलेला असतो..(हे ते पालक मला सांगतात) पण गेल्या पाच वर्षात सहा एकांकिका करून आम्ही आमचं काम चालू ठेवलं आहे. असं केल्याने मराठी वाचेल असा दावा नाही. पण कुठेतरी सुरुवात केलीच पाहिजे.. म्हणून...
|
Zakki
| |
| Monday, August 28, 2006 - 9:53 pm: |
| 
|
विनय, तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. आजकाल नविन आलेल्या लोकांच्या मुलांना निदान न्यू जर्सीत तरी मराठी बोलायला थोडाफार वाव आहे. आमच्या वेळी तसे काही नव्हते. पण आता काही मुले भारतात जाऊन म्हणा किंवा आजी आजोबांशी बोलत असल्याने म्हणा, मराठी बोलतात. एक गमतीची गोष्ट. माझ्या पुतण्याची अमेरिकन बायको, त्यांच्या आठ महिन्याच्या मुलाला 'झोप बेटा झोप,' असे म्हणत निजवते. 'खा बेटा' 'बाबा कुठे' असे थोडे थोडे बोलते. मला नि माझ्या सौ. ला आवर्जून काका नि काकू म्हणते, अंकल, aunt नाही!
|
Lalitas
| |
| Tuesday, August 29, 2006 - 7:28 am: |
| 
|
आमच्याकडे अजुनही मुलांना स्वत:च्या कुटुंबाशिवाय मराठी बोलायला वाव नाही. आम्ही कटाक्षाने घरी फक्त मराठी बोलतच राहिलो, त्यामुळे आमची मुलं उत्कृष्ट मराठी बोलतात. वांग्मयीन मराठी त्यांना येत नाही, मला त्याची अजिबात खंत नाही. इथे राहून एवढं तरी मराठी टिकवता आलं याचं खूप समाधान आहे.
|
मागे NRI मुलांचा एक मराठी कार्यक्रम बघण्यात आला. कार्यक्रम खरेच सुंदर होता. शेवटी सगळ्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. (माझ्यामते त्या कार्यक्रमात त्याना ऐकायची एकमेव आणि छोटीशी संधी.) तेव्हा बर्याच मुलांनी आपली नावे अमेरिकन उच्चारात सांगितली. (उदा. 'खॅरमॅरखॅर' असे. -करमरकर हे फक्त उदाहरण म्हणून लिहिलेय.) फारच थोड्या मुलांनी आपली नावे स्वच्छ मराठी उच्चारांत न अडखळता सांगितली. असं मराठी उच्चारांत सांगणार्यांत मोठी आणि लहान मुलंही होती. अर्थात आपले नाव (मराठी प्रेक्षकवर्गापुढे) अमेरिकन उच्चारांत सांगण्यामुळे मुळे तो कार्यक्रम वाईट होता अशातला भाग नाही. पण प्रश्न पडला की, या मुलांना खरेच मराठी उच्चार येत नाहीत का? किमान घरी यांचे पालक तरी यांना मराठी उच्चाराने हाक मारत असणार, मराठीत बोलत असणार ना?
|
Lalitas
| |
| Tuesday, August 29, 2006 - 8:40 am: |
| 
|
गजानन, त्याचं असं होतं.... जेव्हा घराबाहेर ही मुलं आपलं नाव सांगतात तेव्हां तिथल्या स्थानिक उच्चारानुसार स्वत:चं नाव घेतात. ती संवयच होते म्हटलंस तरी चालेल. घरी आपली नावं ते मराठी उच्चारांत घेत असतील. उदाहरणार्थ: जर्मनमध्ये 'अ' उच्चारी 'आ' होतो. आपलं नाव कुलकार्नी अशीच सांगतात लोकं.... मोठी माणसें सुध्दा!.
|
Bee
| |
| Tuesday, August 29, 2006 - 8:45 am: |
| 
|
नाही येत नाही हीच तर खरी बाब आहे. खूप मुलांना तुझे नाव काय? असा जरी साधा प्रश्न विचारला तरी त्याचे उत्तर येत नाही इथपर्यंत दयनीय अवस्था आहे. म्हणूनच मला एक तळमळ वाटते आहे. सुरवातीला पालक प्रयत्न करतात पण नंतर मुले मोठी झाली की पालक मुलांच्या कलेने घेतात. त्यांच्यावर जोरजबरदस्ती करता येत नाही हेही तितकेच खरे. म्हणूनच काहीतरी असे वेगळे उपक्रम सुरु करण्याची ईच्छा आहे. ह्यात खूपसे पालक support देत नाही ही एक सर्वात मोठी खटकणारी गोष्ट आहे. आत्ता आम्ही महाराष्ट्र मंडळ सिंगापोर IDOL असा एक कार्यक्रम नुकताच करतो आहे. पण प्रेक्षकांची संख्या खूप नसते. कित्येकांना teenager मुले आहेत त्यांनी तरी ह्या कार्यक्रमाला यावे. कार्यक्रम पुर्णपणे आधुनिक कल्पनेचा आहे. मुलांना मजा येईल असा आहे. मराठीतून आहे त्यामुळे त्यांना आपल्या भाषेची गोडी लागेल. पण तरीही मंडळी येत नाहीत. मोठ्यांना काय गरज आहे पटवून सांगण्याची कळत नाही. उलट त्यांनी मुलांना पटवून लाडीगोडी लावून कार्यक्रमाला आणायला हवे. असो.. प्रयास चाललाय.. हे चित्र कधीतरी बदलेल.. माझ्या अजून काही कल्पना आहेत. असे कुणी करुन बघितले असेल तर त्यांचे अभिप्राय वाचायला आवडतील मला. मी इथे मुलांनी मराठीतून गोष्टी सांगणे, वाचन करणे असे काहीतरी करुन बघणार आहे. अर्थात गोष्टी, वाचन त्यांनीच सांगावे आणि मोठ्यांनी ते फ़क्त ऐकावे असे होणार आहे. गेल्या ३ वर्षांपासून आम्ही गणपतीच्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे निवेदन मुलांना मराठीतून लिहून देतो आणि मग बारा तेरा वर्षांची मुले मुली एकत्रीत करुन त्यांच्याकडून पाठांतर करुन हा कार्यक्रम रंगमंचकावर आणतो. तब्बल तीन तास मुले फ़क्त मराठीतून एक एक कार्यक्रम समोर घेऊन येतात ते पाहून खूप बरे वाटते. नाहीतर असे किती दिवस चालणार की फ़क्त भारतातून येणारेच फ़क्त पुढाकार घेतील. मग इथली पिढी काय करणार इथल्या मराठी संस्कृतीसाठी?
|
ललिताताई, तुमचं म्हणणं पटलं. मराठी भाषा आपल्या घरात जगवणं महत्वाचं. साहित्यिक मराठी कळणं खरंच कठीण आहे. मला सुद्धा ते तितकं गरजेचं वाटत नाही, कारण मग आपल्या मुलांना भारताबाहेर राहणं अशक्य होऊन जाईल. गजानन, भारतात राहत असताना मला सुद्धा असं मराठी बोललेलं खटकत असे. पण बाहेर येऊन खरी परिस्थिती बघितली, तेव्हा मात्र मत बदललं. शेवटी माझं असं मत आहे, When in Rome, be a Roman. असं केलं नाही तर आपली नाही, पण मुलांची मात्र ना घरका ना घाटका अशी स्थिती होईल. जरा विषयला सोडून होतंय, पण माझे असे अनेक मराठी मित्र मैत्रिणी होते, जे born & brought up भारतात असून सुद्धा, ईंग्रजी मिडीयम मध्ये शिकल्याने, त्यांना मराठी साहित्याचा ओ की ठो कळत नसे. माझ्या दृष्टीने हे जास्त वाईट चित्र आहे. भारताबाहेर पडल्यावर स्वतःच्या संस्कृतीबद्दल जास्त हळवेपणा येतो मान्य आहे, पण त्याला कुठे राहून जास्त महत्व द्यायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अर्थात हे माझे मत आहे.
|
Bee
| |
| Tuesday, August 29, 2006 - 9:00 am: |
| 
|
अशी अपेक्षा नाही की मुलांना साहित्यीक मराठी शिकवा.. वांगमय शिकवा वगैरे. फ़क्त गरज आहे मातृभाषेतून मराठी लोकांशी संवाद करण्याची. आपण नाही का हिंदी, मराठी आणि ईंग्रजी भाषेत शिकलो. कुठे आपली घरकी ना घाटकी स्थिती झाली आहे. उलट मुले भाषा अधिक लवकर शिकतात. भारतात convent मध्ये शिकलेली मुले घरी आईवडीलांशी मातृभाषेतच बोलतात. इथेही बरीच मुले घरी मराठीतूनच बोलतात. फ़क्त बाहेरच्या लोकांशी ती बोलत नाही. मोठ्यांशी तर मुळीच नाही बोलत पण आपल्या वयोगटातील मुलांशी त्यांचे बोलणे अधिकतर ईंग्रजीतूनच असते. मला तर ती सगळीच शांत शांत वाटली. भारतात कशी काही मुले सतत चुळबुळ करतात, किलबिल करतात, आवाज करतात. इथे तसे चित्र कधी दिसत नाही.
|
Kashi
| |
| Tuesday, August 29, 2006 - 9:23 am: |
| 
|
बी,तुम्हाला कदाचीत महीत असेल..मगच्या वर्शी आम्ही मराठीचे वर्ग सुरु केले होते..मंडळातर्फे..फक्त तिन मुले येत होती निरश न होताव वर्श भर अम्हि वर्ग चलु ठेवला. माझ्याच मैत्रिणीशी बोलालेतर मराठी न आल्याने काही फरक पडणार नाही..आशी मते माडली..पण मुलाना विचारले आसता त्यानी उत्तर दिले की त्याना शिकयला आवदेल पण आई बाबा घेवुन येत नही. ह्याचा अर्थ चुक फक्त मुलाची नाही.
|
ललिता, संपदा हो ना! एकदम मान्य. तुम्हाला पाण्यात राहायचंय तर उभ्या, आडव्या, कशाही सुळकांड्या मारता आल्याच पाहिजेत! पण इथे सगळा प्रेक्षकवर्ग मराठी होता म्हणून आपले वाटले! संपदा, तो इंग्रजी माध्यमाचा मुद्दा मलापण मांडायचा होता पण चर्चा NRI वर चाललीय म्हणून टाळले. मला विचारशील तर, इंग्रजी माध्यम किंवा मराठी माध्यम निवडणे हा ज्याच्या त्याच्या सोयीचा प्रश्न आहे (फिरती नोकरी वगैरे). पण इथे असा समज आहे की, मुलांना इंग्रजी माध्यमात घातलेय तर त्यांच्या कानावर (वर विनयनी लिहिलेय तसे)- 'तो की नाही मराठी टॉक करायला रेडीच होत नाही' किंवा 'बघ बघ ते प्लेन कसे स्काय मध्ये फ्लाय करतेय' किंवा 'हे रीड कर, ते रिमेंबर कर' वगैरे वाक्यांचा मारा केला नाही तर त्यांना इंग्रजीच काय, पण जगातले काहीच येणार नाही! मुले असेच बोलू लागली तर त्यांची चूक किती? आणि इंग्रजी माध्यमात शिकूनही उत्तम मराठी लिहिता, बोलता येणारीही उदाहरणे आहेत. इथेच कितीतरी आहेत! मला वाटते शिक्षण कोणत्याही माध्यमातून घ्या.. आपली भाषा आपल्याला यायला पाहिजे. एक खुमखुमी म्हणून तरी!
|
Lalitas
| |
| Tuesday, August 29, 2006 - 11:44 am: |
| 
|
गजानन, एकदम दुरुस्त! मुलांशी एकावेळी एकच भाषा अगदी शुध्द बोलली गेली पाहिजे. मराठी बोलताना इंग्रजी शब्द का घुसडतात हे एक गूढ आहे. आपली भाषा आलीच पाहिजे... मग तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा! इंग्रज सोडतात का आपली भाषा? मी तर इथे बरेच अमेरिकन व ब्रिटिश कुटुंबं पाहिलीत... त्यांची मुलं जर्मन व इंग्रजी अस्खलित बोलतात. भारतीय लोकांना त्यांच्या मातृभाषेबद्दल न्यूनगंड असतो तेव्हढा आणखी कुठल्या देशांतील लोकांत पाहिला नाही. इटालियन, फ्रेंच, स्पॅनिश जिथे जातात तिथे आपली भाषा टिकवून धरतात.
|
मराठी बोलताना मराठीच बोलावं, आणि इंग्रजी बोलताना इंग्रजीच.. त्यात घरका न घाटका व्हायची काहीच गरज नाही... पाच, सहा वर्षांची पोरटी चार पाच भाषा सहज बोलू शकतात.. वर्गातल्या एका मुलीला हिंदी येतं म्हणून माझी धाकटी तिच्याशी बोलताना सतत हिंदी बोलते. माझ्या मुलीला हिंदी मस्त येतं ये मला हल्लीच उमगलं. इंग्रजी माध्यमातून शिकून मुलं मराठी बोलतात, वाचतात, लिहितात (उद. मी स्वतः) Bee भारतात Convent मध्ये शिकलेली मुलं हल्ली मराठी टॉक करत नाहीत.. काळ बदललाय. Kashi म्हणते त्याप्रमाणे इथे आईवडिलांना मनापासून वाटलं तर मुलांचा प्रश्न येतो, नाही का? शेवटी भाषेचा अभिमान आणि प्रेम असेल तर ती वाढेल, जुलूम जबरदस्तीने किंवा लोकं सांगतात म्हणून नाही..
|
मुख्यतः आपण पालक म्हणुन त्याना भाषेची आवड लावली पाहिजे. जरी इंग्लिश मिडियम मधे शिकत असली तरी घरी त्यांच्याशी कटाक्षाने मराठी बोलले पाहिजे. या गोष्टीचा मला खूपच फ़ायदा झाला त्यामुळे माझ्या मुलाना इथे परत आल्यावर भाषेची कसलीच अडचण जाणवली नाही. माझी दोन्ही मुलं English Medium Schools मधे जातात (ही काही अभिमानाने सांगण्यासारखी बाब आहे असे मला अजिबात वाटत नाही.) पण मी त्याना मराठी वर्तमानपत्रातला मजकूर, मला आवडलेला एखादा लेख मुद्दाम वाचुन दाखवते किंवा वाचायला लावते. पु . लं . च्या किंवा अगदी 'आता खेळा नाचा' सारख्या कॅसेट्स ऐकवते. आज ना उद्या त्याना मराठी साहित्यही थोडफ़ार कळेल. पण आवड ही पालकानीच लावली पाहिजे. भारतातही मराठी बोलण्याची शरम वाटणारे पालक आहेतच. शेवटी प्रत्येकाची स्वतःची आवड, स्वतःची निवड!
|
Bee
| |
| Monday, September 04, 2006 - 7:32 am: |
| 
|
अभिश्रुती, एक दोन वाक्य खूप आवडलीत. पहिलं तू मुलांना तुला आवडलेलें वाचून दाखविते आणि दुसरं त्यांच्याकडून वाचून देखील घेते. ही सवय खरच घरच्याघरी करून बघण्यासारखी आहे. मी तुला आणखी एक सल्ला देऊ का? मुलांना आठवड्यातून निदान दहा ओळी तरी मराठीतून लिहायला सांग. त्यामुळे अगदी हमखास त्यांची शब्दसंपदा वाढेल. just do it, as NIKE says! ऐका ऐका मंडळी.. इथे इतका कमी प्रतिसाद बघता माझा हिरमोड झाला आहे आणि आता कळले की पाणी कुठे मुरते :-)
|
Moodi
| |
| Monday, September 04, 2006 - 10:49 am: |
| 
|
मला पण कळले की सामान्य ज्ञानाच्या बीबीवर एवढा मोठा प्रतीसाद का होता ते. ( बी दिवे,पणत्या,मेणबत्त्या,आकाशकंदिल सगळेच घे. 
|
Bee
| |
| Monday, September 04, 2006 - 11:39 am: |
| 
|
त्याला मीच जबाबदार आहे इतर कुणीही नाही. आली मोठी दिवे लावायला इथे :-)
|
Moodi
| |
| Monday, September 04, 2006 - 11:52 am: |
| 
|
अरे मी कुठे दिवे लावायला आलेय, उलट तुलाच ते घेऊन पेटवायला सांगतेय ना! :-)
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|