Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Ganeshmoortee visarjan ki daan ?

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Ganeshmoortee visarjan ki daan ? « Previous Next »

Vijaykulkarni
Saturday, September 02, 2006 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेली काही वर्षे अन्धश्रद्धा निर्मूलन समिती गणेश मूर्ती आणी निर्माल्य दान करा ही मोहीम राबवीत आहे.
नदी तलावान्चे प्रदूषण टाळावे आणी निर्माल्याचा खत म्हणून उप्योग व्हावा असा दुहेरी हेतु आहे.
काही सनातनी ( म्हणजे आपले नेहेमीचेच हो ) या उपक्रमास विरोध करत आहेत. हितगुजकारान्नी आपली मते मान्डावीत.


Limbutimbu
Monday, September 04, 2006 - 3:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या वर्षी हा विषय चघळुन झाला हे! :-)
गणेश मुर्तीन्मुळ आणि निर्माल्यामुळे नदी प्रदुषित होते हे धादान्त असत्य हे!
त्याउलट मी गेल्या वर्षीपासुन अन्गणातल्या टबात मुर्ति विसर्जन करू लागलो कारण नदी मधे आख्ख्या पुणे शहरच काय, नदी काठच्या प्रत्येक वस्तीची हगन्दरीची गूघाण गटारे सोडलेली असतात, त्या तसल्या पाण्यात मुर्ति विसर्जन करण्याचे ("सनातनी" विचारान्प्रमाणे) पातक माझे हातुन होवु नये म्हणुन मी नदीत मुर्ति विसर्जन करीत नाही!
देवाची मुर्ती दान करणे या सारखी देवत्वाची कृर विटम्बना दुसरी नसेल! सबब घरी आणलेल्या पाहुण्याला "परस्परम समर्पयामी" म्हणुन "दान" (????) देणे हे आमच्या सनातनी धार्मीक विचारसरणीस पटत नाही! सबब दान बिन दिले नाही!
आणि येवुन जावुन अन्धश्रद्धा निर्मुलन वाल्ल्यान्ना लोकान्च्या अन्धश्रद्धा निर्मुलन नव्हे तर लोकान्च्या मनातली धर्मनिष्ठाच नष्ट करायची अस्ते हे कित्येक वेळेस सिद्ध झाल हे, वरील उदाहरणात देखिल सिद्ध होत, गूघाण गटारीचे प्रदुषण, तेही नदीमधे कित्येक वर्षे होत रहाणे हे नजरे आड करुन केवळ आणि केवळ हिन्दुन्च्या देवतान्ना टारगेट करण्याचे आचरट प्रकार असली "निर्बुद्ध" मण्डळीच करु जाणेत!

अरे कोणीतरी या कुलकर्णी महाशयान्ना गेल्या वर्षीची लिन्क द्या रे!
:-)

Kedarjoshi
Monday, September 04, 2006 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गूघाण गटारीचे प्रदुषण, तेही नदीमधे कित्येक वर्षे होत रहाणे हे नजरे आड करुन >>>>>>>>>>>>
क्या बात है. एकदम सही मुद्दा मांडा है तुमने.
गेल्या वर्षी मी गणपती साठी भारतात होतो. मी मुर्ती दान केली. नंतर काय झाले ते माहीत नाही पण नंतर कधी भारतात असेल तर मुर्ती दान करनार नाही. घरीच विसर्जन करेन.
पण फुल, दुर्वा ई मात्र त्यांना दान करायला काही हरकत नाही, ते त्यांचा वापर करुन खत तयार करतील.



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators