|
Bhagya
| |
| Thursday, April 06, 2006 - 1:05 am: |
|
|
please ही बातमी सगळे नीट वाचा. http://subs.nzherald.co.nz/topic/story.cfm?c_id=124&ObjectID=10368362 ह्या मुलिला मि एकदा भेटले होते. तिच्या नवर्याबद्दल बारिक बारिक कुरबुरी सुरू होत्या. याची परीणती अशी होईल, असा विचार कोणीही केला नसेल. यात सगळ्यात वाईट म्हणजे, तिला सगळे 'नवर्याशी जमवुन घे' असा सल्ला देत होते. का आपला समाज लग्न टिकण्यावर इतका भर देतो? लग्न मह्त्वाचे हे मान्य, पण कुठल्या level पर्यंत तडजोड करावी? आयुष्याला पण काहि किम्मत आहे ना?
|
Bhagya
| |
| Thursday, April 06, 2006 - 2:51 am: |
|
|
ती लिन्क लोड होत नसेल तर ही बघा. http://72.14.203.104/search?q=cache:fIEVHSSG-UoJ:subs.nzherald.co.nz/topic/story.cfm%3Fc_id%3D124%26ObjectID%3D10368362+chitralekha+%2B+rajamani+%2B+new+zealand&hl=en&gl=au&ct=clnk&cd=5
|
Maanus
| |
| Thursday, April 06, 2006 - 2:51 am: |
|
|
click here हि लिंक बरोबर आहे.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 06, 2006 - 1:17 pm: |
|
|
Bhagya या विषयावर मला ग्रंथच लिहावा लागणार आहे बहुदा. लग्न हा पवित्र संस्कार हे सगळे आता फोल ठरतेय. पण तरिही मला तुझे आणि ईतरांचे विचार वाचायला आवडेल.
|
Maanus
| |
| Thursday, April 06, 2006 - 3:01 pm: |
|
|
वेगळे होण्याचे निर्णय लगेच घेतलेले बरे असतात. त्यात उगाच ठिक होईल ठिक होईल असा विचार करत dealy करत बसले तर त्याचा त्रास सगळ्यांनाच होतो. मुलीचे वय लहान असल्यांने तीला पण कळत नसते काय करावे आणि काय नाही. घरातल्यांना सासरी नेमके काय होत असेल माहीत नसते. माझ्या सख्या बहीनीबाबत असे ( असे म्हणजे, सासरचा त्रास ) झाल्यामुळे मला कल्पना आहे काय त्रास होतो. शेवटी आम्ही तिला घरी आणले व देवकृपेणे तिला divorce पण मिळाला. परंतु ह्या सगळ्या प्रकारात तिची ४ - ५ वर्ष वायाच गेली ना. आमच्या समोरच्या एका मुलीबाबत पण असे झाले होते, ती तर लग्न झाल्यावर तिन दिवसातच घरी परत आली. त्यामुळे the early you take decision, better for you and everyone
|
Supermom
| |
| Thursday, April 06, 2006 - 3:47 pm: |
|
|
लोकांनी जमवून घे अस फ़ुकट सल्ला खरेतर देऊच नये व असा सल्ला ऐकूही नये.काय त्रास होतो ते संबधित मुलीलाच माहीत असते. अर्थात कुरबूर साधारण कारणांवरून असेल,मानसिक वा शारिरीक त्रास नसेल तर खूप टोकाचा निर्णय घेणेही बरोबर नाही. पण छळ होत असेल तर सगळे जुने समज गुंडाळून ठेवून धाडसी निर्णय घ्यावाच. अन घरातल्यांनी पण साथ द्यावी. शेवटी इतके सुंदर आयुष्य असे पोतेरे होणे याला काहीच अर्थ नाही. समाजाचे काय्--दोन्ही बाजूने लोक बोलतात. आयुष्य ज्याचे त्यालाच काढायचे असते.
|
Shyamli
| |
| Thursday, April 06, 2006 - 4:27 pm: |
|
|
sm म्हणतिये ते बरोबर आहे.... आपल्याकडे साधारणपणे.... मुलीला असे शीकवले जाते की "बाई ग! आता काहीही झाले तरी तेच तुझे घर आहे.....तिथेच तुला आयुष्य काढायचे आहे........" आणि असा परतीचा मार्ग नसला की...... "मरणाला सामोर्या जातात........कींवा उलट पण घडते........" आजच्या पालकांनी मुलिंना पुर्ण सपोर्ट देण आवश्यक आहे......जेणेकरुन मुली मोकळेपणानी आपली अडचण घरी सांगु शकतिल शेवटी...लग्न २रे होऊ शकते पण आयुष्य नाही मिळत नाही का?
|
Mrinmayee
| |
| Thursday, April 06, 2006 - 5:09 pm: |
|
|
श्यामली, किती समर्पक शब्दात सांगीतलं तुम्ही, 'लग्न दुसरं होऊ शकतं, आयुष्य नाही मिळंत'! आपल्याकडे 'कन्यादानाची' प्रथा आहे. देणारे त्याची कितीही वैचारिक बैठक देवोत, पण व्यक्तिश: मला ते फ़ारसं पटत नाही. पण क्शणभर ग्रुहित धरा की ते करावं लागतं, तर दात्यानं ते दान सत्पात्री जातय की नाही हे देखिल बघायला हवं ना?
|
Junnu
| |
| Thursday, April 06, 2006 - 6:12 pm: |
|
|
' लग्न दुसर ....' हे म्हणायल सोप आहे, पण जे माणुस (मुलगा किन्वा मुलगी दोघही) त्यातुन जात त्यांनाच माहीती की किती त्रास होतो ते...मानसिक त्रास ही decision घेण हे काही साधसरळ नाही. त्यामुळे लगेच घेतला पाहिजे हा निर्णय हे प्रत्येक केस मधे बरोबर नाही.
|
Shyamli
| |
| Thursday, April 06, 2006 - 6:33 pm: |
|
|
>>>>>>>>' लग्न दुसर ....' हे म्हणायल सोप आहे नाही म्हणायला सुद्धा अजिबात सोप नाहिये ते... उलट खुप अवघडच आहे.... त्यातल्यात्यात बाईसाठी तर जास्तच....कारण तिला १का माणसाशी नाही तर १का कुटुंबाशी जमऊन घ्यायचे असते........
|
Manuswini
| |
| Thursday, April 06, 2006 - 7:00 pm: |
|
|
माझे मत ह so no arguments काही गोष्टी ह्या अश्या असतात की फुका बोल्ण्यात काही जात नसतं लोकांचं फक्त एकच खरे आहे ज्याच जळतं त्यालाच कळतं एक जवळची व्यक्तीला जळताना पाहिले आहे तेव्ह फुकटे सल्ले देणारे दोन्ही बाजुने बोलणारे लोक हिच ज्यास्त असतात त्यामुळे जर आपल्याला कळत नसेल तर सल्ले देवुही नये असे माझे मत. तुम्हाला काय माहीती how deep water is? anyways हे कोणाला उद्देशुन नाही पण general मत कळत नसेल तर गप्प बसावे माणसाने चुकिच्या दिशा दाखवु नये कोणाला आपला समाज अजुन accept करायला पुर्ण तयार नाही divorce व्याक्तिला तेवढासा असे थोड्या फार प्रमाणत मला तरी दिसते.
|
Aschig
| |
| Thursday, April 06, 2006 - 7:16 pm: |
|
|
आपला समाज हा आपल्यापेक्षा वेगळा आहे का?
|
Mrinmayee
| |
| Thursday, April 06, 2006 - 7:38 pm: |
|
|
काही वेळा मनु:स्विनी, आपले सल्ले हे 'आपल्या जवळच्या व्यक्तिला जळताना' पाहूनच दिले जातात, अगदी कळवळून!
|
Maanus
| |
| Thursday, April 06, 2006 - 7:45 pm: |
|
|
लायकी नसलेल्या, न सुधारणार्या, confused व उगाच तुम्हाला टांगत ठेवणार्या माणसांसाठी वेळ वाया घालवणे हा निव्वळ बावळटपना आहे असे माझे स्पष्ट मत आहे. personal exp किंवा काहीही म्हणा.
|
Prajaktad
| |
| Thursday, April 06, 2006 - 7:53 pm: |
|
|
माझी खुप जवळची मैत्रिण अशाच भयंकर अनुभवातुन गेली आहे. संशयी स्वभावापायी नवरा आणी सासरे मारायला उठले होते.परस्पर नोकरी वरुन घरी गेलि नसती तर आज काय झाले असते याचा विचार करु शकत नाही. छळ तरी किती तो???कुणी guest आले तर हॉल मधे यायच नाही. नवरा सोडुन कुठल्याच पर पुरुषाकडे मान वर करुन बघायच सुद्धा नाही.सासुला विचारल्या शिवाय माहेरी फोन करायचा नाही.टिव्ही बघायचा नाही. MSc.chem univ topper मुलिला धुण भांडी,स्वयंपाक, करुन कॉलेज ला जाव लागायच.१० min उशिर झाला तर त्याचा जाब विचारला जायचा. खरच जो भोगतो त्यालाच माहिती असत.तिने ६ महिने तरी का आणी कसे काढले अशा वातावरणात तिलाच माहिती. समाज तरी किती विचित्र असतो ना?वरवर सगळे सहानुभुती दाखवायचे पण, view हाच की मुलिच्या जातिने जरा जमवुन घ्याव,नमत घ्याव. बायका तर जाती वाचक उल्लेख करुन म्हनायच्या " आमच्याकडे नाही बाई अस मुलिने माघारी आलेल चालल! " मग मुलगी मेल्याचि वाट बघायची का? खंबिरपणे आई-वडिल बहिण बहिणिचा नवरा तिच्या पाठीशि उभे राहिले. पोटगी द्यायला लागु नये म्हणुन सासरचे लोक घट्स्फ़ोट सुद्धा द्यायला तयार नव्हते. बर्याच मानसिक त्रासानंतर २ वर्षानी divorse मिळाला. त्यानंतर एक वर्षाने अनुरुप जोडिदार हि मिळाला,त्यावेळेच्या योग्य निर्णयांतर आज ति सुखात आहे.
|
Junnu
| |
| Thursday, April 06, 2006 - 8:18 pm: |
|
|
माणसा, लग्न झाल्यावर हा निर्णय घेण खुप कठीण असत. तीर्हाईताला जरी कळत असेल की सोडुन देण हाच सगळ्यात चांगला उपाय आहे तरी ज्या व्यक्तीला प्रत्यक्ष निर्णय घ्यायचा असतो त्या व्यक्तीला पटण आणि पटवण फ़ार च मुश्किल असत. ती व्यक्ती तस मानायला तयार नसते, मनाची तशी तयारीच नसते. मनाने कोणी कितीही खम्बीर असल तरी, in fact parents चा support असुन सुद्धा
|
Maanus
| |
| Thursday, April 06, 2006 - 8:27 pm: |
|
|
ती व्यक्ती तस मानायला तयार नसते>>> very true. I know what you are talking about. पण का?
|
Junnu
| |
| Thursday, April 06, 2006 - 8:34 pm: |
|
|
emotional attachment/involvement जास्त करणीभुत असते.
|
Manuswini
| |
| Thursday, April 06, 2006 - 9:21 pm: |
|
|
मैत्रेयी, मी वरिल casE वरुन म्हटले की काही सल्ले देतो पण देण्यार्याने थोडा विचार करावा की तो समोरच्या व्यक्तीला लागु आहे की नाही? प्रत्येक अनुभव हा वेगळा असतो. प्रत्येक माणसाची संवेदना वेगळी असते तो अनुभव समजुन घ्यायची. जसे जुन्नु म्हणते तसे मी एका close व्यक्तीला ह्यातुन जाताना पाहिले आहे तोड म्हणणे सोपे असते पण ते खुप कठीण असते लग्नानंतर सगळे सल्ले बरोबर असले तरी वेळ,काळ, वापरले जाणारे संदर्भ हे खुप त्रासदायक ठरु शकतात त्या व्यक्तीला. म्हणुन सल्ले देण्यार्याने थोडी जाणिव करुन सल्ले द्यावे. तुम्हाला जर ती situation नीट माहिती असेल आणी ती व्यक्ती स्वःताहुन मागत असेल तर द्यावा. किंवा जानीव करुन द्यावी की असे माझे म्हणने आहे पण तु ठरव की तुला खरेच लागु आहे का? specially ह्या बाबतीत. बाकी general गोष्टीत आपण देतोच की कोणाला ही सल्ले आणी share करतोच ना आपला अनुभव. प्राजक्ता म्हणते तसे बाकीची लोकं उगाच मुलीची बाजु पडतं घ्यावे असले टाकाऊ सल्ले देतात. किंवा काय झाले सासु थोडं म्हणाली तर विषय कठीण आहे हा
|
Bhagya
| |
| Friday, April 07, 2006 - 1:25 am: |
|
|
माझा मूळ मुद्दा असा, की आयुष्य हे एकदाच मिळते. त्यामुळे ते सुखाने जगणे महत्वाचे. छोट्या तडजोडी सगळेच करतात. पण कुठपर्यंत त्या करायच्या, ह्याला काही सीमा असावी. सहजासहजी लग्न मोडण्याचे निर्णय आपण घेत नाही, कारण लहानपणापासुन आपली मानसिकता "लग्न हि एक अतिशय महत्वाची बाब आहे. ते झाले नाहि, तर आपल्या आई वडिलांपासून सगळ्यान्च्या आयुष्यात काहितरी कमी आहे" अशी बनवलेली असते. नंतर लग्न झाले, की "लग्न तुटणे खूप वाईट, तसे झाले तर समाजात नाचक्की, लहान भावंडांची लग्ने जमणे कठीण, ज्याचे किंवा जिचे लग्न तुटते, ति व्यक्ति नक्किच वाईट" अशा अनेक भ्रामक कल्पना घेउन आपण वावरत असतो. ह्या कल्पना आणि हे विचार बंद झाले पाहिजेत आणि आयुष्यात झालेल्या बाकी अपघातांप्रमाणेच हा ही एक अपघात समजला पाहिजे. नाहितर केवळ लग्न तुटले म्हणून, प्रेमभंग झाला म्हणुन निराश आणि हताश होऊन आपले आयुष्य रडून वाया घालवणारे कितितरी लोक मी बघितलेत. आणि जसा पुरुष बाईला फ़सवतो किन्वा वाईट वागतो, तशी पुरुषांना फ़सवणार्या किंवा छळणार्या बायकांची उदाहरणे कमी नाहित. एकूण काय, ही व्यक्तिची वृत्ति असते. ह्या बिबि वर मला बायका आणि पुरुष, त्यांना माहित असलेले अनुभव, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांनी खंबीरपणे समाजाची किंवा कुणाचिहि पर्वा न करता घेतलेले निर्णय पण अपेक्षित आहेत.
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|