|
Prasadp77
| |
| Friday, August 11, 2006 - 12:43 pm: |
| 
|
Again bit off topic, but I was/am kind of interested in Solar power and Ethanol use. Few reasons, recently Swedish king announced that Sweden will be free of fossil fuels by 2020 which is quite plausible for Sweden when half of Stockholm bus service runs of Ethanol, later on CBS 60 minutes aired a program where they pretty much appluaded Brazil for its use on Ethanol then reliance comes up with Ethanol plant in Maharashtra sugar belt. When I read the news about this baniya's plant, I did bit of research and was struck at http://www.lewrockwell.com/orig7/desousa1.html Now I am confused if this is true or its just heck of bureaucracy again??? About solar power, I would like to use solar power for powering our little house at our native place and use it as a water pumping station for the well. I couldn't find really any reliable source of Information on any Indian website. The IREDA website also looks like have been made for only BIG businesses, there is little bit information for consumers but not as much you would see on US department's website. Any comments on either of these?
|
Gs1
| |
| Wednesday, August 16, 2006 - 10:44 am: |
| 
|
आर्च, असा अनुभव येतो खरा. पण तुमची अजूनही इच्छा असेल तर माझ्या माहीतीतील काही स्व्यंसेवी संस्था हे प्रकल्प हातात घेऊ शकतील. तसे असेल तर कळवा मला ईमेलने. लालभाई, हो जत्रोपा आणि करंजच्या बायोडिझेलचे सर्व रासायनिक विश्लेषण उपलब्ध आहे. प्रसाद, इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिसळून वापरता येते, महराष्ट्रात अनेक इथेनॉल प्रकल्प आहेत, पण एवढे पाणी पिणारा आणि सुपीक जमीन व्यापणारा ऊस त्यासाठी वापरला तर साखरेच काय करायचे. त्यामुळे भारतासाठी अखाद्य स्त्रोतांपासून बनलेले इंधनच जास्त योग्य असा निष्कर्ष आहे तज्ञांचा. सऊर उर्जा : बरीच चांगली उपकरणे आहेत रे उपलब्ध. पण पंप चालवेल एवढी वीज हवी असेल तर फार खर्च वाढेल. दिवे वगैरे तर सहज शक्य आहे, आजकाल इलेक्ट्रिकच्या दुकानात सुद्धा मिळतात.
|
Pujarins
| |
| Thursday, August 17, 2006 - 1:37 pm: |
| 
|
GS, सुंदर लेख. बायोडिझेलचे फ़ायदे आणि तोटे यावर चांगले विवेचन केले आहे. या विषयावर थोडफ़ार संशोधन आम्ही केले होते. माझ्या मते वाटते तेवढी ही process सोपी नाही. प्रामुख्याने पुढील technical problems येतात: १] refining of the transesterification reaction ही अवघड पध्दत आहे आणि त्यामुळे aditional खर्च येतो ( transesterification is necessary for lowering the viscosity, flash point and boiling point of the oil and also to remove the glycerides ) २] अजूनही योग्य असा उत्प्रेरक ज्याने transesterification yield जास्त येइल तो मिळालेला नाही ३] बायोडिझेलाची शुध्दता हा ही एक कळीचा मुद्दा आहे. purity level अतीशय strongly इंधनाच्या गुणधर्मावर परीणाम करतात. generally, it has to pure by giving sevaral washings of hot water, petroleum ether and neutralize with acid . एक separate प्लांटच उभारायला लागतो ४] या सगळ्या पद्ध्दतीचे अजून industrial लेव्हलला optimization झालेले नाही आणि plant उभा केल्यास ते करावे लागणार. ५] शेतकरी फ़क्त करंज्याची लागवडच करु शकतील. बाकी plant set up, transesterification and refining of oils या गोष्टी private company किंवा सहकारी तत्वावरचे सरकारी कारखाने ( which is most unlikely in this era of privatization ) यांनाच कराव्या लागतील. यामुळे शेतकरीच पुन्हा फ़सवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणखी एक तोटा म्हणजे इथे एक वर्ष जर कापसाला भाव मिळाला नाही तर शेतकरी आत्महत्या करतात, करंजा पासून पैसे मिळण्यास सुरुवात व्हायाला कमीत कमी ४-५ वर्षे लागतात. तो पर्यँत निगा कोण राखणार (गावाबाहेरची पडिक जमीन वापरणे हा उपाय दिसतो तेवढा सोपा नाही. या साठी NGOs किंवा सरकारनेच प्रयत्न केले पाहिजेत.) GS एवढा मी या विषयातला तज्ञ नाही. may be लोकांनी या मुद्द्यांवर विचार केलेला असेल तरी मला जे technical problems वाटतायत ते इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
|
Gs1
| |
| Friday, August 18, 2006 - 5:40 am: |
| 
|
पुजारी, तुम्ही सांगितलेल्या १,२,३,४ हे मुद्दे अगदी बरोबर आहेत. या अडचणी आम्हालाही आल्या होत्या, त्यावर उपाय शोधुन आता युरो दर्जाचे प्रमाणित बायोडिझेलचे उत्पादन करत आहोत. (पण ही काळजी सर्वच जण घेतात असे नाही, त्यामूले भारत सरकारने लवकरच काही निकष सक्तीचे न केल्यास कोणीही कुठल्याही दर्जाचे बायोडिझेल तयार करून विकू लागेल अशी एक शक्यता आणि धोका आहे. त्यातून ईंजिन आणि फ्युएल इंजेक्शन सिस्टिम लवकर खराब होईल.) आता आमच्यासमोरची एकमेव तांत्रिक अडचण म्हणजे उरलेले ग्लिसेरॉल शुद्ध करून वा तसेच विकणे. एक तर अशुद्ध ग्लिसेरॉलसाठी ग्राहक पाहिजे नाहीतर अजून एक प्लांट ग्लिसेरॉलच्या industrial/pharma grade शुद्धीकरणासाठी टाकावा लागेल. करंज लागवड ही केवळ अतिरिक्त पडीक जमिनीवर करायची आहे, त्या निगेसाठी वर्षातील फक्त १५ दिवस काम करायला लागेल, आणि त्याचाही मोबदला दिला जाईल. हा सर्व खर्च योजनेत धरला आहे. सुदैवाने आमची सेवाभावी संस्था याच सिंचन आणि कृषी क्षेत्रात वनवासींबरोबर गेली दोन दशके काम करत असल्याने त्या अनुभवाचा फायदा होत आहे. होय प्रकल्प हा खाज़गी कंपनीने स्थापित करावा व चालवावा पण मालकी मात्र त्या पाचहजार कुटुंबांच्या सहकारी संस्थेची असावी अशी योजना आहे. शेतकरी भावात तरी फसवला जाण्याची शक्यता नाही, कारण एवढी मोठी डिमांड आहे की भाव आपोआपच वाढत आहेत. मी वर दिलेला भाव हा कमीत कमी हमी भाव आहे.
|
Gs1
| |
| Friday, August 18, 2006 - 5:48 am: |
| 
|
आत्महत्या : विषय निघाला आहे म्हणून सांगतो, आम्ही यासंदर्भात विदर्भातील बर्याच वर्तमानपत्रात 'आत्महत्या करू नका, तुम्हाला पुन्हा उभे रहाण्याचा मार्ग आहे' अशी जाहिरात दिली होती. त्याला जो प्रतिसाद आला, त्यांना या योजनेत तर सहभागी करून घेतले आहेच, पण तोपर्यंतचा आधार देण्याचीही व्यवस्था केली अहे. अर्थात अशी पूर्ण जबाबदारी फार मोठ्या प्रमाणावर घेता येणार नाही हेही खरे.
|
Bee
| |
| Friday, August 18, 2006 - 6:14 am: |
| 
|
गोविंदा, आम्ही म्हणजे कुणी ते सांगतोस का? कुठल्या वर्तमानपत्रात तेही सांग. योग्य वाटत असेल तर सांग..
|
Pujarins
| |
| Sunday, August 20, 2006 - 11:53 am: |
| 
|
thanx GS1 तुम्ही या अडचणी सोडविल्या हे पाहून आनंद वाटला तुमच्या उपक्रमाविषयी आणखी जाणून घ्यायला आवडेल. पण बी ने विचारल्याप्रमाणे 'आम्ही' म्हणजे कोण? हे विशद केले तर जास्त चांगले होइल..(अर्थात योग्य वाटत असेल तरच...)
|
Gs1
| |
| Wednesday, September 20, 2006 - 1:49 pm: |
| 
|
करंज लागवडीचा प्रचार, मदत इत्यादी हे एका सेवाभावी संस्थेमार्फत करत आहोत. तर बायोडिझेल उत्पादन कंपनीद्वारे. आम्ही हा शब्द त्या दोन्ही अर्थाने वापरला आहे. पुजारी तुम्हाला व इतर कोणाला अधिक माहिती हवी असल्यास ईमेलद्वारे देता येईल.
|
Aaspaas
| |
| Monday, September 25, 2006 - 5:40 pm: |
| 
|
जरा दमानं, नाहीतर जट्रोफाच्या तेलात पुर्या तळाव्या लागतील आणि जट्रोफाच्या पानांची भाजी खावी लागेल! हे वाचावे.... http://www.agrowon.com/agro/agrowon/08032006/rightframe.html http://www.agrowon.com/agro/agrowon/09082006/rightframe.html
|
Gs1
| |
| Tuesday, September 26, 2006 - 9:24 am: |
| 
|
आसपास, माझेही हेच म्हणने आहे. पण महाराष्ट्रातली ताकदवान जट्रोफा लॉबी आहे ती आणि सरकार मिळून आनंद चालू आहे
|
Worth making a note of http://www.jatrophaworld.org/
|
गोविंद खूप छान माहीती दिलीय. पुजारी तुम्हीही कळीचे मुद्दे सांगितलेत.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|