|
भारतातील गल्लीतल्या दुकानापासून जपान, अमेरिके सारख्या प्रगत राष्ट्रांमधील दूकानापर्यन्त कोठेही गेले तरी Made In China च्या वस्तू सहज दिसतात. ह्याला २ रूपायचा खेळन्यापासून Elctronics मधिल अती किचकट वस्तू ह्याचा कशाचाही अपवाद नाही. चीन ने खरोखरच आपले नाव अर्थिक महासत्ता म्हणून नोंदवायला सुरवात केली आहे. भारत त्यामानाने अजून खूपच मागे आहे. एक software आणि BPO सोडले तर जागतीक अर्थकारनात भारताचे नाव कोठेही ठळक पने दीसत नाही. चिनने बहूतेक ह्या सगळ्याचा plan १०-२० वर्षांपासून केला असावा अणि आत्ता त्याची फ़ळे मिळायला सूरवात झाली आहे. भारतात मात्र अजूनसुद्धा फ़क्त software सोडुन कोठेही कसलेही long term धोरन दीसत नाही. चिनची अफ़ाट लोकसंख्या आज Liabilities न रहाता Asset बनली आहे आपला भारत कधी अणि केंव्हा हे करू शकेल? आपल्याला काय वाटते?
|
भारत चीन सारखी प्रगती नाही करु शकणार. त्याला प्रमुख कारणे १ आपले कामगार कायदे. २ खालुन वरपर्यन्त corruption आहे. ३ भारतातील न्यायदानतील वेळ. ज्याचा मुळे कोणीही कधीही न्यायालयात जाउन स्टे आणता येतो(नर्मदा धरण हे त्याचे उत्तम उदाहरण) ह्या तीन कारणा मुळे प्रगतीचा वेग दिसुन येत नाही खास करुन manufacturing sector मध्ये हा वेग खुप कमी आहे. ह्या तीन गोष्टी सुधारल्या तरच प्रगती होउ शकेल पण हे बदलणे तेवढे सोपे नाही. only manufacturing can provide jobs to the mass population not the service & IT sector
|
Zakki
| |
| Saturday, July 29, 2006 - 12:20 pm: |
| 
|
लोकशाही म्हंटले म्हणजे जागृत जनता पाहिजे. जेंव्हा काही लोक (कसे का होईना) निवडून येऊ शकतात, नि ते जनतेच्या कल्याणा ऐवजी स्वत:च्या फायद्याचे निर्णय घेतात, तेंव्हा ते कायदे प्रगतीच्या आड येणारच. जागृत, सुशिक्षित जनतेने राजकारणात लक्ष घातले तर चांगले कायदे, चांगली अंमलबजावणी होऊ शकते. बाकी गोष्टी भारतापुरत्या मर्यादित नाहीत. १ व ३ यांचा त्रास अमेरिकेसारख्या प्रगत देशातहि होतो, पण कदाचित: कमी प्रमाणात. शिवाय अमेरिकेचे तरी असे काय भले झाले आहे? कॅपिटलिस्ट म्हणवतात, नि Welfare, medicare सारख्या पद्धतीवर अमाप पैसा खर्च करून, पुन: देशाची आर्थिक परिस्थिति म्हणजे ९ ट्रिलियनचे कर्ज! शिवाय सर्वसाधारण जनतेचे नोकरीचे हालच! ते आपले ऋण काढून सण साजरा करत असतात झाले. सरासरी ९,००० डॉ. चे कर्ज दरडोई आहे इथे असे म्हणतात! २ चे प्रमाणहि इथे निदान दैनंदिन व्यवहारात दिसून येत नाही, पण वरच्या पातळीवर काय चालते ते बरेचदा उघडकीला येते. कदाचित् जेंव्हा एक चोर दुसर्या चोराला फसवतो, तेंव्हा त्यांच्यात भांडणे होऊन बळी तो कानपिळी या न्यायाने कुठल्यातरी एका चोराला कोर्टात शिक्षा होते. बाकी झालेले कायदे परत घेणे, दुसरे कायदे लावणे हा खेळ लोकशाहीत चालूच असतो. Dictatorship बद्दल बोलायचे, तर चीनच्या डिक्टेटरांपैकी, काहींनी चीनचे भले केले, पण त्यासाठी त्यांना त्यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीशी तडजोड करावी लागली. अरब देशातल्या डिक्टेटरांनी काय केले हे इतर कुणि सांगू शकतील. तिथे mass population ची काय परिस्थिती आहे, हे कुणाला माहित असल्यास कळवतीलच.
|
|
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|