Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 20, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » कम्युनिस्ट दहशतवाद » Archive through July 20, 2006 « Previous Next »

Saranga
Tuesday, July 18, 2006 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ithe naxalites ani communists madhye gondhal hoto aahe assa mala vatate.
ADMIN - mi GS1 na anumodan deet hoto fakt communism chya vistarit post baddal, shabd prayog navin vaparla!
anyway, naxalism is seperate from communism as it was established by Charu Mazumdar, a far left CPI(M) activist. There were some genuine causes for its spread but resorting to violence cannot be accepted.
We dont know how effective communist rule in Bengal has been to end Naxal movement even in Bengal.

Peshawa
Tuesday, July 18, 2006 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Some wood for fire:
1.
http://frontpagemag.com/Articles/ReadArticle.asp?ID=22756

from above link:
"I don’t think that there was once a Left that was motivated by earthly redemption and that now there is a Left -- that is still a "Left" -- that doesn’t believe in it. There would be no point for a Left unless there was the ingredient of the Marxist faith that held that certain parts of the human condition needed to be annihilated and a certain world of social justice built on its ashes. A person who accepts that we are flawed human beings who live in world that cannot be made perfect, and that the road toward perfect “social justice” automatically comes with a form of terror, is no longer a part of the Left as we know it"

2. http://policestateplanning.com/perceptions_of_communism.htm
3. http://ngothelinh.tripod.com/50_years_communist_crimes.html
4. http://www.stardestroyer.net/Empire/Essays/Marxism.html

oops (from 4): "I can't believe people still think of Karl Marx as some sort of genius when he obviously didn't even understand the principles of supply and demand."

5. http://www.sandeepweb.com/2005/09/22/communist-treachery-redux/

Yog
Tuesday, July 18, 2006 - 8:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>पण तुमचा मान राखून या BB वर पुन्हा काही लिहिणार नाही.
हुश्श!! :-)
Peshawe,
good links...

Limbutimbu
Wednesday, July 19, 2006 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीएस, तुला थॅन्क्यू! ती पोस्ट लिहितानाच माझ्या मनात ठाम विश्वास होता की नक्षलाईट्स हे कम्युनिस्टान्चेच अपत्य हे! किन्वा कम्युनिझमला फुटलेली पालवी म्हणा हव तर! तरीही मला माझ्या मताची खात्री करुन घ्यायची होती म्हणुन ती पोस्ट तशी केली होती! मला ती लिन्क दिल्याबद्दल धन्यवाद!
तसेच हा बीबी सुरु केला हे तर अजुन तपशीलात माहिती येवुदे!
फाळनी नन्तर शिल्लक हिन्दुस्थानच्या हिन्दुइझमचे शत्रु नेमके कसे नी कोण कोण हेत याची माहिती मिळणे मला आवश्यक वाटते आहे!
माझे सगळे बालपण कम्युनिस्ट शेजार्‍यान्च्या सहवासात गेल हे! सोविएत युनिअनची मासिक प्रकाशने मी आवडीने वाचली हेत! त्यातील प्रगतीदर्शक चित्रे, रन्गित फोटो, तक्ते बघुन माझ्या डोळ्यान्चे पारणे फिटले होते! पण १९९० गेले अन ती मासिके ते ते सर्व दिसेनासे झाले! का त्याची कारणमिमान्सा मला अपेक्षित नाही, मला ती माहीत आहे!
मला माहिती हवी हे ती म्हणजे...
१. रशियातील कम्युनिझम
२. चीन मधिल कम्युनिझम
३. क्युबा मधिल कम्युनिझम
४. भारतातील कम्युनिझम
यान्ची स्थापना, वाढ आणि अस्तित्व कशाप्रकारे झाले, त्यामागिल तत्वे, त्या त्या तत्वान्ची पायाभरणी होण्यास उपलब्ध झालेली सामाजिक परिस्थिती, त्यान्च्या बरोबर किन्वा विरोधात किन्वा तटस्थ पणे कोण कोण राहिले, याचबरोबर, हिटलर व्यक्त करीत असलेली कम्युनिस्टान्बद्दलची भिती काय होती, त्यात कितपत तथ्य होते वगैरे बाबी जाणुन घेण्यात मला इन्टरेस्ट हे या करीता की ते करीत असलेल्या चुका अन्य इझम मधेही होवु नयेत!
माझ्या मते हिन्दुइझम विरुद्ध किन्वा "भारता" पुढे मुस्लिम जेहादी दहशतवादाबरोबरच मिशनरी कारवाया, रिझर्वेशनद्वारे मोकाट सोडलेले हिन्दु धर्मान्तर्गत जातिभेदाचे भुत अशा अनेक आघाड्यान्वर सामना करायची पाळी हे त्याचा अन्दाज मला घ्यायचा हे! जीएस, तुझ्या या बीबी मार्फत मला तो घेता येवु शकेल असे वाटते!
जीएस, चान्गले लिहिले हेस, अजुन लिही, मला माहितीच्या मर्यादा हेत, या विषयात तुलनेत मी अज्ञानी हे, तेव्हा या विषयाबाबत तुझाकडुनच अधिक अपेक्षा हेत! पेशवा, योग वगैरे लोक त्यान्च्याकडुन भर घालतीलच! :-)
जाता जाता......
लालभाई, एक्साईट होवु नका!
लाल समाल यातील समाल मी लाल रुमाल असा वाचला होता!
नाही, होत अस कधि कधि, आम्ही समजुन घेवु! :-)
त्यातुनही अस म्हणु नका, लिम्ब्याला आचरणपणा करायची सन्धी मिळावी म्हणुन तुम्ही ते तस मुद्दामच चूकीच लिहिल होतत!
DDD

Aschig
Wednesday, July 19, 2006 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

gs1, much of the modern world realizes that the utopian ideals of communism are just that, utopia. This springs directly from the human ambition that helped them take leaps in evolution and separated themselves from other animals. Equal distribution of wealth is unlikely to come about unless humans lose their humanity of ambition. In that sense you are beating a dead horse.

When it comes to violence, it is deplorable whether communists do it, naxalites do it, or any one else not claiming to be part of any -ism does it.

It will be good if these two parts can be separated.

Lokhitwadi
Wednesday, July 19, 2006 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Communism (marathit saamyawaad) is "extreme socialism" (marathit samajwaad). This philosophy believes that everything (all available resources owned by a state/nation that is communist) belongs to the government, everybody is deemed equal (despite their capabilities, virtues that might make them better from masses. Everyone gets alloted his part of the work and resource(s). Karl Marx laid the foundations of communism and it is importent to understand the situation(s) he went through and observed around to come up with this new concept. Tsar and his knights who used to rule Russia were brutal to the general populace and many died as a result. It is said that Nicholas, the Tsar sent quite a few Russians to Saiberia to dig for gold (yeah, he was agreat fan of it) in inhuman conditions and many used to die there. Karl Marx was not at all famous when he was alive and nobody turned up to give his respect when he died. But if you read his work, it is not hard to realize that it is "ideal but not practicle". Here are some of the pit falls:
1. There is no encouragement to individual entrepreneurship and qualities that might make certain individuals better than the others. Evolution has shown that human beings are very competitive (with other species as well as within themselves) for resources and tend to better their life by working hard for it. Evolution has rewarded "human being" for this handsomely. The tenates of communism removes the reward for one's hard work. This in turn discourages "hard work".
2. Progress takes place when competition between human beings leads to new ideas, new concepts. Communism kills competition for the lack of reward and hence kills the progress.
3. Communism when gets implemented it is never ever, the way Marks thought it should be. To wield control over a hugh populace and thrust communism on them the political leaders usually become brutal in crushing opposition and this leads to violence.
4. Communism relies on the equal distribution of resources, but forgets that new resources/wealth may get created as a result of encouragement (by rewarding them more section of the pie) to people who are better at creating wealth (capitalism seems to do that very well).

Here is what Osho (not that I am his fan, but I have heard his cassettes and some of them are good) had to say about communism:
1. Communism is appropriate (and next in the line for evolution) for wealthy nations which have already created a great amount of wealth.
2. Communism relies on equitable (equal) distribution of wealth and removing dispartiy in society. Before implementing this practically there should be a great amount of wealth already amassed to distribute. If you disrtibute scanty amount then it won't be sufficient struggle will continue because communism has failed to create wealth. Hence for communism to succeed, it should, logically, chrnologically follow capitalism.
3. Communism when gets implemented in poor nations often results in failures of sort Or gets converted into dictatorship. Such communism is far from what Marks described.
History is rife with such failed communisms. If they haven't failed they have made the life of populace misearable.

Paul
Wednesday, July 19, 2006 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यांना या विशयाबद्दल सहज समजेल असे चां गले पुस्तक वाचायचे असेल
१ व्होल्गा ज़ेव्हा लाल होते- वि.स.वलिम्बे.
२ रशिया- न्यानेश्वर मुळे.
माफ़ करा मला "न्या" बारोबर कसा काढायचा ते माहीत नाही.


Moodi
Wednesday, July 19, 2006 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्ञानेश्वर असे लिही dnyaneshwar , ज्ञान dnyaan

Gs1
Wednesday, July 19, 2006 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

मुडी आणि लिंबू तुम्ही विचारलेले प्रश्न( रशिया, चीन, क्युबा) हे यातच उत्तर द्यावेत एवढे लहान नाहीत. निबंधाचे विषय आहेत आणि मी त्यावर हा लेख पूर्ण झाला की नक्की लगेच लिहिन.

धन्यवाद सारंगा, नक्षलीझम असा कुठलाही इझम नाही. नक्षलवाद हा कुठलाही वाद नसून कम्न्युनिस्टांच्या दहशतवादी कारवाया सिलिगुडीतील ज्या भागात प्रथम सुरू झाल्या त्या भागाचे नाव नक्षलबाडी आहे, त्याचा उल्लेख नक्षलवादी, नक्षलाईट्स असा पुढे बदलत गेला. आज नक्षलवादी ज्यांना म्हटले जाते त्या बहुतेक सर्व संघटनांचा नक्षलबाडी भागाशी काहीच संबंध नाही. तरी तेच चुकीचे नाव त्यांना वापरले जाते. आद्य व सर्वात मोठ्या नक्षलवादी दहशतवाद्यांचे अधिकृत नाव काय आहे ? कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ( मर्क्सिस्ट - लेनिनिस्ट ) आणि दोन नंबरची आहे माओइस्ट. तेंव्हा या सर्वांचा उल्लेख करायला कम्युनिस्ट दहशत्वादी हेच योग्य नाव आहे. अर्थात हे सर्व एकच आहेत हे मी पुढे अधिक विस्ताराने स्पष्ट करत आहेच.

आशिष, तुमचा मुद्दा बरोबर आहे. कम्युनिझम ची तत्वे स्वप्नाळू आदर्शवादी म्हणून निरूपयोगी, आणि हिंसाचार कुणाचाही असला तारी तो निषेधार्ह अशी विभागणी करता येईल. but violence is an integral part of communism, not merely because history has proved it during every implementation of communism, but it is well ingrained in the theory itself, more so from Lenin, the first implementor who has also contributed to theory. He has stated it in unambiguous terms, and it has been the God's command for every communist. Almost everytime, those within the party who have opposed violent revolution in principle have been ridiculed as revisionists and have been expelled from the party, sent to prison or have been killed. I think that being a liberal leftist is altogether different than being a communist.

पेशवा आणि आशिष तुम्ही पुढेही यात अधिक सहभागी झालात, तर मला आणि सर्वांनाच नक्कीच काही नवी माहिती व पैलू कळू शकतील असे वाटते.

कम्युनिस्ट दहशतवादाच्या एका मोठ्या घटनेमुळेच या लेखनाची सुरूवात झाली आहे. पहिल्याच पोस्टम्ध्ये पुरावा दिला आहे. पुढील पोस्ट्समध्ये ते अधिकाधिक पुराव्यांच्या माध्यमातून स्पष्ट केले जाईलच.

मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही. मी कम्युनिस्टांच्या वा इतर कुणाच्या द्वेषाने भारलो गेलो नाही. 'भारलो गेलो असेन तर ते भारतप्रेमाने' असले विधान केले तर तेही फारच अतिशयोक्तीपुर्ण होईल. सर्वांसारखेच माझेही माझ्या देशावर प्रेम आहे इतकेच. मुद्दा मुळात भारण्याचा, द्वेषाचा नाही आहे, प्रत्येकाने आपापला धर्म निभावण्याचा आहे. आता जिहादी, कम्युनिस्ट, मिशनरी हे त्यांना त्यांचा जो धर्म ( रेलिजन या अर्थाने नाही ) वाटतो तो त्यांच्या त्यांच्या कंडिशनींगप्रमाणे निभावत आहेत. तसाच भारताचा एक नागरिक म्हणून माझा जो काही धर्म आहे तो निभावण्याचा माझा प्रयत्न आहे. या सर्वांवर माझा राग असण्याचे काहीच वैयक्तिक कारण नाही आणि तो नाही, ते भारताच्या विरोधात म्हणून माझा त्यांना विरोध एवढेच.

कारण एका भारतीय म्हणून आपल्या आणि आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याचा भारताच्या भवितव्यात 'स्टेक' आहे. सुरक्षेच्या दृष्टीने काही संकटे समोर दिसत आहेत. कुठल्याही तात्कालिक घटनेने एकदम भडकून न जाता त्याच्या मागे कोण आहेत, कशा पद्धतीने काम करत आहे, त्यांचा कसा मुकाबला करता येईल आणि त्यात आपण काय करू शकतो या पायर्‍यांनी शांतपणे सखोल अभ्यास, विचार व कृती होणे आवश्यक आहे असे मला वाटते. इथे लिहिण्याच्या निमित्ताने अभ्यासाद्वारे निघालेले निष्कर्ष वा विचारप्रक्रिया कुठेतरी मांडण्याची सुरूवात होते, इतरांकडुनही नवीन काहीतरी कळते म्हणून माझे हे लेखन बरेचसे स्वत्:च्या या स्वार्थासाठी आहे, जनजागृती करण्याचा माझा कुठलाही आव नाही. असल्या विषयांना सुमारे सव्वातीन जणांचा वाचकवर्ग लाभतो एवढे तरी मायबोलीवर एवढी वर्षे आल्यानंतर नक्कीच कळते.

आता पुढचे लिहितो..


Limbutimbu
Wednesday, July 19, 2006 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> असल्या विषयांना सुमारे सव्वातीन जणांचा वाचकवर्ग
नशिब पेशवाईसारखे साडेतीन म्हणला नाहीस!
अन म्हणला असतास तरी तीन सोडुन वरला पाव किन्वा अर्धा तो मलाच ठरवला असता!
की शेरास सव्वाशेर म्हणुन मीच तो सव्वातीन मधला सव्वा?
DDD


Lopamudraa
Wednesday, July 19, 2006 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन म्हणला असतास तरी तीन सोडुन वरला पाव किन्वा अर्धा तो मलाच ठरवला असता!
की शेरास सव्वाशेर म्हणुन मीच तो सव्वातीन मधला सव्वा? DDD
>>>>>>>>>>>>>लिंबु किति शब्दखेळ... थकले ते वाक्य वाचुन....

gs1 लिहित रहा (मला ह्या विषयावर माहिती हवीच होती.. इथे वाचायला मिळाली)


Gs1
Wednesday, July 19, 2006 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कम्युनिझम आणि भारत : स्वातंत्र्यपूर्व काळ

१९१३ च्या रशियन क्रांतीनंतर भारतातही अनेक क्रांतीकारकसुद्धा मार्क्सच्या शोषणमुक्त समाजाच्या विचारांनी प्रेरित झाले होते. पण प्रत्यक्ष जीवनात मात्र त्यांनी देशप्रेमाला झुकते माप दिले, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग हे या तत्वज्ञानातल्या एका भागाने प्रभावित झाले होते पण त्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले.

दुसरीकडे १९२० साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. हा पक्ष इतर बर्‍याच देशातल्या कम्युनिस्ट पक्षांप्रमाणेच लेनिनने स्थापन केलेल्या रशियास्थित कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या अधिपत्याखाली होता. १९३९ पर्यंतही फारशी ताकदही नव्हती कम्युनिस्टांची. कामगारांना एकत्र करून शोषक ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष अशी कम्युनिस्टांची भूमिका होती. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्याबरोबर भारतीय कम्युनिस्टांनी 'हे साम्राज्यवादी युद्ध आहे' असे घोषीत करून ब्रिटिशांना विरोध केला.

रशियाच्या तालावर कोलांटीउडी

पण बावीस जून १९४१ ला हिटलरने रशियावर आक्रमण करताच कम्युनिस्टांची भूमिका ताबडतोब बदलली आणि त्यांनी ' हे लोकयुद्ध आहे, भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली पाहिजे' असे फरमान काढले. हेही स्वत्:हून केले गेले नाही तर रशियाहून जसा आदेश आला त्याप्रमाणे केले गेले. ( स्वत्:ची धोरणे भारतासाठी नव्हे तर आपल्या विदेशी मालकांसाठी बदलण्याची ही घातक वृत्ती तेंव्हापासून जी सुरू झाली ती आजतागायत चालु आहे. दोन महिन्यापूर्वी इराणप्रश्नी त्याचे पुन्हा उघड दर्शन घडले. )

ब्रिटिशांशी हातमिळवणी

ब्रिटिशांना मदत करण्यात कम्युनिस्ट या थराला गेले की त्यांनी एक गुप्त समझोता केला. ( तो तेंव्हा गुप्त होता, आता दिल्लीच्या नॅशनल अर्काइव्हज मध्ये सर्वच कागदपत्रे उपलब्ध आहेत ) त्यानुसार
(१) सर्व कम्युनिस्ट नेत्यांची तुरुंगातून मुक्तता, त्यांना हवे ते करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य, त्यांच्या विविध मुखपत्रांना मान्यता व मदत या कम्युनिस्टांच्या मागण्या होत्या.
आणि त्याबदल्यात
(२) सुभाशचंद्र बोसांविरुद्ध देशव्यापी प्रचार, लष्कर भरतीत सहकार्य, सुसाईड वर्कर्सचा पुरवठा, संरक्षणविषयक कारखान्यात संप न होउ देण्याची व जास्तीत जास्त उत्पादनाची हमी, कॉंग्रेस चळवळींना विरोध असा कम्युनिस्ट करणार असलेल्या कामाचा प्लॅन ब्रिटिशांना देण्यात आला.

चले जावला सुरूंग

यानंतर जे घडले तो कम्युनिस्टांच्या देशद्रोहाने भरलेल्या काळ्या इतिहासाचा पहिला अध्याय आहे.
१९४२ चे भारत छोडो आंदोलनाचा ठराव झाल्या दिवसापासून कम्युनिस्ट पक्षाने ते सॅबोटेज करण्याचा प्रचंड प्रयत्न सुरू केला. काय काय 'काम' केले याचे रिपोर्टही ब्रिटिशांना पाठवले. (तेही उपलब्ध आहेत) मग सगळेच 'आटोपल्यावर' नंतर कॉंग्रेसने, कॉंग्रेस वर्किंग कमिटीज चार्जेस या नावाने प्रसिद्ध अशा ऐवजाद्वारे कम्युनिस्टाम्ना या सगळ्याचा जाब विचारला. ते सारे आरोप आणि त्याला कम्युनिस्ट थातूर मातूर उत्तरे हे 'रिप्लाय टु CWC चार्जेस' या नावाने माहित असलेली सारी कागदपत्रेही हा सगळा इतिहास जाणून घ्यायला उपलब्ध आहेत.

सुभाषचंद्रांविरुद्ध गलिच्छ प्रचार

करारानुसार सुभाषचंद्र बोसांविरुद्ध तर अत्यंत घाणेरडा प्रचार देशभर सुरू करन्यात आला. सुभाषबाबू जेंव्हा जर्मनीला गेले आणि त्यांनी जगप्रसिद्ध भाषण केले बर्लिन रेडिओवरून तेंव्हा कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्राने त्यांचे अतिशय अपमानकारक असे व्यंगचित्र प्रसिद्ध केले त्यात सुभाषबाबू हे मांजराच्या स्वरूपात दाखवले असून गोबेल्स या हिटलरच्या प्रचारप्रमुखाने त्यांना मानगुटिला धरून उचलले आहे आणि माइकसमोर धरले आहे असे ते चित्र होते. ( पिपल्स वॉर, १९ जुलै १९४२ ) अशा घाणेरड्या प्रचाराची आणि चित्रांची राळच त्यांनी उडवून दिली. जेंव्हा जपानच्या मदतीने सुभाषबाबूंनी सीमेपर्यंत धडक मारण्याचे योजले तेंव्हा सुभाषबाबू गाढव असून त्यांच्यावर स्वार होऊन टोजो भारताकडे येत आहे असे व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले ( पिपल्स वॉर, १३ सप्टेंबर १९४२ ) ( माझ्याकडे प्रती उपलब्ध आहेत. ) त्या काळात बाकी सर्व पक्षांच्या प्रकाशनावर बंदी असतांना यांची प्रकाशने का निर्धोक चालू होती हे यावरून लक्षात येते.

देशद्रोहात आकंठ बुडालेली ही माणसे, सावरकरांनी त्यांच्या एका पत्रात ब्रिटिशांची माफी मागितली या कथित कारणासाठी त्यांचे चित्र संसदेत लावायचे नाही असा गोंधळ घालत होती. सर्व मिडिया त्यांचे हे थैमान तीन दिवस दाखवत होती तेंव्हा एकालाही या विरोधकांचा भूतकाळ काय आहे हे बघायची गरज वाटली नाही.

पाकिस्तानच्या मागणीला ताबडतोब सक्रीय पाठिंबा

(१)मुस्लिम लीगने १९४० च्या त्यांच्या अधिवेशनात पाकिस्तानची मागणी करताच त्याला ताबडतोब पाठिंबा देणारा पक्ष होता भारतीय कम्युनिस्ट पक्ष.

(२)त्यासाठी त्यांनी थिअरी मांडली की 'भारत हा एक देश नाही आणि नव्हता, यात अनेक देश आहेत आणि त्यातल्या मुस्लिमांना वेगळे व्हायचे असेल तर ते न्याय्य व योग्यच आहे.' याचा हिरिरीने पुरस्कार करण्यात आला.

(३) आधी त्यांच्याकदे संशयाने पहाणार्‍या मुस्लिम लीगने कम्युनिस्टांना कसे ऍप्रेशिएट करायला सुरूवात केली याब्द्दल कम्युनिस्ट स्वत्:च गर्वाने म्हणतात Among the leaguers we found that that their earlier suspicion that we were fifth column of the congress began to disappear, they were thunderstruck to hear non muslims explain Pakistan better than that was done from the League platform itself

(४) कॉंग्रेसने पाकिस्तानची मागणी फेटाळताच कम्युनिस्टांनी 'जातीय अहंकाराचा उद्रेक' अशी टिका केली.( पी. सी. जोशी जनरल सेक्रेटरी)

(५) 'जिथे जिथे मुसलमान मोठ्या संख्येने एखाद्या सलग भूभागात आहेत तेथे आपले स्वयंशासित राज्य बनवण्याचा त्यांना अधिकार आहे आणि इच्छा असल्यास ते फुटुन निघू शकतात' ही कम्युनिस्ट पक्षाची अधिकृत भूमिका होती. ( ले लक्षात घेतले की आजचे त्यांचे जिहादला असणारे समर्थन समजते)

(६) या सर्वासाठी अर्थातच स्टॅलिनच्या धोरणाचा, वचनांचा आधार घेण्यात आला होता.

कम्युनिस्टांचे इतिहास आणि मिडिया याबद्दलच्या ऑब्सेशनचे कारण हे त्यांच्या या सगळ्या काळ्या इतिहासात दडलेले आहे. आणि ही माहिती देणारे एकही पुस्तक उपलब्ध नाही, कधी कुठेही लेख नाहीत, इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात उल्लेख नाहित. केवळ सरकारच्या, स्वत्: कम्युनिस्ट पार्टीच्या आणि काही संशोधकांच्या ओरिजिनल दस्तैवजाच्या प्रतींमधुनच काही माहिती मिळू शकते हे या ऑब्सेशनचे यश आहे.

संदर्भ
(१) वरच्या पोस्टमधील चले जावला सुरूंगब्द्दल मी फारसा तपशील दिला नाही, कारण तो खूपच जास्त आहे आणि केवळ एवढ्याच विषयाला वाहिलेल्या अरुण शौरी यांच्या 'The Only Fatherland' Communists, Quit India movement and the Soviet Union. या टिपिकल शौरी स्टाईल अत्यंत अभ्यासपुर्ण पुस्तकात ते सर्व विस्ताराने दिले आहे.
(२)खालील पुस्तकेही बघण्यास हरकत नाही. पण कम्युनिस्टांनीच लिहिलेली असल्याने पुस्तकात थोडे शोधण्याची तयारी हवी.

Ghosh S. -socialism and communism in india.
Druhe D. N. - soviet russia and indian communism
E. D. Scalapino - the communist revolution in India.
sumant banerji - india's simmering revolution
P.C. Joshi - problems of the mass movement
Kolakowski - Main currents in marxism vol -III


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कम्युनिस्टांची वाटचाल कशी झाली ते पुढच्या भागात पाहू..


Gs1
Wednesday, July 19, 2006 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


महत्वाची टीप : माझ्या या आधीच्या व पुढच्याही विवेचनात अनेकदा रशियाचा उल्लेख आला आहे. पण त्यात कुठेही रशियावर टीका करायचा हेतू नाही, वा अनादर तर अजिबातच नाही. माझ्या इतिहासाच्या मर्यादित आकलनाप्रमाणे गेल्या साठ वर्षात एक रशिया हा वेळो वेळी खर्‍या मित्रासारखा भारताच्या मागे उभा राहिला आहे, व मदत केली आहे. आज बदलत्या परिस्थितीत त्याला मर्यादा असल्या तरी त्याने आजपर्यंत केलेल्या मदतीचे मोल कमी होत नाही.


Mjwatharkar
Wednesday, July 19, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1 बहुमोल माहिती देत आहात

Moodi
Wednesday, July 19, 2006 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो रशियाची बहुमोल मदत ही कधीच विसरता येणार नाही. जसे दोन व्यक्ती वेगवगेळ्या मतांच्या असल्या तरी मित्र म्हणून ते मतभेद विसरतात, बाजूला ठेवतात, त्याच प्रमाणे रशियाचे आहे.

७१ साली अमेरीका जेव्हा पाकीस्तानच्या बाजूने युद्धात उतरु पहात होती, त्याच वेळी रशियाने त्यांना ठामपणे बजावले की जर तुम्ही युद्धात उतरलात तर आम्ही पण भारताच्या बाजूने उतरु. तेव्हा कुठे सगळे सुरळीत झाले( अजूनही बांगलादेश भारताने केलेली मदत सोयीस्कररीत्या विसरतो, ते वेगळे)


Zakki
Wednesday, July 19, 2006 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण आता दुर्दैवाने रशियाचे सामर्थ्य तितके उरले नाही, म्हणून अमेरिकेची मनमानी चालते जगात. इथले अनेक लोक स्पष्टपणे म्हणतात, इराक, इराण, लिबिया, सिरिया, लेबॅनन, कटर या सगळ्यांवर 'नुकिलर' बॉंब टाकून कायमचा काटा काढा! मूर्ख लोक. तेलाचे साठे नष्ट झाले तर एक दिवस तरी अमेरिकेला जगता येईल का?

Aschig
Wednesday, July 19, 2006 - 10:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The methods that communists *implement* to (try to) attain their perceived goals and the actual *concept* of communism are two distinct things.

It will be interesting to see what the current communist leaders in India say about specific issues that are proving troublesome for the country (including, as is alleged, the methods of some of their followers).

Gs1
Thursday, July 20, 2006 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कम्युनिझम आणि भारत : स्वातंत्र्योत्तर काळ

१९४५ -१९५० : पहिल्याच लोकशाही सरकारला विरोध, सश्स्त्र उठाव.

१९४५ च्या निवडणुका कम्युनिस्ट पक्षाने लढवल्या होत्या, पण त्यात कॉंग्रेसला यश मिळाले होते. स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमारस कम्युनिस्टांत दोन तट पडले. कॉम्रेड बी. टी. रणदिवेंच्या गटाचे म्हणणे होते की संप, उठाव, हिंदू मुस्लिम दंगे याचा फायदा घेऊन आता क्रांतीचे रणशिंग फुंकले पाहिजे आणि कम्युनिस्टांनी सत्ता ताब्यात घेतली पाहिजे, कॉंग्रेसची सत्ता म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. पश्चिम बंगाल शाखेने त्यांना पाठिंबा दिला. १९४७ मध्ये प्रसिद्ध केलेया पत्रकात ते म्हणतात ' कॉंग्रेस फॅसिस्टांवर तुम्ही बंदुका रोखा. सर्व कलकत्त्याला किंवा सर्व बंगालला आग लावा.' वाद विकोपाला गेले आणि लोकशाही सरकारच्या विरोधात क्रांतीला विरोध केल्याबद्दल पी. सी. जोशींची उचलबांगडी करून बी. टी. रणदिवे सरचिटणीस झाले. नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताबद्दल कम्युनिस्टांचे दोन कलमी धोरण ठरले.
(१)शहरी भागात सर्वत्र संप घडवून आणणे.
(२) (आंध्र प्रदेश) तेलंगण भागात सशस्त्र उठाव करून तो ताब्यात घेणे. ( तेंव्हा तेलंगण निजामाकडे होता)

पण सरदार पटेलांनी सप्टेंबर १९४९ मध्येच निजामाला शरण आणून तेलंगण भारतात समाविष्ट करून घेतले. त्यानंतर पुढे तीन वर्षे कम्युनिस्टांचा भारत सरकारशी सशस्त्र संघर्ष चालू राहिला.

१९५१ - १९५९ : भांडणे आणि रशियाच्या आदेशांचे पालन.

मे १९५० मध्ये राजेश्वर राव सरचिटणीस झाले. ते चीनसमर्थक असल्याने अंतर्गत संघर्ष सुरू झाला. इकडे नेहरू रशिया संबंध जुळू लागले होते. त्यातच रशियाने ब्रिटिश कम्युनिस्ट पक्षाद्वारे असा आदेश दिला की भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सांसदीय पद्धतिशी जुळवून घ्यावे. याला अर्थातच चीनवादी राव यांचा विरोध होता. यावरचे मतभेद एवढे टोकाला गेले की ते आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट नेत्यांनी सोडवावे असे ठरले. त्याप्रमाणे १९५१ मध्ये डांगे, राव, अजय घोष वगैरे रशियाला गेले. आणि अखेर स्टॅलिनच्या आदेशाप्रमाणे राव यांच्या ऐवजी अजय घोष सरचिटणीस झाले. भारताविरुद्धचा सश्स्त्र लढा मागे घेण्यात आला. निवडणुका लढवण्याचे धोरण ठरले.

अशा रीतीने ४ वर्षे चाललेली भारताविरुद्धची क्रांती स्टॅलिनच्या आदेशाने संपुष्टात आली. या सर्व निर्णयप्रक्रियेत भारताला काय हवे ? काय चांगले ? याचा विचार सुद्धा झालेला दिसत नाही.

भारत रशिया मैत्री १९५५ मध्ये वाढत गेली आणि त्याचा परिणाम म्हणून रशियाने भारत सरकारशी जुळवून घेण्याचा स्पष्ट आदेश अजय घोषना त्यांच्या १९५६ रशिया भेटीत दिला. त्याप्रमाणे पक्षाने निवडणुका लढवल्या व १९५७ मध्ये केरळमध्ये नंबुद्रिपादाम्च्या तेतरुत्वाखाली कम्युनिस्टांना सत्ता मिळाली.


१९५९ - १९६४ : पावलापावलाला देशद्रोह.

१९५९ ला पहिली भारत चीन चकमक झाली त्यात १० भारतीय जवान ठार झाले. कम्युनिस्ट पक्ष चीनच्या मागे उभा राहिला, प्रत्यक्ष नंबुद्रिपादनेच 'हे भारतीय आक्रमण सहन केले जाणार नाही' असे जाहीर केले. कॉम्रेड डांगेंना याबद्दल संसदेत फैलावर घेताच त्यांनी 'चीनला समर्थन ही पक्षाची चूक आहे. मी या बाबतीत माझ्या पक्षाशी सहमत नाही' असे संसदेत २४ ऑक्तोबर १९५९ ला नमूद केले.

पण रशियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला जाहीर पाठींबा देताच कम्युनिस्टांना त्यांची भूमिका काही काळ बदलावी लागली. प्रश्न चिघळत गेला, चीनचे आक्रमण झाले, दबाव वाढत गेला आणि अखेर १ नोव्हेंबर १९६२ रोजी कम्युनिस्ट पक्षाने चीनचा निषेध करणारा ठराव मंजूर केला. हा ठराव मात्र सुखासुखी होउ शकला नाही, प्रचंड विरोध, गोंधळ झाला आणि चीनच्या समर्थनार्थ आणि ठरावाच्या विरोधात ज्योती बसू, हरकिशन्सिंग सुरजीत, नंबुद्रिपाद इत्यादींनी राजीनामे दिले. (कॉंग्रेसमध्ये पेरलेलेया कम्युनिस्टांपैकी एक मणीशंकर आय्यर हा त्या वेळेला युरोपात चीनवाद्यांसाठी धनसंकलन करत होता.)

नंबुद्रिपाद आणि इअतर ९५७ कॉम्रेड्ससह ही सर्व मंडळी जानेवारी १९६३ पर्यंत देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगाची हवा खात होती. आज हीच मंडळी समाजात उजळ माथ्याने वावरत तर आहेतच. पण सरकारमध्ये सहभागी आहेत, निर्णयासाठी दबाव आणत आहेत, अनेक गोपनीय कागदपत्रे बघू शकत आहेत ही खरी भयावह परिस्थिती आहे.

एक लक्षात आले असेलच की या सगळ्यात पुन्हा भारताच्या बाजूचे की चीनच्या असा प्रश्नच नव्हता. रशियाच्या ऐकायचे की चीनच्या बाजूने उभे रहायचे असा प्रश्न होता. यावरुन ही सगळि साठमारी चालू होती.

ते युद्ध तर आपण हरलो. पण चीननेही शस्त्रसंधी जाहीर केली आणि आपल्याला मुक्त करायला लाल सेना आली या स्वप्नात वावरणार्‍यांचा भ्रमनिरास झाला.

१९६४ - १९६७ : फूट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना, पुन्हा दहशतवादाकडे.

कम्युनिस्ट पक्षातील ही सर्व भांडणे विकोपाला गेली. त्यातच चीनवादी कॉम्रेड्सनी कॉ. डांगे यांनी १९२५ मध्ये तुरुंगातून मुक्ततेच्या बदल्यात ब्रिटिशांशी एकनिष्ठ रहाण्याची शपथ घेतल्याचे प्रकरण उकरून काढले आणि अखेर भारतीय कम्युनिस्ट पक्षापासून फुटुन वेगळे होत आपला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला.
चीनने पेकिंग रिव्ह्यूद्वारे या नव्या पक्षाचे स्वागत करताम्ना मूल सीपीआयवर त्यांच्या मवाळ सुधारणावादी धोरणांबाबत जोरदार टीका केली. या नव्या नव्या सीपीएमचे चारू मुजुमदार, कानू सन्याल वगैरे नेते 'कायद्याने वा सरकारच्या माध्यमातुन आपले ध्येय साध्य होणार नाहीत. आता सशस्त्र क्रांतीद्वारे सत्ता काबीज केली पाहिजे. चीनचे नेते माओ हेच जागतिक क्रांतीचे अग्रदूत आहेत. संसदीय मार्ग हा सुधारणावाद आहे, तो स्वीकारणार्‍यांबरोबर सहकार्य नाही' अशा गर्जना करू लागले. ( सुधारणावादी ही कम्युनिस्टांमधली मोठी शिवी आहे.)

पण तरीही १९६७च्या निवडणुका सीपीएम ने लढवल्या आणि अनपेक्षितपणे सत्ता मिळाल्यावर बसू आणि कंपनी एकदम घुमजाव करून सध्या क्रांती नको, पुढे निवडणुकातूनच देशभर सत्ता मिळवू असे म्हणू लागली.
असे करणे हा माओशी द्रोह आहे असे चारू मुजुमदार, सन्याल या जहालांचे मत होते आणि त्यातूनच पुन्हा एकदा मतभेदांची ठिणगी पडली. १९६७ मध्ये नक्षलबाडीला पहिला कम्युनिस्ट उठाव झाला आणि बुरागंज हा भाग स्वतंत्र म्हणून घोषित करण्यात आला. समांतर सरकार स्थापन करण्यात आले. हे सर्व चिघळत जाऊन १९६९ मध्ये लेनिनच्या जन्मशताब्दीच्या दिवशी मुजुमदार सन्याल यांची कम्युनिस्ट पार्टी ऑफ ईंडिया(मार्क्सिस्ट - लेनिनिस्ट) सिपीएम पासून फुटुन वेगळी झाली.
या नव्या क्रांतीचे चीनतर्फे स्वागत करण्यात आले, आणि या वेळेला सीपीएम वर टीका करण्यात आली की त्यांनी तेलंगणाची क्रांती अर्धवट सोडुन दिली व विश्वासघात केला. नक्षलबाडीचा दहशतवाद ही १९५१ म्ध्ये रशियाच्या दबावाने थांबलेल्या कम्युनिस्टांच्या भारताविरुद्धच्या सशस्त्र क्रांतीचेच १६ वर्षाच्या खंडानंतर पडलेले पुढचे पाउल होते.

१९६७ साली सुरू झालेला हा हिंसाचार आता अनेक राज्यातल्या मिळून शेकडो जिल्ह्यात पसरला आहे. किती ठिकाणी भारताचे राज्यशासन उलथुन यांचे शासन सुरू झाले आहे. आतापर्यंतच्या मुद्यांवरून
(१)कम्युनिस्टांचा देशद्रोह.
(२)भारताविरुद्धची कटकारस्थाने.
(३)परकीयांशी हातमिळवणी.
(४)दहशतवाद.
(५) भारताचे विभाजन करू पहाणारी भूमिका.

हे स्पष्ट झाले असावे, आणि त्यांना सर्व शक्तीनिशी विरोध करण्याची आवश्यकताही जाणवली असावी.

कम्युनिस्ट दहशतवादाची पुढची एका बाजूला सम्सदीय राजकारण तर दुसर्‍या बाजूला सशस्त्र लढा ही दुहेरी वाटचाल, उल्फा, जिहादी, LTTE , नेपाळचे माओवादी अशा सर्वांशी हातमिळवणी आणि सद्यस्थितीबद्दलची झोप उडवेल अशी काही महत्वाची आकडेवारी हे आपण नंतर थोड्या काळाने पाहू.


Gs1
Thursday, July 20, 2006 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


एक विनंती:
या लेखाच्या समर्थनार्थ कुठलेही पोस्ट करण्यास जरी बंदी घालण्यात आली असली तरी, ज्या कोणी इथपर्यंत वाचले आसेल त्यांनी वाचले एवढेच शक्यतो मेल / पोस्ट द्वारे कळवल्यास मला फार मोठी मदत होईल.

कारण मी जरी अंदाजाने सव्वातीन वाचक म्हटले असले तरी खरेच किती लोक हे लेखन वाचतात याबद्दल मला उत्सुकता आहे.


Deemdu
Thursday, July 20, 2006 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS वाचतीये. खुपच माहितीपुर्ण लिखाण आहे हे. संग्रही ठेवु का copy करुन?

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators