|
Gs1
| |
| Tuesday, July 18, 2006 - 9:30 am: |
| 
|
१७ जुलै, ८०० सशस्त्र कम्युनिस्ट दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २६ वनवासींची हत्या, ३२ अत्यवस्थ, २५० 'मिसिंग'. मुंबई दिल्लीत जे इस्लामी दहशतवादी हल्ले होतात त्याला नेहेमीच जास्त प्रसिद्धी मिळते. आता लोकही जागरूक झाले आहेत. पण इस्लामी दहशतवादाहून अधिक संघटित आणि लष्करी पद्धतीने ऑपरेशन्स करणार्या कम्युनिस्ट दहशतवादाच्या भयावहतेबद्दल मात्र पुरेशी जागरूकता दिसून येत नाही. कारणे दोन. (१)कम्युनिस्टांच्या बहुतांश दहशतवादी कारवाया या बिहार, आंध्र प्रदेश, झारखंद, छत्तीसगड, महाराष्ट्रातले चंद्रपूर, गडचिरोली अशा अविकसित, दुर्गम भागात सुरू आहेत. त्यामुळे तिथे मिडिया पोहोचत नाही, छोट्या छोट्या हत्याकांडांची तर बातमीही येत नाही. (२) बहुतांश बातम्या या दाबल्या जातात. एखादा खूनही चार दिवस चवीने चघळणारी आपली मिडिया या बातम्या जेमतेम उल्लेख करून दाबून टाकते. मिडियात बरेच जण स्वत्:च कम्युनिस्ट आहेत हा त्यातला एक भाग आणि मिडियावर नजर ठेवायची कम्युनिस्ट दहशतवाद्यांची स्वत्:ची यंत्रणा आहे हा दुसरा भाग. हे विधान मी अनेक ज्येष्ठ वार्ताहरांशी बोलून त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावरून करत आहे. याचा परिणाम म्हणून भारतातले शंभरहून अधिक जिल्हे आज कम्युनिस्ट दहशतवादग्रस्त झाले आहेत. त्यातल्या शेकडो तालुक्यात आज कॉम्रेड कमांडर्सचे राज्य चालते राज्यशासनाचे नाही. आम्हाला सामील व्हा नाहीतर मरा अशी वनवासींना थेट धमकी लाग़ू आहे. याचा परिणाम म्हणून लाखो वनवासी जीवाच्या भीतीने त्यांची घरे सोडुन विस्थापित म्हणुन रिलिफ कॅंपमध्ये रहात आहेत. आपल्याला काश्मिरी विस्थापितांचे कॅंप माहिती असतात, पण भारताच्या मधोमधही अशी परिस्थिती आहे हे माहित नसते. छत्तीसगडमधील दांडेवाडाच्या एराबोर रिलिफ कॅंपमधील ४००० विस्थापित वनवासींवर काल ८०० जणांच्या माओवादी कम्युनिस्ट तुकडीने हल्ला केला. त्याचबरोबर दुसर्या तुकडीने तिथल्या CRPF आणि पोलिस स्टेशनवर हल्ला करून त्यांना तिथे गुंतवून ठेवले. एवढी मोठी घटना, पण ती इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनी तर दाबलीच पण टाईम्स वगैरेंनीही पार आत दहाव्या पानावर दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी स्वतंत्र भारताच्या इतिहासात कदाचीत पहिल्यांदाच कम्युनिस्ट दहशतवाद्यांनी अख्ख्या ट्रेनचेच अपहरण केले होते तेंव्हाही कुठे काही ऐकू आले नाही. कम्युनिस्ट दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आता सर्वसामान्य माणसानेच सरकारवर दडपण आणणे जरूरी आहे. टाईम्स ई पेपरची लिंक देता येत नाही, त्यामुळे बातमी पेस्ट करत आहे.
|
Gs1
| |
| Tuesday, July 18, 2006 - 9:54 am: |
| 
|
Times Of India, Pune Edition, 18/7/06 Page 10 Chhattisgarh camp targeted, 26 dead By Subodh Ghildiyal/TNN New Delhi: Three women and two infants were among the 26 tribals killed as armed Naxalites, in a pre-dawn swoop, attacked the Errabore relief camp at Dandewada in Chhattisgarh on Monday. Four Naxalites were killed in the retaliatory fire. As many as 80 persons sustained injuries, with 32 reported to be serious. A large number of tribals, said to be up to 250, are missing from the camp since the attack. Sources said that of the missing persons, at least 25 are suspected to have been taken away by Naxalites, who were around 800 in number. The gruesome killing saw Maoists brutally hack 20 persons with sharp weapons, while three were burnt alive in houses that were set ablaze and two were shot dead, as the Naxal massacre revisited the haunted tribal district after a gap of nearly three months. A rattled Union home ministry called it “desperate action” on the part of Naxals who are “repeatedly targeting innocent people they claim to represent”. As per reports around 800 armed Naxalites launched a cleverly planned simultaneous attack on the CRPF camp, the police station and the nearby relief camp, which provides shelter to around 4,000 locals. While the forces were pushed to defend themselves first, the tribals became easy fodder for the armed group. Relief camps have become a common feature ever since the state decided to back the ‘Salva Judum’, a movement against Naxalites. These camps are meant to provide safety to tribals from Naxalites so that they are not forced into the armed movement. Dantewada in Chhattisgarh, bordering Andhra Pradesh, has emerged as the nerve centre of the battle between the state and Naxalites. The emergence of Salva Judum enraged Maoists to the extent that they began to target tribals to deter them from joining the anti-Naxal activities.
|
Gs1
| |
| Tuesday, July 18, 2006 - 9:58 am: |
| 
|
ही घ्या रेडिफची लिंक सापडली http://in.rediff.com/news/2006/jul/17naxal.htm
|
Soultrip
| |
| Tuesday, July 18, 2006 - 10:29 am: |
| 
|
कम्युनिस्ट दहशतवाद मायबोलीवरही घुसलाय!
|
Maudee
| |
| Tuesday, July 18, 2006 - 10:48 am: |
| 
|
अनुमोदन soultrip GS1 गेल्या काही दिवसात कम्युनिझम वर फ़ार ऐकते आहे मायबोलीवर.... कम्युनिझम नक्की काय आहे ते सांगू शकाल का म्हणजे त्या अनुषंगाने मला(सर्वानाच) ह्या bb त participate करता येईल. Thanx in advance
|
Rahul16
| |
| Tuesday, July 18, 2006 - 11:07 am: |
| 
|
या खुनांचे पण समर्थन करनारे लोक सापडतीलच
|
मी नक्षलाईट्स बद्दल गेल्या आठ पन्धरा दिवसात कोणत्यातरी बीबी वर एका पोस्ट मधे उल्लेख केला होता, जन्ग जन्ग पछाडुनही मला माझी ती पोस्ट सापडत नाही, ती जर सापडली तर या बीबी वर काही पोस्टता येइल! जीएस, कॅन यू हेल्प मी? 
|
Moodi
| |
| Tuesday, July 18, 2006 - 1:17 pm: |
| 
|
लिंबु current affairs मधले लॉक केलेले काही बीबी मला सापडत नाहीयेत( उदा. हुसैन, जिहादी अन कमिशनरीज, करंट अफेअर्स वगैरे). कदाचीत त्या बीबींवर तुझी पोस्ट असु शकते.
|
Gs1
| |
| Tuesday, July 18, 2006 - 1:26 pm: |
| 
|
माऊडी,लिंबू हो लिहितो ना. पण सर्वांना एकच विनंती आहे. गेल्या काही दिवसातले अनुभव बघता या विषयावरची अधिक माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचू नये म्हणून हा बीबी बंद पाडण्यासाठी इथे माझ्यावर वा तुमच्यावर गलिच्छ भाषा वापरून वैयक्तिक चिखलफेक वा इतर संबंध नसलेल्या विषयांवर काहीतरी घाणेरडे लिहून वातावरण भडकावण्याचा प्रयत्न होईल. त्याकडे मी कायमच दुर्लक्ष करत आलो आहे. कितीही provoke केले तरी तुम्हीही पूर्ण दुर्लक्ष करा, एका शब्दानेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उत्तर देउ नका. नाहीतर शब्दाने शब्द वाढत जाईल, पुन्हा एकदा मूळ विषय बाजूला पडेल आणि केवळ वाद सुरू रहातील. कुणाच्या खोडसाळपणाला समर्पक उत्तर देण्यापेक्षा हा महत्वाचा विषय सर्वांसमोर येणे जास्त आवश्यक आहे असे मला वाटते. तेंव्हा कृपया या बीबीपुरती तरी माझी ही विनंती मान्य करा, म्हणजे मला थोडे सलग लिहिता येईल आणि विषय पूर्ण करता येईल. अर्थात प्रामाणिक शंका, खंडन, मंडन,मुद्दे यांचे स्वागतच आहे.
|
१७ जुलै, ८०० सशस्त्र कम्युनिस्ट दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २६ वनवासींची हत्या, ३२ अत्यवस्थ, २५० 'मिसिंग'>> एक दहशतवादी हल्ला होऊन ८ दिवस होत नाहीत तोच दुसरा पण. आणी त्या बद्दल मिडिया काहीही लिहिनार नाही. This is really sick thing they have done and they are doing always.
|
Gs1
| |
| Tuesday, July 18, 2006 - 1:56 pm: |
| 
|
लिंबू तुझी लिंक /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=835888#POST835888
|
Gs1
| |
| Tuesday, July 18, 2006 - 2:19 pm: |
| 
|
कम्युनिझम म्हणजे काय याचे सोप्या शब्दात उत्तर असे देता येईल. ( ही माझी कम्युइनिझमबद्दलची मते नसून त्याच्या अधिकृत संदरभातून घेतलेले आहे. ) राजकीय तत्वज्ञान : समाजाचे शोषित आणि शोषक असे दोन भाग करून, शोषितांच्या शोषकांविरुद्धच्या रक्तरंजीत क्रांतीद्वारे शोषितांची हुकुमशाही प्रस्थापित करायला हवी असे प्रतिपादन करणारे तत्वज्ञान म्हणजे कम्युनिझम. आर्थिक तत्वज्ञान : उत्पन्नाच्या सर्व साधनांवर (उदा. शेते, कारखाने) या शोषितांच्या सरकारची मालकी प्रस्थापित करून त्यातील उत्पन्नाचे शोषितांमध्ये समान वाटप करणे हा कम्युनिझमचा प्रमुख अर्थविचार म्हणता येईल. यानुसार वैयक्तिक मालकी वा संपत्ती निर्माण करू पहाणारे हे भांडवलदार आहेत,शोषितांचे वर्ग्शत्रू आहेत. सामाजिक : धर्म, सम्स्कृती ही शोषितांना ताब्यात ठेवण्यासाठीची अफूची गोळी आहे. हे सर्व बूर्झ्वा म्हणजे पांढरपेशा मध्यमवर्गाचे खूळ आहे. त्यामुळे त्याचा त्याग आवश्यक आहे.कम्युनिझमला अभिप्रेत अशा जीवनपद्धतीप्रमाणेच प्रत्येकाने जीवन व्यतीत केले पाहिजे. आंतरराष्ट्रीय : राष्ट्रवाद, देशप्रेम हीसुद्धा अशीच एक शोषण करणारी व साम्राज्यवादाला पोषक अशी निषेधार्ह गोष्ट आहे. जगातील कामगारांनी देशाच्या सीमा ओलांडुन भांडवलदारांविरुद्ध, गैरकम्युनिस्ट सरकारविरुद्ध एक झाले पाहिजे हे तत्व आहे. लाल अक्षरातले सर्व शब्द हे कम्युनिस्टांचे विशेष पारिभाषिक शब्द आहेत. दास कॅपिटल या बर्यापैकी क्लिष्ट व अत्यंत अभ्यासपूर्ण ग्रंथाद्वारे मार्क्स आणि एंगल्सने हे तत्वज्ञान मांडले. दारिद्र्य, अज्ञान आणि अन्याय याने नाडलेले असंख्य शोषितांना ही क्रांतीची कल्पना भावली त्यातून अनेक देशात कम्युनिझम फोफावला, रशियात रक्तरंजीत क्रांती झाली, पुढे अनेक देशातही झाली आणि कम्युनिस्ट सरकारे आली. कुणे एके काळी शोषितांची क्रांती वगैरे गोष्टींमुळे कम्युनिझम ला मिथुनच्या गरिबोंका दाता वगैरे चित्रपटांसारखेच मास अपील होते हे मान्य केले पाहिजे. वयाच्या विसाव्या वर्षी तुम्ही कम्युनिस्ट नसाल तर तुम्हाला हृदयच नाही असे म्हटले जायचे पण तिसाव्या वर्षीही तुम्ही अजून कम्युनिस्टच असाल तर तुम्हाला डोकेच नाही असे पुढचे वाक्य आहे. कम्युनिस्टांची सत्ता आल्यावर अर्थातच भ्रमनिरास झाला. नाही रे वर्गाची म्हणजे कम्युनिस्ट नेत्यांची निरंकुश सत्ता, शोषितांचे म्हणजे कम्युनिस्ट नेत्यांचे कल्याण असे सगळीकडेच घडले आणि कम्युनिझम ही पण अखेर गरिबांना भडकावून सत्तेचा मलिदा खायची कम्युनिस्ट नेत्यांची अधिक भीषण खेळी एवढाच अर्थ उरला. शिवाय प्रतिक्रांती नावाचे एक बुजगावणे उभे केले गेले. म्हणजे काय तर शोषितांच्या या क्रांतीविरुद्ध भांडवलदार प्रतिक्रांती करणार आहेत असे एक वातावरण निर्माण केले गेले. ते वापरून कुणाही पक्षांतर्गत विरोधकाला, वा नागरिकाला भांडवलदारांचा हस्तक वा प्रतिक्रांतिकारक ठरवून ठार केले गेले वा सैबेरियात पाठवले गेले. दुसर्या महायुद्धात जेवढी माणसे मेली त्याहून जास्त माणसे एकट्या स्टॅलिनच्या काळात रशियात मारली गेली. एकुणाच मानवी हक्कांची जेवढी पायमल्ली कम्युनिस्टांनी केली तेवढी कुठल्याही क्रूर हुकुमशहांनीही केली नाही. कम्युनिझमचे हे भेसूर वास्तव इतिहासात तर पानोपानी नोंदलेले आहेच पण George orwel च्या ऍनिमल फार्म आणि १९८४ या जबरदस्त कादंबर्या कम्युनिझमचा प्रत्येक पैलू, सारे ढोंग अगदी प्रभावीपणे उभे करतात. आयन रॅंड चे वी द लिविंग हे रशियातील अनुभवांवरचे पुस्तक सुद्धा वाचण्यासारखे आहे. लाइफ ऍंड डेथ इन शांघाय हे आत्मचरित्र माओच्या सांस्कृतिक क्रांतीमुळे लोकांनी काय नरकयातना भोगल्या हे समजते. या सर्व भ्रमनिरासामुळे जगभर कम्युनिस्ट राजवटींविरुद्ध उठाव झाले आणि लोकशाही व्यवस्था स्थापन झाली. देशात कम्युनिझम असणे आणि नसणे यातला नरका - स्वर्गाचा फरक कुणि इस्ट आणि वेस्ट जर्मनीत जाऊन बघावा, मी पाहिला आहे. किंवा जवळच बंगालमध्ये जाऊन पाहिला तरी चालेल. जगात अनेक देशांमध्ये आज कम्युनिस्टांवर बंदी आहे. अमेरिकेसारख्या देशात असे नियमच आहेत की ड्रग पेडलर्स, गुन्हेगार याबरोबरच कम्युनिस्टांनाही व्हिसा दिला जात नाही. कम्युनिस्टांना शिव्या दिल्या असा वाक्प्रयोग मध्ये वाचला, पण बाहेर तर फ़ेसिस्ट, नाझी सारखी कम्युनिस्ट हीच अपमानास्पद शिवी समजली जाते. तर असा हा सर्व जगाने टाकाऊ ठरवलेला कम्युनिझम आपल्याकडे मात्र अज्ञान आणि गरिबीच्या जोरावर तग धरून आहे. आता कम्युनिस्टांचा भारतातील इतिहास जरा पाहू...
|
Saranga
| |
| Tuesday, July 18, 2006 - 2:37 pm: |
| 
|
लगे रहो GS हम तुम्हारे साथ हॅ
|
Admin
| |
| Tuesday, July 18, 2006 - 4:38 pm: |
| 
|
कृपया आम्ही तुमच्या बरोबर आहोत अशासारखे किंवा लेखाबद्दल व्यक्तिगत शाबासकी देणारे संदेश टाळावेत. त्याने होते काय की मूळ विषयावरची चर्चा बाजूला रहाते आणि त्यांचे अमूक तर आमचे किती समर्थक आहेत याचे शक्तीप्रदर्शन सुरु होते. तुमचे मत, तुम्हाला त्या विषयाबद्दल काय आवडले किंवा कसे लिहिलेले आवडले हे लिहिलेत तर जास्त योग्य होईल.
|
ऍनिमल फार्म आणि १९८४ या जबरदस्त कादंबर्या कम्युनिझमचा >>>> majha hech mat aahe, manavii swabhaavaachyaa purN virudhd vaatate, communism, majh yaa kadabaryaabaddal hech mat hot agdii.!!!
|
Yog
| |
| Tuesday, July 18, 2006 - 4:54 pm: |
| 
|
GS , नेहेमीप्रमाणेच उत्क्रृष्ट माहिती... हा दहशतवाद सोयिस्कररीत्या दडपला जातो, अगदी खरे आहे. please keep writing... admin महोदय, जशी वर "समज" दिलीत तशीच या bb वर उगाच कुणी येवून पुन्हा सन्घाविरुध्ध काहितरी प्रतिवादी विधाने केली (जो या bb चा विषय नाही) तर तेव्हाही अशीच "समज" द्याल अशी आशा करतो.
|
Moodi
| |
| Tuesday, July 18, 2006 - 5:59 pm: |
| 
|
Res. Admin तुमच्या सुचनांचे पालन होईल. पण योगलाही अनुमोदन. जी एस मला उत्सुकता ही पण आहे की रशियात मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी पेरेस्त्रोईका बद्दल जी लोक जागृती करण्याचा प्रयत्न केला होता, त्यातले यश व अपयश याबद्दल तुमचे काय मत आहे? रशियातल्या धर्मपद्धतीबद्दल काय मत आहे?
|
Laalbhai
| |
| Tuesday, July 18, 2006 - 6:06 pm: |
| 
|
प्रस्तुत लिखाण करणारी व्यक्ती मुळातच कम्युनिस्टद्वेशाने भारली आहे. आणि हा BB कम्युनिस्ट विचारसरनीबद्दल चर्चा करण्यासाठी नसून, कम्युनिस्ट कसे वाईट, घातक, या आणि अशा प्रचारासाठीच आहे! त्यामुळे या BB वर मला काही लिण्याचे काहीच प्रयोजन नाही! चर्चेसाठी असता तर काही लिहिलेही असते! लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्या व्यक्तीने आत्तापर्यंत कम्युनिस्ट दहशतवादाचे कोणतेही "ठोस" पुरावे दिलेले नाहीत! "बातम्या प्रसिद्ध होत नाहीत" "मीडियातले कम्युनिस्टांचे पित्तू या बातम्या छापत नाहीत" या सबबीखाली पुरावे देण्याचे, या व्यक्तीने कायम टाळले आहे. कोणीही कोणतेही निबंध लिहून कम्युनिस्ट वाईट ठरत नाहीत! कम्युनिस्ट फक्त एका राज्यात आहे. (आणि अजुन अर्ध्या फारतर) मग संपूर्ण देशातील मीडिया, कम्युनिस्टांच्या अधिपत्याखाली कसा आहे बुवा? कम्युनिस्टांच्या so called कारवाया.. कोणीच, अगदी कोणीच कसे छापत नाही???? असो.. मी जास्त बोलत नाही. आणि इथे आणखी एक वाद उपस्थित करून administrator यांना त्रास देण्याची माझी इच्छा नाही. कम्युनुनिझमचा प्रचार करण्याची माझी इच्छा नाही. तो असता तर मी कम्युनिझमबद्दल हिरिरीने बोललोही असतो! तरीही अनेकांच्या मला आलेल्या मेलमधून मायबोलीवर होणार्या द्वेशमूलक भाषणांचा त्यांना आता वीट आला आहे, असेच लक्षात येते. प्रस्तुत लिखाण हे कुरापत काढणारे आणि शड्डू ठोकून आव्हान देण्यासाठी केलेले आहे. यातूनच लिखाण करणार्या व्यक्तीची प्रवृती लक्षात येते. पुन्हा एकदा, हा BB चर्चेसाठी नसल्याने, इथे चर्चा शक्यही नाही. पण पुरावे न देता कोणत्यही विचारसरणीविरुद्ध अपप्रचार करणे, हे चूक आहे. या लिखाणावर अपेक्षेप्रमाणे नेहमीच्याच यशस्वी कलाकारांच्या प्रतिक्रीया आहेत! नवीन कोणीही नाही.. याचा विचार BB च्या चालूकर्त्यानेच करावा आणि त्यावर टाळ्या कुटणार्यांनी तर अवश्य करावा! लाल समाल
|
Admin
| |
| Tuesday, July 18, 2006 - 6:26 pm: |
| 
|
लालभाई कृपया विषयाबद्दल लिहा तो विषय काढणार्या व्यक्तीबद्दल नको.
|
Laalbhai
| |
| Tuesday, July 18, 2006 - 6:46 pm: |
| 
|
Admin, मुळातच विषय हा कुरापती काढणारा आणि आव्हान देणारा आहे. काय लिहिणार त्या विषयाबद्दल? या BB चा मुख्य हेतूच भांडणे करण्याचा आहे. मी म्हटले तसे, कम्युनिझमम्धे काय चूक आहे आणि काय योग्य आहे, अशी चर्चा असती तर तसे लिहिलेही असते. पण इथे सरळ सरळ नक्षलवाद्यांची सगळी कृत्ये कम्युनिस्टांच्या माथी मारणे चालले आहे. शिवाय कोणता पुरावाही नाही... (मीडियाने छापले नाहीत ना!) मुळात पश्चिम बंगाल मधे सलग सातव्यांदा कम्य्नुनिस्टांनी निवडणूक जिंकली ती काही बंदूकीच्या जीवावर नव्हे. १. गेल्या ३० वर्षांच्या राजवटीत एकही भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण पश्चिम बंगालात झालेले नाही. २. गेल्या ३० वर्षात एकही मोठी दंगल पश्चिम बंगालात झालेली नाही. ३. बांगला देश निर्माण झाल्यापासून कम्युनिस्ट पक्ष, पर्यायाने देश आणि पश्चिम बंगाला, बांगलादेश पुरस्कृत दहशतवादाला तोंड देत आहे. ४. IT च्या प्रगतीत पश्चिमबंगाल अनेक राज्यांच्या पुढे आहे. मुख्यतः कोणतेही BJP ruling राज्य पश्चिमबंगालच्या पुढे नाही! आणखी या विषयावर काहीही बोलण्यासरखे नाही. मुद्द्यांचा प्रतिवाद करायचा तर ते केवळ निबंधाचे मुद्दे आणि संबंधित व्यक्तीचे स्वप्नरंजन आहे! असे असले तरी कम्युनिस्ट राजकीय पक्षांना मी पूर्णतः पाठिंबा देणार नाही कारण त्यांनीही काही चुका केल्याच आहेत. जशा कॉंग्रेसने केल्या, BJP ने केल्या. तुम्ही कोणत्या पक्षाची जू मानेवर वागवता हे महत्त्वाचे नाही. पण जे व्यासपीठ कोणत्याही विचारसरणीचा पुरस्कार करणे कटाक्षाने टाळते, त्याच व्यासपीठावर, एका राजकीय पक्षाचा पाठिमागे लपून दुसर्या राजकीय पक्षावर गोळ्या झाडणे, हे अतिशय बालिशपणाचे आणि immature आहे! मुळातच कुरापत काढणारा विषय आहे! पण तुमचा मान राखून या BB वर पुन्हा काही लिहिणार नाही. Enjoy hating communism...
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|