Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Earthquake - Ready or not Here I co...

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Earthquake - Ready or not Here I come « Previous Next »

Rachana_barve
Monday, June 19, 2006 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेले काही दिवस मी बे area च्या overdue भुकंपाबद्दल खुप ऐकते आहे. खर तर earthquake was due in 1998 पण तेंव्हा तो झाला नाही आता मध्यंतरी office मध्ये झालेले काही demos काही fremont मधली प्रदर्शन ह्यामुळे वाटल की काही तुमच्या बरोबर share कराव आणि तुमचे प्रीकोशन प्लॅन्स, आणि जे लोक 1989 मध्ये US especially bay area मधे असतील त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकता येतील.

earthquake planning मधे मला मिळालेल्या काही टीप्स.

If you are inside
1. stay inside
2. Move only a few steps to a nearby safe place. Take cover under and hold onto a piece of heavy furniture or stand against an inside wall. Stay indoors until the shaking stops and you're sure it's safe to exit. Stay away from windows and doors.
3.Never take an elevator
4.If you are in bed, hold on, stay there, protect your head with a pillow.

If you are outside

लवकर अशा ठिकाणी जा की जी त्यातल्या त्यात मोकळी जागा असेल

If you are in car

Slow down and drive to a clear place
Turn on emergency flashers on and slow to a stop. Do not stop on overpasses, underpasses, or bridges. Be careful of overhead hazards such as power lines or falling building debris.
Turn off the ignition and set the parking brake.
Stay inside the car until the shaking stops

दुसर म्हणजे घरी लहान मुलं असतील तर earthquake drills, fire drills करत रहा. teach the kids what to do in these cases शिवय घरात clear water चा माणशी Atleast ३ गॅलन्स चा साठा, मेडीकल first aid kit , कॅन फ़ुड, कॅन ओपनर, मेणबत्त्या असा साठा असू द्यावा. एक लहानशी बॅग भरून दराजवळ ठेवावी. ज्यात थोडे फ़ार कपडे, xeroxed imp docs , first aid kit , टोर्च, फ़ोनकार्ड, कोरडे खाणे, जसे बिस्किट्स, सीरीयल्स Etc थोडे पैसे आणि त्या बॅगेवर तुमच्या family चा एक फ़ोटो चिकटवावा. जेणेकरून in case of emergency तुम्हाला ती बॅग फ़क्त उचलून बाहेर पडता येइल and you can survive for 2-3 days.. कारमध्ये पण गोष्टींचा साठा करून ठेवावा, एक लहानसे ब्लॅंकेट, लहान, म्हातारे ह्यांच्या special needs च्या गोष्टी, पाणी, first aid kit etc


Bee
Tuesday, June 20, 2006 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना.. चांगला विषय निवडलास.. तू काय काय प्लान्स केलेत मग :-)

Bsa
Tuesday, June 20, 2006 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हे वाचुन १९९३ चा लातुर भुकम्प आठवला.

मी तेन्हा ३ मजल्यावर होतो..पहाटे भुकम्प ज़ाला..मला वाटले कोणीतरी गदगदुन हालवतेय.... थोड्या वेळानन्तर कलाले भुकम्प आहे....

नन्तर सगळेच भयानक होते...


Sayonara
Monday, June 26, 2006 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे आत्ताच वाचलं रचना. सगळं जपानच्या बीबी वर हलव बरं तिकडे शोभून दिसेल. बरीच वर्ष टोक्योमध्ये मेजर earthquake expected आहे. आम्ही असेपर्यंत तरी तो काही आला नाही पण बरीच जॅपनीज लोकं घराच्या entrance ला emergency kit तयार ठेवतात. ह्यात साधारणपणे हेल्मेट, बॅटरी, ट्रांझिस्टर, सुकं खाणं (ज्याची expiry साधारण २,३ वर्ष असते असं), मिनरल वॉटर, टॉयलेट पेपरचा एखादा रोल वगरे. मुलं असतील तर त्याप्रमाणे वेगळी तयारी आणि महत्वाची documents वगैरे. अर्थात ही सर्व जमवाजमव करायला वेळही मिळायला हवा.

Raina
Tuesday, June 27, 2006 - 1:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना,
मी पण आत्ताच वाचलं. पुर्वतयारी करायलाच हवी असे जपान मध्ये इतके बिंबवले जाते (तरीपण माझ्यासारखे अनेक लोकं म्हणजे पालथ्या घडयावर पाणी. गेली बरीच वर्ष माझा हा नवीन वर्षाचा संकल्प आहे की earthquake kit तयार करायची. दर वेळेस मोठठा भुकंप झाला की अजुनच संकल्प सोडायचे. भीती जरा कमी झाली की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. हे बरोबर नाही हे कळते- पण वळत नाही. असो. )
इथे अजुन एक शिकवले जाते ते म्हणजे भुकंप होत असताना दार, किंवा खिडकी उघडायची (म्हणजे अडकलो तर बाहेर पडायला) आणि पहिले जाउन टेबलाखाली बसायचे. logic असे की, भुकंपात सर्वात जास्ती इजा ही धडाधडा पडणा-या वस्तूंनी होते- त्यापासून वाचण्यासाठी. सगळी theory माहीती आहे पण भुकंप होत असताना मात्र बाहेर पळुन जायचीच उर्मी येते. इकडे तर ते कानीकपाळी ओरडुन सांगत असतात की अजिबात बाहेर पळुन जायची घाई करु नका. तसे केले तर डोक्यात दगड विटा पडण्याची शक्यता फार. टेबलाखाली बसा आणि भुकंप संपल्यावर (जगला-वाचला तर) त्वरित जवळच्या earthquake designated safe areas/ evacuation ground मध्ये आपली emergency kit घेउन जा.

टेबलाखाली जा- हे हज्जार वेळा ऐकले आहे- पण केले नाही कधी. या मे महिन्याच्या सुरुवातीला एक भुकंप झाला तेव्हा आम्ही Costco त होतो. त्यावेळेला ह्या शिकवणुकीचे महत्व पटले. त्या अवाढाव्य Costco त वस्तु पडायला लागल्याकी! नशीब खूप मोठा भुकंप नव्हता- नाहीतर ५ किलोचे Tide टाळक्यात बसले असते तर त्या भुकंपानी नाही तरी Tide नी नक्कीच इजा झाली असती.
आॅफीसात पण तेच- भुकंप होत असताना मोठा आहेसं वाटलं की जपानी लोकं सटासट टेबलाखाली आणि समस्त परदेशी जनता घाबरत एकमेकांच्या तोंडाकडे पाहत उभे असतात.


Sayonara
Tuesday, June 27, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलीच्या शाळेतही त्यांच्या क्लासमध्ये हेल्मेट्स आणि सॉफ्ट पिलोज ठेवलेल्या होत्या. आणि मधूनमधून emergency drill पण करायचे.

Raina
Tuesday, June 27, 2006 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या kit वरुन आठवले- माझ्या एका मैत्रिणीने नेटाने kit तयार केले. मग हळुहळु मुलाची दुधाची पावडर संपली होती म्हणुन ते बाहेर निघाले, या न त्या कारणानी त्या kit मधल्या अनेक वस्तू बाहेर निघाल्या त्या निघाल्याच. परत काय ती संपुर्ण kit तयार झाली नाही.

माझं आधीच आॅफिस १४व्या मजल्यावर होत. तर ब-याच जपानी बाया आपल्या cube मध्ये spare flat (बिनटाचेच्या) चपलांचा जोड ठेवायच्या.
म्हणजे भुकंपात पळायला लागले तर उपयोगी होतील. कारण जपानी बाया झाडुन सगळ्या उंच टाचांच्या चपला घालतात.

नव-याचं आधीच office ४४व्या मजल्यावर होतं. त्यांची disaster drill असायची ६ महिन्यातुन एकदा. ४४ मजले जिन्याने उतरत येणे म्हणजे- १ तास लागतो.. इतका वैतागायचा..

Raina
Tuesday, June 27, 2006 - 2:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे असेही खूप सांगतात की- घरच्या लोकांनी अशा संकटकाळी नक्की कुठे भेटायचे ते ठरवून ठेवायचे आधी. कारण फोन बंद होणार, कदाचीत ट्रेन ही. बायको घरी, नवरा कार्यालयात आणि मुलं शाळेत असतील. अशा प्रसंगी आधी ठरवलेले बरे.
जवळचे evacuation areas सर्वांनी जाउन आधी पाहुन यावे- असेही म्हणतात.

सायोनारा नी लिहिलय तसे आहे.. तोक्योत म्हणे दर ७० वर्षांनी का काय एक जोरदार मोठठा भुकंप होतो. तर असा ह्या दशकात अपेक्षीत आहे वगैरे. त्यामुळे जोरदार तयारी सुरु असते सगळीकडे.
असे म्हणतात की सरकारची सर्व आकडेवारी तयार आहे.की अमुक एक strength चा भुकंप झाला तर किती लोकं मरतील वगैरे.


Raina
Tuesday, June 27, 2006 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुद्द भुकंप तर अनेक प्रकारचे. काही अमीर खा साहेबांच्या आलापीसारखे धिम्या गतीत सुरु होउन मग धडाधड जोरात हलायला लागते. बिलडिंगा एक तर आडव्या (म्हणजे Pendulum सारख्या ) नाहीतर पुढे मागे हलतात... मग या ताना झाल्या की परत विलंबीत लयीत हलुन हळुहळु थांबतात.

दुस्-या प्रकाराची मला जास्ती भिती वाटते.. जमिनीतुन खालुन असा [ढुप्प SSS] आवाज येउन ( बाॅम्ब ) पडलाय की काय- असे वाटावे असा आवाज आणि जमिनीखालुन हलतय असे वाटते...
असा एक भुकंप मागच्या वर्षी जाणवला. त्यावेळेला आम्ही खरोखर घाबरुन खाली पळालो (पहिल्यांदा). संपल्यावर वर आलो तर्- पेपरवाला एवढ्या परिस्थितीत शांतपणे elevator नी वर येउन स्थितप्रज्ञाप्रमाणे पेपर टाकुन गेला होता.


Raina
Tuesday, June 27, 2006 - 2:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक भिती म्हणजे त्सुनामी ची. भुकंप झाल्याच्या २-या मिनिटाला टी.व्ही वर माहिती यायला सुरुवात होते. त्सुनामी नो शिंपाई वा अरीमासेन... म्हणजे त्सुनामी होण्याची शक्यता नाही. क्वचित कधीतरी गल्लीतुन ग़ाड्या कर्णे घेउन तीच त्सुनामी ची announcement करत असतात.

आम्ही तर bay area त राहतो. ती त्सुनामी ची warning पाहील्याशिवाय जिवात जीव येत नाही.



Raina
Tuesday, June 27, 2006 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे असे शिकवतात की भुकंपात सर्वात जास्ती मनूष्यहानी ही अंगावर वस्तु पडुन किंवा त्याहुन जास्ती आग लागुन होते.
आग लागली की संपले. म्हणुन भुकंपात कधीही elevator वापरायचा नाही. प्रत्येक मजल्यावर fire extinguisher असतेच. ( तो हाताळायच्या सर्व Instructions अर्थातच फक्त जपानीत असतात.)


Zakki
Tuesday, June 27, 2006 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यात उत्तम म्हणजे न्यू जर्सीत रहावे. भूकंप, त्सुनामि यासारखे जीवघेणे प्रकार होत नाहीत. फार तर कधी कधी असह्य उन्हाळा (३८ डिग. सेल्सिउस तर प्रचंड थंडी (उणे २० डिग. सेल्सिउस) असे होते. पैकी थंडी चा काही ताप नाही, हीट, कपडे असतात. उन्हाळ्यात A/C . कधी खूप बर्फ पडला तर पडण्या आधी सगळीकडे जाहिरात होते. मग कामावर गेले नाही तरी चालते (नि बाकी कुठे भटकायला कशाला जायचे?)

Raina
Wednesday, June 28, 2006 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायोनारा,
तुम्ही झक्की काकांचेच ऐकुन न्यु जर्सीत राहायला गेलात का?




Raina
Wednesday, June 28, 2006 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, सायोनारा,
ही लिंक वाचून पाहा. interesting.
http://www.yomiuri.co.jp/dy/features/scene/20060613dy03.htm

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators