|
Puru
| |
| Wednesday, May 17, 2006 - 11:19 am: |
| 
|
बी उवाच: "मराठी माणसांची मिळकत असेल इतर भारतीयांच्या मानाने चांगली पण सांसारिक माणसाला दर महिन्या दोन महिन्याला एक पुस्तक वाचायला घेणे परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे." --- माझ्या पाहण्यात तरी पुणेरी मध्यमवर्गीय महीन्यातुन दोन्-तीनदा तरी बाहेर जेवायला जात असतो आणि at least ३००-४०० रुपयाचं बिल करत असतो (प्रत्येक वेळी) ..उगाच नाही कोणत्या ही hotel ला तुफान waiting असतं. प्रश्न इच्छेचा आहे, आपपल्या priority चा आहे, पण पैशाचा नक्कीच नाही! आणि मराठी flexible नाही म्हणता, it should accept new words म्हणता. अहो, मराठी फारच लवचिक आहे (तेच दुर्दैव आहे!) आपण सर्वांच्या बोलण्यात एक शेवटचे क्रियापद सोडले तर बाकी सगळं इंग्रजीच असतं नां? 'मोडेन पण वाकणार नाही' म्हणणारे आपण, आणखी किती आपली भाषा वाकवणार? नाही तर आहेच गत Indonesian, Philipino सारखी!(त्याना script च नाही, English चा वापर करतात)
|
Moodi
| |
| Wednesday, May 17, 2006 - 1:23 pm: |
| 
|
संपदा मी मराठी मीडीयमध्येच शिकलेय. इंग्लिश मात्र ५ वी पासुन होते हे बर्याच जणांना आठवत असेल. त्या वेळी खरच पंचाईत झाली होती एकदम नवीन भाषा जुळवुन घेताना. आता स्व. श्री रामकृष्ण मोरेंनी(मागचे शिक्षणमंत्री) खरच चांगली गोष्ट केली की आता पहिलीपासुनच इंग्लिश भाषा समाविष्ट केली मराठी शिक्षण पद्धतीत, त्यामुळे हे आता निदान पुढे तरी जड जाणार नाही. त्यामुळे मराठी शाळा ओस पडतील अशी जी निरर्थक भीती मनाला वाटत होती ती कमी झालीय. अशी आशा तर नक्कीच आहे की मराठी घराघरात तर नक्कीच जिवंत राहील.
|
अगं मी सुद्धा मराठी मीडीयमचीच आहे.
|
|
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|