|
Santu
| |
| Thursday, May 11, 2006 - 12:01 pm: |
| 
|
पुरु तुम्हाला पुणे मुंबै अपेक्षित असावे. कारण 90% लोक आजुन खेड्यात च किंवा सांगलि सातारा या ठिकाणी राहतात तिथे अजुन english चे खुळ नाहि. अजुन लोक मराठीतच बोलतात. मुंबाई,पुण्यात मात्र तुम्ही म्हणता ताशी परिस्थिति आहे.
|
पुरू, तुम्ही जरी घाई घाईत लिहिलेले असले तर त्याचा अर्थ 'मराठी हवे, देवनागरी नसले तरी चालेल' असा होतो, आणि तो तुम्हाला अपेक्षित नसावा, निदान या चर्चेत तरी नाही... इंग्रजीची कास धरणार्या बहुतेक लोकांना 'ती पटकन वापरता येते' हा शोध लागलेला असतो. तरी, तुम्ही तुमच्या नंतरच्या लिखाणात ही चूक सुधारलेली आहे, तेव्हा अभिनंदन.. बाकी जगात बर्याच भाषांची हीच परिस्थिती आहे, आणि इंग्रजीच्या प्रवाहात त्या वाहून जातील का हा प्रश्न आहे..
|
Storvi
| |
| Thursday, May 11, 2006 - 5:43 pm: |
| 
|
convent शाळेंचा अट्टाहास बाळगणे चुकीचे नाही. मराठी शाळेत धड शिकवत नाही मग आईवडील काय करणार. फ़ाडफ़ाड ईंग्रजी बोलणारी मुलेमुली हुषार असतातच असे नाही पण त्यांना चांगले ईंग्रजी येते म्हणून ती मराठी बोलणार्यांवर मात करतात. कामाधंद्यात आजकाल ईंग्रजी यावे लागते मग मुलांना ईंग्रजीचे शिक्षण दिले तर काय बिघडले. मराठी भाषेत प्राविण्य जरी मिळाले तरी त्याचा तुम्हाला काही खास फ़ायदा होणार आहे का? सर्वच जण मराठी शिक्षक तर बनणार नाहीत ना? बहुसंख्य लोक हाच विचार करतात की आपल्या पोराला बोलीभाषा नीट येते ना मग साहित्यीक मराठी यायची काय गरज. उद्या जर कुणी घरादारात साहित्यीक भाषेत बोलायला लागला तर तुम्ही म्हणाल हे भाषेच अवडंबर होत आहे. >>पटलं रे बाबा... आणि का सगळे येऊन जाऊन आम्हा बिचार्या convent शिक्षितांवर घसरतात काय कळत न्हाय राव. जणु काही मराठी शाळेत गेलेले लोक अगदी अस्खलित मराठीच बोलत असतात... माझं मराठी इथल्या दिग्गज गदिमांचा वसा चालवणार्या लोकांइतके चांगले नसले तरी अनेक मराठी माध्यमातुन शिकलेल्यांपेक्षा चांगले आहे निश्चित. आणि मुळात शाळेवरून कोणाला काय येते हे का ठरवावे? असो I digress . परत मूळ मुद्द्या कडे वळा सगळे.. 
|
Puru
| |
| Monday, May 15, 2006 - 2:05 pm: |
| 
|
येथे एवढे उत्तमोत्तम कवी-लेखक मंडळी आहेत, त्यानी थोडा follow up केला, efforts घेतले तर नव्या पिढीची एक दमदार फळी तयार होऊ शकते. आता कोणाची नावे घेत नाही (हो, उगीच आमचं नाव कसं वगळलं म्हणुन रुसवे-फुगवे नको व्हायला ) , पण संदीप खरेच्या तोडीची माणसे (किंबहुना काकणभर सरसच!) आहेत येथे! रवीकिरण मंडळाच्या धर्तीवर असा एक group होऊ शकतो, तो informally आहेच, त्याला थोडं structure दिलं की उद्याचे पाडगावकर, बापट, विंदा, गदीमा, पुलं, कुसुमाग्रज, खांडेकर जन्माला येतील्; मायमराठीचा हा वेलु पुन्हा गगनावरी झेपावेल! अमृताते पैजा जिंकेल, जागतिक वाड.मयावर ठसा उमटवेल!! .... .... (आणि अस्मादीक नातवांना सांगतील, ते थोर कवी नां, कोथ्रुड BB वरती नुसत्या चकाट्या पिटायचे; मीच सांगितलं त्याना, लेको चार अक्षरे छापा म्हणुन! आता बघ, ज्ञानपीठ मिळवलं बघ त्याने, party ला बोलवायचं मात्र विसरला बघ शिंचा ) बघा, पटतंय का तुम्हाला?
|
Aparnas
| |
| Wednesday, May 17, 2006 - 9:37 am: |
| 
|
स्मिता, तू म्हणतेस ते बरोबर आहे. माझ्या मते कोणी इंग्लीश मिडियम मधे जरी शिकत असेल तरी घरच्या माणसांनी घरी मराठी बोलायला हवं. आणि प्रत्येक मराठी माणसाने देवनागरी लिपी शिकायला हवी. तरच आपण मराठी भाषा टिकून राहील. हे सगळं जरा पुस्तकी झालंय खरं, पण मला साध्या भाषेत लिहिता येत नाहीये.
|
Bee
| |
| Wednesday, May 17, 2006 - 10:06 am: |
| 
|
काही सहीबिही उत्तर नाही की सही टोलापण नाही. जी कारणे संस्कृत भाषा नष्ट होत चालली आहे ती कारणे मराठी भाषेला लागू पडतात का? तसे मराठीच्या बाबतीत घडते आहे का हा विचार आधी करा. त्यापुर्वी मी संस्कृत भाषा मागे का पडली ह्याची खरी कारणे सांगा. पुरुने सुचवलेल्या उपायांमध्ये प्रांजळपणे सांगायचे म्हणजे काही दम नाही. मराठी भाषेत साहित्य नाही का? मराठी लोक मराठी वाचत, लिहित, शिकत, बोलत नाही का? दरवर्षी १० वी आणि १२ वी च्या परिक्षेत मराठी विषयाच्या तुलनेने English मध्ये नापास होणारी मुलेमुली काय कमी आहेत!!! आणि नविन साहित्याचे स्वागत केले जाते पण जुने साहित्य कालबाह्य होत आहे त्याची कुणी पर्वा इथे करते का? दर महिन्याला एक पुस्तक विकत घेता येईल इतकी आमदनी आहे मराठी माणसांची? कित्येक अभियंते पदवी घेऊन बाहेर पडतात तर मुलाखती मध्ये त्यांना धड बोलता येत नाही ह्याला कारण म्हणजे आमचे english खूप कच्चे असते. English भाषेत नविन शब्दांचे स्वागत केले जाते. त्यामुळे ती भाषा धेडगुजरी होत आहे असे कुणी म्हणत नाही तर आमच्या भाषेची श्रीमंती वाढते आहे असे English/Americans म्हणतात. English मध्ये जगातील सगळ्याच भाषेतील थोडेफ़ार शब्द आहेत. so what if our mother tounge accepts others vocab? मला एक वाटते, मराठीचे मरण होत आहे ही भिती पुणेकर मुंबईकर ह्यांना वाटत असेल पण इतरत्र मुलांना English अस्खलित बोलता येते असे नाही. खूप कमी प्रमाण आहे अशा मुलांचे.
|
Devdattag
| |
| Wednesday, May 17, 2006 - 10:34 am: |
| 
|
>>कित्येक अभियंते पदवी घेऊन बाहेर पडतात तर मुलाखती मध्ये त्यांना धड बोलता येत नाही ह्याला कारण म्हणजे आमचे english खूप कच्चे असते. बी.. हे चुक आहे.. कित्येक अभियंते मागे पडतात ते त्यांच्यामध्ये असलेल्या आत्मविश्वासाच्या अभावामुळे.. आणि तो मिळवायला इंग्रजीचं ज्ञान लागत नाही.. कोणतीही कंपनी अभियंत्याला त्याच्या इंग्रजीवरून घ्यायचं की नाही ते ठरवत नाही.. मी जगातल्या सर्वात नावाजलेल्या कंपनीत काम केलय आणि तिथला माझा अनुभव मला हेच सांगतो अशुद्ध बोलल्याने त्या भाषेचं मरण होतं असं कोण म्हणतं? जे अशुद्ध बोलतात ते आपण जे बोलतो त्याला कदाचित अशुद्ध समजत असतिल. त्यांच्या दृष्टिने ते त्यांची मातृभाषा जिवंत ठेवत असतिल.. आणि मराठी लोकांच्या मिळकतीबद्दल म्हणत असाल तर ती इतर भारतियांच्या मानाने बरीच चांगली आहे.
|
Bee
| |
| Wednesday, May 17, 2006 - 10:50 am: |
| 
|
आणि देवदत्त आत्मविश्वास हा तेंव्हाच येतो जेंव्हा तुम्ही थोडेफ़ार तरी perfect असता. न येऊन आत्मविश्वास दाखविणार्याला over-confident म्हणतात. मी माझ्यावरून आणि माझ्या मित्रांवरुन हे सांगतो की आम्ही जेंव्हा MBA च्या GD ला जायला निघालो त्यावेळी मुळ प्रश्न हा होता की आमचे English कच्चे होते. मुलाखंतीमध्येही आमची हीच बोंब असायची. आज माझा B.E. झालेला भाचा मला म्हणतो आहे मामा मला English speaking course join करायचा आहे. मराठी माणसांची मिळकत असेल इतर भारतीयांच्या मानाने चांगली पण सांसारिक माणसाला दर महिन्या दोन महिन्याला एक पुस्तक वाचायला घेणे परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच तर ग्रंथालय निघाले ना.. नाहीतर घरोघरी ग्रंथालय काढावे इतकी पुस्तके निर्माण झाली असती. जाऊ द्या.. लिहून लिहून माझा keyboard झिजला बिचारा पण ते म्हणतात ना कोळसा कितिही उगाळला तरी काळाच
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|