Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 11, 2006

Hitguj » Views and Comments » General » मराठीचे मरण मराठी माणसांच्या हाती » Archive through May 11, 2006 « Previous Next »

Nirakar
Wednesday, January 21, 2004 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

parijat .. .. he kadh ani mag bagh

Parijat
Wednesday, January 21, 2004 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ohh..mala nahee kalala...post kelyabarobarach mala kalalee mazee chuk :-)
nirakar, mala farach dumb vatata ahe ..


Rachana_barve
Wednesday, January 21, 2004 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ksaÆ      

Shrini
Wednesday, January 21, 2004 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kaya Æ

Nirakar
Wednesday, January 21, 2004 - 8:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mazi simple idea -
ha\white{ha}\white{ha}\white{ha}

ha chya aiwaji \ch{nbsp} kinva nusatich space tak

Rachana_barve
Wednesday, January 21, 2004 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kuzo kaya    

Zakki
Wednesday, January 21, 2004 - 8:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aro %yaa bandwidth caa problem hÜtÜ mhNaUna admin nao saaMigatlao kI caar XabdasaazI resources vaayaa GaalavaU naka² tr tumhI maMDLI ca@k kayadaBaMga krt Aahat² ina var naivana laÜkaMnaa pNa %yaat saaimala k$na Gaotahat² kaya mhNaavao yaa p`karalaa² maaiht Aaho maaiht Aaho fa|r fa|r huXXaar Aahat to. pNa mhNaUna sagaLI huYaarI kayada maÜDNyaat vaayaa GaalavaayacaIÆ AaiNa to sauwa Aaplyaa savaa-Mcyaa ip`ya maayabaÜlaIvar² kaya hoÆ kuzo foDala hI papoÆ hTkoXvar² hTkoXvar²²

Parijat
Wednesday, January 21, 2004 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I agree with Zakki..sorry, mala mahit navata haa kayada .


Bepositive
Saturday, January 24, 2004 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maI vaacatÜ Aaho barM ka sagaL\yaa pÜsT.

Puru
Wednesday, May 10, 2006 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर 'मराठी वाचवा, मराठी वाढवा' असे नाव जास्त समर्पक होईल.
असो.
२०६० पर्यंत मराठीची अवस्था आजच्या कोंकणीमालवणी सारखी झाली असेल. थोडक्यात ती फक्त एक बोली भाषा असेल! The reasoning behind year 2060 - By that time most of us(the rarer species fully conversant with Marathi)would be in the last leg of our life .

अशी आपल्या मातृभाषेची दुरावस्था टाळायची असेल तर एकच तसा सोपा ( but difficult to implement) उपाय आहे.

आपण आपल्या मुलांना (assuming 95% of all kids would be learning in convent/Englsih medium schools) घरी अथक परिश्रम घेऊन मराठी शिकवायचे. You will say, what is so great about it? Even now most of convent educated Marathi kids know Marathi well enough.

मान्य आहे, पण 'well enough' म्हणजे त्यांच्यापैकी किती जणानां मृत्यंजय वाचता येइल? त्यापैकी किती जणांना ती कळेल? किती जण मराठी कविता करु शकतील? Even today you ask these questions to your convent-edcuated friend/kid, the answer is big NO!

We can not say No to English, at the same time, we need to strive hard to keep Marathi alive! भाषा जिवंत राहते, तिच्यातल्या सदोदीत आणि सशक्त साहीत्य-प्रसुती मुळे. जेंव्हा साहित्य-निर्मीतीचा झरा आटतो, तेंव्हा ओळखायचं भाषा मरणासन्न होतेय! Even today how many first grade Marathi authors/poets are there? आज-कालची मराठी पुस्तके, वर्तमानपत्रातील भाषा, दिवाळी अंकातील कथा सध्याचा दर्जा (?) दाखवितात.

Talking about my part, yes I'm taking special efforts in teaching Marathi to my daughter. I always feel more proud when she tops in Marathi in her class!

(One request: Pl. don't comment on my Marathi-English mixed writing. It will only divert the attention from the main issue. Pure devnaagri typing takes enormous amout of time, so I reverted to English just to save time. The doubtful folks can see my Marathi poems on Jhuluk, or check out my Marathi kaavya-sangraha :-) /


Rachana_barve
Wednesday, May 10, 2006 - 11:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही post पुरु..
we can not say no to english खर आहे. मराठी नुसत येत म्हणण्यात अर्थ नाही. पुलंचे पुस्तक वाचून त्यातले मार्मिक विनोद कळले पाहिजेत. तुम्ही म्हणता तस मृत्युंजय वाचून भारून गेल पाहिजे. I hope हे टिकेल. पण आजकालचा एकूणच वाचनाचा आनंद बघून निराशाच होते.


Arun
Thursday, May 11, 2006 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी टिकवायची असेल, तर सगळ्यात प्रथम महाराष्ट्रातून बाहेर पडा.

जेंव्हा येता जाता आपली भाषा आपल्या कानावर पडत नाही, किंवा आपल्याला आपल्या भाषेत कोणाशी संवाद साधता येत नाही, तेंव्हाच आपल्याला आपल्या भाषेची किंमत कळते, आणि मग आपण जाणीवपूर्वक, आपण आपल्या भाषेच्या अस्तित्वाचा विचार करायला लागतो.

बघा, पटतय का ..............


Puru
Thursday, May 11, 2006 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी बरोबर आहे अरुण. मला US मधे याची प्रकर्षाने जाणीव झाली. office मधे, apt. complex मधे, temple मधे, grocery store मधे तेलगु, पंजाबी, गुजराथी एवढं कानावर पडायचं की, मराठी ऐकायला अगदी आसुसलेलो असायचो!

या वेबसाइट ने खरंच खुप achieve केलं आहे. मला कळत नाही, मायबोली चे जनक (owners) एवढे प्रसिद्धी-पराड्:मुख का आहेत? It is high time that such a fabulous work gets its due recognition in media. It will also help in getting new visitors. If maayboli can do some kind of venture with Crossword or Marathi publishers, they can organise book-fairs, kaavya-wachan, can hold Marathi essay-competition etc. I sincenrely believe they should take it to the next level & be more visible in society. This movement has the power of saving Marathi from dying, it has the power of nurturing new marathi talent!

Admin, please conevy it to the management. या चळवळीत जर या पामराची काही मदत झाली, तर सोन्याहुन पिवळे!


जय मराठी!


Kandapohe
Thursday, May 11, 2006 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरु, एक विनंती. स्वतःपासून सुरुवात कर आधी. केव्हढे ते विंग्रजी शब्द. तुझी कळकळ समजु शकतो पण `लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण` असे नको व्हायला. पटलं तर व्हय म्हणा. :-)

Puru
Thursday, May 11, 2006 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटलंच अशी एखादी comment येईल म्हणुन:-)

म्हणुनच मी हे लिहिले होते:
---
( One request: Pl. don't comment on my Marathi-English mixed writing. It will only divert the attention from the main issue. Pure devnaagri typing takes enormous amout of time, so I reverted to English just to save time. The doubtful folks can see my Marathi poems on Jhuluk, or check out my Marathi kaavya-sangraha )

----

पण लक्षात कोण घेतो?


Bee
Thursday, May 11, 2006 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठीच मरण होईल असे मला अजिबात वाटत नाही. मुंबई पुणे इथे English बोलणारे बरेच आहेत पण महाराष्ट्रभर अनेक खेडीपाडी, शहर, तालुके, जिल्हे आहेत जिथे हिंदी, मराठी, गुजराती, मारवाडी, सिंधी, कोंकणी ह्या बोलीभाषा बोलल्या जातात.

मी ह्या वेळी जेंव्हा भारतात गेलो तेंव्हा भागवत सप्ताह सुरू होता समोरच्या मंदीरात. इकडे दुसर्‍या मंदीरात ज्ञानेश्वरीचे वाचण सुरू होते, कुणाकडे दासबोध वाचन सुरू होणार होते. हे सर्व करू पाहणारे फ़ार फ़ार पाचवी सहावी ह्यापेक्षा अधिक शिक्षित नव्हते. त्यांच्या अवतीभोवती लहानथोर मंडळी बसली होती. हे सर्व बघुन असे वाटत नाही आमची मायबोली मराठी भाषा काळाच्या ओघात लुप्त होईल. आणि साहित्यीक मराठीपेक्षा बोलीभाषा जिवंत असणे हे केंव्हाही महत्त्वाचे. जेंव्हा बोलीभाषा जिवंत असेल तेंव्हाच अक्षर वांगमय जन्माला येईल. कितीतरी अलंकारीक शब्द हे बोलीभाषेत गावतात तर वाचून चोथा झालेले शब्दप्रयोग साहित्यात आढळतात. उदाहरणच जर घ्यायचे झाले तर देशमुखांचे बारोमास अस्सल बोलीभाषेत आहे म्हणूनच इतके रसाळ झाले आहे. गोनिदांची पुस्तकेही ह्याच गटात मोडतात.

आणि आणखी एक सांगणे हे की मराठी भाषेत बरेच विपुल साहित्य निर्माण झालेले आहे आणि होत राहील. जी मंडळी व्यासंगी आहेत ती म्हणतात अजून बरेच काही वाचायचे आहे ह्यावरुनच काय ते लक्षात घ्यावे.

convent शाळेंचा अट्टाहास बाळगणे चुकीचे नाही. मराठी शाळेत धड शिकवत नाही मग आईवडील काय करणार. फ़ाडफ़ाड ईंग्रजी बोलणारी मुलेमुली हुषार असतातच असे नाही पण त्यांना चांगले ईंग्रजी येते म्हणून ती मराठी बोलणार्‍यांवर मात करतात. कामाधंद्यात आजकाल ईंग्रजी यावे लागते मग मुलांना ईंग्रजीचे शिक्षण दिले तर काय बिघडले. मराठी भाषेत प्राविण्य जरी मिळाले तरी त्याचा तुम्हाला काही खास फ़ायदा होणार आहे का? सर्वच जण मराठी शिक्षक तर बनणार नाहीत ना? बहुसंख्य लोक हाच विचार करतात की आपल्या पोराला बोलीभाषा नीट येते ना मग साहित्यीक मराठी यायची काय गरज. उद्या जर कुणी घरादारात साहित्यीक भाषेत बोलायला लागला तर तुम्ही म्हणाल हे भाषेच अवडंबर होत आहे.


Pha
Thursday, May 11, 2006 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>महाराष्ट्रभर अनेक खेडीपाडी, शहर, तालुके, जिल्हे आहेत जिथे हिंदी, मराठी, गुजराती, मारवाडी, सिंधी, कोंकणी ह्या बोलीभाषा बोलल्या जातात.
बी, चर्चा मराठीबद्दल चाललीये ना??!
आणि वाङ्मय = vaa~Nmaya , साहित्यिक = saahityik , आलंकारिक = aalaMkaarik असं लिही.


Kandapohe
Thursday, May 11, 2006 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण लक्षात कोण घेतो? >>
पुरु माफ करे रे. पण विंग्रजी असल्याने मी दुर्लक्ष केले. :-)


Puru
Thursday, May 11, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देशो-देशीचं वाड़मय जिवंत राहीलंय ते नवी भाषा शिकण्याच्या ओढीमुळे! आपल्या मराठीमधे किती तरी अक्षर्-वाड़मय म्हणता येईल,असं साहित्य आहे. 'मला साहित्य वाचुन काय करायचय? बोलता आलं म्हणजे बास झालं' असं म्हणणं म्हणजे एक पाऊल मागे जाणं आहे. प्रगत भाषा, सशक्त साहित्य हे त्या संस्कृतीचा ठेवा असतो. मराठी शिकुन शिक्षक व्हा, असं मी कधी ही म्हणालो नाही.

उत्तम मराठी शिकुन (आणि मुलांना शिकवुन) अभिजात साहित्याचा आस्वाद घ्या (आणि घेउ द्या), असं माझं म्हणणं आहे!

आणखी एक आपण सर्व जण करु शकतो: प्रत्येक महिन्याला एक तरी मराठी पुस्तक विकत घ्यायचे.



Bee
Thursday, May 11, 2006 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरु वाचाल तर वाचाल हे विधान कुठल्याही भाषेसाठी, व्यक्तीसाठी लागू पडते. कुणाला एक पुस्तक वाच, विकत घे म्हंटले तर ती व्यक्ती वाचायला लागेलच असे नाही. काहींना नसतो मुळात वाचनाचा छंद. बरेच वर्तमानपत्र वाचणारे साहित्य वाचत नाही आणि साहित्य वाचणार्‍यांना वर्तमानपत्र वाचायला आवडत नाही. तर असे व्यक्ती तितके प्रकृती भेटत राहतात.

मी त्रिवार हेच म्हणेल की जोवर तुमची बोलीभाषा जिवंत आहे तोवर त्या भाषेचे मरण नाही. इतर भाषांचा परिणाम होत राहील. कदाचित आज पासून दोनशे वर्षानंतर मराठीमध्ये आणखी ईंग्रजी शब्द घुसळले जातिल आणि त्या काळातील पिढीला त्याचे समानार्थी मराठी शब्द माहिती नसतील पण मराठी भाषा ही जिवंत असेल.

खूप पुर्वी, जेंव्हा फ़क्त मौखीक स्वरुपात साहित्य उपलब्ध होते तेंव्हा भाषा नष्ट होण्याची भिती वाटली असेल का त्या काळातील प्रतिभावंतांना. असेल नसेल कुणास ठावूक. पण एक दिलासा आहे, जिथे ज्ञानेश्वरी सारखे प्राचीन ग्रंथ जिवित राहीलेत तिथे आमची मराठी भाषा चिरकाल असेल.

फ, व्याकरण दुरुस्ती सांगितल्याबद्दल धन्द्यवाद. येते तेवढे नीट लिहिण्याचा आणि नविन काही शिकण्याचा माझा नेहमीच प्रयास असतो. ते खरच आलंकारीक आहे की अलंकारिक आहे? ur 2 cents is worth for me!


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators