|
Moodi
| |
| Sunday, April 16, 2006 - 2:04 pm: |
| 
|
लोपा एवढे मनाला लावुन घेऊ नकोस. मत व्यक्त करणे ही स्वाभावीक क्रिया असली तरी तुझ्या सारख्या उच्च पदावर काम केलेल्या सरकारी अधिकारी व्यक्त्तीने एवढे निराशावादी बोलणे उचीत नाही.
|
Moodi
| |
| Sunday, April 16, 2006 - 2:09 pm: |
| 
|
दिनेश खरय बाकी महत्वाचे मुद्दे पण केव्हाच दुर्लक्षीत झालेत.
|
moodi mi manaalaa laun ghetalele nahi, fact sangitali, majhyabajune mi mat dene band karatey... majha muddach tumachya laxaat yet naahiye.. jar mii je paahile aani aikale te lihile naa tar.. mod delete karateel iatki tyaa savadatalee bhashaa bhayanak and bhishan aahe. mi anubhavalyashivaay bolat nahiye aso..
|
Gs1
| |
| Monday, April 17, 2006 - 2:56 pm: |
| 
|
लोपामुद्रा, तुम्ही रागावला आहात असे तुमच्या उपरोधिक पोस्टवरून वाटले म्हणून हा खुलासा. माझे पोस्ट हे तुम्हाला वा कोणालाच उद्देशून नव्हते, वा कुणा एकाच्या पोस्टला उत्तर म्हणून नव्हते. असे असते तेंव्हा मी त्याचा उल्लेख माझ्या पोस्टमध्ये जरूर करतो. तेंव्हा त्यातली कुठलिही गोष्ट, उदा दांभिक हा शब्द तुम्ही वैयक्तिक्रित्या स्वत : ला लावून घेउ नका ( तसा यत्किंचितही उद्देश नाही) ही विनंती. इथली, इतर संकेतस्थळांवरची, आणि बाहेर चालणारी एकून चर्चा बघुन माझ्या मनात आलेले प्रश्न मी मांडले आहेत. डान्सबार बंद झालेच पाहिजे असे तुमचे आग्रही प्रतिपादन आहे, तेंव्हा तुम्ही मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तुमचे सविस्तर मत / प्रतिवाद मांडला तर तुमचे मत पटेलच असे नाही पण समजाउन घेण्याचा तरी प्रयत्न करता येईल. आर आर हा काही यातला मुख्य मुद्दा नाही. पण आर आर बद्दल तुम्ही बरेच उल्लेख केले आहेत म्हणून विचारतो, कायदा आणि सुव्यवस्थेच्या सर्व प्रश्नांचे जे मूळ आहे की पोलीस नियुक्त्या आणि बदल्या या रेटकार्डाप्रमाणे गृहमंत्रालयात शिस्तबद्ध व्यवहाराद्वारे केल्या जातात. हा पैसा घेणे आर आर नी बंद केले आहे का ? नाही ना ? , मग ते कुठल्या नैतिकतेच्या गोष्टी करतात ? समाजविघातक कारवाया आणि समाजाचे होणारे नुकसान असा निकष लावायचा तर डान्सबारच्या आधी पोलिस स्टेशने बंद करावी लागतील. आर आर बद्दल व्यक्तीश : काही राग नाही. कारण बाकी काही मतभेद असोत, पण ही पोलिस खात्याकडुन टरगेट देउन उत्पन्न / खंडणी मिळवाण्यात पाटील, पवार, राणे, मुंडे, महाजन, ठकरे.. सर्वांचे एकमत झालेले दिसते. पण वर मी म्हटल्याप्रमाणे आर आर नी बंदी का घातली ते सोडुन देऊ, तुम्हाला बंदी हा हवी आहे ते सांगा अशी विनंती. मूडी : तुमचे म्हणणे बरोबर आहे. रोजगार्निर्मीतीसाठी ताबडतोब सर्वत्र डान्सबार चालू झालेच पाहिजेत, ते अत्यावश्यक आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही. पण केवळ आवश्यक नसणे हा काही एखादी गोष्ट कायद्याने बंद करायचा निकष असू शकत नाही.
|
Moodi
| |
| Monday, April 17, 2006 - 3:37 pm: |
| 
|
प्रतिमा जोशींचे आबांना पत्र.. वाचले की सुन्न व्हायला होतं. नक्की काय चाललय याचा थांगपत्ताच लागत नाही. कष्टकरी राबत रहातात, कामगारांचे भले करु या नावाखाली नेते स्वतची पोळी पिकवतात, पोलीस स्टेशनमध्ये साधी स्टेशनरी सुद्धा नसते. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1491503.cms .
|
सगळे पोस्ट्स वाचले. गोविंद, दिनेश मुद्दे छान मांडलेयत. मझा फारच कडक विरोध होता तो जऽऽरा कमी झालाय पण तरीही.. बाकी सगळी राजकीय गुंतागुंत सोडून मला काही प्रश्न आहेत. डान्सबार नव्हते तेंव्हा अशाच इतक्या बायका होत्या त्या काय करायच्या? फक्त रोजगार हाच प्रश्न असेल तर तो देशी दारूच्या दुकानात कम करणार्या किंवा drug trafficking करणार्या लोकांचाही असतोच. आणि टिव्हीवर जो जाहीर नंगानाच चालू असतो त्याचीही कुठे सक्ती असते? फक्त तो फुकट दाखवला जातो आणि डान्सबारमधे पैसे उडवावे लगतात. आणि सक्ती नसली तरी वाईट गोष्टींची easy availability कशाला करून द्यायची नवीन पिढीला? गरज काय त्याची? हे प्रश्न अज्ञानापोटी अगदी पडले म्हणून विचारलेत. ते कदाचित चूकही असतील. आवडले नसतील तर सोडून द्यावेत.
|
Aschig
| |
| Monday, April 17, 2006 - 7:08 pm: |
| 
|
moodi, in that letter NGOs are mentioned in a bad way. Are there any particular NGOs involved? I did not quiet get that reference.
|
Moodi
| |
| Monday, April 17, 2006 - 8:14 pm: |
| 
|
हो आशिष हे परत वाचल्यावर माझ्या लक्षात आलेच, पण प्रतिमा जोशी यांनी नेमका पुर्ण संदर्भ दिलाच नाहिये. त्या नेमके कुणाचे नाव घेतायत हेच समजले नाही. अन त्यांनी तसा पुरावा पण दिला नाही की ज्यांच्यावर त्या असा आरोप करीत आहेत, त्या संघटना कोणत्या. त्यामुळे हे सर्व बाकीच्यानी वाचल्यावर महाराष्ट्र टाईम्सला या संदर्भात अजुन काहीच कसे विचारले नाही असे आता वाटतय. ही पोस्ट उडवावी का? मी सहज विचारतीय. कारण वाचकात मग आणखी गैरसमज निर्माण होवु शकतात.
|
GS1 चांगले आहे पोस्ट! मलाही असेच वाटते की या बन्दीमागे नक्कीच अनेकांचे ego , स्वार्थ वगैरे दडले असणार! सामाजिक नैतिकता वगैरे विचार बन्दी घालताना आणि उठवतानाही झाला असेल असे वाटत नाही. डान्स बार समाजाला आवश्यक असे मुळीच म्हणायचे नाहिये पण त्यावर बन्दी घातल्याने काही साधणार आहे का? ज्यांना अशी करमणूक हवी आहे, आणि ज्यांना तशी सेवा द्यायची इच्छा आहे त्यांना इतर मार्ग सापडतीलच. बार बन्द असला तर हे लोक(सेवा देणारे अन घेणारे!) एकमेकांशी संपर्क करणे अवघड आहे का? मग कुणी फ़ार्महाऊस वर त्या डान्सर्स ना बोलवून पार्टी करतील कुणी अशाच एखाद्या ठिकाणी! भाडोत्री जागेची कमी आहे का? थोडक्यात सांगायचेय ते असे की अशा बन्दी ने काही साध्य होईल, सामजिक नैतिकता जपली जाईल असे मानणे हाच भाबडेपणा आहे!
|
Aschig
| |
| Monday, April 17, 2006 - 10:29 pm: |
| 
|
maitreyee, like GS1 I am not for closing such places because people can use their discretion in going there. But it is not true that closing or not closing makes no difference. There is a subset of people who will not go if it is not legal. Also, open trouble because of the bars is unlikely to happen if they are illegal. The alcohol ban in Gujarat is a good example. People who want to still partake in it, but you rarely see drunkards roaming the streets at night. If it were not for the recent rioting, I would consider it one of the safer cities from that (from experience).
|
वाचायला बरोबर वाटत आहे आशिश तुमचे. पण डान्स बार मधे ज्या प्रकारचे लोक जातात, ते स्वत च्या कायदेशीर पत्नी, आई बाप यांची नैतिक भीड न बाळगता तिथे जातात(म्हणजे तेवढी ' किमान निर्ढावलेली पातळी ' गाठलेली असते! ) ते कायद्याने बंदी आहे म्हणून जायचे थांबतील? मला तरी शंका आहे! तशी कायद्याने गर्भाचे लिंगनिदान करण्याला बंदी आहे, पण अगदी प्रतिष्ठित लोक(उघड कारणासाठी)ते करून घ्यायला कचरत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. असो हे विषयान्तर होत आहे..
|
आशिष एकदम पटलं. निदान काही प्रमाणावर तरी आळा बसेल त्याला. गोविंद तू म्हणतोयस ते मुद्दे पटले पण त्यासाठी सगळा समाज एका मिनिमम लेव्हलपर्यंत सुसंस्कृत आणि सदाचारी आहे असं गृहित धरलं पाहिजे. आणि असला व्यवसाय करायला आणि तो enjoy करायला सगळ्या देशातून मुंबईत लोक येणार ही कीर्ती काही फारशी बरी वाटत नाही. मुंबईचं शांघाय व्ह्यायच्या ऐवजी लास वेगाससारखं होईल नाहीतर. (ही संकुचित मनोवृत्ती आहे असं वाटतंय मलाही, तरी पण...) मैत्रेयी बरोबर. पण अशा गोष्टी लपूनछपून कराव्या लागल्या की त्या योग्य नाहीत हे तरी लक्षात येतं ना त्यांच्या. कुठल्याही वाईट गोष्टींना बंदी घालणं हे चांगल्या समाजासाठी गरजेचं आहेच. सारासार विचार करून निर्णय घेणारे आणि मोहात न पडणारे लोक थोडे असतात उलट बेकायदा गोष्टींना घाबरणारे जास्त. मग तसं तर तसं. पूर्वी देवाधर्माची भिती होती ती आता राहिली नाही.(आणि तेंव्हाही ती वेशीला टांगून ठेवणारे लोक असणारच) मग आता कायद्याची तर कायद्याची.
|
Ekanath
| |
| Tuesday, April 18, 2006 - 5:26 am: |
| 
|
माझे मत GS1 , दिनेश मंडळींनी मांडलेल्या मताला समांतर आहे. ह्या प्रश्नाला कमी महत्त्वा आहे, असे नाही, पण त्यापेक्षा कित्येक प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. शेतकरी आत्महत्य करत आहेत, वीज नाही, इत्यदी. आणि ज्या गृहमंत्र्यांना समाजाच्या नैतिकतेची काळजी आहे, त्यांना स्वतःच्या पोलिसांची कितपत काळजी आहे? आर्थिक ओढाताण, भरमसाठ (जबाबदारीचे) काम यातून पोलिस व्यसनाधीन होत आहेत. कित्येकांची कुटुंबे मोडत आहेत. ते सुधारण्यासाठी काय केले त्यांनी? डान्सबाद बंद करणे उत्तमच. तिथेही शोषण, नैतिकतेचा प्रश्न महत्त्वाचा आहेच. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे प्रश्न राज्यासमोर असताना, अशा कमी महत्त्वाच्या प्रश्नात सरकारने शक्ती खर्च करणे मूर्खपणा आहे, असे वाटते.
|
सगळ्यांनी छान मुद्दे मांडले आहेत. मला असं वाटत की इथे केवळ डान्स बार वर चर्चा करु म्हणजे दुसर्या प्रश्नांची या बरोबर तुलना नको. बायकांचे नाचुन करमणुक करणे हे नवे नाही. पुर्वीही राजेमहाराजे, नाच-गाण्याच्या मैफिली करत. परंतु आता याला येक हिडीस स्वरूप आले आहे. इझी मनी ही येक व्रुत्ती आहे. पर्यायी व्यवस्था केल्यास किती मुलींची तयारी आहे काम करायची! दारु पिणे चुकिचे आहे का? तर नाही- सरकार तुम्हाला लायसन्स देते. बरं नाचणे हा गुन्हा आहे का? तर ते ही नाही. दुसरी बाजु अशी की, यामुळे गुन्ह्यांना खतपाणी मिळतय का? आबांच्या मते हो!....'बंदीच्या काळात गुन्हे कमी झाले' - असं त्यांच स्टेटमेंट होतं. ३-५ स्टार मधे चालत, मग बार मधे का नाही? याला झक्कींचं पोस्ट समर्पक आहे. दिनेश, आपल्या मुलांची जबाबदारी ही आपलीच असते.१००% अनुमोदन! आज, टिव्हीवर- पिक्चर्स मधे काय वेगळ पहातात ही मुलं? पण म्हणून बंदी उठवावी का? कायद्यामधे बदल करता येणार नाही का? लोपामुद्रा, तू म्हणतेस ते योग्य आहे पण 'पुर्नवसन' हा येक आपल्याकडे विनोदाचा भाग बनला आहे. -चिंगी
|
Lampan
| |
| Tuesday, April 18, 2006 - 6:49 am: |
| 
|
ह्या विषयावर दुमत होउ शकतं हे वाचुन सुन्न झालोय !!!
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 18, 2006 - 2:48 pm: |
| 
|
मी काय किंवा GS1 काय, आम्ही कधीच कुठल्यास डान्स बार मधे गेलो नाही, पण तुम्ही त्या बायकांचा तिरस्कार करावा हे पटले नाही. अहो कोण बाई, सुखासुखी असा पेशा स्वीकारेल ? त्यामुळे जर सरकारला वाटत असेल तर सगळ्या बाजुने विचार करायला हवा होता. मुंबईत बांगला देशींसाठी झोपडपट्ट्या ऊभ्या राहतात, त्याना सर्व सुविधा मिळतात कारण त्यांच्याकडुन एकगठ्ठा मते मिळतात. म्हणजे पुनर्वसन अशक्य आहे असेहि नाही. आजच नर्मदा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करायचा निर्णय झाला आणि मेधाने ऊपोषण सोडले. अहो जर सरकारला काहि करायचेच असेल तर सरळ वेश्या व्यवसाय बेकायदेशीर ठरवा ना ? आहे हिम्मत. तुमच्यापैकी अनेकजणाना माहित नसेल कि भारतात तो बेकायदेशीर नाही. सार्वजनिक ठिकाणी हातवारे करणे, अल्पवयीन मुलींवर जबरदस्ती करणे असे गुन्हे आहेत. थेट वेश्याव्यवसाय नाही. अर्थात कुणी जाणकार यावर लिहितील तर बरे.
|
Arch
| |
| Tuesday, April 18, 2006 - 2:53 pm: |
| 
|
कोणी विश्वास पाटिलांची चंद्रमुखी कादंबरी वाचली आहे का? बारबालावरून आठवली. जरूर वाचा.
|
Moodi
| |
| Tuesday, April 18, 2006 - 4:15 pm: |
| 
|
दिनेश अहो त्या बायकांचा तिरस्कार वाटत नाही हो, उलट वाईट वाटतय की पोटासाठी काहीही करावे लागतेय. आता साध्या ब्लेडचे उदाहरण घ्या. त्या जाहिरातीतही बाईच लागते. कशाला? ती येऊन करते का त्या बाबाची दाढी? काही कौटुंबीक किंवा स्त्रीयांसंबंधीत जाहिराती ठीक आहेत पण आजकाल काही पण विकायचे झाले तर आधी स्त्रीलाच पटावर उभे केले जाते. परदेशात अशा बारमध्ये करणार्या मुली पुढे चांगले शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवुन लग्न जेव्हा करतात तेव्हा परदेशातील पुरूष आधी हे बघतात की ती स्त्री आधी स्वताच्या पायावर उभी आहे, आर्थीक अन मानसीक दृष्ट्या पण खंबीर आहे. भारतात होते का असे? तुम्ही विचाराल ही परदेशाशी तुलना का? तर मला हेच म्हणायचे आहे, की एवढी मोकळी संस्कृती आहे, ड्रिंक्स घेणे पण सोशल झालेय( जे फॅड विदेशातुन उचलले गेले) तर मग या बायकांना समाजात ते स्थान मिळेल का? जे योग्य शिक्षण झालेली स्त्री मिळवते ते? अशा कित्येक स्त्रीया आहेत ज्या गरिबीतुन अपार कष्ट करुन वर आल्यात, खुप शिकल्यात. त्या काय मग नाचायला गेल्या का? एकीकडे womens day साजरे होतायत अन दुसरीकडे ही अशी केवीलवाणी परीस्थिती बायकांची. राहिता राहिले बांगला देशातुन येणार्या घुसखोरांचे, ते तर काय समाजवाद्यांची विषारी किडच आहे. अजगरासारखी ती मुंबईला गिळंकृत करतीय, काल दिल्ली आज काशी अन उद्या आणखीन काही. असो हा अतिरेकी विषय या बीबीचा नाही त्यामुळे त्यावर नंतर बोलता येईल. ती लिंक मी दुसर्या बीबी वर देतेय.
|
स्त्रीच्या शोषणाचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की प्रत्येक समाजात 'शेरावत' प्रवृती असलेली माणसं असतात.. पैसा आणि प्रसिध्दी साठी काहीही करणारी.. म्हणूनच सुशिक्षीत, सुधारीत आणि देशात सुध्दा हे व्यवसाय चालतातच... नाहीतर युरोप अमेरिकेत हे धंदे चालले नसते नाही का?
|
Mbhure
| |
| Tuesday, April 18, 2006 - 11:22 pm: |
| 
|
दिनेश आणि GS चे पटत असले तरी त्यावर बंदी घालावी. कमीत कमी त्यावर बंधने टाकावित की जेणे करुन डान्स बारमध्ये सर्वसामान्यांना महागडे होईल. असेही तेथे सर्व महागच असते. ज्यांना वाटते की येथे छुपा(?) वेश्याव्यवसाय चालतो म्हणुन बार बंद करावेत तर हा विनोद आहे. कारण मग लेडिज सर्विस असणार्या हॉटेल आणि पार्लर्सचे काय? अनेक पांढरपेश्या संस्थांमध्ये काम करणार्यांचे काय? सर्वच स्पष्ट लिहीणे अवघड आहे... आमच्या एका मैत्रिणीने अनुभवलेली गोष्टः नवर्याची वाट बघत ती एका सुप्रसिद्ध पंचतारांकीत हॉटेलच्या लॉबीत उभी होती. नवर्याची ऑफिसची मिटींग चालली होती. काही वेळ गेल्यावर तिथला सिक्युरिटी गार्डने तिच्याकडे चौकशी केली. ती नवर्याची वाट बघते आहे कळल्यावर तिथे उभे न रहाता, लॉबीत बसायला सांगितले. नवर्याला आल्यावर तिने ही गोष्ट सांगितली. त्याने तिला सिक्युरिटी गार्डने असे का सांगितले, हे कॉफी शॉपमध्ये कॉफी घेताना दाखवुन दिले. "एक कॉलजमधली मुलगी असावी, ती तिथे (वाट बघात राहिल्यासारखी) १०-१५ मिनीटे उभी होती. एक वडिलांच्या वयाचा पुरुष आला, ईकडे तिकडे रेंगाळ्यासारखे केले. काऊंटवरच्याशी बोलला आणि मग तो आणि ती मुलगी दोघेही ('वेगळ्या तर्हेने') लिफ्टमध्ये चढले." आमची मैत्रिण हे बघुन बेशुद्ध पडायची बाकी होती. ही १९८९-९० च्या दरम्यान्ची गोष्ट आहे. दिनेश सांगतो तसे परिस्थीतीनुसार होणे मान्य पण हे तर Just to earn little more Pocket Money..... आणि परत पैसा आला की गरजा वाढल्या... चक्र सुरु होते. वेश्या व्यवसाय कायदेशीर असणे काहीच गैर नाही पण त्याबरोबर सामाजिक आणि सरकारी जबाबदार्याही कसोशीने पाळल्या जायला हव्यात. नेदरलँड, ऑस्ट्रेलिया येथे जसे ते पाळले जाते तसे आपल्या ईथे होत नाही. त्यासाठी कायदा राबवणे जरुरीचे आहे. बंदीपेक्षा बंधन जरुरीचे आहे. कायदा हा बारबरोबरच पंचतारांकीत हॉटेल आणि जी 'अशी' बरीच 'टिकाणे' आहेत, त्यांनाही लागू हवा. तरच त्याचा उदोउदो करणे योग्य ठरेल. युरोप, अमेरीकेत जरी हे धंदे चालत असले तरी त्यांची सामाजिक आणि कौटुंबिक रचना आपल्यापेक्षा वेगळी आहे. तिथे एखाद्या बाईला पटले नाही तर ती सरळ मुलांना घेऊन घराबाहेर पडते. भारतात हा सुधारितपणा अजुन सहज शक्य नाही. तसेच तेथे ठराविक बंधने कायद्याच्या भितीपोटी पाळाविच लागतात कारण त्यात सामन्य माणुस आणि प्रेसिडेंटच्या मुली हा भेदभाव होत नाही.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|