|
Manuswini
| |
| Wednesday, April 05, 2006 - 5:34 am: |
| 
|
आणखी एक माहीती हे की, नागरीक म्हणुन आपला हा हक्क आहे की कितीही चांगले dentist चे मोठे office असु दे आपण नेहमी Sterile आहेत का वापरली जाणारी equipment ह्याची चौकशी करावी. दुसरी काळजीची गोष्ट म्हणजे beauty parlors एथे manuicure,pedicure करताना पण काळजी घ्यावी. मी हे एका magzine मधे वाचले की not only AIDS पण hepatitis B सारखे रोग ही पसरु शकतात. आणखी एक उदाहरण दिले होते magzine मधे की waxing करताना येणारे रक्त आणी तोच spatula वापरुन तो wax मधे बुडवुन काही parlors मधे Waxing होते. एका वेळी दोन clients असतील तर एकच wax वापरला जातो ज्यात तोच wax चा spatula बुडवतात. हे सर्व वरिल magzine मधे होते. असे काही आपण बघितल्यास स्प्ष्ट नकार द्यावा. केसांमधे bacterial infection होवु शकते जर कंगवा स्वच्छ नसेल तर. हे AIDS संबधीत नाही. पण ह्या ठिकाणी काही dangerous रोग पसरु शकतात. nj च्या oaktree वरिल एक parlor म्हणजे घाणीचे आगार. एकदा मी बिंदास जावुन भर client उभे असताना त्याला lecture दिले की क्या आप साफ़्सफ़ाई रखना पसंद नही करते. अंदर बैठ भी नही सकते. बर्याच लोकांनी फक्त मुकपणे माना डोलावल्या. नाव आहे त्या parlor चे पायल. आता त्याने renovation केले आहे. पण एतके घाण की भीती वाटेल. मी बिंदास चारदा विचारायची फणी धुतलेली आहे ना मगच केस काप. लोकांन काय जातेय दुसर्याच्या जिवाशी खेळायला
|
Dakshina
| |
| Wednesday, April 05, 2006 - 6:25 am: |
| 
|
मनुस्विनी, तुझं म्हणणं अतिशय बरोबर आहे. मला तर सतत याच गोष्टींची काळजी वाटते. आता तर मी बाहेरच्या Doctor कडे Injection घ्यायला जाणंच बंद करून टाकलं. माझी एक मैत्रिण मला गरज पडली तर घरीच देते. मी आपल्या ४ सिरिंज आणूनच ठेवल्यात आणि एक pain Killer ची बाटली. आपल्याला शक्य आहे तितकी काळजी आपण घेतलीच पाहिजे. आपल्यामधे बरेच Doctors असतील किंवा Hospitals मधे काम करणारे लोक असतील त्यांनी तर खूप खबरदारी घेतली पाहीजे. कारण चुकून जरी Prick झालं तरी... संपलं सगळं. हवं तर Double हातमोजे घाला... हव्या तितक्या सुया वापरा... पण प्रत्येकासाठी वेगळ्या...
|
Dakshina
| |
| Wednesday, April 05, 2006 - 6:40 am: |
| 
|
या सगळ्या खबरदार्यांबरोबर इतरही गोष्टींचा विचार गांभीर्याने केला पाहीजे. तो म्हणजे 'मल्टिपल सेक्स पार्टनर्स' मला वाटतं की आता आणि या पुढे लग्नं करताना एकवेळ पत्रिका नाही पाहीली तरी चालेल पण मुलाला / मुलिला HIV नाही ना याची खात्री करून घ्यावी. भारत खूप पुढे चालला आहे, अमेरिकन संस्कृती बळावत चालली आहे. Relationship च्या व्याख्या बदलत चालल्या आहेत. एक पती - एक पत्नीत्व हे थोडं मागे पडलय. शिवाय हातात पैसे खेळू लागल्यामुळे लहान मुले ही त्याचा हवा तसा वापर करू लागली आहेत. Dance Bars आणि वेश्यागमन करणार्यांमुळे हा रोग तर आता पसरत चालला आहे. शिवाय समलिंगी लोकांना तर याचा सगळ्यात जास्त धोका आहे. मधे मी एका लोकशही उत्सवात पाहिलेल्या नाटकाबद्दल Experiences मधे लिहिलं होतं. त्या नाटकातले सगळे कलाकार हे सेक्स वर्कर्स होते. आणि कौतुकाची गोष्टं म्हणजे ते लोक त्यांच्याकडे येणार्या प्रत्येक गिर्हाईकाला Condom वापरण्याची सक्ती करतात. जो नकार देईल त्याला तिथले सगळेच विरोध करतात. त्यांच्याशी झालेल्या संवादातून हे ही कळलं की त्यांच्याकडे येणार्या १२ ते १६ वयोगटातल्या मुलांना पण त्या नकार देतात. I think what they are doing is extreamly good
|
>> आता तर मी बाहेरच्या Doctor कडे Injection घ्यायला जाणंच बंद करून टाकलं. OR you can insist upon using disposable syringes and rubber gloves. And I believe most of the hospitals / doctors use disposable syringes these days.
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 05, 2006 - 4:01 pm: |
| 
|
हा व्हायरस शरिराबाहेर दहा मिनिटाच्या वर जगत नाही. अर्थात काळजी घेणे योग्य. आता जर ईंजेक्शन घ्यायला जायचेच असेल तर, आपली डिस्पोझेबल सिरींज घेऊन जाणे हे उत्तम. रक्ताने भरलेले ईंजेक्शन देणे, डेंटिस्ट कडची लागण वैगरे प्रकार दुर्दैवी असले तरी यातली गोम अशी आहे कि हे सिद्ध करता येणे कठीण असते. म्हणजे समजा जर अश्या एका अपघातानंतर जर तुम्ही पॉझिटिव्ह ठरलात, तर त्यापुर्वी तुम्ही निगेटिव्ह होता, हे सिद्ध करावे लागते. खुपदा ह्या असल्या सबबी, आपली निरागसता सिद्ध करण्यासाठी वापरल्या जातात. दुर्दैवी असले तरी हे सत्य आहे.
|
Moodi
| |
| Wednesday, April 05, 2006 - 10:31 pm: |
| 
|
दै.सकाळच्या विज्ञान या सदरात HIV विषयी आशादायक बातमी आहे, पण मला ती लिंक इथे देता येत नाहीये, कुणी Software वाले ती इथे देण्याची कृपा करतील का? माता, बालक अन एच आय व्ही असे नाव आहे बातमीचे. http.//210.210.17.75/esakal/esakal/rightframe.html अशी आहे ती लिंक.
|
मूडी, तिथे मी शोधाशोध केली पण मला ती बातमीच सापडली नाही. तू असे करू शकतेस का बघ- ती बातमी उघडण्यासाठी त्या बातमीच्या लिन्कवर(किंवा कोणत्याही लिन्कवर) तू माऊस नेलास तर तुझ्या browser च्या तळाच्या status bar मध्ये त्या लिन्क चा पत्ता दिसेल. तो note करून इथे दे. किंवा त्या बातमीच्या लिन्कवर right-click करून properties click कर. तिथेही तुला तो पत्ता दिसेल. तो copy-paste कर.
|
Dakshina
| |
| Thursday, April 06, 2006 - 5:46 am: |
| 
|
म्हणजे दिनेश, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता Driving लायसन्स बरोबर HIV Negetive चे Certificate पण घेऊन फ़िरावे लागणार बहुधा..
|
हो ना दक्षिणा ती गरजच आहे आजची. लग्न करण्यापूर्वी HIV चाचणीची मागणी केली तर समोरच्यांना पण त्यात काही विशेष / गैर / अवमानकारक वाटायला नको. (त्यांच्या मुलाच्या / मुलीच्या सुरक्षेची त्यांनापण काळजी ना.) HIV ची लागण झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत चाचणी केली तर report negative येऊ शकतो.
|
Champak
| |
| Thursday, April 06, 2006 - 6:54 am: |
| 
|
गोवा सरकारने लग्नापुर्वी HIV test सक्तीची केली आहे. तसा कायदा नुकताच संमत केला आहे, अशी बातमी आहे. मुळात, कुंडली अन पत्रिका वगैरे पेक्षा, medical test report च पाहीले पाहिजेत लग्न जमवताना! म्हंजे कंपनीत नोकरी joining ला जसे medical test compulsory असतात तसे, वर अन वधु ला एका doctor कडुण medical test करुण घ्यायला पाहीजे.
|
Dakshina
| |
| Thursday, April 06, 2006 - 8:10 am: |
| 
|
चंपक हे तर मी आधी लिहीलेलंच आहे. मैत्रिण सांगते त्यावरून मला असं जाणवलं की एक विशिष्ट Class आहे जिथे हे माहीतीच नाही कि एडस हा किती भयानक रोग आहे ते. एक जोडपं आलं होतं त्यांच्या Clinic मध्ये, माणूस Positive होता.. आणि बाई पण. रोगामुळे म्हणा अणि त्यामुळे थोडा मानसिकतेत फ़रक पडल्याने तो मनुष्य थोडा भ्रमिष्ट झाला होता... त्याची बायको सांगत होती काय झाला बघा हा रोग.... आमावस्या जवळ आली की हे असं वागायला लागतात.... खरं सांगू का बाई म्हणे आमच्या लग्नात गोंधळ नव्हता घातला.. त्यामुळेच यांना हे असं झालं असावं... मी ऐकून चकित झाले. ही गोष्टं आपल्यासाठी हास्यास्पद आहे पण भोगणार्यासाठी खूप दुःखदायक..... आणि काही पुरुष तर दारूच्या नशेत कुठे कुठे जाऊन येतात आणि स्वतःच्या बायकांना पण नकळतपणे Positive करतात. अजुन एका माणसाला Counselling च्या दरम्यान, किती वेळा Exposer झालं या विषयी विचारलं तर म्हणाला ५० / ६० बायका तरी झाल्याच असतील. मारठी, पंजाबी.. सिंधी.. कोणती नाही असं नाही... ते पण अभिमानाने... म्हणजे आपल्याला रोग झालाय आणि तो आपण नकळतपणे पसरवतोय.. आता आपल्या कुटुंबाचं कसं होणार या चिंतेपेक्षा त्या माणसाला आपल्या ( So called ) मर्दानगीचा किती अभिमान?
|
Moodi
| |
| Thursday, April 06, 2006 - 8:21 am: |
| 
|
माता, बालक आणि एचआयव्ही ( डॉ. मृदुला फडके, डॉ. पी. एम. बुलाख ) ****************************** एचआयव्हीबाधित मातेपासून बाळाला विषाणूचा संसर्ग होऊ नये आणि स्तनपानही चालू ठेवता यावे, यासाठी पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय प्रकल्प राबविण्यात येत आहे. सध्या तो अंतिम टप्प्यात आला आहे. त्याबद्दल... ****************************** संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजाप्रमाणे भारतात ५१ लाख लोक एचआयव्हीबाधित आहेत आणि प्रत्येक शंभर ते सव्वाशे माणसांमागे एक व्यक्ती एचआयव्हीग्रस्त आहे. यामध्ये २५ ते ४० वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश अधिक आहे. स्त्रिया आणि बालकेही एड्सच्या तडाख्यातून सुटलेले नाहीत. एचआयव्हीग्रस्तांमध्ये सुमारे ४० टक्के महिला आहेत. त्यांच्या आणि बालकांच्या समस्या फारच बिकट आहेत. आईला एचआयव्हीचा संसर्ग झाला असेल तर तिच्या शरीरातील विषाणू बाळाच्या शरीरात जाण्याची भीती असते. एचआयव्हीबाधित आईमार्फत बाळाला एचआयव्हीचा संसर्ग होण्याची शक्यता ३३ टक्के असते. हे बाळ ७ ते १० वर्षांतच आणि काही वेळेला त्याआधीच एड्सला बळी पडते. यापासून बाळाची मुक्तता व्हावी म्हणून जगभर संशोधन चालू आहे. त्यातूनच नेव्हिरापीन, एझेडटी आणि थ्रीटीसी या औषधांचा शोध लागला. गर्भवती महिलेला ही औषधं दिल्यास बाळाचा रोगापासून बचाव होऊ शकतो, हेही स्पष्ट होऊ लागलं. गरोदर मातेला नवव्या महिन्यात आणि त्यानंतर प्रसूतीच्या वेळेस एझेडटीचे औषध दिल्यास बाळाला ५० टक्के संरक्षण मिळतं, हे सिद्ध झालं. थायलंडमधल्या संशोधनातून, तसेच युगांडामध्ये झालेल्या संशोधनानुसार, नेव्हिरापीनची फक्त एक गोळी प्रसूतीच्या वेळेस आईला आणि एक डोस जन्मानंतर ७२ तासांच्या आत बाळाला दिला, तर बाळाला एचआयव्हीचा संसर्ग होण्याची शक्यता निम्म्यानं कमी होते. दोन्ही संशोधनांचं खूपच महत्त्व होतं. आपल्याकडं "नॅको' म्हणजे "नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन'नंदेखील या चाचण्या केल्या. त्या यशस्वी झाल्या. त्यानंतर आईला तीन औषधं म्हणजे "हार्ट' ट्रिटमेंट देऊन बाळाला "एचआयव्ही'पासून जवळजवळ ९९ टक्के संरक्षण मिळतं, असं सिद्ध झालं आणि अमेरिकेत अशी औषधं देण्यास सुरवात झाली; पण त्याला खूप देखरेख (मॉनिटरिंग) करावी लागते. या औषधांचे दुष्परिणाम होऊ नयेत, यासाठी वेळोवेळी तपासणी करून योग्य ते बदल करावे लागतात. या सगळ्या संशोधनामध्ये एक मोठी समस्या आहे आणि ती आपल्यासारख्या विकसनशील देशांमध्ये फार महत्त्वाची आहे. ती म्हणजे, या सगळ्या उपचारांनंतर आईनं बाळाला दूध पाजायचं नसतं. कारण आईच्या दुधातून एचआयव्हीचा विषाणू बाळामध्ये जाऊन बाळाला आजार होऊ शकतो. स्तनपान, एचआयव्हीबाधित माता आणि तिचं बाळ स्तनपानाचं महत्त्व आपल्या देशात फार पूर्वीपासून आहे. बालरोगतज्ज्ञदेखील म्हणतात, की स्तनपान न करता वरचं दूध दिल्यास बाळामध्ये जुलाब, न्युमोनिया वगैरे जंतूंचा प्रादुर्भाव खूपच वाढतो आणि कधी कधी बाळ दगावतं. म्हणूनच पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक आणि जॉन्स हॉपकिन्समधील डॉ. आर. सी. बॉलिंजर यांनी ७ ते ८ वर्षं खूप विचारमंथनानंतर एक प्रकल्प अमेरिकेच्या "एनआयएच' या संस्थेला सादर केला. तो मंजूर झाल्यावर पुण्यात या प्रकल्पाचं संशोधन सुरू झालं. कसा आहे हा प्रकल्प? अशी धारणा आहे, की जर बाळाला जन्मानंतर दीड महिना नेव्हिरापीन दिलं, तर आईला स्तनपान करता येईल आणि तरीसुद्धा बाळाला एचआयव्हीचा संसर्ग होण्याचं बहुतांशी टाळता येईल. या प्रकल्पाचं मूळही हेच आहे. आईला प्रसूतीच्या वेळी एक गोळी नेव्हिरापीन व बाळाला सहा आठवडे तेच औषध, हीच ती चिकित्सा पद्धती आहे. या प्रकल्पानंतर असे प्रकल्प इथिओपिया आणि युगांडातूनदेखील सादर झाले. पुण्यातल्या एचआयव्हीबाधित मातांना या प्रकल्पामुळे एक वरदानच मिळालं. जवळजवळ सातशे बाधित स्त्रियांनी याचा फायदा घेतला आहे. गरोदरपणाच्या अगदी चौथ्या महिन्यापासून त्यांची नियमित तपासणी केली जाते. त्यांच्या रक्तदाबाची तपासणी केली जाते. त्यांना लोहाच्या, जीवनसत्त्वाच्या, कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात. अल्ट्रासाऊंड तपासणी केली जाते आणि जरूर ती औषधं दिली जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या प्रत्येक गरोदर महिलेला बाह्यरुग्ण विभागातच एचआयव्हीबद्दल माहिती सांगितली जाते. एचआयव्ही संबंधित समुपदेशनाला "व्हीसीटीसी' म्हणतात. याचा अर्थ ऐच्छिक सल्ला व रक्ततपासणी गोपनीयरीत्या मिळण्याचं केंद्र. तेथे समुपदेशक असतात. गेल्या तीन वर्षांत अंदाजे सत्तर हजार महिलांनी स्वेच्छेनं तपासणी करून घेतली व त्यामधील सुमारे बाराशे महिला एचआयव्हीग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. या सर्व गरोदर माता व त्यांच्या नवजात बालकांसाठी हा प्रकल्प राबवला जात आहे. याची सर्वांत जमेची बाजू हीच, की एचआयव्हीबाधित मातेलासुद्धा आपल्या बाळाला स्तनपान देता येतं. सगळ्या जगाचं लक्ष या बाबीसाठी या प्रकल्पावर आहे आणि सर्व शास्त्रज्ञांची कसोटी आहे. पुढच्या वर्षी या संशोधनाचं फलित आपल्याला मिळेल, अशी आशा करू या. या प्रकल्पात सहभागी आहेत अमेरिकेचे डॉ. आर. सी. बॉलिंजर, डॉ. अरविंद भोरे, डॉ. ए. एल. काकरानी, डॉ. श्रीपाद दाबक, डॉ. पुष्पलता नाफडे, डॉ. गौरी शास्त्री, डॉ. कपिला भरुचा, डॉ. ए. एम. भालेराव, डॉ. रमेश भोसले, डॉ. वेंकट, डॉ. संजय देशमुख, डॉ. आर. आर. मेलिंकरी आदींसह याशिवाय बी. जे. महाविद्यालयातील अनेक डॉक्टर, कर्मचारी यांचं मोठं सहकार्य मिळालं आहे. ( डॉ. मृदुला फडके, डॉ. पी. एम. बुलाख ) (डॉ. मृदुला फडके या प्रकल्पाच्या मुख्य समन्वयक आहेत
|
Moodi
| |
| Thursday, April 06, 2006 - 8:30 am: |
| 
|
गजानन जमले रे जमले. धन्यवाद रे इतके छान पद्धतीने सांगीतल्याबद्दल. जर भारताच्या खेडया पाड्यात अन गावा गावात कुटुंबनियोजन अन मन तसेच शरीराशी संबंधीत सर्व रोगांची नीट माहिती पुरवली गेली अन ते तेवढ्याच यशस्वी पद्धतीने राबवले गेले तर ही समस्या मूळापासुन नष्ट होवु शकेल. मनुस्विनी तू म्हणतेस ते बरोबर आहे बर्याच ब्युटीपार्लरमध्ये स्वच्छता अजीबात ठेवली जात नाही. आन बायकांमध्ये पण ते जागृती किंवा स्वतच्या आरोग्याविषयीचे भान दिसत नाही. मागच्या वर्षी सकाळच्या मैत्रेण या सदरात किंवा सप्तरंगमध्ये यावर लेख आला होता की सगळीकडे सर्रास ब्युटीपार्लरस उघडली जातात पण बायका मग त्या पारलर चालवणार्या असो वा गिर्हाईक, स्वच्छते कडे अजीबात लक्षच देत नाही. दिनेश तुम्ही दिलेली ही बातमी फार धक्कादायक आहे हो.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 06, 2006 - 1:11 pm: |
| 
|
HIV म्हणजे मृत्यु हे समीकरण तितकेसे बरोबर नाही. शिवाय या व्हायरसचा विंडो पीरियड असतो, म्हणजे हा विषाणु शरिरात असला तरी, प्रचलीत चाचणीत आढळुन येण्यासाठी साधारण ४० दिवसाचा अवधी लागतो. शिवाय हा व्हायरस शरिरात असला तरी अगदी १० वर्षे कुठलेहि लक्षण न दाखवता सुप्तावस्थेत राहु शकतो, त्यामुळे चाचण्याना तसा काहि अर्थ नाही. आता लॉजिकली हे सांगायचे म्हणजे एका व्यक्तीची आज चाचणी केली, तो निगेटिव्ह ठरला, त्याला कमीत कमी ४० दिवस ताब्यात ठेवा, आणि परत एकदा चाचणी करा, आणि तेंव्हाहि तो निगेटिव्ह ठरला तर थोडीफार खात्री बाळगा. त्यामुळे प्रामाणिकपणा सगळ्यात महत्वाचा. मोठ्या हॉस्पिटलमधे रक्त घेताना, वा कुठल्याहि ऑपरेशनच्या आधी हि चाचणी करतातच. डॉक्टर सहसा धोका पत्करत नाहीत.
|
Palas
| |
| Friday, April 07, 2006 - 9:44 am: |
| 
|
दिनेश, तुमचा वरचा मुद्दा बरोबर आहे. ३०-४० दिवसांच्या विंडो पिरीअडमुळे हा विषाणू शरिरात आहे की नाही हे सिध्द करणे अवघड जाते. त्यामुळे प्रामाणिकपणावरच विश्वास ठेवायला हवा. आता वरच्या काही मुद्द्यांबद्दल्: हा विषाणू पसरायचा खरा मार्ग एकच आहे....कुठल्याही body fluid मधुन ह्यात लाळ, थुन्की आणि अश्रु येत नाहित. लाळ आणि थुंकी मधे काही ग्लायको प्रोटिन्स असतात त्यामुळे HIV चे infection खुप वाढले (म्हणजे AIDS झाला) किंवा CD4 count खुप कमी म्हणजे २०० पेक्षा खाली झाला तरच त्यात ते १-२% पर्यंत असतात. अश्रुं मधुन इबोला पसरतो (जो HIV पेक्षा लाख्पट deadly आहे.... त्याबद्दल नंतर कधीतरी) रक्त्: रक्तातुन हा विषाणू सहजच पसरु शकतो. १० मिनिटे वगैरे ढोबळ्मान आहे व रक्तच एक थेंब आहे गृहीत धरले तर ते खरं आहे. रक्त जर जास्त असेल तर १० मिनिटे खुप कमी पडतील. आपण जे रक्तदान करतो ते रक्त जर तपासले नाही (आज्-काल सगळ्या रक्तपेढ्या ते तपासतात त्यामुळे काळजी नसावी) तर त्यातुन infection होवु शकते. माझ्या वाचनात एक case आली होती (आणि ती २००३ पर्यंत unique होती) ज्या मध्ये एकाच्या tooth brush वापरला म्हणुन दुसर्याला infection झाले होते. त्य case चा खुप बारकाइने अभ्यास करुन त्या शास्त्रज्ञांनी असे अनुमान काढले की त्या brush ला HIV infected व्यक्तिच्या हिरड्यातून आलेल्या रक्ततुन तो पसरला. त्यामुळे रक्तातुन infection व्हायचे असेल तर कमित कमि visible amount of blood हवे.... ते पुर्ण dry नको ( coagulated रक्त HIV transmit करू शकते).. it should be rock hard dried . म्हणजे visible blood drop must contaminate with our body fluid . केस १. मी रस्त्याने चालत आहे माझ्या हाताला जखम झाली आहे आणि समोरुन कपाळाला जखम झालेली आणखी एक व्यक्ती येत आहे (HIV positive) . आम्ही एकमेकांवर आदळतो. माझा हात त्याच्या कपाळाला लागतो. ह्या case मध्ये मला HIV infection होवु शकेल का ? --फार कमी शक्यता. कारण माझ्या जखमेवर कहीही आदळले असता त्यातुन पुन्हा रक्तस्त्राव सुरु होइल... म्हणजे माझ्या शरीरतील रक्त बाहेर पडायला लागेल आणि त्याचा मला लागलेल infected रक्त माझ्या शरीरात जाणार नाही. पण ही शक्यता आहे.. माझ्या हातावर एक्-दोन थोड्या थोड्या अंतरावर जखमा असतील तर chances वाढतात कारण infected रक्त वाहत दुसर्या जखमेवर जावुन clot होवु शकते. ह्या शक्यतेत chances खुप जास्त कारण इथे body fluid to bodyfluid चा संबंध येतो. केस २. माझ्या uncut skin वर (outer) कुठलेही HIV infected fluid पडले तर मला infection कधीच होणार नाही. केस ३. pricking with needle : very few chances almost next to negligible..not because virus can not survive outside of body but because blood would be dried out (AGAIN virus survives in body fluid for any long time if kept properly) केस ४: surgery जेंव्हा शरीरावर शस्त्रक्रिया केली जाते तेंव्हा सर्जन्सला infection असेल तर खुप high chances कारण शरीर stitch करतांना किंवा फाडतांना थोड्या जखमा होतातच आणि त्यांचे body fluid रुग्णांच्या body fluid मधे जातेच... हेच उलटहि होत असते. त्यामुळे सर्जरी हा देखील खुप धोका असलेला धंदा झाला आहे. केस ५: रबर ग्लोव्ह ने prick होणे कसे काय टाळता येते ? HIV ची biology कधीतरी इथेच पाहु आपण.
|
Palas
| |
| Friday, April 07, 2006 - 9:54 am: |
| 
|
Second important thing: This virus has evolved to infect humans lately. It is the evolutionary process and has nothing to do with """any scientific experiments""" that created this virus. Our knowledge of molecular and cell biology only increased in last 5-10 yrs. Designing something like this was impossible in 1960s' when first cases appeared. Virus do mutate and travels cross-species, SARS is one such kind. Who knows what else is on the way? just think of HIV mutating inself so that it can travel through air.........
|
Storvi
| |
| Friday, April 07, 2006 - 3:16 pm: |
| 
|
सर्जरी चा मुद्दा काही पटला नाही. हल्ली सर्जन्स साबणाने स्वच्छ हात धुवुन आणि ग्लव्स घालुनच सर्जरी करतात. यात body fluids transfer कशी काय होतील?
|
Palas
| |
| Friday, April 07, 2006 - 4:55 pm: |
| 
|
शिल्पा, सर्जरी करतांना शरीरावर अत्यंत तिक्ष्ण अश्या हत्यारांचा वापर केला जातो. त्यावेळेस त्या हत्यारांचा साधा स्पर्श देखील रक्त काढतो. हा अपघात होइलच असे नाही पण असे सर्जरीच्यावेळेस खुपदा होते. त्यामुळेच मी सांगीतले की rubber latex gloves can not protect one from infection if the prickinng has to happen कारण ते ग्लोव्हज सहजच फाटतात. आम्ही हे सर्जरी रोजच वापरतो.... खुपदा साधा twizeer/tooth pick/blade/pen/pencil त्याला छिद्र पाडतात.
|
Dineshvs
| |
| Friday, April 07, 2006 - 5:18 pm: |
| 
|
शक्यतो डॉक्टर्स हल्ली डबल ग्लोव्ह्ज वापरतात. पण मायक्रो कट्स असले तर त्यानाहि धोका आहेच. पण प्राथमिक अवस्थेत नुसत्या नजरेने हे रुग्ण अजिबात ओळखु येत नाहीत. ईबोलाची आठवण पण नको रे बाबा. खुपच भयानक प्रकार होता तो.
|
मुंबईत जे जे हॉस्पिटल मधे काम करणारी माझी मैत्रीण खुप दिव्यातुन जायची असे मला वाटयचे हे ७-८ वर्षापुर्वी मी पाहिले तीला भेटायला गेले तेव्हा dmlt होती, सरकार ह्या लोकाना साधे gloves पण देत नसत. काही प्रकार तर pippett ने ओढुन tesT करायचे असातात. they handle urine,stool with minimal protection TB च्या रक्त चाचण्या करताना केवळ एक mouth gloves जो कापडी आहे तो लावुन pipette ने ते sample ओढुन slide बनवा यार खरेच भीती वाटली होती मला त्यावेळी तो dmlt भाग पण एतका गलिच्छ होता ना these guys are at high risk
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|