|
Champak
| |
| Wednesday, February 15, 2006 - 9:56 am: |
| 
|
ह्यावर उपाय एक च हे. ७०% लोक ज्यावर अवलंबुण आहेत त्या शेतीला नियमित अन कमी दराने पतपुरवठा व्हायला हवा. आता ६ टक्के दराने मिळणार आहे असे समजले. पण मिळेस्तोवर अवघड हे! कर्जाचा उपयोग हा अल्पभुधारक अन शेतमजुरी करुण शेती करणारे ह्यांना पण व्हायला पाहिजे अन्यथा सधन शेतकरी च त्याचा लाभ घेतात. कमी पाण्यात येणारी पिके अन जलस्त्रोतांचे योग्य वयस्थापण फ़ायदेशीर ठरते. आय टी मध्ये असणार्या लोक जसे stocks मध्ये पैसे गुंतवतात तसे शेती त ही गुंतवा. पण बिगर शेतीत नको! कर्ज वाटप अन सरकारी योजने चा नुकताच आलेला एक अनुभव. पाहणी करणार्या साहेबाला सोयीचे पडावे म्हणुण एका आड्बाजुच्या शेता ऐवजी रस्त्याच्या कडेच्या शेतात ठिबक सिंचण संच बसवणे भाग पाडले! अजब हे! जमिनीचा पोत अन पिकाचा प्रकार न ओळखता केवळ साहेबाला सोप्पे जावे म्हणुण असा अट्टाहास!!!
|
Gs1
| |
| Wednesday, February 15, 2006 - 3:37 pm: |
| 
|
गिरीने दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे मंडले आहेत. प्रलोभन, उत्क्रांती आणि संस्कार. आवडले.
|
Aschig
| |
| Thursday, February 16, 2006 - 5:39 am: |
| 
|
मला रंग दे बसंती चा संदेश थोडा वेगळा वाटला. त्यांनी जरी असे दाखवले आहे की ते पाच तरुण एका पुढार्याचा खुन करतात, तरी त्यांना ते तेवढे मर्यादीत ठेवायचे न्हवते. त्यांचा संदेश असा आहे Either you accept your predicament, or stand up and be responsible. आणी हे तर कोणत्याही क्शेत्रात लागु आहे. तुम्हाला तुमच्या खानावळीतील जेवण नाही आवडत, बदला खानावळ कींवा उठवा आवाज. तुम्हाला दील्या जात असलेले शीक्शण नाही पटत, उठवा आवज आणी करा काही तरी ठोस. कशा करताच दुसर्यांकडे बोट दाखवायची गरज नाही. रस्ते, कचरा, बागा, जाहीराती, रीक्शावाले, पोलीस, पुढारी सगळे एक एक करुन सरळ होतील. गरज आहे ती सर्वांनी सक्रम होण्याची सर्व बाबतीत
|
Manya
| |
| Thursday, February 16, 2006 - 9:49 am: |
| 
|
ह्याचिच वाट बघत होतो, NRI ministry ला mail करणार होतो, तर आज हि बातमी वाचली, चला आत तरी आपला हक्क, कर्तव्य पार पाडुया. Union Cabinet clears voting rights to NRIs
|
Maanus
| |
| Friday, February 17, 2006 - 4:08 am: |
| 
|
आजपर्यन्त केलेल्या भ्रष्टाचाराचा तपशील. १० वीत असताना च्या सुमारास. शेतात विज नव्हती, १२ हजार रु. विज मंडलातील काही लोकांना. ११ वी, नव्यानेच ईंग्रजी माध्यमात होतो, काही केल्या ईंग्रजी कळत नव्हते, नापास होनार हे हमखास माहीत होते, नीकाला आधी मास्तराला जाऊन भेटलो... विचारले काही करता येईल का, एक बाटली द्यावी लागेल म्हनाले. बाटली वैगेरे कधी दिली नाही पन प्रत्येक विशयात ४० ४० मार्क पाडुन पास झालो. पुण्यातील एका अती ऊच्च महावीद्यालयातील ही गोष्ट आहे. आता तो मास्तर तिथे नाही ही गोष्ट वेगळी आहे. S.Y. महाविद्यालयातीलच एका शिक्षकाकडे शिकवनी लावली, जेनेकरुन कधिही तासाला नाही बसले तरी चालेल. व परिक्षे साठी महत्वाचे प्रश्न मिळतील. एव्हाना कामाला लागलो होतो आणि collage full time attend करणे शक्य नव्हते. मध्यंतरात चिकार वेळा P.U.C. वाल्यांना गाडीतला धुर न तपासता दिलेले पैसे. त्यांना धुर तपासा म्हटले तर कशाला उगाच आमचा व तुमचा पन time waste करता अशी उत्तरे. ४ वर्ष बिना परवाना गाडी चालवली परवाना काढायला गेलो, पन त्यांनी नापास केले. तासाभरात एका agent तर्फे परिक्षा दिली लगेच पास, परवाना हतात. थिएटर बाहेरील black वाले तर मस्त मित्राच झाले होते, special discount मधल्या rate मधे तिकीटे मिळायची. अजुन चिकार आहे, पन नको उगाच एखादा पत्रकार हात धरुन मागे लागयचा... भिती ह्यालाच म्हनतात वाटत. सकाळी दुध विकायचो आणि दिवसभर computer बदडायचो. त्यामुळे जवळ जवळ सगळ्या स्थरातील लोकाशी भेट व्हायची. गेल्या दिड वर्षापासुन new jersey/york मधे आहे पन अजुन एक दमडी पन कुनाला द्यावी लागली नाही अमुम एक काम करुन घेण्यासाठी.. म्हना इथे दैनदीन दिवसात फारच limited लोकांशी बोलने होत असते त्याममूळे माहित नसेल. माहीत नाही हे ईथे लिहीने कितपत बरे आहे.. पन एक general idea भ्रष्टाचार कुठे कुठे चालतो... व हा खरच आपल्याला थांबवता येनार आहे का हा प्रश्न...
|
Maanus
| |
| Friday, February 17, 2006 - 4:43 am: |
| 
|
अजुन एक गोष्ट... जाती व्यवस्था. हे लोक अजुनही जात का बघतात. एकदा एका महाविद्यालयातील प्राचांर्यांशी बोलत होतो. त्यांनी नाव विचारले.. फक्त पहिले नाव सांगीतल्यावर पुर्ण नाव विचारले. ते सांगीतल्यावर प्राचांर्यांचे उत्तर "नावावरून काहीच कळत नाहीय" माझ्या आडनावावरुन जातीचा आजीबात पत्ता लागत नाही. दुसरा किस्सा फारच ताजा आहे, दोन महिन्या पुर्विचा. व्हिएन्ना विमानतळावर माझे पुढचे विमान यायला थोडा वेळ होता. मी जरा आरम करत होतो तर माज्या शेजारच्या बाईने मला एक प्रश्न विचारला are you gujrathi मी टरकलोच हे काय? मी नाही म्हनालो, परत पाच मिनटाने तिच बाई what is your cast मी excuse-me ती what is your cast मी from a very low class cast त्यांन्तर ती बाई गप्पच, बघितले पन नाही माझ्याकडे. मी तिला एकदा विचारले पन "तमे गुजराथे छे?" तरी काही उत्तर नाही. हि बाई green card holder होती दोन उदाहरने, एक प्राचार्य, एक businessशी निगडीत जर, लोकंची अजुनही हिच प्रव्रुत्ती असेल तर कसे होनार.
|
Lampan
| |
| Friday, February 17, 2006 - 10:37 am: |
| 
|
माणुस तुमचं वरती परवान्याबद्दल लिहिलेलं वाचल .... माझा मोठेपणा म्हणुन नाही पण सांगतो ... मला २दा नापास केल पण ३र्या वेळेला मला बिना एजंट परवाना मिळाला 
|
Champak
| |
| Friday, February 17, 2006 - 10:53 am: |
| 
|
जी जात नाही ती जात! लोक शिकले सवरले पण सोयीस्कर रित्या जातीयवादी असतेत. जव्ह गरज पडेल तव्हा जातीचे फ़ायदे घ्यायचे अन वर सगळे समान असे दाखवायचे. मा. मा. मु. सुशीलकुमार शिन्दे चान्गल्या कामाने नाही त जातीने CM झाले. दुर्दैव हे!
|
माणुस, भ्रष्टाचाराच्या कथा काय सान्गाव्यात? असले दहा बीबी अपुरे पडतील! योग्य वेळी तुमचे हे मुद्दे घेऊन त्यावरही लिहिनच! चम्पक, ऍग्री, अर्थात या प्रश्णाच्या विविधान्गाना स्पर्ष करणे गरजेचे आहे, योग्य वेळेस लिहिन! बाकी तुमचे चालूद्या, मला पोस्टायला लई अभ्यास करायचा हे!
|
Moodi
| |
| Friday, February 17, 2006 - 1:41 pm: |
| 
|
खी खी खी माणुस तुझ्यासारखा अनुभव मलाही आलाय अन बर्याच जणांना आलाय. मलाही सहारा विमानतळावर एका बाईने विचारले होते, तमे गुजराथी छो? मी म्हटले नाही मी मराठी आहे, मग ती गप्पा मारायला लागली. बहारीनला पण असेच झाले माझ्याबरोबर असणार्या एका बाईने तोच प्रश्न मला विचारला मग मी वरीलच उत्तर दिले. मात्र त्या दोघी सासु सुना स्वभावाने खुप छान होत्या, तसेच दुसरे गुजराथी जोडपे मात्र मुंबईचे असल्याने मला म्हणाले आमच्याशी मराठीतच बोल शिरीष कणेकरांची कणेकरी वाच या विषयी, हसुन पोट दुखेल. दिनेश विषयांतराबद्दल क्षमस्व. भाग्या शेतकर्यांनाच काय महाराष्ट्रातील देशातील तमाम जनतेला वीज हवीय. पण सरकारच्या फुकट वीज देण्याच्या धोरणामुळे सत्यानाश झाला. गरीब शेतकर्यांकडे कुठुन आलाय पंप? त्यांना बिचार्याना त्यांच्या पीकाचेच पैसे वेळेवर मिळत नाहीत, कर्ज मात्र चक्रवाढ व्याजाप्रमाणे वाढत जाऊन मानेला विळखा बसवते. शेतकर्यांना खरी जरूर आहे तज्ञ मार्गदर्शनाची, शेतीला पोषक बियाणांची, पाण्याची. पण तेच वेळेवर मिळणे दुरापास्त आहे. स्वातन्त्र्यवीर सावकर म्हणाले होते की नद्या जोडणी प्रकल्पामुळे भारतात शेतीपासुन सर्वत्र पाणी खेळते राहील. पण लाल फितीचा कारभार, पाकिस्तान अन बांगला देशाचा विरोध त्यामुळे हे शक्य होत नाहिये. समाजातील खरे प्रश्न गरिबी, शिक्षण, नोकर्या, भ्रष्टाचार हे आहे. जोपर्यंत हा जातीच्या आधारावर आरक्षण मुद्दा निकलात काढुन आर्थीक परिस्थीवर आधारीत मुद्दा येत नही तोपर्यंत असेच होणार. समाजात विवीध क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, वकिल, इंजीनीअर, अर्थ तज्ञ यांनी जर नाममात्र अल्प दरात सल्ला देवुन पतसंस्था, दवाखाने, शेती, सहकार यात सल्ले दिले तर परिस्थिती सुधारु शकेल. पुण्यात एक बाई आहेत ज्यांनी दररोज काम करणार्या म्हणजे हातावर पोट असणार्या बायकांना संघटीत करुन एक पतसंस्था उभारुन परवडेल अशा कमी दरात कर्ज देऊन बरीच सुधारणा केली. त्या बायकाना पण बचतीचे महत्व पटुन त्यांच्या आर्थिक परिस्थीत फरक पडला. बायका जर अर्थ अन सहकार क्षेत्रात स्वताहून उतरल्या तर बरीच सुधारणा होवु शकेल.
|
Dineshvs
| |
| Friday, February 17, 2006 - 2:13 pm: |
| 
|
शेतकर्यांसाठी कर्ज आणि सबसिडी यावर किती दिवस अवलंबुन राहणार ? त्यामुळे सुधारित तंत्र आणि पाण्याचे नियोजन हे जास्त मह्त्वाचे मुद्दे आहेत. आपल्या किती मंत्र्यानी ईस्रायला भेटी दिल्या आणि त्या प्रमाणात शेतीच्या तंत्रात नेमक्या काय सुधारणा झाल्या ? अगदी पाटाचे पाणी जरी आले तरी बांध फ़ोडणे, आपल्याकडे पाणी वळवणे हेच प्रकार जास्त होतात. बांधार्यांची कामे नीट होत नाहीत कारण त्यासाठी कमी प्रतीचे साहित्य वापरले जाते, आणि ते बांधत असतानाच सगळ्याना माहित असते, तरिही कोणी अडवत नाही कारण तिथे गावच्या पुढार्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. पाण्याच्या नियोजनाबाबत मला आढळलेले एक खास ऊदाहरण. ओमानमधे फ़ारसा पाऊस पडत नाही, पिण्याचे पाणी हे त्याना फ़लाज म्हणजेच डोंगराच्या पोटातुन निघणार्या पाटापासुन मिळते. हे पाट नीट बांधुन गावागावातुन फ़िरवलेले असतात. यातले पाणी रोज तितकेच येते असे नाही पण नियमित मात्र येत असते. आता या पाण्याच्या वापराचे काहि नियम आहेत आणि ते कटाक्षाने पाळले जातात. पहिले म्हणजे कुणीही या फ़लाजमधे थेट काहि धुत नाही. स्वच्छ भांड्याने पाणी काढुनच ते पाणी वापरले जाते. यात कुणीही हात पाय, गुरे धुत नाहीत. पाण्याच्या प्रमाणावर ते आधी पिण्यासाठी, मग शिजवण्यासाठी, मग शेतीसाठी, मग गुरांसाठी, मग पुरुषांच्या अंघोळीसाठी व मग बायकांच्या अंघोळीसाठी वापरले जाते. या नियोजनाला कुराणाचा संदर्भ आहे असे सांगितले होते. पण ते महत्वाचे नाही, मह्त्वाचे आहे ते या नियमांचे कटाक्षाने होणारे पालन पाणी वापरण्यापुर्वी कायम पुढच्या गावकर्यांचा विचार केलेला असतो. ईथे मला आणखी एक मुद्दा मांडायचा आहे, कि जसे त्रिकालाबाधित सत्य असते तसेच त्रिकालाबाधित चांगले कर्म असते. आता आपला देश तथाकथित सुजलाम सुफलाम असल्याने आपल्याकडे भुकेल्याला अन्न व तहानलेल्याला पाणी देणे हे तितकेसे आवर्जुन सांगितलेले नाही. पण मुस्लीम लोकांच्या नमाजाच्या शेवटच्या टप्प्यात डावीकडे व ऊजवीकडे बघायचे असते. आता जरी तो ऊपचार म्हणुन ते लोक करत असले तरी त्या कृतिमागे, तुमच्या आजुबाजुला कोणी पिडीत भुकेलेला नाही ना ते बघा, त्याला समाधानी करा तरच तुमचा नमाज पुर्ण होईल असा संदेश आहे. आणि हे ते आवर्जुन पाळतात हे मी बघितलेले आहे. मस्कतला ईजिप्शियन बायका रमदानमधे सुर्य बुडायची वाट बघत ऊपास सोडायच्या तयारीत असायच्या, पण त्यावेळी कुणीहि आम्ही जरी समोरुन गेलो तर त्या आपले अन्न देऊ करायच्या. तर माझा मुद्दा असा, कि हे कृत्य कुठल्याहि परिस्थितीत चांगलेच आहे, केवळ त्यांच्यात आहे म्हणुन ते वाईट नाही. तर मला जे नेतृत्व अपेक्षित आहे, ते या कसोट्यांवर ऊतरणारे हवे. दुसरे असे कि जसे मी जनता पक्षाचा ऊलेख केला तसेच शिवसेनेचाहि करायला पाहिजे, एकेकाळी शिवसेनेचा आम्हाला खुप आधार वाटायचा, आता तसे आहे का ? तेंव्हा ते तसे वाटायचे कारण सेना तेंव्हा समाजकारण करत असे. म्हणजेच लोकाना जिंकण्यासाठी आधी समाजकारण करणे मह्त्वाचे आहे, एकदा लोकांचा विश्वास मिळवा, त्यावेळी कुठल्याहि पक्षाला बांधुन घेऊ नका. मग राजकारणात ऊतरा आणि त्यावेळी देखील या समाजकारणाची कास सोडु नका.
|
Pama
| |
| Friday, February 17, 2006 - 3:12 pm: |
| 
|
वरचे मुद्दे वाचले. भ्रष्टाचार कुठेकुठे आणि किती खोलवर रुजला आहे याचे माणूस नी चांगली उदाहरणे दिली आहेत. नेते भ्रष्ट आहेत, मोठमोठ्या कंपन्यांमधल्या व्यवहारांमधे भ्रष्टता आहे, मंत्री भ्रष्ट आहेत हे फार दूरच बोलतो आपण. अगदी रोजच्या व्यवहारातील साध्या साध्या व्यवहारांमधे सुद्धा' खाऊ' घालल्याशिवाय काम होत नाहीत. आणि हे तर उघड सत्यच आहे. त्याचे काही पुरावे सादर करण्याची पण गरज नाही. लंपन म्हणतो ते अगदी पटते. दोन वेळा नापास केले तिसर्यांदा पास केले. आपला वेळ आणि पैसा वाया जातो म्हनून आपण कित्येकदा तरी.. जाऊ दे, देऊन टाक ५- ५० रुपये, १० मिनिटत काम होईल. इथे रोज रोज खेटे घालायला कुणाला वेळ आहे.... अशी स्वतची समजूत घालून, सगळेच करतात, त्यात काय.. अस आपल्या मनाला समजावून टाकतो. अगदी अलिकडच उदाहरण माझ्या बाबतीत घडल ते विसा वर असलेला वेवर मंजूर करू घेण्याबाबतीत. ते' ना हरकत पत्र', पुलीस स्टेशन, पासपोर्ट ऑफिस आणि मंत्रालय या ठीकाणांहून लागणार होत आणि केवळ १ महिना होता हातात. जाताना पैसे न चारता काम करून घेण्याच ठरवल होत. १५ दिवस होऊन गेले तरी मंत्रालयात हलचाल काय.. माझ application जिथल्या तिथे होत. शेवटी एकांची ओळख सांगितली तेव्हा ते पुढे सरकल. आता ओळख सांगितली ती मोठी व्यक्ति होती त्यामुळे त्यांना काम करण भाग पडल. तरी शेवटचा उपाय काढलाच.. अगदी शेवटची step , ज्याच्याकडे ते पत्र पास होऊन आल तो ते मला मिळालय हे कबूल करायलाच तयार होईना. ३ दिवस त्याची मनधरणी करूनशेवटी म्हट्ल आता जाण्याचा दिवस आला. तेव्हा त्याला कंठ फुटला आणि काय राव, डॉलरात कमावता, १०-२० डॉलर काय जड आहेत का? असे स्पष्टच विचारले. तेव्हा आमचा student विसा होता.. खरच जड होतेही १०- २० डोलर अशे कोणालातरी चारायला. शेवटी आमची दया येऊन तरी किंवा आमची कीव करून त्याने ते पत्र आदळलेच जवळपास आमच्या हाती. शिवाय ओळख सांगितलेल्या साहेबांना सांगू नका हे सांगायला विसरला नाही तो. ओळख सांगून काम करून घ्याव लागल याची बोच अहेच. वेळ नव्हता तुमच्या कडे हे आम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला अगदी घरच्यांनीही, पण माझ्याकडून या झाडास थोडका होईना, पाणी घातल्या गेल याची अजूनही खंत वाटते. सांगायचा मुद्दा हा कि इतक खोलवर रुजलेला हा रोग काढायचा म्हणजे १-२ दिवसांच काम नाही. रोजच्या साध्या साद्या व्यवहारात तरी आपल्याकडून भ्रष्टाचाराला खतपाणी मिळाणार नाही इतक जरी प्रत्येकानी केल तरी सुरवात नक्कीच होईल त्याला मुळापासून सांपवण्याची. रं दे ब च्या निमित्तने मला वाटत हेच अधोरेखीत केलय... सुरवात करा, कुठून कशी करता हे गौण आहे. म्हणूनच, त्या मुलांनी जो मार्ग अवलंबला तो चूक की बरोबर हे तितक महत्वाच नाही. त्यांनी सुरवात केली. एकदा ठिणगी पेटली की ती जळत ठेवण प्रत्येकाच्या हाती आहे. सुरवातीला चुका होतील, पण मग बरोबर मार्ग सापडत जातील. ......... करवॅ बनता जायेगा. system मधे शिरून ती बदलायचा प्रयत्न झाला पाहिजे हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता हेच बघा.. इतके जन इथे तळमळीने लिहितायत, तितके सच्चे आणि स्वच्छ नेते, ऑफेसर आणि इअतरही क्षेत्रात काम करणारे लोक आहेत आणि प्रत्येकानी आपला खारीचा वाटा उचलून निदान आपल्या आजूबाजूला तरी असे स्वच्छ भ्रष्टाचाराच्या प्रदुषणरहित वातावरण ठेवले तरी मोठीच सुरवात झाली म्हणायची!!
|
Champak
| |
| Friday, February 17, 2006 - 3:13 pm: |
| 
|
शेतकर्यांसाठी कर्ज आणि सबसिडी यावर किती दिवस अवलंबुन राहणार ?....... >>>> सद्य परिस्थितीत, प्रदुषण अन पाण्याचे दुर्भिक्ष ह्यामुळे शेती धंदा फ़ार खर्चिक झाला आहे. जमिनी पिकवण्यापेक्षा त्या खाट्या ठेवल्या त परवडेल अशी पर्तिस्थिती आहे. त्यामुळे ह्याला सबसिडि देणे गरजेचे आहे. खर्च वाढले अन उत्त्पन्न कमी, ह्यामुळे शेती फ़ार भांडवली उद्योग झाला आहे. input नसेल त output कसे मिळणार, ह्यामुळे सुरुवातीच्या काळात लागवड अन देखभालीसाठी नियमीत अन कमी दराने कर्ज मिळायला हवेच. सधन शेतकरी एक वेळ भांडवल गोळा करु शकतो पण अल्पभुधारकाला हा खर्च करणे शक्य नसते अन मग तो शेतमजुर बनतो. भ्मीहीन शेतमजुर हा वेगळाच विषय आहे. फ़क्त मोसमी कामे अन कमी मजुरीचे दर ह्यात च तो अडकलेला असतो. नवे तंत्रज्ञान वगैरे ठिक पण ते त्या शेतकर्यापर्यन्त पोहचत नाही. कारण उदासीन अधिकारी अन अगम्य भाषेत दिली जाणारी माहीती. बदलाला विरोध करणे हा काहींचा स्थायीभाव असल्यानी, नवे तंत्रज्ञान रुजवणे वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, ह्या उक्तीने तरुण पोरांना शेती करायला उद्युक्त केले तर च आस पास चे छोटे शेतकरी त्यापासुन प्रेरणा घेवु शकतात. अर्थात, ह्या फ़ोरम वर शेतकरी अन शेतकरी कुटुंबातील किती लोक आहेत हा प्रश्न च असल्याने फ़क्त चर्चा च होउ शकते. अर्थात, IT सारख्या पैसेवाल्या क्षेत्रातील लोकांनी जर शेती कडे भांडवल पुरवठा केला त मजा येईल. नविन कृषी धोरणात कंपनी शेटी अथवा सामुहिक शेतीला कंपनी चे स्वरुप देण्या चा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे सुशिक्षित लोकांनी तिकडे हि invest करायला हरकत नाही. हे करित असताना बोगस सागा ची झाडे लावणार्या कंपन्यांपासुन बचाव करावा. एकुण, भांडवली गरजा पुर्ण होण्या साठी काही काळ सबसिडी अन कर्जे देणे योग्य आहे, नव्हे ती गरज च आहे! हे करताना फ़क्त सधन शेतकरी गैरफ़ायदा घेणार नाहीत ह्याची काळजी घेणे गरजेचे. बिर्ला अन टाटा समुहाने दिंडोरी, नासिक जवळ contract farming केले आहे. फ़ुलशेती अन फ़ळबागा अथवा कृषी पर्यटण हे यातील पुढचे टप्पे आहेत......
|
Bsa
| |
| Friday, February 17, 2006 - 3:41 pm: |
| 
|
champak... सामुहीक शेतीची कल्पना खुपच आवडली.. याचे फ़ायदे खुप आहेत...पण दुर्दैव असे की एकी नसल्याने अवघड आहे..पण नक्कीच अशक्य नाही...
|
Maanus
| |
| Friday, February 17, 2006 - 4:02 pm: |
| 
|
२-३ वर्ष मी देखील IT मधे येण्यापुर्वी शेती आणि दुध व्यवसायाचा प्रयत्न केला होता. आमच्या शेतात विहीर होती म्हनुन पाण्याचा कधीच त्रास झाला नाही. पन विज नाही, शेत अगदी गावाला चिकटून तरीही M.S.E.B. विज द्यायला तयार नाही. जमिन आहे पन ती खडकाळ. त्यात पिक येउन येउन ते किती येनार. व त्यात पिक आल्यानंतरचे वाटे ते किती. मग दुधाचा व्यवसाय सुरु केला. पहील्या वर्षी ओला दुश्काळ व पुढची दोन वर्ष सुका दुश्काळ... झाले ३ वर्ष गुरांना खायला चांगल चारा देताच आला नाही. सगळी गुर खराब झाली... दुध पन नाही आणि जी कर्ज झाली ती विचारु नका. बर फक्त natural or government problem नसतात, unskilled labour हाताळायचे म्हनजे एक प्रचंड मोठे व विचित्र काम असत. त्यांचे नखरे, भांडन. एकदा एक भिंन्त बांधायची होती, त्या पठ्याने ७ दिवस घेतले. अशिच एक भिंन्त मला इथे बांधावी लागली मोजुन २ तास लागले. ह्यात काही राम नाही हे कळाले, देवकृपेणे तेव्हाच एक संगणकातली नोकरी लागली आणि मग अता झालेली कर्ज कमी करतोय. माझ्या आधिच्या लेखनातुन मला सामाण्य माणसाच्या दैनंदीन जिवनातले प्रसग सांगयचे होते. common man रोज रोज कोणत्याच पुढार्याला भेटत नसतो. basic needs मधला भ्रष्टाचार तरी कमी करता आला पाहीजे.
|
Champak
| |
| Friday, February 17, 2006 - 4:04 pm: |
| 
|
अरे ग्रामीण भागात अजुनही जे लहान शेतकरी असतात, ज्यांना कमी बैल असतात, ते लोक इतर शेतकर्यांच्या मदतीने शेतीची मशागत करतात. म्हंजे दोन शेतकर्यांनी प्रत्येकी २ बैल असतील त ते दोघे एकत्र येउन ४ बैला च्या सहाह्याने दोघांच्या ही शेताची नांगरणी करतात. याला सावड करणे असे म्हणतात. सामुदायीक शेती तशी अवघड गोष्ट आहे, पण पाणी वाटप संस्था अथवा उपसा जलसिंचन सारखे प्रकल्प, अनेक शेतकरी एकत्र येउन राबवतात, अन बहुतांश ठिकाणी हे यशस्वी ही होते.
|
Ajjuka
| |
| Saturday, February 18, 2006 - 5:20 am: |
| 
|
गिरी, प्रलोभने, संस्कार आणि शुचिता बाळगणे... सगळेच पटले. प्रत्येक माणसाला हे जमले तरी खूप होईल. बाकी शेतकरी समस्या आणि पाणि प्रश्नाबद्दल मी फार काही बोलू शकणार नाही पण संदर्भासाठी एका पुस्तकाचे नाव देते आहे. विलासराव साळुंख्यांचे वीणा गवाणकरांनी लिहिलेले चरीत्र ' आम्ही भगीरथाचे वारस'
|
Dineshvs
| |
| Saturday, February 18, 2006 - 3:18 pm: |
| 
|
शेतकरी कर्ज घेऊन, आपला स्वाभिमान गमावुन बसतो, तसे न होता त्याला कर्ज मिळाले पाहिजे. आणि नविन तंत्र हे अगदी अत्यावश्यक आहे. आपल्याकडे ते नाही असे नाही, फ़क्त ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. सध्या ईथे १५५१ या नंबरवर हेल्पलाईन आहे, तिथे तुमच्या भाषेत उत्तरे दिली जातात. जसे पर्यटन ऊद्योगात नवीन पिढी शिरलीय तशी शेतीतहि शिरायला हवीय. शहरात नोकर्या मिळवणे आता तसे कठीणच आहे. हा लोंढा आता तसा मंदावला आहे. पण तरिहि ओसाड जमीनी बघुन वाईट वाटते. अलिकडे राजस्थानात भटकलो तर तिथली हिरवाई डोळ्यात भरली, आपल्याकडे तर काकणभर जास्तच पडतो कि पाऊस. त्यामुळे या नियोजनात तरुणानी शिरायला हवे. एकंदर अडाणीपणामुळे म्हणा किंवा दशहतीमुळे म्हणा शेतकरी नेहमी गप्पच बसतो. तो भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज ऊठवत नाही. शिवाय शेतकी संशोधनामुळे, तो आता तितका आतबट्ट्याचा व्यवहार राहिलाय असे नाही. कर्ज जर शेतीसाठी घेतले असेल तर ठिक हो पण तो पैसा हुंडा आणि जेवणावळीत जात असेल तर ? समाजकारणाची सुरवात ईथुनच व्हायला हवीय.
|
Dineshvs
| |
| Tuesday, February 21, 2006 - 3:47 pm: |
| 
|
साप्ताहिक सकाळच्या ताज्या अंकात म्हणजे २५ फ़ेब्रुवारी तारिख असलेल्या अंकात, गणेश मतकरीनी रंग दे बसंतीची छान समीक्षा केलीय. याचे शीर्षक आहे, आपलाच आवाज, अगदी चपखल वर्णन. त्यातली काहि वाक्ये ईथे द्यायचा मोह होतोय. ( ईथे डोंबिवली फ़ास्ट चा पण संदर्भ आहे ) या चित्रपटांचा विशेष हा कि, हो क्रांतीची गरज ऊघडपणे मानणारे हे पहिले दोन चित्रपट आहेत. त्यांचे नायक आपल्यासारख्या सामान्य माणसांची भाषा बोलताहेत, आपलच प्रतिनिधित्व करताहेत. या चित्रपटांच्या निर्मितीमागे केवळ व्यावसायिक गणितांपेक्षा अधिक काहि आहे. एक विचार आहे. जो आपल्याला वेळीच जागं होण्याचा ईशारा देतो आहे. या भ्रष्टाचार्यांमधलं एक व्हायचं का, त्यांआ विरोध दर्शवायचा, हा निर्णय घेण्याची वेळ आल्याचं आपल्याला सांगतो आहे. बाजु निवडणं हाच पर्याय दाखवुन देतो आहे. - - - कि असंतोष पसरायला सर्व थरात सुरवात झाली आहे आणि या असंतोषाची नोंदहि घेतली जाते आहे. हि एका जागृतीची सुरवात आहे आणि तिच्याकडे केवळ करमणुकिसाठी केलेली कलानिर्मिती म्हणुन पाहणं चुक ठरेल. ईथे RDB ला High Concept सिनेमा असे म्हंटले आहे. माझा हा BB ऊघडण्यामागचा हेतुहि हाच आहे.
|
Champak
| |
| Tuesday, February 21, 2006 - 4:43 pm: |
| 
|
http://www.esakal.com/20060221/yuv_nivadak9.html सकाळच्या २6 फ़ेब्रुवारी तारिख असलेल्या अंकात,
|
Dineshvs
| |
| Tuesday, February 21, 2006 - 5:05 pm: |
| 
|
चंपक, तु लिंक दिलेल्या लेखाशी मी सहमत नाही. ( शिवाय मी दिलेला संदर्भ साप्ताहिक सकाळ मधला आहे. शिवाय या सिनेमाची धुम वैगरे सिनेमाशी केलेली तुलनाहि गैर आहे. या सिनेमाला अजिबात फ़ॅंटसीची झाक नाही. ) मला नाहि वाटत RDB बघितल्यानंतर आपले मन हिंसाचाराच्या बाजुने वळते. खुप वाईट वाटते त्या तरुणांसाठी. ऊलट हिंसाचार ते नाही करत तर आधी राजकारणी आणि नंतर कमांडोज करतात. हातात शस्त्र असुनहि ते एकाच व्यक्तीला मारतात. ईतर कुणावरहि हल्ला करत नाहीत. पण त्यानी केलेला हिंसाचार आणि भ्रष्ट राजकारणी आणि व्यापारी यानी घडवुन आणलेला हिंसाचार याची जातकुळी वेगळी नाही का ? आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते फ़क्त गांधीजींच्या मुळे असा एक पद्धतशीर प्रचार केला जातो, आणि या वेड्या क्रांतीकारकांची चेष्टा केली जाते. हे बरोबर आहे का ? आणि प्रस्थापित छुप्या हिंसाचाराच्या नायनाटासाठी जर हा शेवटचा ऊपाय असेल, तर मी या हिंसाचाराचे जोरदार समर्थन करीन.
|
Moodi
| |
| Tuesday, February 21, 2006 - 5:31 pm: |
| 
|
सॉरी दिनेश निदान आज या तुमच्या मतावर तरी मी तुमच्याशी सहमत होवु शकत नाही. का ते उद्या सविस्तर लिहीन. 
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 22, 2006 - 1:26 am: |
| 
|
मूडि, मी वाट बघीन. या सिनेमात दोष नाहीत असे नाही, त्याचेहि उल्लेख वरील लेखात आहेतच. आणि चर्चा तर मलाहि हवीच आहे, मतभेद असले तरी मांडायचेच. क्रांतिकारकांची चेष्टा झाली हे पटत नाही का ? सावरकरांची ऊपेक्षा झाली नाही का ?
|
Moodi
| |
| Wednesday, February 22, 2006 - 10:30 am: |
| 
|
सॉरी दिनेश आजही वेळ मिळत नाहिये. पण तुम्ही त्या सा. सकाळमधील लेखात काय लिहीलय याची जरा कल्पना द्याल का? कारण तो आम्ही वाचु शकत नाही, वेबवर किंवा निदान इथे तरी उपलब्ध नसल्याने..
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 22, 2006 - 4:10 pm: |
| 
|
मूडि तो लेख आता ईथेहि दिसत नाही. त्या लेखकाला हा सिनेमा नीट कळला नाही बहुदा. त्याने असे विधान केले होते कि सिनेमा संपल्यावर आपल्या मनात फ़क्त हिंसाचारच राहतो. शिवाय सवंग गाण्यांच्या लोकप्रियतेबद्दल काहि विधाने केली होती. शिवाय हा लेख फ़क्त या सिनेमाबद्दल नव्हता. अगदी गावपातळीवर देखील सत्ता हातात आली तर सत्ताधारी कसे भ्रष्ट होतात, त्याची दोन ऊदाहरणे ( संदर्भ साप्ताहिक सकाळ, लेखक डॉ. अर्चना फ़णसळकर, मंगेश जोशी, सुनील पाटिल, विनिता ताटके. लेखाचे नाव, आपली वाट पहात आहेत, महाराष्ट्रातल्या अनेक सोनमांजरी. ) हे गाव पुणे नांदेड रोडवर लोहा तालुक्यात आहे. अर्थात हे फ़क्त ऊदाहरण म्हणुन. तिथले ऊतारे. त्यांच्यातल्या एकाने गावात मोलमजुरी करुन आणि जनावरांचा व्यापार करुन चार पैसे कमावले आणि गावात जमीन घेतली. त्या जमिनीवर त्याने मोसंबीची बाग केली. झाडाना फ़ळे लागल्यावर गावातले बरेच जण त्यांच्यासमोरच फ़ळे तोडुन नेत. कोणाशी भांडण नको म्हणुन फ़ळे द्यायला ते तयार होत. पण बागेतुन तोटाच जास्त होवु लागल्यावर त्यांनी स्वताच्याच हाताने सर्व मोसंबीची झाडे तोडुन टाकली. आज हे कुटुंब आपला सर्व व्यवहार लोह्यात करतं आणि फ़क्त मुक्कामाला गावात येतं. अशीच दुसरी कहाणी ऐकायला मिळाली. अशाच एका लिंगायत शेतकर्याने जनावराना पाणी पिता यावे म्हणुन गावात एक हौद बांधला. त्या शेतकर्याचा मुलगा हौदाजवळ असताना पोलिस पाटलाच्या नातेवाईकाच्या शेळ्या पाणी पिण्यासाठी आल्या, शेतातले कुत्रे त्यांच्यावर भुंकत असल्याने, मुलाने कुत्र्याला बाजुला केले. पण पोलिस पाटलाने मात्र आपल्या नातेवाईकासह लोहा पोलिस स्टेशनमधे जाऊन, मुलाने शेळ्यांवर कुत्रे सोडले व कुत्रा शेळीला चावल्यामुळे शेळी मृत पावली अशी तक्रार नोंदवली. या प्रकरणातुन सुटण्यासाठी शेतकर्याला रु १,५०० दंड भरावा लागला. पैसे संबंधितानी आपापसात वाटुन घेतले. शेतकर्याने वैतागुन पाण्याचा हौद तोडुन टाकला.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|