|
Milya
| |
| Friday, March 07, 2008 - 8:28 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मॅट्रीक्स ह्या साईट बद्दल ऐकले आहे का? तुम्ही थोड्याकाळाकरता परदेशी जात असाल तर ही साईट त्या देशातले post paid कार्ड तुम्हाला देशातच देते... त्यासाठी काहीही रेंटल घेत नाही... फक्त पासपोर्टची आणि क्रेडिटकार्डची फोटोकॉपी द्यायची त्यांना आणि क्रेडिटकार्डवर ते Rs 10000 authorization घेणार सिक्युरिटी म्हणून. आल्यावर तुम्ही फोन जसा वापरला असेल तसे बिल भरायचे आणि ते तुमच्या क्रेडिटकार्ड वर काहीही चार्ज करणार नाहीत... तर ह्यात काही फ़सवणूक असू शकते का? कुणाला काही अनुभव असेल तर कृपया लगेच सांगा. अर्जंट आहे
|
Meenu
| |
| Friday, March 07, 2008 - 9:06 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मिल्या तू म्हणतोस ते नाही माहीत मला .. पण मी US ला जाताना इथून airtel prepaid international calling card घेऊन गेले होते. US ला गेल्यावर असं लक्षात आलं की तिथे मिळणारी international calling card जास्त स्वस्त आहेत .. तिथे 2$ मधे एक तास आणि इथे तासाच्या टॉक टाईमसाठी ५०० रुपये भरावे लागले.
|
मिल्या मला कॉल कर. माझ्या मते असल्या रिस्क घेण्याऐवजी युकेत चांगली कॉलींग कार्ड मिळतात ती वापर. काही लागल्यास मला फोन कर. ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
>>>>> क्रेडिटकार्डची फोटोकॉपी द्यायची त्यांना यात बरीच म्हणजे फारच रिस्क आहे! खास करुन कार्ड नम्बर, नावासहीत मागिल तिन आकडी नम्बर कळविण्यात! (मी एकदाच तो मुर्खपणा केला होता) कोणालाही कार्डची फोटोकॉपी देवु नये असे कार्डकम्पन्या सान्गतात! (नम्बरही फोनवर मोठ्याने सान्गु नये अस सान्गतात) तेव्हा ही रिस्क घेवु नये असे माझे मत! आम्ही कम्पनीचे फॉर्म्स फाईल करताना वेगवेगळ्या डायरेक्टरान्च्या कार्ड्सचे तपशील वापरुन फिया भरतो, पण तो विश्वासाचा मामला अस्तो! इथे तसे काही नस्ते, ती झेरॉक्स कुणाच्याही हातात पडली तर काहीही होऊ शकते! त्याची जबाबदारी कोण घेणार? निदान कार्ड हरवले तर ज्याचे त्याला कळते तरी, कुणाला तरी दिलेली झेरॉक्स हरवली / चोरली गेली तर काय कप्पाळ कळणार?? तेव्हा असले काही करु नये! इति लेखन सीमा
|
Pha
| |
| Friday, March 07, 2008 - 2:01 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मिल्या, हे वाच : http://www.mouthshut.com/product-reviews/Matrix_Cellular-925062753.html अर्थात, या इंटरनेटवरच्या रिव्ह्यूंची विश्वासार्हता तशी कमीच मनायला हवी. तरीदेखील केप्या म्हणतोय तसे यूकेमधल्या सोयी कशा आहेत तपासून बघ.
|
Palas
| |
| Wednesday, March 26, 2008 - 5:23 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मी माझ्या recent swiss आणि german trip मधे मट्रिक्स चे SIM कार्ड नेले होते. दिवसाला १ फ्रॅन्क घेतले पण service खुपच छान होती. short trip वर असताना फोन कार्ड घेण्यासाठी indian store शोधा किंवा internet sites शोधा ह्या पेक्षा हा उपाय चांगला आहे. मुख्य म्हणजे तुमच्या जवळ सतत एक नंबर असतो ज्यावर लोकल माणुस देखील contact करु शकतो. मट्रिक्स चे लोक घरपोच सेवा देतात.
|
|
मायबोली |
![](/images/dc.gif) |
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|