|
Hkumar
| |
| Tuesday, December 11, 2007 - 4:39 am: |
|
|
अनेक देशांच्या चलनांचे एकमेकाशी असलेले conversion rates हे कसे ठरवले जातात याबद्दल कोणी सोप्या भाषेत माहिती देऊ शकेल का? ही माहिती internet वर असेलच पण प्रत्येकाला तेवढा वेळ देता येत नाही आणि ती क्लिष्टही असू शकते.
|
Maanus
| |
| Wednesday, December 12, 2007 - 2:17 am: |
|
|
theoretically its based on something called as PPP, Purchasing Power Parity USD/INR = (gold price in INR / gold price in USD) but in real world it doest work this way. there are many other factors you have to consider. most important interest rate. I dont know how exactly it works. plus you dont do USD to INR directly. apart from major currency players, every other country is based on some major currency. like INR is based on british currency, I think. (i may be incorrect though). mostly currency trades are done to safe guard your positions. lets say you have purchased 100 oil barrels @ 80 USD for Feb 08. You dont know what will be oil price in Feb 08 or USD price will be in Feb 08, so you make another deal, lets say USD / CAD with some fixed future forex rate, which'll cover any loss if you may encounter. how you decide weather you should do a forex or not, depends on few greeks and VaR (Value at Risk) now I may have said many things wrong, because I just know how to produce these greeks and VaR, but dont know how to use them yet. but overall thats the idea. individuals generally dont trade currencies. but there are few who does, one just lives above me, he has 7 computers and just keeps trading in forex. go through this link
|
Hkumar
| |
| Wednesday, December 12, 2007 - 7:37 am: |
|
|
धन्यवाद माणूस. आभारी आहे. खरे सांगू, नाही कळले. विषय अवघड आहे. अजून कोणी सोप्या भाषेत आणि मराठीत(!) समजावल्यास बरे होईल. आणि ती लिन्क वगैरे नको बुवा! internet वर गोंधळायला होते.
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, December 12, 2007 - 8:53 pm: |
|
|
ऐच कुमार करन्सी ही एखाद्या स्टॉक प्रमाने ट्रेड केली जाते. ज्या दिवशी बाजारात जास्त डॉलर्स उपलब्ध असतात त्या दिवशी त्याची किमंत रिलेटिव्हली कमी होते. ( जसे एखाद्या शेअर्स च्या बाबतीत होते अगदी तसेच). हे झाले किमंत डिसाईड झाल्यावर पण डिसाईड करताना मात्र त्या देशाच्या PPP लक्षात घेतला जातो. ( नविन देश रोज निर्मान होत नसल्यामुळे फक्त एकदाच हे केले जाते) नंतर मात्र करन्सी ट्रेडींग केली जाते. १५ दिवसांपुर्वी आपल्या RBI ने भरपुर डॉलर्स विकत घेउन पडनारा डॉलर थोडा थांबविला. शेअर मार्केट ला लागु होनारे सर्व रुल तिकडे ही लागु होतात जसे ऑप्श्न्स ( त्याला तिकडे फॉरवर्ड कव्हर म्हणले जाते). तुम्हाला आज जर वाटले की उद्या डॉलर चा भाव ५० रु होनार असेल तर तुम्ही आज काही जास्त पैसे देउन फॉरवर्ड क्व्हर विकत घेउ शकता. जर भाव वाढला तर तुमचा फाय्दा कारन तुम्ही आज विकत घेतले जर वाढला नाही तर तुमचा प्रिमीयम वाया गेला.
|
Maanus
| |
| Thursday, December 13, 2007 - 5:49 am: |
|
|
हम्म्म, केदार ने demand/supply बद्दल सांगीतलेय. मी परत एकदा currency trading का करतात हे सांगायचा प्रयत्न करतो. तुम्हाला थोडेफार गणित यायला पाहीजे, नाहीतर हे समजनार नाही. I am taking example of Natural Gas as my main trading commodity. Unit of measure for Natural Gas is MMBtu. To show currency trading I am taking Swiss Franc as example. Symbol CHF my account book तारीख्: nov 26 1 MMBtu = 6.5 USD 1 USD = 1.0989 CHF 1 CHF = 0.910 USD (1/1.0989) so lets say I have purchased 100 MMBtu Gas. I have also purchased swiss francs worth 1000 USD. so my book looks like 100 MMBtu Gas @ 6.5 USD = 650 USD 1000 USD @ 1.0989 CHF = (1,098.90 CHF) तारीख्: Dec 10 Todays price chart looks like this 1 MMBtu = 6.0 USD 1 USD = 1.1363 CHF 1 CHF = 0.880 USD (1/1.1363) so my book looks like 100 MMBtu Gas @ 6.0 USD = 600 USD loss of 50 1,098.90 CHF @ 0.880 USD = (1,248.35 USD) profit of 248.35 total profit 248.35 - 50 = 198.35 USD आता विचार करा जर मी २६ तारखेला १००० चे francs विकत घेतले नसते तर आज मला ५० चा लॉस झाला असता. पण मी francs विकत घेतलेले, म्हणून गॅस वरचा तोटा जावुन मला actually profit झालाय. आता तुम्ही म्हणाला की मी फक्त francs का विकत नाही घेतले, gas घ्यायची काय गरज होती. तर gas ची किंमत अशी ६.५ वरुन ६ वर जात नसते, व पैसे कमवण्यासाठी मुख्य गोष्ट gas आहे. currency trading is only to safeguard yourself if anything goes wrong. this is called as hedging. जेव्हा जगभरात खुप लोक आपले मुख्य उद्योग वाचवण्यासाठी, currency trading करतात तेव्हा obviously एखाद्या currency चा supply कमी होतो तर कुणाचा जास्त. व त्याच्यामुळे पैशाच्या किंमती वर खाली होतात. जगभरात रोज साधारण 2.5 trillion $ trade होतात.
|
फॉरेक्स किंवा फॉरिन करन्सीचा दर (परकीय चलन विनिमयाचा दर) हा सर्वसाधारणपणे मागणी आणि पुरवठा या तत्वावर आधारीत असतो. ज्या करन्सीला जास्त मागणी (नजीकच्या भविष्यात) त्या करन्सीचा दर वाढतो. उदा. भारतात २००३-२००४ सालापर्यंत १ US $ ला ४५ रू. पडत होते. परंतु गेल्या ३-४ वर्शांपासून परकीय आर्थिक संस्था मोठ्या प्रमाणात शेअरबाजारात गुंतवणूक करत आहेत. समजा मेरील लिंचने मुंबई स्टॉक एक्स्चेंजवर ५० कोटी रूपयांचे शेअर विकत घेतले, तर त्यांना शेअरची किंमत US $ मध्ये द्यावी लागेल. म्हणजे ५० कोटी रूपयांकरता त्यांना सध्याच्या विनिमयाच्या दरानुसार सव्वा कोटी डॉलर्स द्यावे लागतील. हे डॉलर्स बॅंकेत जमा होतील व शेअरच्या विक्रेत्यांना बॅंकेकडून रूपयांच्या स्वरूपात ५० कोटी रूपय मिळतील. म्हणजे हा व्यवहार पूर्ण झाल्यावर मेरील लिंचला शेअर मिळतील, शेअरच्या विक्रेत्यांना ५० कोटी रूपये मिळतील, आणि बॅंकेच्या स्वतःच्या खात्यात सव्वा कोटी डॉलर्स वाढतील व ५० कोटी रूपये कमी होतील. अशा अनेक परकीय संस्थांनी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक केली तर बॅंकेकडचा डॉलर्सचा साठा वाढेल व रूपयांचा साठा कमी होईल. साधारणपणे २००२-०३ पर्यंत भारतात दरवर्षी २-३ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक होत होती. परंतु गेल्या ३-४ वर्षात हे प्रमाण वर्षाला सरासरी १५-१६ अब्ज डॉलरपर्यंत गेले आहे. त्याचबरोबर भारताची निर्यात गेल्या काही वर्षात खूप वाढली आहे. त्यामुळे भारताची परकीय चलनाची गंगाजळी २५० अब्ज डॉलर्सपर्यंत पोचली आहे (हीच गंगाजळी २००४ मध्ये, म्हणजे वाजपेयी राजीनामा देताना १२० अब्ज होती तर १९९६ मध्ये, म्हणजे नरसिंहराव जायच्या वेळी ३० अब्ज डॉलर्स होती). त्यामुळे भारतात परकीय चलनाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे डॉलरचा भाव ३९ रूपयापर्यंत आला आहे. भारताने Floating Exchange Rate चे धोरण स्वीकारल्यामुळे रू-डॉलर चे गुणोत्तर रोज बदलत असते. या धोरणात विनिमयाचा दर मागणी व पुरवठा यावर ठरतो. त्याचबरोबर Balance of Trade म्हणजेच आयात-निर्यातीतली एकूण तफावत, दोनही चलनांवरील व्याजाचे दर (हे त्या चलनाच्या सामर्थ्यानुसार ठरतात. साधे उदाहरण म्हणजे रूपयात ठेवलेल्या Fixed Deposit ला जास्त व्याज दर मिळतो, डॉलर्समध्ये ठेवलेल्या FD ला तुलनेने कमी व्याजदर मिळतो, तर ब्रिटिश पाऊंडची स्थिरता डॉलर्सपेक्षा जास्त असल्यामुळे त्या चलनातल्या FD ला अजून कमी व्याजदर मिळतो.), महागाईचा दर, Purchasing Power Parity , आणि परकीय गुंतवणुकीचे प्रमाण या घटकांचा सुद्धा विनिमयाच्या दरावर परिणाम होतो. काही देशांनी (उदा. सिंगापूर) Fixed Exchange Rate हे धोरण स्वीकारले आहे. या धोरणात त्या दोन देशांच्या चलनाच्या दराचे गुणोत्तर हे स्थिर असते. यातला अजून एक प्रकार म्हणजे Managed/Dirty Float . या प्रकारात, दोन चलनातला विनिमयातला दर हा Floating असतो. परंतु दोनपैकी एक चलन खूप महाग किंवा खूप स्वस्त होऊ नये किंवा विनिमय दरातला बदल एका विशिष्ट Range च्या बाहेर जाऊ लागला तर रीझर्व्ह बॅंक हस्तक्षेप करून दर नियंत्रणात आणते. बहुतेक वेळा Floating Exchange Rate आणि Managed/Dirty Float हे धोरण एकत्र राबवले जाते. गेल्या काही महिन्यांपासून रु-डॉलर विनिमयाचा दर वेगाने घसरत आहे. रूपया सशक्त होत आहे तर डॉलर दुर्बल होत आहे. डॉलर ३४-३५ रूपयापर्यंत घसरला तर निर्यातीवर अतिशय वाईट परिणाम होईल. निर्यातदारांची डॉलरमधली निर्यात वाढूनसुद्धा त्यांच्या हातात प्रत्यक्षात कमी रूपये येतील. त्यामुळे त्यांचा निव्वळ नफा घसरेल. नफा घसरला की त्यांची वाढ खुंटेल. नवीन नोकर्या निर्माण होणार नाहीत. कदाचित आहेत त्या कर्मचार्यांना काढून टाकले जाईल व बेकारी वाढेल. यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने डॉलरला ३९ रू. या पातळीवर आधार दिलेला आहे. जेव्हा डॉलरची किंमत ३९ च्या खाली जाण्याची शक्यता असते तेव्हा लगेच रिझर्व्ह बॅंक बाजारात उतरून रूपये देऊन डॉलर खरेदी करते व अशा तर्हेने डॉलरची मागणी वाढवून भाव सावरण्याचा प्रयत्न करते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे Infosys . गेल्या ५-६ महिन्यात Infosys ने अतिशय उत्तम कामगिरी करून सुद्धा या कंपनीचा शेअर २१०० रूपयांवरून १६०० रूपयांपर्यंत घसरला आहे. डॉलरचा कमी झालेला भाव हे यामागचे मुख्य कारण आहे. डॉलरचा भाव कमी झाल्याचे फायदे सुद्धा असतात. पेट्रोलियमची आयात स्वस्त होते. डॉलर जर १ रूपयाने घसरला तर भारताचे दरवर्षी किमान २००० कोटी रूपये वाचतात. तसेच अवजड यंत्रे व इतर आयात स्वस्त होते. या विषयात अजून सविस्तर माहिती हवी असेल तर मी ती वेळोवेळी पोस्ट करीन.
|
xe.com var pan thodifar mahiti mulu shakel, Like news & updated information.
|
Anaani
| |
| Thursday, December 13, 2007 - 1:46 pm: |
|
|
Satishmadhekar ani Kedarjoshi फरच छान explain केले आहे.
|
Hkumar
| |
| Saturday, December 15, 2007 - 5:08 am: |
|
|
धन्यवाद सतिश, केदार व माणूस. chaa.ngale spaShTeekaraN aahe.
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|