|
Shonoo
| |
| Thursday, October 18, 2007 - 5:40 pm: |
|
|
आकाश कंदिलाचे फोटो, चित्रं हवे आहेत. आमच्या कॉम्प्लेक्स मधे दोन चार देशी मंडळी मिळून सगळ्या मुलांकरता दिवाळिचा कार्यक्रम करणार आहोत. आमंत्रण पत्रिकेत टाकायला कंदिलाची इमेज पाहिजे आहे. कोणाकडे आहे का? उद्यापर्यंत मिळेल का? गूगल वर खास काही सापडलं नाही. काळ्या क्राफ़्ट पेपरवर रांगोळी, TP च्या रोलवर कागद चिकटवून केलेले कंदील, आरती, फुलबाज्या अन इतर फटाके असा बेत आहे. बिगर्-भारतीय मुला मुलींसाठी आणखीन काय activity करता येतील? साधारण चार पाच वर्षे ते पंधरा वर्षे वयाची मुलं मुली असतील.
|
Karadkar
| |
| Thursday, October 18, 2007 - 6:40 pm: |
|
|
१०-११ वर्षाच्या मुलाना थोडे अगघड काम चालु शकेल. इथे Michaels त्या साधारण १-२ इंच उंचिच्या कुंड्या मिळतात. त्यांच्याखाली ठेवायला त्या drain dish पण असतात. त्या कुंड्या उलट्या ठेवुन त्यावर त्या drain Dish ठेवायच्या तो साधारण समईसारखा आकार दिसतो. त्यात tea candle लावुन डेकोरेट करु शकता. हाच प्रकार साधारण ४-५ इंचाच्या कुंड्या वापरुन डिशवर कडेला ५-६ tea candles ठेवुन ते पण समई सारखे छान दिसते.
|
Pony
| |
| Friday, October 19, 2007 - 2:50 pm: |
|
|
khupach chhan idea ahe hi. karadkar ekadam bhannat kalpana!!! avadali bua! chala mi tar lagechach kamala lagate. mazya hi mulansathi.
|
Karadkar
| |
| Friday, October 19, 2007 - 3:36 pm: |
|
|
http://www.grandillusions.co.uk/pages/products.aspx?id=71&p=323 इथे जे lanterns आहेत ना ते आणुन त्यावर ते sun catcher करायचे रंग असतात ते वापरुन डिझाईन करु शकता. आत tea candle लावली की अप्रतीम दिसते.
|
Prajaktad
| |
| Saturday, November 03, 2007 - 5:39 am: |
|
|
माझ्या मुलिच्या preschool मधे दिवाळी निम्मीत स्नcक,क्राफ़्ट असा बेत ठरवत आहोत... non-indian मुल आणी स्कुल मधिल इतर यांना आपल्या सणाची माहिती व्हावी हा उद्देश आहे..कुणी अस इथे us मधे स्कुल मधे जावुन काही celebrate केले आहे का?केले असेल तर काही आईडिया देता येतिल का? मी आकाशकंदिल, पणत्या नेणार आहे... snacks मात्र अलर्जी पॉईंट ने इथलेच असतिल... रांगोळी काढायचा विचार आहे. ३ वर्षाच्या मुलांसाठी क्राफ़्ट काय ठेवता येईल?? काही सजेशन मिळाली तर विकएंडला plan करता येईल..प्लिज सुचवा...
|
Malavika
| |
| Saturday, November 03, 2007 - 2:01 pm: |
|
|
प्राजक्ता, मी पणतीचे चित्र काढून, (त्याच्या पाहिजे तेवढ्या photo copies काधून) मुलांना रंगवायला दिल्या होत्या. शंकरपाळी बहुतेक मुलांना अवडतात, अमरुंनापण.
|
Maanus
| |
| Saturday, November 03, 2007 - 4:04 pm: |
|
|
रांगोळी वरुन आठवले, गेल्या दिवाळीत आम्ही पणत्यांचे स्वस्तिक काढले होते रांगोळी म्हणुन फोटो फोटो इतका खास नाही आला, पण तेव्हा ते खुप चांगले दिसत होते. plus side काही फुले टाकली असती तर अजुन उठुन दिसले असते.
|
Prajaktad
| |
| Saturday, November 03, 2007 - 6:39 pm: |
|
|
मालविका! सजेशन बद्दल धन्यवाद.
|
Prajaktad
| |
| Thursday, November 08, 2007 - 7:42 pm: |
|
|
आमचा प्रिस्कुल मधला दिवाळी प्रोग्रम खुप छान झाला.. मुलांना दिवाळी स्टोरी,रांगोळी,पणत्या,समई, अशा अनेक गोश्टी दाखविल्या,सांगितल्या.. आकाशकंदिल ड्रा करुन पेंट करायला दिले.. consruction paper चे आकाशकंदिल बनवुन प्रत्येक मुलाला भेट म्हणुन दिला.. खालील आकार त्यांना पेंट करायला दिला होता... consruction paper च्या आकाशकंदिलचा फोटो टाकते लवकरच..
|
Prajaktad
| |
| Saturday, November 10, 2007 - 4:06 am: |
|
|
|
Mvrushali
| |
| Wednesday, November 14, 2007 - 12:10 am: |
|
|
प्राजक्ता,छान जमलाय आकाशकंदिल.मधला भाग पण construction paper चाच केलास का?जरा सांगू शकशील का सविस्तर?धन्यवाद.
|
Prajaktad
| |
| Thursday, November 15, 2007 - 8:13 pm: |
|
|
व्रुशाली धन्स! मधला भाग पण, construction paper चाच आहे..२ किंवा ३ घद्या घालुन(उभ्या) कात्रिने शेप कापलाय मग सरळ करुन गोल स्टेपल केलय..
|
Amruta
| |
| Friday, November 16, 2007 - 5:43 pm: |
|
|
हा आमचा दिवाळीचा कंदिल
|
Panna
| |
| Saturday, November 17, 2007 - 3:36 am: |
|
|
दोन्ही आकाश कंदिल छान झालेत! अमृता, तुझ्या आकाश कंदिलाची कृती टाकशील का ईकडे?
|
Amruta
| |
| Sunday, November 18, 2007 - 4:40 pm: |
|
|
अग अगदी सोपी आहे कृती. मी गिफ्ट पकिंगच्या सेक्शन मधे क्रेप पेपर मिळतात ते आणले. मग त्याचे चौरस तुकडे कापले. कंदिल किती मोठा हवाय त्यावर आकार अवलंबुन असावा. मग चौरस तुकड्यांचे अपोसिट २ कोन जोडले. असे १० तुकडे तयार केले. मग कार्डपेपर चा लांब जांभळ्या रंगाचा दिसतोय तो तुकडा कापला आणि त्यावर मगाचे नारिंगी तुकडे लावले. हा झाला वरचा भाग तयार. झिरमिळ्या कापुन घेतल्या व त्या जांभळ्या भागावर चिकटवल्या.मग जांभळ्या तुकड्याची दोन टोक चिकटवली. झाला कंदिल तयार. माझ्याकडे सोनेरी कागद नव्हता नाहितर त्या जांभळ्या भागावर सोनेरी कागद चिकटवला कि अजुन मस्त दिसेल कंदिल.
|
Panna
| |
| Monday, November 19, 2007 - 2:26 am: |
|
|
छान सोपा वाटतोय ग करायला! लगेच करुन बघते!
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|