|
Saee
| |
| Friday, September 21, 2007 - 10:19 am: |
| 
|
स्वयंसेवी संस्थेत काम करणारा माझा एक मित्र ८ दिवसांच्या एका परिषदेसाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मेलबोर्नला जात आहे. त्यासाठी मेलबोर्नमधल्या युथ हॉस्टेल्स्चे पत्ते, दर आणि महाराष्ट्र मंडळातर्फे तात्पुरती रहाण्याची सोय होते का याबद्दल माहिती हवी आहे. मेलबोर्नमधे कोणी मायबोलीकर असतील तर मला याबद्दल काही कळू शकेल का? संस्था स्वयंसेवी असल्याने दौर्याचा खर्च शिवाय रहाण्याजेवण्याचा खर्च यातला काही भाग मित्राला स्वतःला उचलावा लागणार असल्याने अत्यंत अल्प दरात रहाण्याची सोय हवी आहे. सिडनीमधे एक स्नेही आहेत पण सिडनी - मेलबोर्न जवळपास १२ तासांचे अंतर असल्याने ते सोयीचे नाही. मी नेटवर शोधायचा प्रयत्न केला, युथ हॉस्टेल्स मिळाली पण त्यांचे दर आणि इतर माहिती मिळाली नाही. महाराष्ट्र मंडळाच्या साईटवरही याबद्दलची माहिती उपलब्ध नाही. कृपया कोणाला माहित असल्यास लगेच सांगा.
|
Saee
| |
| Wednesday, October 17, 2007 - 6:14 am: |
| 
|
Admin , माझ्या मित्राची रहाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे हा bb बंद केलात तरी चालेल. कोणाला यासंदर्भात माहिती हवी असेल तर माझ्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|