|
Admin
| |
| Thursday, December 14, 2006 - 9:10 pm: |
|
|
काही वर्षांपूर्वी मायबोलीच्या दिवाळी अंकाला २ पारितोषिके मिळाली. १. चिन्मय कम्युनिकेशन आणि २. मुंबई मराठी पत्रकारसंघ. त्यातले दुसरे पारितोषिक अजून पर्यंत मला प्रत्यक्षात पहाता आले नाही याचे दु:ख आहे. मला खात्री आहे, हे केवळ कार्यबाहुल्यामुळे विस्मरणातून झाले असेल आणि त्यात कुणाचाही वाईट हेतू नाही. तुम्हाला कुणाला या पारितोषिकाबद्दल (स्मृतीचिन्ह) किंवा त्याच्या मुंबईपासूनच्या प्रवासाबद्दल माहिती असेल तर कृपया इथे लिहा म्हणजे ते शोधून काढणे सोपे होईल. हे पारितोषिक कुणी स्विकारले यापासून शोध सुरु करता येईल
|
Admin
| |
| Thursday, December 14, 2006 - 9:16 pm: |
|
|
चिन्मय कम्युनिकेशन तर्फे मिळालेले स्मृतीचिन्ह समीर सरवटे ने २-३ महिन्यात माझ्या पर्यंत पोहोचवले. शोध आहे तो पत्रकार सन्घाच्या स्मृतिचिन्हाचा
|
Anilbhai
| |
| Thursday, December 14, 2006 - 9:41 pm: |
|
|
मुंबई मराठी पत्रकारसंघा चे पारितोषिक आपले मायबोलिकर दिनेश शिंदे ह्यानी आपल्या सर्वांतर्फ़े स्विकारले होते. त्यामुळे सध्या ते स्म्रुतिचिन्ह व सर्टिफ़िकेट त्यांच्याच कडे असण्याची शक्यता आहे. ही न्युज खालिल ठिकाणी आहे. /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=1&post=454321#POST454321 त्या सर्टिफ़िकेट ची ईमेज
|
Admin
| |
| Thursday, January 25, 2007 - 5:35 am: |
|
|
मायबोलीला मिळालेले स्मृतीचिन्ह श्री दिनेश यानी पाठवले आणि ते माझ्या घरी पुण्यात पोहोचले आहे. ते शोधून देण्यासाठी ज्यानी ज्यानी मदत केली त्यांचे आणि इतके दिवस सांभाळून ठेवल्याबद्दल श्री दिनेश यांचे मन्:पूर्वक आभार.
|
Bee
| |
| Thursday, January 25, 2007 - 9:32 am: |
|
|
Admin- त्यानंतरचे दिवाळी अंक स्पर्धेसाठी दिले नव्हते का? माझ्यामते दरवर्षी आपला दिवाळी अंक स्पर्धेत जायला पाहिजे.
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००८ |
|
|