Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 13, 2007

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज गणेशोत्सव » हितगुज गणेशोत्सव पूर्वतयारी » हितगुज गणेशोत्सव २००७ पूर्वतयारी » Archive through September 13, 2007 « Previous Next »

Lalu
Friday, August 31, 2007 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lol, लोपा, म्हणजे काम मिळावेच अशी अपेक्षा होती का? 'काम करु म्हटले तर दिले नाही, तेव्हा आता आम्ही नाही ज्जा!' असे आहे का?? तू हे चेष्टेत लिहिले असशील, पण नक्की रोख कळत नाही आहे म्हणून हे स्पष्टीकरण -
बरेच लोक मदतीला तयार होतात पण सगळ्यांनाच काम देता येत नाही. लोक हे समजून घेतात अशी अपेक्षा. सावनी, नकुल, आर्च, अरुण आणि इतर बर्‍याच मंडळीनी मदतीची तयारी दाखवली होती. काहींना 'लागेल तसे कळवू' असे सांगितले होते पण शेवटपर्यंत कोणतेच काम देण्यात आले नाही. काम कोणाला द्यायचे ते कामाचे स्वरुप आणि ज्या त्या वेळच्या बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असते. पण हे झालं दिवाळीचं.

गणेशोत्सव समिती, यंदा 'उत्सुक्तता' वाढली आहे. लवकर सांगा कार्यक्रम. ~D :-)


Aktta
Saturday, September 01, 2007 - 12:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इकडे मुर्ती वगैरे बसवता का.... म्हंजे झी मराठी किंवा इ टीवी मराठी सारख....
एकटा.....


Lopamudraa
Monday, September 03, 2007 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु कुठल्याच अपेक्षेने लिहिले नव्हते except चेष्टा.. २०१ चेष्टा.. म्हणून दोन smili टाकल्यात.. :-)

Sanghamitra
Tuesday, September 04, 2007 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>२०१ चेष्टा
लोपा, ही मंडळाला दिलेल्या वर्गणीची फिगर आहे वाटतं? :-)

Lopamudraa
Tuesday, September 04, 2007 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोल.. संघमित्रा. पकडल ना लगेच.. मध्ये % लिहायचे राहिले..

Himscool
Thursday, September 06, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे यंदा गणपतीत स्पर्धा वगैरे काही होणार आहे की नाही.. की नुसतीच समिती स्थापन होउन काहीच न घडता तिचे विसर्जन होणार आहे...

Vaatsaru
Thursday, September 06, 2007 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे जरा धीर धरा - लागले लगेच सगळे समिती च्या पाठी भुणभूण करत :-)

Sanyojak
Thursday, September 06, 2007 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणेशोत्सवाची समिती स्थापन होत आहे. व कार्यक्रम लवकरच जाहीर होईल. आणखी कोणाला समितीत काम करायची इच्छा असेल तर लवकर कळवा.

Runi
Thursday, September 06, 2007 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संयोजक काही लागली मदत तर हक्काने सांगा मी आहे बर का मदतीला.

Sanyojak
Tuesday, September 11, 2007 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी,
बाप्पांच्या आगमनाची तयारी जोरदार सुरु आहे ना? नवे रुप ल्यायलेल्या, नव्या मखरात सजलेल्या गणपती बाप्पांचे आगमन आता अगदी उंबर्‍यापर्यंत येऊन ठेपले आहे.

हितगुजकरांचा गणपतीही दर वर्षी प्रमाणेच यंदाही दणक्यात साजरा होणार!
समित्या स्थापन झालेल्या आहेत. स्पर्धा ठरलेल्या आहेत.
घोषणा होईलच इतक्यात.
आता तुम्ही फ़क्त इतकच करायचं की आपापल्या कल्पनाशक्तीला, सर्जकतेला नवी धार लावून ठेवायची. सगळ्याचाच कस ह्यावर्षीच्या स्पर्धांमधून लागणार आहे. नव्या नव्या साजिर्‍या आरत्याही रचायला घ्या.

बाप्पांच्या स्वागताची तयारी जोरदार असुद्यात.


Sanyojak
Thursday, September 13, 2007 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप्पा मोरया!
चला मंडळी आपापल्या लेखण्या, कुंचले,आणभव आणि डोकी परजून ठेवा.
कोरे कागद, स्क्रीन्स, कॅनव्हास तुमच्या प्रतिभास्पर्शाने बहरून जाऊ दे.
बाप्पांच्या मूर्तीचे बुकिंग झालेय. मखर सजतेय. तांदळाची पिठी, नारळ, गुळाच्या ढेपा, केशर, वेलदोडे यांचे वास वेगवेगळे का होईना पण दरवळायला लागलेत. जास्वंदीला फुलोरा आलाय.
आरत्यांच्या कॅसेट्स, दिव्यांच्या माळा यांचे टेस्टिंग पण झालेय.
घंटा, तबक, निरांजने, समया घासून पुसून लख्ख झाल्यात.
बॅंड आणि टेम्पोही ठरलेत.
तुम्ही सज्ज आहात ना?


Sanyojak
Thursday, September 13, 2007 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

!! ग़णपती बाप्पा मोरया !!

हितगुज २००७ गणेशोत्सवातील कार्यक्रम निश्चित झाले आहेत मंडळी. त्याची यादी खालीलप्रमाणे आहे.

हितगुज गणेशोत्सव २००७: कार्यक्रम आणि संयोजन समितीमधील सभासदांची नावे

चित्रकला स्पर्धा

१. संघमित्रा
२. सावनी

फोटोग्राफी स्पर्धा

१. राज्या
२. वाटसरु
३. असामी


पाककला स्पर्धा

१.संघमित्रा
२.सावनी

एक पानी कथा स्पर्धा

१. वाटसरु
२. संघमित्रा

फोटोंना नावं सुचवा आणि मॅड ऍड स्पर्धा

१. अज्जुका
२. सावनी

गद्य STY

१. ट्युलिप
२. असामी
३. संघमित्रा

पद्य STY

१. अज्जुका
२. ट्युलिप
३. वाटसरु

आमची तयारी झाली. तुमची?




Deepanjali
Thursday, September 13, 2007 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा सही ,
झाल्या का स्पर्धा announce ..!
एक पानी कथेची तेवढी भीती वाटतेय !
:-)


Lalu
Thursday, September 13, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>तयारी जोरदार असुद्यात.तुम्ही सज्ज आहात ना? आमची तयारी झाली. तुमची?
अहो, आम्ही केव्हापासून तयार आहे, तुम्ही पुढचं बोला. :-) कसली चित्रं काढायची? कुणाचे फोटो काढायचे... ~d

कार्यक्रम छान आहे, मजा येईल. :-)
मोरया!




Deepanjali
Thursday, September 13, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसली चित्रं काढायची? कुणाचे फोटो काढायचे... ~d

<<< lol लालु
तू नाहीस चक्क फोटो ला caption समिती मधे ?



Seema_
Thursday, September 13, 2007 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक पानी कथेची तेवढी भीती वाटतेय !
>>>
लोकांकडची पान फ़ार मोठी आहेत म्हणुन का ग DJ ? ~DD

Gajanandesai
Thursday, September 13, 2007 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"अरे बाळा काय हे? तुझी निघायची वेळ अगदी उंबरठ्यात येऊन ठेपलीय आणि अजून तुझा नट्टापट्टाच चाललाय? कुठे बसला होतास?"



"अगं आई! खरेच की, लक्षातच आले नाही, किती वेळ गेला ते! जरा HG वर डोकावत होतो कुठंवर आलंय ते. यावर्षी काय काय धमाल येणार याच्या कल्पनाविलासात अगदी रंगून गेलो होतो. निघायची अगदी उत्सुकता लागलीय बघ मला तिथली 'तयारी' बघून. "

(हसत हसत)
"हम् लवकर निघायचं तर त्यासाठी आपलीही 'तयारी' करायला लागते हो! आटप लवकर!"

(गाल फुगवून)
"अं. हे बघ झालंच माझं!"




(दोघेही हसतात. पडदा!)

Tulip
Thursday, September 13, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

how cute! खूपच छान वाटलं वाचायला :D

Sashal
Thursday, September 13, 2007 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, वातावरण निर्मिती छान झाली ..

Karadkar
Friday, September 14, 2007 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजा, cute हा एकदम :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators