Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
हितगुज गणेशोत्सव २००७ पूर्वतयारी ...

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज गणेशोत्सव » हितगुज गणेशोत्सव पूर्वतयारी » हितगुज गणेशोत्सव २००७ पूर्वतयारी « Previous Next »



संयोजन समितीत भाग घेण्यास उत्सुक असलेल्या उमेदवारानी खालील लिंक पहावी.
गणेशोत्सव व्यवस्थापन

  Thread Posts Last Post
Archive through August 06, 200720 08-07-07  2:40 am
Archive through August 31, 200720 08-31-07  3:30 pm
Archive through September 13, 200720 09-14-07  2:38 am

Zakasrao
Friday, September 14, 2007 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणपती बाप्पा मोरया :-)
.. ..


Himscool
Friday, September 14, 2007 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीडी, एक नंबर....
एक पानी कथा स्पर्धेचा नक्की अर्थ काय? कथा एकाच पोस्ट मध्ये संपायला पाहिजे की screen scroll न करता संपली पाहिजे.. काहीच बोध होत नाहीये.. भ्यँऽऽऽऽऽऽऽ
आणि कशाचे एक पान - पहिली ते चौथी वापरतो त्या छोट्या वहीचे पान.. पण त्यात सुद्धा एक रेघी दुरेघी की चौरेघी वही.. का नंतर वापरतो त्या फुलस्केप वहीचे पान.. का A4, A3, A2, A1 असे निरनिराळ्या आकाराचे पान.. आणि पानाच्या एका बाजूवर लिहायचे की दोन्ही बाजुवर... आयला नुसता गोंधळ उडलाय डोक्यात... पार भुगा झाला मेंदूचा...
आता हे असे झाल्यावर कोणत्या स्पर्धेत भाग घेणार...:-(


Kmayuresh2002
Friday, September 14, 2007 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजा,सही रे...:-)

चला.. तर गणरायाच्या मायबोलीवरच्या आगमनाची जोरदार तयारी झालेली दिस्तेय... उद्यापासुन आरत्या आणि प्रसादाचा पाऊस पडणार तर इथे:-)

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

हिम्या,तुला लईच प्रश्ण पडले आहेत लेका.. उद्या बाप्पाचे आगमन झाले ना की तोच तुझ्या प्रश्णांची उत्तरे देईल हो:-)


Abhi_
Friday, September 14, 2007 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिम्या किती प्रश्न हे?? तुझा अगदी "स्वगत सम्राट"झालाय..

Giriraj
Friday, September 14, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रश्न-स्पर्धा पण आहे का?

Psg
Friday, September 14, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकपानी कथा म्हणजे? खरच स्पेसिफ़ाय करा.. विषय दिलेत तर उत्तम :-)

वाट पहातोय..
मोरया!


Bee
Friday, September 14, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकपानी कथा म्हणजे अतिलघुकथा. पानांच्या भाषेत सांगायचे तर ४ थ्या वर्गाच्या, १ रेघी वहीच्या, एका पानावर 'टंकीत' करून पुर्ण होईल इतकी छोटी कथा. अशी कथा मनातल्या मनात वाचायला घेतली तर ३ ते ४ मिनिटे लागायला हवीत. कथेला आवश्यक असतील तर परिच्छेद करा अन्यथा करू नका. आता हे विचारू नका की टंकीत केली तर फ़ॉंट साईझ किती असावा वगैरे वगैरे. उ. भा. प्र. नकोत.

पुर्वी मी अशा एकपानी कथा लिहिल्या होत्या त्या तुम्ही अभ्यासू शकता :-) :-)

प्रतिभावंतांच्या कथा वाचायच्या असतील तर शांता शेळकेंचे 'एकपानी' पुस्तक आहे, दुर्गा भागवतांचे 'दुपानी' पुस्तक आहे. तात्पर्य हे की हितगुज काही नविन साहित्य - उपक्रम करते आहे असा विचार करू नका.


Bee
Friday, September 14, 2007 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रिनीच्या कथा अभ्यासू नका कारण त्या फ़क्त अर्धपानीच असतात :-) :-)

Badbadi
Friday, September 14, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रिनीच्या कथा अभ्यासू नका कारण त्या फ़क्त अर्धपानीच असतात >> बी, अरे 'एकपानी कथेचा अभ्यास' अशी स्पर्धा नाहिये काहि.... नाही म्हणजे तू उगाच न झेपणारा अभ्यास करत बसायचास म्हणून सांगितलं :-)

Sanghamitra
Friday, September 14, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडे :-)
बी जरा दम धर ना. नियम पोस्ट होणार आहेत लौकरच. उगीच लोकांना मिस्लीड करू नकोस.
:-)
पूनम लौकरच नियम पोस्ट होतील. छान कथेची अपेक्षा आहे :-)
मोरया!



Kmayuresh2002
Friday, September 14, 2007 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम लौकरच नियम पोस्ट होतील. छान कथेची अपेक्षा आहे..पूनम,तुम्हारा expertise अब इधर काम आयेगा :-)

Shonoo
Friday, September 14, 2007 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला दर दिवसा साठी एक अशी कथा लिहायची आहे. स्पर्धे करता नाही. पण त्या गुलमोहर्भाद्रपद मधे न टाकता गणपती उत्सव ला संबंधित बी बी वर टाकायच्या आहेत. तर त्या कुठे टाकता येतील?
मी हितगुज वरून संयोजकांना मेल केली होती पण त्याला उत्तर आलं नाही अजून.
( कोण ते "आधी वर्षाची गोष्ट पूर्ण कर" म्हणतंय? रागा रागाने वळून बघते! )


Giriraj
Friday, September 14, 2007 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,तुझ्या कथा अभ्यासायच्या म्हणतोस का? तूच आधि अभ्यास करून घे त्यांचा! ('आर्श्यात तोंड पाहून ये' च्या धर्तिवर!):-)

मित्रा,तसा धीर आहे पण असा धरवला नाही! :-)


Sanyojak
Friday, September 14, 2007 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक पानी कथा स्पर्धा नसून 'लघु कथा स्पर्धा' असे वाचावे - 'एक पानी' मधली व्यावहारिक अडचण आमच्याही लक्षात आली म्हणून ते थोडेसे बदलले आहे. नियम लवकरच पोस्ट होतील

Seema_
Friday, September 14, 2007 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संयोजक ,
लघुकथा किंवा एक पानी काहीही म्हणा,पण त्या पुढे शब्दांची मर्यादा अंदाजान घालुन द्या न . म्हणजे for example साधारण ६०० शब्द (जस निबंध स्पर्शेत असत तस) अस . म्हणजे लोकाना आपोआप अंदाज येईल.
हे just suggestion आहे , मान्य केलच पाहिजे अस काही नाही .



Bee
Friday, September 14, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकपानी कथा आणि लघुकथा ह्यात फ़ार असा फ़रक नाहीये. कथा खूप लांबलचक असू नये इतकाच काय त्याचा मथितार्थ होतो. निदान मायबोलिकरांना तरी खूप depth मधे हा प्रकार कसा असतो वगैरे खूप माहिती सांगायची गरज नाही. असो..

मी मिसलीड केले असेल तर वरील पोष्ट काढून घ्या.. पण मला तसे वाटत नाही..

गिरिराज, प्रयास करण्याला महत्त्व आहे. तू तेही केलेले नाही.. चल जा खडकावर जाऊन घास घास चेहरा धू पाहू :-)


Sanyojak
Friday, September 14, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, शब्दांची मर्यादा आहे, नियम प्रकाशित होतीलच थोड्या अवधीत

Manuswini
Saturday, September 15, 2007 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाकडे खालील mp3 downloads असतील तर मला पाठवतील का?


तुज मागतो मी आता
प्रथम तुला वंदीतो
उठा उठा सकळीक
मला हवी आहेत गणपती दिवसात pls email me if you have it


Mahaguru
Saturday, September 15, 2007 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुधा माझ्या कडे आहेत ही गाणी.

Moderator_2
Saturday, September 15, 2007 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दरवर्षीप्रमाणे यंदाही मायबोलीचा ऒनलाईन गणेशोत्सव साजरा होतोय.
मूर्तिची प्रतिष्ठापना झालेली आहे. वेगवेगळे उपक्रमही चालू झाले आहेत.
तरी उपक्रमांच्यात भाग घेण्यासाठी आणि श्रींच्या दर्शनासाठी

/ganeshotsav_2007

या ठिकाणी भेट द्यावी.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators