|
hitguj warchya kahi mandalinna mi baalgeete pathavli. they liked them. If anybody else wants 'em, you can email me. Thank You.
|
ase kase aste ho mothyanche wagne ... mazya bahini la mahit ahe, ill ask her and post it here soon. अपूर्व
|
Anaya
| |
| Monday, March 20, 2006 - 5:34 pm: |
|
|
कोनला "एक होती म्हातारी" गाणे माहित आहे का मला जे काय जसे काय आठवत आहे ते एक होती म्हतारी जाइ लेकिच्या घरी काठी टेकित टेकित जाते जाते जंगलातुन गुहेतुन आले वाघोबा वाघोबा अन कोल्होबा म्हणु लागले म्हातारीला खाउ का ग तुला म्हातारी मग घाबरली थर थर कापु लागली पाया पडुनी म्हणु लागली जाउ द्या ना मला लेकीकडे जाउन येते शिरा पुरी खाउन येते लठ्ठमुठ्ठ होउन येते खा ना मग मला म्हणणे तिचे आवडले म्हातारीला सोडुन दिले लेकीकडे जाउन आली शिरा पुरी खाउन आली लठ्ठमुठ्ठ होउन आली भोपळ्यामधे बसुन आली दिसेना कोणा एवढा मोठा भोपळा लाल लाल वाटोला आतुन बोले म्हातरी चल रे भोपळ्या टुणुन टुणुक गुहेतुन आले वाघोबा वाघोबा अन कोल्होबा म्हणु लागले म्हातारीला खाउ का ग तुला मीच खाणार मीच खाणार नाही कोणाला देणार भांडु लागले तांडु लागले भांडु लागले तांडु लागले पळते म्हातारी कशाची म्हातारी कशाची कोतारी चल रे भोपळ्या टुणुक टुणुक.
|
Dakshina
| |
| Thursday, March 23, 2006 - 8:56 am: |
|
|
चांदोमामा मोठ्ठा खट्याळ पोर, एक नंबरचा दंगेखोर छळायचा सगळ्या तार्यांना आकाशात घालून धिंगाणा एकदा आई त्याला रागावली थोबाडीत देऊन म्हणाली, कार्ट्या तुझी मोडतेच खोड जेवण तुझे करतेच बंद चंदू बिचारा खूप रडला १५ दिवसात खंगत गेला दया आली आईला जेवायला दिले चंदूला अस्सा पठ्ठ्या फ़ुगत गेला १५ दिवसात टुणटुणित झाला.. आरगोटी गारगोटी चांदोमामाची झाली फ़जिती..
|
Dakshina
| |
| Monday, March 27, 2006 - 5:14 am: |
|
|
स्नेहल, हे घे, असे कसे हो असते मोठ्यांचे वागणे एकदा एक बोलणे आणि एकदा एक बोलणे.... लवकर उठलं तर म्हणतील नीज अजुन थोडा आणि उशिरा उठलं तर म्हणतील पसरलाय घोडा... असे कसे.. अभ्यास केला तर म्हणतील पुस्तकातला किडा आणि नापास झालं तर म्हणतील परिक्षेतला वेडा... असे कसे... एकदा म्हणतील बाबा रे दया करायला शिक आणि केली तर म्हणतील गधड्या लावशील मला भीक... असे कसे.. कधी आजारी पडले तर मग मात्र म्हणतात पिंकी आमची गुणाची एव्हढेच खरे बोलतात.... असे कसे..
|
Deemdu
| |
| Monday, March 27, 2006 - 7:44 am: |
|
|
म्हणजे bpositive आणि Dakshina भाऊ बहीण आहेत तर
|
Badbadi
| |
| Monday, March 27, 2006 - 12:55 pm: |
|
|
धन्यवाद दक्षिणा तीसरी चौथीतले दिवस आठवले..
|
dakshina मल आठवतात ते शब्द थोडे वेगळे आहेत.. शिवाय अजून काही कडवी आठवतात ती हि देते आहे असं कसं .......... अभ्यास केला तर म्हणतात, 'पुस्तकातला कीडा' अन खेळायला गेलो तर म्हणतात, 'परिक्षेत रडा ... ' एकदा सांगतात, ' बाबानो खरे खरे बोला' खरे सांगताच म्हणतात ,' निर्लज्ज मेला ... ' सांगतो जसे दाखले मी मित्रांच्या घरचे वस्स्कन ओरडतात , ' नको सांगू कौतुक दुसर्यांचे' शेजारच्या बाळूचा मात्र, सारखा सरखा पुळका मला आपलं म्हणत राहतात, ' त्याचं जरा शिका!'....
|
Anaya
| |
| Tuesday, March 28, 2006 - 6:14 pm: |
|
|
कोणाला "ये ग तु ग गाई" अन्गाई चे शब्द आठवत आहेत काय ये ग तू ग गाई वासराचे आई तान्ह्या बाळाला दूध दे ई एवढेच आठवत आहेत मला.
|
Storvi
| |
| Tuesday, March 28, 2006 - 7:02 pm: |
|
|
मी जे म्हणते (आणि आई म्हणते) ते असे आहे: ये गं तु गं गाई बाळाच्या डोळीया घाली पाळणिया अंथरूण.. अंथरुण केले पंघरुनी शेला निजविते तुला ..... राणी / राजा अंगाई ये गं तु गं गाई चरुनं भरुनं बाळाला दुध देई वाटी भरून अंगाई.. बाळा असेल तिथे बाळाचे नाव घालायचे अधुन मधुन..
|
Hatwalne (anand), 3 kadwi miss zaleli Chityache balgeet. Ekada la ek chitta Hatat gheun adkitta Chitta ala dupari magu lagala supari Mi mhanale kashala? Tevha chitta mhanala atach jevan zhale fakkad khaun takale bara bokad. Bara bokad sola shelya baghata baghata fast kelya tyanantar gammat mhanun Don bail takale khaun Jevan jara jadach zhale Bhaltech angavarati ale Mhantale khavi supari mhanun alo dupari Mi Gupchup gharat gelo Supari gheun baher aalo Supari khaun gela Chitta Tithech visarun adkitta Khote watate tur ya pahun Adktta aahe gharat ajun
|
Deemdu
| |
| Thursday, May 11, 2006 - 11:44 am: |
|
|
अनया हे माझ version ये ग गाई गोठ्यात बाळाल दुदु दे वाटीत बाळची वाटी मांजर चाटी मांजर गेल रागानं त्याला खाल्ल वाघोबानं वाघोबाचे डोळे लाल झाले तिकडुन आले उंदीर्मामा वाघोबाला भीऊन पळून गेले
|
Moodi
| |
| Friday, May 12, 2006 - 1:36 pm: |
|
|
हे एक बडबडगीत आनंद मासिकातले. कुरकुर कुरकुर कुरकुंजा घोड्यावर बसला भडभुंजा भडभुंज्याची लांब लांब शेंडी घोड्याला वाटली चार्याची पेंढी.
|
Kishordeve
| |
| Wednesday, November 01, 2006 - 6:06 am: |
|
|
konala hi gaani purna yetat ka? Don bokyanni aanala ho aanala, chorun lonyacha goLa.. ani he ek: Aai mala pawasat jaau de, ekadach ga, bhijuni mala chimb chimb houde..
|
Adtvtk
| |
| Wednesday, November 01, 2006 - 2:06 pm: |
|
|
रमला कुठे ग कान्हा, का अजुनी येइना ग||ध्रु|| बाई तिन्ही सांजा झाल्या,गाई घरा परतल्या धुंडोनी नजरा शिणल्या, कुठे गेला माझा कान्हा||ध्रु|| मुरलीचा मंजुळ सुर,घुमतो ग कोठे दुर लावी जिवा हुरहुर, कुठे गेला माझा कान्हा||ध्रु|| हे गाणं-कविता कुणाला पूर्ण माहिती आहे का? फ़ार जुने गाणे आहे. माझे आजोबा त्यांच्या सर्व नातवंडांना झोपवताना म्हणायचे.
|
Ksmita
| |
| Monday, November 27, 2006 - 11:39 pm: |
|
|
कित्ती वेळा सान्गितल हो बाप्पा तुम्हाला कित्ती गोड खाता जरा जपा जीवाला हे गाणे कोणी पूर्ण करेल का? i heard this song at sunnyvale,ca (usa) temple marathi mandal ganapati ustav this year
|
Milindaa
| |
| Tuesday, November 28, 2006 - 10:46 am: |
|
|
शांता शेळके यांच्यावरच्या नक्षत्रांचे देणे मधले हे बालगीत कोकीळ म्हणतो काय करावे खोकून बसला पार घसा कुहु कुहुची मंजुळ गाणी सांगा आता गाऊ कसा सांगा आता गाऊ कसा (१) कुत्रा म्हणतो उडी मारुनी पकडू गेलो एक ससा ससा पळाला पाय मोडला चोरामागे धावू कसा चोरामागे धावू कसा (२) म्हणे कोंबडा टीव्ही बघता रात्री गेला वेळ असा उशीरा उठलो कुकुचकू ची हाक कुणा मी देऊ कसा हाक कुणा मी देऊ कसा (३) बोका म्हणतो चष्म्यावाचून आंधळाच मी भरदिवसा बिळात सरकन् पळून गेला उंदीर कोठे शोधू कसा उंदीर कोठे शोधू कसा (४)
|
रमला कुठे ग कान्हा, का अजुनी येइना ग>>>>.. मलाही हवे आहे हे गाणे.. माझी आई म्हणायची आम्हाला.. पण तीलाही पुर्न आठवत नाहिये..
|
कुणाला हे बडबडगीत पूर्ण येतय का? ससा ससा, दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा, लाल लाल डोळे छान, छोटे शेपूट मोठे कान, ........................????? चाहूल लागता पळतो धूम.
|
Jagu
| |
| Saturday, March 31, 2007 - 8:14 am: |
|
|
सचीन हे असे आहे.. ससा ससा, दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा, लाल लाल डोळे छान, छोटे शेपूट मोठे कान, पाला खाउन होतो टूम चाहूल लागता पळतो धूम.
|
|
|