सही... जगु. थॅंक्स. मी कितीही प्रयत्न केला तरीही आठवत नव्हतं
|
Pat15m67
| |
| Tuesday, April 03, 2007 - 10:58 am: |
|
|
कुणाला हे गाणे येतेय का?... बघ आई आकशात सुर्य हा आला पांघरुनी अंगावर भरजरी शेला, निळ्या ह्याच्या महलाला आत झालरी, सोनियाचे लावियले.... pat15m67
|
Sjk
| |
| Friday, May 18, 2007 - 4:36 am: |
|
|
कोणाला हे गाणे पूर्ण येते का? वाटाणा फ़ुटाणा शेन्गदाणा उडत चालले टणाटणा वाटेत भेटला चिमुकला तीळकण हसायला लागले तिघेही जण ...... ( हे सन्क्रान्तीचे बालगीत आहे ... तीळगूळ / हलवा बनवण्याचे.... )
|
Konala "Labad Landaga Dhong karatay" he gane yete ka?
|
"Ya bai ya bagha bagha kashi majhi basali baya" ani "Chhan kiti disate, Phulapakharu" he sudhha yet asel tar post kara
|
chan chan chan manimau che bal kase gore gore pan ivalishi jivani aani ivalese dat chutu chutu khate kasa doodh aani bhat ivalese dole,ivalese kan chan chan chan ... ivalyashya payamadhe ivalasa chendoo fekata mi ghyaya dhave dudoo dudoo dudoo ivalyashya shepatichi zali kaman chan chan chan ... ali ali manimau dur jara jau balachi maja sari duruniya pahu aaishi bal khele visaruni bhan chan chan chan...
|
Archanap
| |
| Friday, July 06, 2007 - 4:49 pm: |
|
|
Phulapakharu chan kiti disate phulapakhru ya velinvar phulan barobar god kiti hasate phulapakharu Pankha chimukale nile jhambhale halavuni jhulate phulapakharu Dole barika kariti luka luka gol mani janu te phulaphakharu Me dharu jata yei na hata dura cha udate phulaphakharu
|
Riddhi
| |
| Sunday, July 08, 2007 - 5:09 pm: |
|
|
गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण हे पुर्ण येत असल्यास
|
Meenu
| |
| Monday, July 09, 2007 - 4:40 am: |
|
|
दिवस उद्याचा सवडीचा रविवार माझ्या आवडीचा .. हे पण लिहा कुणाला येत असेल तर please
|
Manjud
| |
| Monday, July 09, 2007 - 6:08 am: |
|
|
गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण वहिनीला आणायला चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला हरिणाची जोडी हरिणाची गाडी तुडवी गुलाबाचे रान दादा मला एक वहिनी आण गोर्या गोर्या वहिनीची अंधाराची साडी अंधाराच्या साडीला चांदण्याची खडी चांदण्याच्या पदराला बिजलीचा बान दादा मला एक वहिनी आण वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा तुला दोन थापा तिला साखरेचा पापा बाहुल्यांच्या परी होऊ दोघी आम्ही सान दादा मला एक वहिनी आण
|
Manjud
| |
| Monday, July 09, 2007 - 6:10 am: |
|
|
एका माकडाने काढलंय दुकान कोणाला येतं का? प्लीज कोणीतरी लिहा नं
|
Psg
| |
| Monday, July 09, 2007 - 7:07 am: |
|
|
एक नाही दोन नाही बेरीज-वजाबाकी नाही तीन नाही चार नाही भूमितीची सजा नाही दिवस उद्याचा सवडीचा रविवार माझ्या आवडीचा.. धृ.. सोमवारचा असतो गणिताचा तास गणिताच्या तासाला मी नापास गणित विषय माझ्या नावडीचा रविवार माझ्या आवडीचा ..१.. भलताच कठीण तो मंगळवार डोक्यावर असतो भूगोलाचा भार भूगोल विषय माझ्या नावडीचा रविवार माझ्या आवडीचा ..२.. घेऊन तोफ़ा आणि तलवारी इतिहास येतो बुधवारी इतिहास माझ्या नावडीचा रविवार माझ्या आवडीचा ..३..
|
Riddhi
| |
| Thursday, July 12, 2007 - 5:13 pm: |
|
|
आभारी आहे मन्जुद मी हे गाणे कधीचेच शोधत होते
|
Riddhi
| |
| Sunday, July 22, 2007 - 5:22 pm: |
|
|
मला आनन्द या जीवनाचा सुगन्धापरी दरवळावा हे गाणे हवे आहे
|
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठावरी ओघळावा झिजुनी स्वतः चंदनाने दुसर्यास मधुगंध द्यावा हे जाणता जीवनाचा आरंभ तो ओळखावा मागे मी अंताक्षरीवर विचारले तेव्हा एवढेच मिळाले होते. 'झिजुनी स्वतः...' हे कडवे बहुतेक मनीने ( Manee ) सांगितले होते. माझ्या आठवणीप्रमाणे, फार पूर्वी दूरदर्शनवर शुक्रवारी संध्याकाळी लागणार्या 'संघर्ष' या मालिकेचे हे शीर्षकगीत होते.
|
Deemdu
| |
| Wednesday, July 25, 2007 - 5:12 am: |
|
|
एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन आली गिर्हाईके छान छान आली गिर्हाईके छान छान छान छान एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन मनी ने आणले पैसे नवे म्हणाली शेटजी उंदीर हवे मनी ने आणले पैसे नवे म्हणाली शेटजी उंदीर हवे छान छान छान एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन अस्वल आले नाचवीत पाय म्हणाले मधाचा भाव काय अस्वल आले नाचवीत पाय म्हणाले मधाचा भाव काय छान छान छान एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन कोल्ह्याने मागीतला गुळाचा रवा आणि म्हणाला मांडून ठेवा माकड म्हणाले लावुन गंध आता झालय दुकान बंद छान छान छान एका माकडाने काढलय दुकाऽऽऽन
|
अरे... अचानक बालगीतांचा (आणि इतरही बर्याच गाण्यांचा) खजिनाच सापडला! ईथे... http://www.ideasnext.com/marathimusic/Baal%20Geete-Top%2015/Ravivar%20Mazya%20Awadicha.htm
|
Manjud
| |
| Friday, July 27, 2007 - 10:57 am: |
|
|
दिमडू, धन्स. बरेच दिवस शोधत होते.
|
(चाल: गोरी गोरी पान, फुलासारखी छान) नवा नवा छान, मी फ्रॉक घालणार दादा, तुला मी राखी बांधणार थाट माट रांगोळीचा चंदनाचा पाट ताट चांदीचे रे, नारळाचा भात गोड गोड करंज्याही मीच वाढणार सुवर्णाच्या निरंजनात लाविते रे वात ओवाळीन भाऊराया होई औक्षवंत हात देई हाता दादा नाही सोडणार भरजरी किनारीखाली गुलाबाचे फुल राखीवर शोभे दादा जरतारी झूल तुझ्यासाठी दादा स्वारी आता हसणार
|
Swara
| |
| Sunday, September 16, 2007 - 3:23 am: |
|
|
pat15m67 आजच ह्या वर आले. तुम्हाला हवे असलेले गाणे (कविता) माझी आई म्हणते. मला पण खूप आवडत ते: बघ आई आकाशात सूर्य हा आला| पांघरून अंगावरी भरजरी शेला|| नीळ्या त्याच्या महालाला खांब सोनेरी| मोतीयांच्या लावियेल्या आत झालरी|| केशराचे घातलेले सडे भूवरी| त्यावरून येई त्याची डौलाने स्वारी|| डोंगराच्या आडून हा डोकावे हळू| गुलाबाची फूले आणि लागे ऊधळू|| नभातून सोनियाच्या ओती तो राशी| गुदगुल्या करी कश्या कळ्या फुलांसी|| पाखरांच्या संगे याची सोबत छान्| गाती बघ कशी याला गोड गायन्|| मंद वारा जागवीतो सार्या जगाला| म्हणतसे ऊठा ऊठा मित्र हा आला||
|
Jagu
| |
| Thursday, October 11, 2007 - 8:02 am: |
|
|
आई व्हावी माझी मुलगी, मी व्हावी आईची आई हे गाण कोणाला येत का?
|
Pat15m67
| |
| Tuesday, November 13, 2007 - 5:00 pm: |
|
|
खूप खूप आभार स्वरा खरं तर ह्या गाण्याची मी आशाच सोडुन दिली होती.
|
Varshasana
| |
| Wednesday, December 12, 2007 - 10:21 am: |
|
|
Hi Jagu, Check out this link http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/421.htm
|