Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 04, 2006

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज गणेशोत्सव » हितगुज गणेशोत्सव २००६ » STY » गद्य STY: कभी हात्तिच्या ना कहना » Archive through September 04, 2006 « Previous Next »

Deepanjali
Tuesday, August 29, 2006 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, Right!
माझ्या post मधले अभिषेक चे dialog सोडून द्या :-)
बाकी अभिषेक ची खबरी 362436 ने ' कभी हत्तिच्या ना कहना ' गाणे गायल्या बद्दल तिचा पुतळा झालाच आहे !


Deepstambh
Wednesday, August 30, 2006 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खबरी 362436 ने ९८ पूर्णांक ९९ अंशावरील FM च्या रेडीओखुर्चीवर लागलेल्या ' कभी हत्तिच्या ना कहना' गाण्यावर खंजिरी घेउन belly dance केला होता.. त्यामुळे ती वाचली..

तसेच अभिषेकने 'हात्तिच्या हातीच्या हत्तिच्या' असे तीनवेळा म्हटल्याने तो ही वाचला. एकचवेळ 'हात्तिच्या' म्हटला असता तर त्याची धडगत नव्हती..


Kiran
Thursday, August 31, 2006 - 1:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाडी रुळावरुन घसरतेय असे वाटतेय

Zakki
Thursday, August 31, 2006 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण जरा (!) गोंधळल्यासारखे झाले आहे. आता जरा महत्वाच्या गोष्टींचा सारांश लिहा.
दोन्ही राज्यात एकच नियम आहे का? कुठल्या तरी राज्यात तो नियम नाही असे लिहीले होते ना?
तीनदा 'हात्तिच्या' म्हंटल्यावर काही होत नाही हा नियम कधी झाला?


धन्यवाद.


Asami
Thursday, August 31, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन्ही राज्यात तोच नियम अहे आणी एकदा बोला नाहितर हजारदा, पुतळा तर बनणारच.

आत्ता ह्या BB चेच पहा ना. DS तीनदा बोलला आणि BB पुतळ्यासारखा बंद पडलाय :-)


Lalu
Thursday, August 31, 2006 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BB चा मोबाईल तुझ्याकडे आहे काय?

Kedarjoshi
Thursday, August 31, 2006 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाडी पुढे का सरकत नाहीये?

हा घ्या SMS मी आताच cingular ला request करुन अमिताभ ऋषींना SMS पाठवायला सांगीतले. सर्व जन परत हात्तीच्या म्हणे पर्यंत माणसं झाली आहेत.


Gajanandesai
Thursday, August 31, 2006 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमिताभऋषी तपाकरता निबीड अरण्यात गेलेत त्यामुळे नेटवर्क मिळत नाहीय बहुदा!
अप्सरा अप्सरा!
:o)

Mandarnk
Thursday, August 31, 2006 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"प्रीती अभीषेक ला एवढ्या रात्री भेटायला आली होती" ही बातमी शारुख ला ताबडतोब कळवण्यासाठी राणी ने मोबाईल घेतला आणी ती शारुख ला sms लिहू लागली. पण लगेच तिच्या लक्षात आलं... तिचा मोबाईल झाला होता जुना, आणी त्यात २५ characters पेक्षा जास्त characters एका sms मधे टाईप करताच यायची नाहीत!
मग तीनी लॅपटाॅप घेतला, आणी शारुख ला एक मोऽऽऽऽऽऽऽऽठ्ठं email लिहीलं. वर त्याला २५ characters मधे मावेल असा sms पण केला, की त्यानी त्याचे email account अर्जंट चेक करावे!
आता एवढ्या रात्री अर्जंट email आणी तो ही राणीचा....शारुख चं मन अनेक कल्पनांनी मोहरुन गेलं! विजयनगर downtown मधे त्यांनी (चोरुन) एकत्र घालवलेले क्षण त्याच्या डोळ्यापुढे झरझर तरळुन गेले. घाईघाईने त्याने लॅपटाॅप चालू केला....... आणी पहातो तर काय.... राणीच्या मेसेज ऐवजी दुसराच मेसेज तिथे चमकत होता: "No wireless network found!" संतापाने त्याचे डोळे लालबुंद झाले. "या router च्या पण अगदी नको तेव्हा अंगात येतं....." तो स्व:तावरच चरफडला, पण काही उपाय शोधणं भाग होतं. बर, router ची कंपनी पण इतकी भिक्कार, की technical assistance साठी साधा १-८०० नंबर नाही!
काय कराव याचा विचार करण्यात आणखी काही वेळ गेला, आणी बसल्या-बसल्या त्याची नजर समोरच्या बाथरुम कडे वळली. बस्स, होउ नये ते झालं आणी राणीची आठवण जाउन तिची जागा दुसर्या एका कटू आठवणीने घेतली!
३ वर्षांपुर्वीची गोष्ट... असंच wireless network तेव्हा डाउन झालं होतं, आणी शारुख ला एक महत्वाचं काम होत. तेव्हा त्याला अचानक आठवलं की आपल्या बाथरुम च्या खिडकीतुन समोर Days Inn ची बिल्डींग दिसते, तेव्हा कदाचित त्यांचा सिग्नल आपल्याला मिळू शकेल. म्हणून तो लॅपटाॅप घेउन बाथरुम मधे गेला, आणी स्क्रीन कडे आशेने पाहु लागला. काही सेकंदातच त्याला हवा असलेला मेसेज तिथे चमकु लागला: " One or more wireless networks found in range! " त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही, आणी त्या भरात त्यानी टुण्णकन उडी मारली, पण..........................
उडी मारुन त्याचा पाय पडला तो नेमका लक्स च्या वडी वर! आता लक्स हा जरी हिरोईन नी वापरायचा साबण असला, तरी शारुख त्याला एकमेव अपवाद होता! गुलाबाच्या पाकळ्या पसरवुन लक्स लावत टब मधे डुंबायला त्याला आवडायचं, पण त्याच लक्स नी घोळ केला. त्याचा पाय लक्स वरुन सटकला, आणी तो जोरदार आपटला. त्या अपघातात त्याचा एक पाय अधू झाला, तो कायमचाच!
ही आठवण आल्यामुळे या वेळी Days Inn वाल्यांच net वापरायचा विचार त्याच्या मनाला शिवला देखील नाही, आणी तो दुसरे काय करता येईल याचा विचार करत बसला!


Mandarnk
Thursday, August 31, 2006 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, आयुष्यात पहील्यांदाच काही लिहील, खुप मजा आली! शाळेत निबंध लिहीण्याची आठवण झाली.
कृपया बोअर केलं असेल तर माफ करा



Maitreyee
Thursday, August 31, 2006 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इकडे अभिषेक प्रीतीला पाहून चमकला!
' प्रीती तुम??'
' नही कोई और!'असे म्हणून प्रीती ने एक दात विचकणारा स्माईली टाकला:-O
'अरे अस काय एकाच स्युचेशन मधे आपण दोघे ना! अशा वेळी आपल्याला मैत्री करणे भाग आहे अभिषेक!' प्रीती म्हणाली.

' चलो एक दुसरे का दर्द बाटते है' असे अभिषेक पण म्हणाला.
मग काम धन्दा न करणारा अधू, तोतरा शारूख कसा आपल्याला नकोसा झालाय हे प्रीती ने डोळ्यात पाणी आणून सांगितले.
तसे अभिषेक ने पण बोरिन्ग, सारखे रडणार्या राणीबरोबर जगणे अशक्य असल्याचे सांगितले!
दोघांनी ठरवलं आता या दोघांकडून पिच्छा सुटण्याचा एकच मार्ग, ते म्हणजे या दोन लूजर्स ना लवकरात लवकर एकत्र आणणे! त्यासाठी कुणाची बरं मदत घ्यावी? विचार करता करता प्रीतीला अचानक एक नाव आठवले! 'करण! येस्स करण!!'
करणसिंग जोहर या शारूख च्या दरबारातील विदुषक (आणि शारूखचा चमचा) त्याची मदत घ्यावी असे ठरले. पण आता अडचण अशी होती की करणसिंगाची राजा शारूख वर इतकी प्राणान्तिक निष्ठा होती की प्रीती काय राणी काय कोणतीच राणी शारूख जवळ आलेली त्याला आवडायचे नाही! मग आता कसं करायचं? असे ते दोघे चिन्ता करत असतानाच..
कडकड विजा चमकल्या आणि अहो आश्चर्यम! दोघांचे दुःख ऐकून तिथे अमिताभ ऋषी खुद्द प्रकटले!
म्हणाले 'तुम्ही दोघे माझे लाडके आहात! तुम्हाला मदत मी च करेन. काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला तुमचे नवरा आणि बायको (अनुक्रमे) नकोयत एवढाच ना? हात्तिच्या!' (ब्याग्राउंड ला हात्तिच्या हात्तिच्या चे प्रतिध्वनी आणि प्रत्येक ध्वनी बरोबर एकेकाच्या चेहर्‍याचे उभे आडवे तिरके क्लोज उप्स!!..



Kiran
Friday, September 01, 2006 - 1:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे म्हणजे अगदी त्या सलोनीच्या serial मधला शेवटचा पार्ट बघितल्यासरखा वाटला :-) आधी काय झालय (काय काय झालय) ते आता ताण देउनही किंवा वाचुनही आठवत नाहीये. असो. आहे तसेच घोडे दामटायचे पुढे!!

Kiran
Friday, September 01, 2006 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कडकड विजा चमकल्या आणि अहो आश्चर्यम! दोघांचे दुःख ऐकून तिथे अमिताभ ऋषी खुद्द प्रकटले!
म्हणाले 'तुम्ही दोघे माझे लाडके आहात! तुम्हाला मदत मी च करेन. काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला तुमचे नवरा आणि बायको (अनुक्रमे) नकोयत एवढाच ना? हात्तिच्या!' (ब्याग्राउंड ला हात्तिच्या हात्तिच्या चे प्रतिध्वनी आणि प्रत्येक ध्वनी बरोबर एकेकाच्या चेहर्याचे उभे आडवे तिरके क्लोज उप्स!!..

पहिली १० मिनिटे खाऊन झाल्यावर Commercial break!!
तिरके वाकडे कमेरे फ़िरवून झाल्यावर अभिषेक आणि प्रीती पहतात तो काय? अमिताभ ऋषींचा पुतळा त्यांच्या समोर उभा

प्रीती आणि अभिषेक दोघेही दचकतात. आता काय करायचे? अभिषेक र्‍ऋषींकडचा mobile काढून घेतो आणि त्यावरून पुन्हा त्यांनाच SMS करायचा प्रयत्न करतो. पण हाय रे दैवा

मेसेज येतो. source and recepient cannot be same. Enter recepient number again and retry . अभिषेक validation routine लिहिणार्या programmer च्या नावाने बोंब ठोकतो.

ईतक्यात प्रीती त्याला सांगते अरे त्यापेक्शा तू असे का नाही करत?
(त्याच्या कानात) गपाळ पिकाळ टिपीक टू वेका फ़िका मटका धू (म्हणजे कसेट fast fwd केल्यावर कसा आवाज येइल तस आअवाज)

अभिषेकचा चेहरा आनंदाने खुलतो! आणि म्हणतो, अरे हे तर माझ्या लक्शातच नाही आले!

एकदम नाचू लागतो..

व्वा! तूच माझी प्रीती
प्रेमाची गोड नीती

शारुखला पाजु भांग
आणि राणीला टांग



Aaftaab
Friday, September 01, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतक्यात अभिषेकला एक कल्पना सुचली.. जर अमिताभ ऋषीच पुतळा झाले तर त्यांचा शाप काय कपाळ काम करेल? त्याने हळूच 'हात्तिच्या' म्हणून पाहिले.. काहीच झाले नाही.. मग मत्र त्याने शाहरुखला फोन करून त्याच्या आन्सरिन्ग मशीनवर मनमुराद हात्तिच्या हात्तिच्या म्हणून मेसेज ठेवला.. तोही वेगवेगळ्या आवाजात.. ! आणि अमिताभ ऋषींना पुन्हा पुतळामुक्त करायचे ह्या गडबडीत विसरूनच गेला..

इकडे शाहरुखला सुचत नव्हते की आता ईमेल चेक कसे करायचे.. तो आपल्या दालनातून मदतीच्या शोधात बाहेर जातच होता, तेवढ्यात वाटेतच त्याची आणि करणसिंगची टक्कर झाली....
शा: अरे क क क क करण... तु इथे क क क कसा?
क: अरे शाहरुख डियर मी आहे ना... मला सुचलेल्या एका नव्या कहाणीची स्टोरी तुला सांगायला येत होते, आय मीन, येत होतो, .. एनीवे तुला माहिताय ना मला काय म्हणायचं आहे ते..?
शा: क क क क
क: कळलं, कळलं.... मला कळलं की तुला माझी कहाणीची स्टोरी ऐकायची आहे ते.. आणि गंम्मत म्हणजे या कहाणीला आम्ही तिघे मिळून नाव देणार आहोत..
शा: तिघे को को को....?
क: मी, आपली केकताकुमारी आणि काकेश कोशन भैय्या..
असे म्हणून करणसिंग त्याला त्याची कहाणीची स्टोरी सान्गू लागला, तेवढ्यात.............!!!


Deepanjali
Saturday, September 02, 2006 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतक्यात एक भूकंपा सारखा हदरा बसला आणि आणि क्षणार्धात छप्पर फ़ुटून एक पुतळा अमिताभ गुरुच्या मांडीवर येउन पडला !
तो पुतळा होता नुकत्याच पुतळा झालेल्या नतकी 362426 चा !
अचानक झालेल्या भूकंपाने आणि या पुतळ्याच्या अचानक पडल्याने करण आणि शारुख बेसुध्द पडले !
भूकंप होण्याचे कारणही तसेच होते !
अमिताभ गुरुंचा पुतळा झाल्याने इथे विचित्र सेन च्या गुहेतले सगळे कैदी अचानक सजीव झाले होते , त्यात " तो " देखणा पुतळाही सजीव झाला .
इतर कैदी सुचित्रसेन च्या नेतृत्त्वा खाली गुहेतून बाहेर पडण्या साठी सगळे गुहेच्या दारं खिडक्या भींती सगळे काही फ़ोडू लागले होते .
पण नर्तकि 362436 चे मात्र फ़क्त डोळेच सजीव झाले आणि बाकी सर्व शरीर पुतळाच राहून ती अमिताभ च्या मांडीवर येउन पडली होती .
तिकडे विचित्र सेन ला मात्र या कशाचीही खबर नव्हती , शारुख करण च्या साडे तीन तासाच्या बकवास कथा ऐकत असणार याची खात्री असल्याने विचित्र सेन प्रीतीवर line मारायला शारुख च्या महालात गेला .
पण अचानक भूकंपाचा सौम्य धक्क्याने तो पण बेशुध्द पडला .
इथे गुहेतले सगळे पुतळे सुटले होते , विचित्र सेनाच्या अन्यायाचा निषेध म्हणून सगळे क्रांति झाल्या सारखे विचित्र सेन च्या महालाची तोडफ़ोड करत झुंडेनी प्रत्त्येक दालन लुटत पुढे चालले होते , यात सुचित्रसेन सर्वात आघाडीवर होता !
पण या दंग्यात सामील नव्हता फ़क्त एकच तरुण ..... तोच सर्वात देखणा " तो " जो इतके दिवस भींती शेजारी पुतळा बनून राहिला होता तो !...... तोच नर्तकि 362436 चा खास आवडता !!!
सगळे कैदी विचित्रसेन च्या महाला बाहेर पडले , अर्थात " तो " देखणाही बाहेर पडला !
इतर संतप्त जमावानी विचित्रसेन च्या अख्या महालाला आग लावली !
हे पाहून " तो ' देखणा फ़क्त मंद हसला आणि आपली पावले शारुख च्या महाला कडे वळवून तो चालु लागला !
साडे सहा फ़ूट उंचीचा " तो " जिथे विचित्रसेन बेशुध्द पडला होता तिथे अला !
विचित्रसेन ला पाहून पुन्हा एकदा तो मंद हसला आणि अता त्याची पावले वळली शारुख आणि करण च्या रंगमंच दालना कडे .
तिथे नुकताच शुध्दीवर आलेला करण शारुख ला एका लफ़डेबाज कहाणीच्या निमित्ताने राणीला पटकावायच्या tips देत होता .
" त्या " तरुणाने ते ऐकले आणि पुन्हा एकदा समाधानाने हसला आणि महाला बाहेर पडला .
आपल्या उंच पायांनी झपा झपा चालत " तो " वियजनगर च्या वेशी पाशी आला , बाजुलाच वसलेल्या संजयनगरच्या हद्देकडेही त्यानी डोळे भरून पाहिले आणि " तो " कडकडून हसला ..
" हे संजयनगार और विशालनगर के वासीयो , आज से मुघल साम्राज्य मे गुलामी करनेकी तैय्यारी करो , अब यहां किसीका राज्य होगा तो सिर्फ़ मेरा .. इस ' जलालुद्दीन लोदि ' का .. और उसके बाद मेरे साथ लाखो मुघल आपके राज्य को अपना ' सल्तनत - ए - मुघल ' बना देंगी !
येही वक्त है हमला बोलनेका !
संजयनगर और विजयनगर के राजा तो पडोसी होने के कारन हमेशा झगडेंगे और उपरसे कभी उलझते है एक दुसरेकी बिवी हासील करनेकी चक्कर मे तो कभी उस बेवकूफ़ करण सिंग विदूषक कि कहानिया सुननेमे ...
उस सेनापती विचित्रसेन का ध्यान भी है शारुख कि प्रीती को हासील करनेमे और अपने भाई सुचित्रसेन से झगडनेमे .
राज्य कि तरफ़ तो किसीका ध्यान ही नही है !
लोहा गरम है , हाथोडा मारनेका समय आ गया है .... मुघल साम्राज्य का सूरज आज ही चमकेगा ..
हमने हमला बोल दिया है ..
रानी , प्रीती तैय्यारी कर लो मेरी बेगम बननेकी या फ़िर ' जोहार ' मे शहिद होनेकि "!
असे म्हणत जलालुद्दिन लोदी क्रुर हसला आणि बघता बघता त्याच्या अफ़गाणी सेनेने ' अल्ला हू अकबर ' च्या आरोळ्या देत संजयनगर आणि विजयनगर वर हल्ला चढवला ..!






Deepstambh
Monday, September 04, 2006 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय नगर - राजा शारुख - पत्नी प्रिती - सेनापती विचित्रसेन (खलनायक) - प्रधान अमरसेन (मित्रपक्ष)
संजय नगर - राजा अभिषेक - पत्नी राणी


तर अशा रितीने किस किस की शादी मे जलालुद्दीन लोदी ही क्स्टार प्लस वरील केकता कपुरची सिरीयल बघुन शारुख उठला.. त्याला हि सिरीयल भयानक आवाडायची.. का तर म्हणे त्यात खूपवेळा 'क' हा शब्द यायचा.. मग शारुखही 'क क क' करत बसायचा..

त्यात एक पुतळा जलालुद्दीन लोदी काय होतो.. राज्यावर हल्ला काय चढवतो.. सारेच सही..

इथे अमिताभऋषी पुतळा झाल्याने दोन्ही राज्यांवरील 'हात्तिच्या' शाप आपोआपच संपुष्टात येतो.. अमिताभऋषींनी जिवंत समाधी घेतली असे शारुख आणि अभिषेक संयुक्त निवेदन काढुन घोषीत करतात आणि पुण्यनगरीच्या मावळ संस्थानातील एका टेकडीवर त्यांचे मंदीर इभे करतात.. अमिताभऋषी स्वप्नात येऊन त्यांना सांगतात की एकविसाव्या शतकात मुंबापुरी आणि पुण्यनगरीला जोडणारा एक द्रुतगती महामार्ग माझ्या मंदिराजवळुन जाईल.. तेव्हा या मार्गाने जाणार्‍या सर्व भक्तांना माझ्या मंदीराचे दर्शन घेता येईल..

सीन कट्.. कॅमेरा मुंबापुरीच्या एका नृत्यालयात येऊन थबकतो.. आत मंजुळ संगीत सुरु असते.. सुर आसुर सुरईतुन मदिरा पीत आहेत.. असे एक चित्र भिंतीवर असते..

विचित्रसेनने कपट करुन शारुख आणि अभिषेक एकाच समयी या नृत्यालयात असतील असा कट रचलेला असतो.. तो हातात गजरा घालुन मदिरेच्या बुधल्यात लपून बसतो..

इतक्यात क्लोज अप.. एका अतिसुंदर यौवन असलेल्या युवतीच्या चेहर्‍यावर.. तिची काया अतिशय कमनीय असते..

दाल मे कुछ काला है याचा अंदाज येऊन शारुख व अभिषेक दोघेही तिथे वेषांतर करुन येतात..

ते बघतात.. अरे ही तर 'मिस विजयसंजयनगर ११४२' ईश्वरी रायसुंदर!!!

ईश्वरीच्या पापण्या हळुहळू वर जातात आणि तिचे सुंदर निळे डोळे दृष्टीस पडतात.. इतक्यात तबल्याचा ध्वनी घुमू लागतो.. ना धी धि ना.. ना धी धि ना

..गजरा रेऽऽऽऽऽऽ!

गजरा रेऽऽ.. गजरा रेऽऽ..
याची किंमत किती सांग ना?
गजरा रे.. गजरा रे..
याची किंमत किती सांग ना?

नाही नाऽऽ जा नाही नाऽऽ
मला विकायचा तो नाही ना...


गाण्याचा रंग चढत जातो.. शारुख आणि अभिषेक दोघेही ईश्वरीसोबत बेधुंद नाचु लागतात.. इथे विचित्रसेन बुधल्यात डबा धरुन बसलेलाच असतो.. जास्त उशीर झालाच तर केवळ वेळप्रसंगी कामाला येईल म्हणुन..




Psg
Monday, September 04, 2006 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विचित्रसेन बुधल्यात डबा धरुन..
डबा का दबा रे!
दीप, आज सुटला आहेस! :-)


Deepanjali
Monday, September 04, 2006 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपक ,
संयोजकांच्या पहिल्याच post मधे आहे कि त्या वेळी internet, mobile, computer सोडून कुठल्याहे गोष्टीचा शोध लागला नव्हता .
त्यामुळे टी व्ही वर स्टार प्लस वरची सिरीयल कशी असेल ?
आणि हे पण लिहिलय संयोजकांनी कि कथेचा कुठलाही भाग स्वप्नात वगैरे चालु नाहीये , त्यामुळे आधीच्या post मधला जलालुद्दीन चा हल्ला किंवा पुतळा सजीव होणे हे serial चा episode म्हणून खपवता येइल का ?


Deepstambh
Monday, September 04, 2006 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोहा गरम है , हाथोडा मारनेका समय आ गया है असे जलालुद्दीनने म्हणताच संजयनगर आणि विजयनगरमधील शेकडो लोहार आणि माथाडी कामगार हातात हाथोडा घेऊन जलालुद्दीनच्या दिशेने धावुन आले..

त्यातच अफगाणी सेनेला टक्कर देण्यासाठी चरबी समुद्राच्या किनार्‍यावरील महानराष्ट्रातुन नऊ निरमा - आण सेना, शू सेना, ऍंग्री सेना, बीम सेना अशा अनेक सेना आपाअपले डिजायनर सैनिकी पोशाख घालून... 'हरऽऽ हरऽऽ महादेवऽऽऽऽ' च्या गर्जना करीत त्या शेकडो लोहार आणि माथाडी कामगारांच्या मदतीला उडुन आल्या... प्रत्येक सैनिकाकडे त्याचे खाजगी पुष्पक विमान होते.. ते ही बयोडीजेल वर चालणारे..

अफगाणी सेनेतले कोणी समोर येऊन 'अल्ला हू अकबर' म्हणाले की माथाडी कामगार त्याला 'अकबर का बिरबल.. अकबर का बिरबल' असे म्हणुन गुदगुल्या करायचे.. त्याचे कारण असे की अफगाणी सेनेतल्या प्रत्येकाला हृद्यविकाराचा त्रास होता..

तर अशारितीने अफगाणी सेनेला खाता भूईमुग थोडी झाली.. ते कसेबसे खुष्कीच्या मार्गे परत गेले.. जलालुद्दीनला हा awe and struck धक्का सहन झाला नाही. त्याचा हाडामांसाचा पुतळा झाला.

इथे शारुख 1 GB ADSL Broadband वर 'पावणेसात फेरे' मालीका बघण्यात गुंग होता. तर अभिषेक त्याच्या लेटेस्ट 3G mobile वर streaming 'कहानी गर गर की' पहात फणसाचे गरे खात होता..

इथे विचित्रसेन बेशुद्ध पडुन कोमात गेला होता.. वैद्यांनी निदान केले की एकविसाव्या शतकात मुन्नाभाई MBBS नामक कोणी भोंदू वैद्य त्याला जादुकी पप्पी देईल तेव्हाच तो शुद्धीवर येईल. अशारितीने शारुखची दुसरी काळजीही मिटली. वर सांगीतल्याप्रमाणे अमिताभऋषींनी जिवंत समाधी घेतली होतीच..

संजय आणि विजयनगर राज्यांची चिंता कोणालाच नव्हती.. सगळ्या रस्त्यांवर खड्डे पडेल होते.. फास्ट फुड खाऊन प्रजा जाड होत होती.. कचराकुंडीत कचरा तुंबला होता.. रिक्षावाले मनमानी करत होते.. लोड शेडींग सुरु होते.. स्वकीय आपआपसात ऑनलाईन भांडत होते.. एक ना दोन (ना तीन ना चार..).

आता प्रजेने ठरवले की आपल्या दोन्ही राज्यांचे विलिनीकरण हाच यावर एक तरुण उपाय आहे. अशावेळी एका राज्याचा राजकुमार आणि दुसर्‍या राज्याची राजकुमारी यांचे लग्न लावुन दिले की काम भागत असे.. पण आपले राजे bachelor नाहीत ना.. निदान Bachelor of Science किंवा Bachelor of Arts असते तर ते पण नाही.. दोघेही ठरले स्कुल ड्रॉपआऊट.. आता??


Sanyojak
Monday, September 04, 2006 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नियमाप्रमाणे आधीच्या पोस्ट मधे जे काही घडले त्याला अनुसरूनच पुढचा भाग लिहिणे अपेक्षित आहे. त्यामुले आधीचा एपिसोड 'स्वप्न होता ' किन्वा 'हे सर्व TV वर चालू होते' असे म्हणून 'कॅन्सल' करणे योग्य ठरणार नाही..
बाकी चालू द्या.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators