DJ ने घेतलेल्या मेहनतीचा मान ठेऊन मी तिच्या कथेचा धागा पुढे खेचला आहे..
|
Eliza
| |
| Monday, September 04, 2006 - 7:40 pm: |
| 
|
विजय संजय नगरात आयटम बाला आणि आयटम साँग चे वाढते खूळ बघून दोन्ही राज्यातील जागरूक (अर्थात आगाऊ) महीला सत्याग्रह स्पेशल मेधावती पाटणकरांच्या मदतीने ह्या सगळ्या आयटमांवर बंदी आणतात. तसेच टीव्ही वर फ़क्त समाज सुधारक आणि माहीती पूर्ण कार्यक्रम दाखवावेत असं त्या दोन्ही राज्याच्या राजांतर्फ़े वदवून घेतात. लोधीचे challenge दोन्ही राजे मिळून अमरीक नगर देशाच्या सेनेला त्यांच्या दांडग्या मुस्लीमे सेनेविरुधच्या अनुभवामेळे outsource कारयचे ठरवतात. अमरीक नगर सुधा ह्या संधीचे स्वागतच करते. 'मऊकपडे' क्षेत्रात संजय आणि विजय नगरेने प्रचंड प्रगती केली होती. ह्या राज्यातले अनेक होतकरू तरूण अमरीक नगरात कामाला होते पण अमरीक नगराने नाही तिथे नाक खुपसून नको त्या देशांमध्ये युद्ध करून विजय आणि संजय नगरचे देणे थकवले होते. एकूण काय, हे युद्ध अमरीक नगर विना शुक्ल लढणार होते. लोधीचा परस्पर सोक्ष मोक्ष लावल्या मुळे शारुख आणि अभिषेक आता त्यांच्या आती महत्वाच्या समस्येकडे म्हणजेच त्यांच्या love life कडे लक्ष द्यायला मोकळे झाले.
|
अरे t.v. serial वगैरे बनायला आधी camera, motion pictures चा वगैरे शोध नको का लागायला ? 
|
आज आणि उद्या असे दोनच दिवस राहिले... आता गाडी बुंगाट सोडा सगळ्यांनी (शक्यतो रुळावरून!)... उद्या काहीही करून गोष्टीचा शेवट करायलाच हवा हे लक्षात असू द्या... (म्हणजे आता जरा शेवटाच्या दिशेने न्या गाडी!)
|
त्या सिरियल्स वेब कॅमेरा वापरुन शूट केल्या होत्या आणि youtube.com, metacafe.com, yahoo vidoes इत्यादी चॅनेलवर प्रक्षेपित केल्या गेल्या.. DJ .. आत्ताच NDTV वर Online TV सबंशी बातमी पाहिली.. काही Net TV .. http://wwitv.com/ http://www.beelinetv.com/ http://www.onlinetvplayer.com/
|
आज कथेचा शेवट करायला हवा... कोणी volunteer तयार आहे का शेवट करायला?
|
Prajaktad
| |
| Wednesday, September 06, 2006 - 7:25 pm: |
| 
|
इथे कुणी " हात्तिच्या " म्हणल आणी सगळ्यांचेच पुतळे झाले वाटत!! sty पुढे सरकलेच नाही की!!.. पण शेवट तर करुन टाका कुणितरी
|
Deepanjali
| |
| Wednesday, September 06, 2006 - 9:58 pm: |
| 
|
इकडे राजा शारुख आणि राजा अभिषेक जलालुद्दिन चे संकट टळल्यानी पुन्हा एकदा निश्चिंत होउन दुसर्याच्या राण्या पळवण्याच्या विचारात मग्न झाले ! पण यावेळी शारुख चा सल्लागार अमरसेन मात्र चिंतेत पडला होता ! राजांच्या भांडणापायी अशा परकीय स्वार्यांचे वारंवार हल्ले होउ लागले तर राज खजिना रिकामा होयला वेळ लागणार नाही हे त्याने ओळखले होते ! तिथे अमरिक नगराचा गोरापान राजा ' झुडपेश्वर ' विजयनगर आणि संजय नगरची लढाई इतक्या लवकर संपल्याने हताश झाला होता . नुकतेच त्याला राजा ' मुद्दाम घुसेन ' च्या हल्ल्यातही निराशा पदरी पडली होती ! अता संजय आणि विजय नगराच्या लढाईवरच त्याच्या राज्याचे भविष्य ठरणार होते ! दोन्ही राज्यातल्या अचानक पसरलेल्या शांततेने त्याचे सिंहासन डोलायला लागले होते . त्याच्या राज्यातल्या तलवार कारखान्यात आणि त्याचे लाढाउ रथ बनवणारे कंपनी ' खोइंग ' यात मंदी आली कि असेच त्याचे सिंहासन डोलायला लागायचे . गेले काही दिवस संजय आणि विजय नगरात चाललेला पुतळा धुमाकुळ आणि राजांची एका मेकांच्या बायकांना मिळवण्या साठीची चढाओढ पाहून झुडपेश्वर ने संधी साधली होती आणि त्या साठी खास अफ़गाण चा जलालुद्दीन लोदी out source करून त्याला अगदी हवा तसा घडवण्यात झुडपेश्वर यशस्वी झाला होता ! पण मग अचानक पणे विचित्रसेन च्या गुहेत झालेला त्याचा पुतळा पाहून अमरिक नगर निराश झाले होते . अमिताभ गुरुंचा पुतळा झाल्याने जलालुद्दिन ने हल्ला केला खरा पण त्याचा इतक्या लवकर सोक्ष मोक्ष लागेल याची झुडपेश्वर ला कल्पना नव्हती .. थोडक्यात अता पुढे काय हा मोठ्ठा प्रश्न अमरिकनगर कडे होता . अमरिक नगर ला एक नंबरचे नगर बनण्या साठी इतर नगरां मधे लढाया घडवणे अति गरजेचे होते .. अता काय करणार .. झुडपेश्वर ला एक युक्ति सुचली ... अमिताभ गुरुंच्या मांडीवर पडलेल्या अफ़गाणी नर्तकिचा जुना प्रेमी ' समा - हय - सुहाना ' हा अतिशय डोकेबाज अतिरेकी होता . त्याला outsource करायची कल्पना झुडपेश्वर्च्या डोक्यात आली . मग काय वार्याच्या गतिने अफ़गाण मधे संदेश गेला आणि समा - हय - सुहाना झुडपेश्वर समोर हजर झाला . समा हय सुहाना त्याच्या प्रेमिकेचा पुतळा झाल्याने पेटून उठला आणि त्याला जवाबदार अशा विजय आणि संजय नगरावर हल्ला करण्या साठी आपली फ़ौज घेउन निघाला . पुन्हा एकदा ' अल्ल हू अकबर ' चे नारे ऐकून नुकतेच शांतीने झोपलेले सैनिक खडबडून जागे झाले . संजय आणि विजय नगरच्या सेना एकामेकांना भिडल्या , युध्दासाठी त्वरित ' खोइंग ' कंपनीची लढाउ घोडे आणि तलवारी अमरिक नगराने पुरवल्या ! शारुख आणि अभिषेक दोघे एक होउन या वेळी समा च्या सेनेला भिडले . अमरसेन नी शारुख ला सल्ला दिला " शक्ति पेक्षा युक्ति श्रेष्ठ , समा हय सुहाना ' ला सांगा त्याची प्रेयसी अजुन जीवंत आहे पण ती हवी असेल तर इथून हत्त्यार खाली टाका आणि अमरिकनगराच्या झुडप्यालाच खतम करून या !" समा हय ने हत्त्यर खाली टाकले आणि आणि तो झुडपेश्वर नेच पुरवलेली युध्दसमुग्री घेउन अमरैक नगरीकडे निघाला . तिथे झुडपेश्वर महाराज बेसावध होते . समा - हय - सुहाना आपल्यावरच हल्ला करेल असे त्याच्या स्वप्नातही नव्हते ! समा च्या सेनेने झुडप्याच्या सेनेवर हल्ला चढवला आणि बेसवध झुडप्याला खतम केले . त्याच क्षणी इथे अमिताभ ऋषि आणि नर्तकिचा पुतळा एकदम जीवंत झाले ! अमिताभ गुरु जीवंत पाहून सगळे घाबरले .. ' हत्तिच्या ' शाप पुन्हा येणार म्हणून सगळीकडे शोक पसरला ! इतक्यात समा हय तिथे लढाई जिंकून अमरिकनगर चा खातमा करून अला आणि म्हणाला " झुडपेश्वर खतम .. अनंद उत्सव साजरा करा ... हत्तीच्या पाठीवरून साखर वाटा .." आणि समा चा पुतळा झाला .. पाठीवरून साखर वाटा हे आपलं त्याच्या मनातच राहून गेलं .. अमिताभ गुरु हसले , म्हणले " आज तुम्ही शाप मुक्त झालात . समा हय सुहाना आणि झुडप्श्वर नी माजवलेला आतंक जेंव्हा संपेल आणि संजय विजय नगरची लफ़डेबाज जनता जेंव्हा लफ़डे विसरून क्षत्रिय धर्माला जागेल तेंव्हा हा शाप संपेल हे सत्त्य होतेच पण अजुन एक कमगिरी बाकी आहे .. राजा शारुख आणि राजा अभिषेक यांनी राजे पदाचा त्याग करायचा आणि आपापल्या राण्यांना घेउन कायमचे करण सिंगच्या सर्कशीतल्या ' माकड ' विभागात उड्या मारत रहायचे ... आहे कबुल ? तरच शाप पूर्ण पणे मुक्त होईल .." शारुख - प्रीती - राणी - अभिषेक नी मुकाट्यानी माना डोलावल्या आणि ते माकडांच्यात आनंदाने राहू लागले ! अमिताभ गुरुने हुषार अमरसेन ला राजा केले आणि संजय नगर विजय नगर एकत्र करून एकच ' संविधान नगर ' बनवले . तसेच राज्यातील लोकां कडच्या मोबाईल सुविधा आणि मोबाईल नेटवर्क च बरखास्त करून टाकले . त्यामुळे संविधान नगरातील जनता फ़ालतु timepass सोडून कामाला लागाली आणि शांतिने नांदू लागली ! युगे लोटली पण आजही शारुख प्रीती अभिषेक राणी निरनिराळ्या रूपाने करण सिंग च्या सर्कशीत माकड उड्या मारतात आणि तेंव्हा न जमलेल्या लफ़ड्यांची कसर माकड नाट्यां मधे भाग घेउन भरून काढतात !! .......................................... समाप्त .
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, September 06, 2006 - 10:48 pm: |
| 
|
सही DJ मस्त शेवट केलास.
|
Maitreyee
| |
| Wednesday, September 06, 2006 - 10:52 pm: |
| 
|
युगे लोटली पण आजही शारुख प्रीती अभिषेक राणी निरनिराळ्या रूपाने करण सिंग च्या सर्कशीत माकड उड्या मारतात आणि तेंव्हा न जमलेल्या लफ़ड्यांची कसर माकड नाट्यां मधे भाग घेउन भरून काढतात !!
धन्य आहे कल्पना
|
Hawa_hawai
| |
| Thursday, September 07, 2006 - 12:39 am: |
| 
|
DJ ... .. .. ..
|
Asami
| |
| Thursday, September 07, 2006 - 12:59 am: |
| 
|
DJ धन्यवाद ग. शेवटचे वाक्य कहर आहे
|
Eliza
| |
| Thursday, September 07, 2006 - 2:49 am: |
| 
|
सही गं सही, DJ 
|
Mandarnk
| |
| Thursday, September 07, 2006 - 3:24 am: |
| 
|
सॉलीड शेवट केला हा एकदम, धमाल आली! आता पुढच्या वर्षी गणेशोत्सव मधे याचा सिक्वल का रिमेक???
|
Milya
| |
| Thursday, September 07, 2006 - 1:01 pm: |
| 
|
ही ही ही डीजे सहीच शेवटचे वाक्य आणि मोहब्बत आउर sms बिन बुलाये मेहमान है >>> 
|
Prajaktad
| |
| Thursday, September 07, 2006 - 7:35 pm: |
| 
|
dj सुसुत्र शेवटाबद्द्ल थांकु शेवटच वाक्य... daamm good and true
|