|
Sanyojak
| |
| Sunday, August 27, 2006 - 12:44 am: |
| 
|
कभी 'हात्त्तिच्या' ना कहेना ही गोष्ट आहे 1142 सालची किंवा कदाचित 1412 ही असेल. Exact साल आता आठवत नाही, आठवायची गरजही नाही. ऐंशी तिथे पंचऐंशी! तर हे जे का खूप खूप वर्षांपूर्वीचं साल होतं, त्या साली विजयनगर नावाचं एक साम्राज्य होतं. त्या राज्याचा शारूख नावाचा एक राजा होता. आता हे तुम्हाला फारसं पटणार बिटणार नाही पण विजयनगर त्याकाळी फार म्हणजे फार पुढारलेलं होतं. म्हणजे इतकं पुढारलेलं की कॉंप्युटर, इंटरनेट, गूगल, ईमेल, ऑर्कूट, मोबाईल फोन, एसेमेस इ इ गोष्टींचे शोध तिथे ऑलरेडी लागलेले होते. आणि तिथली जनता या सगळ्या दळण वळणाच्या साधनांचा यथेच्छ वापरही करत होती. अर्थात इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कॉम्प्यूटर, इंटरनेट आणि मोबाईल सोडलं तर बाकीच्या कुठल्याच आधुनिक गोष्टींचा शोध तिथे लागला नव्हता. म्हणजे वाहतुकीसाठी घोडे, शस्त्र म्हणून तलवारी - बाण, कपडे म्हणून अंगरखे इ इ गोष्टीच लोक वापरायचे. (म्हणजे लोक घोड्यावर टांग मारून एका म्यानात तलवार आणि दुसर्या म्यानात मोबाईल घेऊन जायचे इ) तर तुम्हाला ही बॅग्राउंड सांगून झाल्यावर मी थेट कथेलाच हात घालतो. या विजयनगरचा शारूख हा सम्राट होता हे वर मी सांगितलंच. शारूखला तशा दोन चार राण्या ऑलरेडी होत्या. त्या राण्यांमध्ये प्रीती नावाची त्याची एक पट्टराणी होती. पण इतकं सगळं असून त्याचा डोळा मात्र शेजारच्याच संजयनगरच्या राजाच्या, अभिषेकच्या राणी 'राणी' वर होता. या राणीची आणि शारूखची भेट पहिल्यांदा ऑर्कूटवर झाली होती. मागे कधीतरी एकदा दुपारच्या मनसोक्त भोजना नंतर विलासकक्षात जायच्या ऐवजी शारूख इंटरनेटकक्षात येऊन बसला होता. सहजच ऑर्कूटवर फेरफटका मारत असता असता त्याला राणीचं प्रोफाईल दिसलं होतं. तिचे एकूणात असलेले fans, testimonies इ इ पाहून शारूख फारच impress झाला होता. मग त्यानं तिला scrap टाकलं, मग तिनं त्याल... असं करत करत त्यांची मैत्री जमली होती. मग दोस्ती कब प्यार मै बदल गयी उनको पताही नहि चला इ इ... आता शारूखची अवस्था अशी होती की त्याला राणी हवीच होती. अर्थात त्या बर्याच अडचणीही होत्या. म्हणजे प्रीती आणि अभिषेकचं काय करायचं, दोन राज्यांचं काय करायचं, लोग क्या कहेंगे इ इ . आणि हां एक महत्वाचं सांगायचं राहिलं. विजयनगर आणि संजयनगर या दोन्ही साम्राज्यात रहाणार्या माणसांना एक शाप होता. मागेच कुण्या अमिताभऋषीनी कशानेतरी संतापून जाऊन तो शाप दिलेला होता. शाप असा की कुठल्याही माणसानी कधीही 'हात्तिच्या' (पक्षी: हात तिच्या) हा शब्द उच्चारला की तो माणूस आहे त्या ठिकाणी पुतळा होऊन उभा राह्यचा. अर्थात या शापाला एक उश्शापही होता. तो पुतळा पुन्हा सजीव व्हायचा असेल तर पुतळा झालेल्या व्यक्तीच्या मोबाईलवरून अमिताभऋषींना एक SMS करावा लागायचा. असा SMS केला की तो पुतळा परत सजीव बनायचा. (मात्र तो SMS त्या पुतळा झालेल्या व्यक्तीच्या मालकीच्या मोबाईलवरूनच करणं गरजेचं!) . अर्थातच या शापामुळे सर्वसामान्य जनतेचं आयुष्य फार म्हणजे फार जिकीरीचं झालं होतं.... कोणीही कुठेही सहज म्हणून 'हात्तीच्या' म्हणलं की झालाच त्याचा पुतळा! शारूखच्या समोर म्हणजे खरंतर दोन समस्या होत्या. एकतर त्याला काहीही करून राणी (अभिषेकवाली) मिळवायचीच होती आणि त्याला आपलं राज्य टोटली शापमुक्तही करायचं होतं. या दोन्हीसाठी नक्की काय करावं लागेल यावर खूप खूप खलबतं का काय ते करूनही त्याला काहीच सोल्यूशन मिळत नव्हतं. अजूनही एक प्रॉब्लेम शारूखच्या आयुष्यात येऊ घातला होता, ज्याची शारूखला फारशी कल्पना नव्हती... त्या प्रॉब्लेमचं नाव होतं शारूखचा सेनापती विचित्रसेन... या विचित्रसेनचा एक डोळा विजयनगरच्या साम्राज्यावर होता, तर एक डोळा प्रीती राणीवरही (शारूखची पट्टराणी) होता! हे दोन्ही हस्तगत करण्यासाठी विचित्रसेनच्या खूफिया कारवाया सुरू होत्या... एके दिवशी शारूख आपले (माहित असलेले) दोन्ही प्रॉब्लेम आपला अत्यंत विश्वासू प्रधान अमरसेन याच्याशी डिस्कस करत होता. अमरसेनला काहीतरी खल्लास आयडिया सुचली आणि अमर म्हणाला ' हात्तिच्या, एवढंच ना..' आणि अमरचा जागच्या जागी पुतळा बनला! नियमः 1.ही गोष्ट व यातला कोणताही भाग कोणाच्याही स्वप्नामधे सुरू नाही. उगाचच 'xyz' ला जाग आली आणि लक्षात आलं की हे सगळं स्वप्नं होतं असं किंवा या स्वरूपाचं काही पोस्ट करून रसभंग करू नये! 2.यात सुरुवातीला सांगितलेली सर्व पात्रं शेवटपर्यंत जिवंतच ठेवावीत धपाधप पात्रं मारत बसू नयेत. 3.आपला भाग पोस्ट करताना आधीपर्यंत काय पोस्ट झालेलं आहे हे पाहुन त्याला अनुसरुनच पुढील पोस्ट करावे. आपल्या पोस्ट ने गोष्ट शक्यतो पुढे सरकत आहे किंवा काही value addition होते आहे याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. 4.जर काही मोठे पोस्ट करणार असाल तर कृपया इतरांना त्याची पूर्वकल्पना द्यावी म्हणजे तुमचे आणि इतरांचे प्रयत्न वाया जाणार नाहीत.
|
सही आहे concept कोणी लिहिलाय हा episode ? राहुल फाटक कि मिल्या ? 
|
Lalu
| |
| Sunday, August 27, 2006 - 8:16 pm: |
| 
|
आरं तिच्या sss ... !!! आपल्या विश्वासू प्रधानाचा दगड झालेला पाहून शारुखच्या तोंडून सहजच उद्गार फुटतात! तसे सहजच म्हणायचे कारण त्याने मुद्दाम सवयच लावून घेतलेली असते. चुकून ते 'हात्तिच्या' तोंडात आलं तर काय घ्या! पण उपाय माहित असल्याने लगेचच त्याने अमरसेनचे म्यान चाचपायला सुरवात केली. (तलवार असलेले नव्हे, दुसरे! ). हवी ती वस्तू हाती लागल्यावर त्याचा चेहरा खुलला. त्याने प्रधानाच्या म्यान्यातून मोबाईल बाहेर काढला आणि अमिताभऋषींना sms केला. ....थोडा वेळ गेला काहीच घडलं नाही! शारुख राजानं पुन्हा ट्राय केला. .... निष्फळ! अरे हे काय चाललंय काय? हे सोल्यूशन आत्तापर्यन्त तर चालत होतं मग आता काय झाल..?!!
हात् (जीभ चावून) .... आरं तिच्या!! शारुखच्या एकदम लक्षात येते. तो मोबाईल तर शारुखचाच असतो. विश्वासू प्रधान आणि मित्र म्हणून शारुखनेच अमरसेनला तो मोबाईल वापरायला दिलेला असतो. तो अमरसेनच्या मालकीचा नसतोय काय! आता काय करावं? शारुख विचारात पडतो. याच्या मालकीचा एखादा फोन असेल का दुसरा? पण फुकटचा फोन असल्यावर हा पठ्ठ्या कशाला स्वतःच्या मालकीचा फोन घेईल..? पण अमरसेनसारख्या हुशार प्रधानाला तरी स्वतःचा मोबाईल असण्याचं महत्व माहित असणारच.. शोध केला पाहिजे... तिकडे अमिताभऋषी sms पाहून दचकतात! तसं त्याना हे नेहमीचंच झालेलं असतं. sms यायचं कारण एकच. पण शारुखच्या मोबाईलवरुन sms म्हणजे त्यांच्या मनात विचार येतो, शारुख..... राजा शारुख... पुतळा झालाय....?!!
|
Maitreyee
| |
| Monday, August 28, 2006 - 12:55 am: |
| 
|
सही आहे DJ , लिहिलय की, prasad_shir ची आहे कल्पना.
|
Bee
| |
| Monday, August 28, 2006 - 3:53 am: |
| 
|
काय हे पात्रांना मारायच नाही, स्वप्न बघायचं नाही.. इतके जड नियम.. हात्तिच्या.. :०)
|
बुचकळ्यात पडलेले ऋषीवर्य, डोळे मिटून गूगल-स्तोत्र पुटपुटतात. क्षणात त्यांच्या मोबाईलची घंटी वाजते. घोर उपासतापास आणि वृद्धापकाळाने कृश झालेली आपली बोटे चामड्याच्या म्यानात घालून ते मोबाईल पुन्हा बाहेर काढतात आणि त्याच्या स्क्रीनवर आपले नेत्र केंद्रीत करतात. घटकाभरापूर्वी ज्यावरून सलग दोन sms आले तो मोबाईल शारूखचा असून तो अमरसेनला ऑफिशियल वापराकरता देण्यात आलाय याचे आकलन झाल्यावर, त्या मोबाईलवरून sms आला आहे याचा अर्थ अमरसेनचा पुतळा झालाय हे चटकन त्यांच्या लक्षात येते. "हन्त हन्त!" शारूखचा विश्वासू प्रधान दगडच राहिला तर सम्राट शारूखची अवस्था काय होईल अशी कल्पना केल्यावर त्यांना क्षणभर आपल्याच शापाचा (पुन्हा एकदा) राग आला. शेवटी थोडा विचार करून ते निर्णय घेतात... ... अमरसेनच्या शरीरात हळूहळू चेतना येऊ लागते. आणि पाठोपाठ त्याच्या मोबाईलची रिंग वाजते. अधीरतेने शारूख sms उघडून वाचू लागतो.. "हा मोबाईल तात्पुरता का होईना पण अमरसेनच्या मालकीचा होता म्हणून त्याला जिवंत करण्यात येत आहे........ परंतु!! (भयचकित होऊन शारूख मोबाईलसहीत दोन्ही हात छातीवर घट्ट धरून, ओठ आवळून आकाशाकडे पाहतो. नंतर खाली बघून sms पुढे वाचू लागतो) या मोबाईलची बॅटरी चार्ज न करता जेवढा वेळ चालेल तोपर्यंतच अमरसेन जिवंत राहील. तत्पूर्वी त्याच्या मालकीच्या मोबाईलवरून मला sms आला नाही तर तो पूर्ववत निश्चल पुतळा होऊन पडेल!" शारूख झपकन inbox बंद करतो आणि बॅटरी बघतो.
|
बॅटरीची एकच दांडी शिल्लक होती.. याने विटीदांडूपण नाही खेळू शककककत.. शारुख मनात म्हणाला.. (तो मनातपण हकलायचा.. हा एक शाप होता पण याची गोष्ट नंतर कधीतरी..) त्याने पटापट त्याचा वरमांडी ( laptop ) सुरु केला.. तो वाय-फाय ने नेट ला कनेक्ट झाला आणि त्याने ई-बाई.कॉम ओपन केली.. मोबाईल सेक्शनमध्ये अनेक कंपनीचे फोन्स उपलब्ध होते.. जसे की श्याम-सांग, नवख्या, खोटाबोला, पन्नासोणीका, सोहनी-ए-रिक्क्षा-आण, नायट्रोजन.. इत्यादीओते.. त्याने पटकन नवख्याचा न-मालीका'७८६ सिलेक्ट केला आणि अमरसेनला दख्खन परगण्यातल्या मोबाईल वर्ल्ड मध्ये पाठवले... तिथे त्याला एकतर ई-बाई.कॉम पेक्षा स्वस्तात फोन मिळाला.. आणि लगेचही मिळाला.. तसेच त्याचा जूना फोनही दुकानदाराने एक्स्चेंज मध्ये घेतला.. त्याने लगेच अमिताभऋषीला समस करुन आधी स्वःताची सुटका करुन घेतली.. आणि खड्डे पडलेल्या रस्त्यातुन त्याचा रथ राजवाड्याकडे भरधाव हाकला... आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे.. त्याचे असं आहे की अमरसेनचा रथ जमीनीपासुन ६ इंच वर राहुन हवेशी बाते करायचा.. इथे शारुख महाद्वारात त्याची वाटच पहात होता.. अमरसेन म्हणाला, 'महाराज तुम्हाला कसं कळलं मी आलो ते..??' शारुख म्हणाला, 'अरे कालच मी सर्व रथांवर GIS बसवुन घेतली होती.. महालात बसुन मी तुझा रथ ट्रॅक करत होतो.. असो.. तू लवकर मला उपाय सांग पाहू'
|
Psg
| |
| Monday, August 28, 2006 - 10:18 am: |
| 
|
अमरसेननी उत्साहानी सुरुवात केली.. "महाराज, तुम्हाला अशी नामी आयडीया देतो की बास.. तुम्हाला ही आयडीया पसंत पडली तर मला तुमचा हा मोबाईल भेट म्हणून पाहिजे हं" शारूखनी त्याच्या मागणीकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केल आणि म्हणला "तू आयडीया तर सांग ना, मग मोबाईलच काय, वरमांडी देईन.. नॉव शूट.." "महाराज, सोप्पं आहे.. आपण संजयनगरवर स्वारी करायची आणि अभिषेकला युध्दकैदी करून, त्याच्या मुसक्या बांधून त्याला आपल्या तळघरात डांबून ठेवायचं.. त्यांचे सेनापती मी आधीच आपल्याकडे फ़िरवून घेतो, म्हणजे आपल्याला जास्त लढाई करायला लागायची नाही.. नवरा युध्दकैदी आहे म्हणल्यावर 'राणी' नक्कीच त्याच्या सुटकेची भीक मागेल तुमच्याकडे. तसच अमिताभऋषी आणि अभिषेकचीही जवळीक आहे असं ऐकीवात आहे..ते त्याला मुलासारखं समजतात.. तेही त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करतील.. असं झालं की आपण दोन अटी ठेवायच्या.. राणी तुमची पट्टराणी बनली पाहिजे आणि ऋषींनी 'त्या शब्दाच्या' जाचातून आपली सुटका केली पाहिजे.." "ते सगळं ठीक आहे, पण मग त्या अभिषेकच काय करायचं? त्याला तसच सोडून दिलं तर तो पुन्हा राणीच्या मागे येईल ना.." "त्यालाही तोड आहे महाराज.. पण अभय असेल तर सांगीन" "सांग तू सांग रे, घाबरू नकोस.." "महाराज, राणी तुमची पट्टराणी झाली की प्रीतीराणी तश्या एकट्याच पडतील, आणि अभिषेकही एकटाच असेल.. तेव्हा.." अमरसेन सूचक हसला.. शारूखचे डोळे चमकायला लागले.. "अमरसेन, मला तुझा अभिमान वाटतो! काय अफ़लातून आयडीया काढली आहेस. हा घे तुला कंठा भेट.." "पण तो मोबाईल हवा होता महाराज.." "हावरटपणा करू नकोस, आत्ताच तुला नवा कोरा मोबाईल घेतला ना मी... आता मिशन संपली की पुढच्या मागण्यांचा विचार करीन..तोवर हे प्रीपेड कार्ड घे, छोटं बक्षीस.." इतकं बोलून शारूख त्याच्या विश्रामकक्षात गेला आणि अमरसेनही त्याच्या महालाकडे निघाला. महाराजांना कल्पना पसंत पडली होती.. he had consolidated his position ! अमरसेन खुश होता.. पण कोणीच पाहिलं नाही की त्याचवेळी एक काळी आकृतीही शारूखच्या महालातून बाहेर पडली आणि विचित्रसेनच्या महालाकडे चालू लागली..
|
पूनम.. सही.. तसेच कथा लिहित असताना मध्येच कोणी येऊ नये म्हणुन आपली position consolidate करायची तुझी आयडीयाही भन्नाट आवडली.. मला वाटतं पद्य STY वरही ही आयडीया चालु शकेल..
|
Shraddhak
| |
| Monday, August 28, 2006 - 11:34 am: |
| 
|
आधीच अमावस्येची अंधारी रात्र आणि नखशिखांत काळे कपडे... त्यामुळे काळी आकृती चार पाचदा तरी धडपडली आणि एक दोनदा तर तिचा बुरखा सरकून तिचा चेहरा दिसता दिसता राहिला. विचित्रसेनाच्या महालापाशी पोचून त्या आकृतीने खिशातून एक जीर्ण पिवळट कागद काढला आणि त्यावरचा नकाशा बारकाईने बघितला. " लोक गूगल अर्थपर्यंत पोचले न् हे अजून पिवळ्या कागदावरचेच नकाशे वापरायला लावतायत.... " असे त्रासिकपणे पुटपुटत त्या आकृतीने महालाच्या बागेत उभ्या असलेल्या एका पुतळ्याशी शेकहॅंड केला आणि अचानक बागेतले एक गुप्त दार उघडले गेले. ह्या दरवाज्यातून जाणारी वाट थेट विचित्रसेनाच्या महालातल्या अतिगुप्त चर्चा कक्षात निघत होती. आकृतीने दरवाज्यापाशी पोचून दारावर तीनदा उजव्या हातातल्या हिर्याच्या अंगठीने टकटक केले आणि कक्षात प्रवेश केला. समोर विचित्रसेन आपल्या मोबाईलवर काहीतरी बघण्यात गुंग झाला होता. " नवीन MMS आलाय वाटतं? " आकृतीने विचारले तसा विचित्रसेन एकदम दचकला. त्याने दचकून वर बघितले. विचित्रसेनाचे पाळण्यातले नाव चित्रसेन होते. कारण तो दिसायला अतिशय handsome होता. पण एक डोळा विजयनगर आणि एक डोळा प्रीतीराणीवर ठेवल्यामुळे त्याला चकणेपण प्राप्त झाले होते. आधीचे त्याचे सुंदर रूप आठवणार्यांना त्याचे असले डोळे बघणे विचित्र वाटे, म्हणून त्याचे नाव विचित्रसेन झाले होते. " काळी आकृती का? ये बैस, बैस. नंबर काय? " " मी काळी आकृती नं १११. हे बघा माझं बक्कल. " आकृतीने आपल्या गळ्यातले सोन्याचे बक्कल दाखवले. त्यावर १११ चा आकडा लिहिलेला होता. " आता रात्रीचे साडेबारा झालेत. मला झोपही आलेली आहे. तेव्हा काय तो अपडेट लौकर दे. " मग सेकंदाचाही वेळ न घालवता आकृतीने अमरसेन आणि शारुखचे बोलणे जसेच्या तसे (in fact हुबेहूब त्यांच्याच आवाजात) ऐकवले. ( काळ्या आकृतीने हे आवाज इतके हुबेहूब काढले की टेपरेकॉर्डरचाही शोध लागला की काय ही शंका विचित्रसेनाला आली. तसंच, बोलण्यामध्ये एकदा शारुखचा मोबाईल वाजला होता, ती ट्यूनदेखील आकृतीने टिपली होती.) " आयला, हा तर सगळ्यात लेटेस्ट रिंगटोन आहे ना रे? मी एवढं नेटवर शोध शोध शोधलं तरी माझ्याकडे अजून आला नाही हा रिंगटोन अन या शारुखने मिळवलादेखील... " " पाहिजे तर हा रिंगटोन मी तुम्हाला बारा तासांच्या आत forward करीन पण आपल्या discussion चा विषय तो नाही. " " मला माहीत आहे रे... बाकी तू आणलेली माहिती शंभर टक्के खरी आहे का? " " एकशे एक टक्के. खोटी निघाली तर १११ बक्कल नंबर नाही लावणार. जी हवी ती सजा द्या. " " अरे हो, सजेवरनं बरं आठवलं. गेल्या वेळी तू विचारलं होतं नाही का, की मला फ़सवणार्या व्यक्तीला मी काय सजा देतो? चल दाखवतो. " विचित्रसेन आकृतीला एका वेगळ्या अंधार्या वाटेने एका भुयारातून एका अंधार्या दालनात घेऊन गेला. तिथे अनेक पुतळे उभे केलेले होते. " कुणाला शिक्षा द्यायची झाली की त्याला इथं आतमध्ये सोडून देतो आणि दार लावून घेतो. दाराच्या मागे काय लिहिलंय वाच. " दाराच्या मागे लिहिले होते, ' दरवाजा उघडण्यासाठी कृपया खालील प्रश्नाचे उत्तर द्या - हत्तीण कोणाला म्हणतात? आकृतीने विचित्रसेनाकडे जराशा हताश नजरेने बघितले. आकृतीला विचित्रसेनाच्या आयक्यूबद्दल शंका येत असल्याचे स्पष्ट दिसत होते. दार लावून विचित्रसेन आणि आकृती पुढली खलबते करायला निघून गेले. इकडे या दालनात एक पुतळा अचानक हलला आणि त्या दालनाच्या एका भिंतीकडे चालू लागला.
|
Sanyojak
| |
| Monday, August 28, 2006 - 11:53 am: |
| 
|
मंडळी छान चालले आहे. प्रत्येक जण रुमाल टाकून आपली जागा बळकट करत आहे पण तसे करताना फार वेळ सुद्धा घालवू नका कारण इतर अनेक जण खुरमांडी घालून बाहेर तिष्ठत उभे आहेत. तेव्हा येवूद्या पटापट. गणपती बाप्पा मोरया!!
|
Asami
| |
| Monday, August 28, 2006 - 2:46 pm: |
| 
|
हत्तीण कोणाला म्हणतात ? just too good
|
वा श्रद्धा.. जबरदस्त.. आणि 'हत्तीण कोणाला म्हणतात' वरुन तू कल्पनेची जबरदस्त भरारी घेतली आहेस.. याचे उत्तर फक्त मराठी भाषा सोडुन दुसर्या भाषेत दिलं तरच.. नाहितर..
|
Lalu
| |
| Monday, August 28, 2006 - 7:15 pm: |
| 
|
अरे वा! श्र, आणि आता DJ का? हत्तिच्या!! छान. DP फोन कंपन्यांची नावे मस्त आहेत!
|
पुतळ्यां च्या कोठडीत एक सुंदर कमनीय अशी बुरखाधारी अकृति उगीचच पुतळ्या सारखी निर्जिव उभी रहायची आणि कोणी नसताना एका कोपर्यातल्या पुतळ्याकडे जाउन तासन तास रडायची ! त्या अंधार्या कोठडीतली भीषण शांताता त्या अकृतिच्या पैजणांनी आणि गोड गाण्यानी भंग झाली !! " किसी पत्थर कि मूरत से मुहब्बत का इरादा है " हे गाणं गुणगुणत ती भींतीशी उभ्या असलेल्या " त्या " पुतळ्याकडे चालु लागली !! " तो " पुतळा होताच खास .. त्याचे ते भव्य कपाळ , सरळ नाक , त्याचे ते गहिरे डोळे , खांद्या पर्यंत रुळणारे घुंगराले केस .. उंच , भरदार छातीचा , पिळदार हातांचा " तो " अगदी ग्रीक योध्दा शोभेल असा रेखीव होता ! अकृति त्या पुतळ्या पाशी आली आणि तिने त्या दगडी पुतळ्याला घट्ट मिठी मारून ती रडू लागली . " उफ़ ये मेरी किस्मत .. कनिज को मुहब्बत होनी थी तो इस पत्थर कि बूत से ! हम तो यह भी नही जानते के ये बूत है किसका . लेकिन तू जो भी है , मेरे सपनोंका शेहेजादा बस तूही है .. तूही है .. तूही है ! ( यी तिनही " तू ही है " ला वीज कडाडून पुतळ्यावर प्रकाश पडला !) या प्रकाशात ती आकृति पुतळ्या भोवती नाचू लागली ." पत्थर के सनम तूझे हमने मुहब्बत मे खुदा माना पत्थर के सनम .." इतक्यात त्या अकृतिचा मोबाईल किणकिणायला लागला .. या अल्लाह !.. महाराज अभिषेक का sms! तिने स्वत्:चा लटके झटके dance थांबवून आधी तो message उघाडला ! " कनीज 362436, विचित्रसेन च्या महालातले काही updates? Report करायला लवकरात लवकर राजमहालात ये " हे वाचून कनीज ला दरदरून घाम फ़ुटला ! अभिषेक राजाला कनीज 362436 ही अमिताभ गुरुंनी दिलेली भेट होती ! खास अफ़गाणिस्थानातून मागवलं होतं म्हणे तिला . अभिषेक महाराजांना ती त्यांच्या एके काळची प्रेमिका ' ऐश्वर्या ' ची आठवण करून द्यायची , म्हणून विशेष प्रिय होती ! आपल्या मादक सौंदर्याने आणि त्या काळी दुर्मिळ अशा Belly Dancing च्या कलेने विचित्रसेन च्या सेनेतील फ़ूट पाडायला म्हणून तिला कमगिरीवर पाठवलं होतं . पण इथे झालं भलतच ... कनीज 352436 या अंधार्या गुहेतील एका देखण्या पुतळ्यावर जाम फ़िदा झाली होती . तो पुतळा मूळचा कोण , कुठला हे कनीज ला काही माहित नव्ह्तं . पण अमिताभ गुरु नेहेमी म्हणायचे , " मुहब्बत और sms बिन बुलाई मेहेमान है कभी भी आजा सकते है " त्यामुळे तिने अभिषेक राजाचे काम सोडून फ़क्त एकच काम केले होते , ते म्हणजे या पुतळ्याचा मोबाईल फोन शोधणे .. पण अता अभिषेक महाराजांना काय update द्यायचे .. 362436 ने पुतळ्याला पुन्हा एकदा मीठी मारली आणि ती अभिषेक कडे जायला निघाली .. दारापाशी लिहिलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्या शिवाय बाहेर जाता येत नाही तिला माहितच होते , तिने उत्तर दिले , गणपती बप्पाला ज्या प्राण्याचे डोके शंकराने शोधून आणले त्या प्राणी जातीतील मादीला हत्तीण म्हणतात !" दार उघडले आणि 362436 आपला रथ गुप्त मार्गाने काढून अभिषेक कडे गेली ! अभिषेक वाट च पहात होता पण 352436 ने काहीही updates आणले नव्हते , तिने बुरखा काढला , आपले belly dancing चे आवडते निळे टिकल्यांची blouse आणि low waist निळ्या टिकल्यांचा चंदेरी घोळदार पयजामा घातला . पोटावर एक छोटसा निळा टॅटू काढला , डोळ्यात सूरमा घातला आणि dress ला matching अशी silver blue अशी shaded eye shadow लावून ती पुतळ्याच्या आठवणीत खंजिरी घेउन belly dance करु लागली ! तुम को भी है खबर मुझको भी है पता होगया है तेरा पत्थर का पुतळा पुतळा बनके भी अपने मोबाईल को pocket मे रखना कभी ' हत्तिच्या ' ना कहना . अभिषेक ने तिने सुरईतून आणलेली दारू प्यायली आणि सात मजली हसला " हा हा हा , माझ्या राज्यात लोक कितीही वेळा म्हणू शकतात हात्तिच्या हातीच्या हत्तिच्या !!! लेकिन शारुख तू .... कभी हत्तिच्या ना कहना
|
काय ग deeps बिचार्या अभिषेकला असा रोल.
|
Devdattag
| |
| Tuesday, August 29, 2006 - 6:17 am: |
| 
|
इथे विचित्रसेनाच्या त्या कोठडीत अजून एक पूतळा हालचाल करायला लागतो. तो पूतळा असतो विचित्रसेनाचा भाऊ सुचित्रसेन ह्याचा. सुचित्रसेन हा विचित्रसेनाचा लहान भाऊ, त्या दोघांच एकमेकांशी अजिबात पटत नसतं याची अनेक कारणं होती त्यातलं एक म्हणजे विचित्रसेनाचं राणी राणीवर फिदा असणं सुचित्रसेनाला पटत नव्हतं. सुचित्रसेन हा तसा सरळमार्गी मनुष्य कुणाच्या अध्यात नाही ना मध्यात नाही. आपण भले आणि आपली खाणावळ भली. हो, सुचित्रसेन एक खाणावळ चालवायचा, त्या खाणावळीत त्याने संजयनगरातले काही प्रसिद्ध पदार्थ ठेवायला सुरवात केली होती तसंच त्याने आपल्या खानावळीचे रुपांतर एका डान्सबार मध्ये केले होते. हे सगळं विचित्रसेनाला पटत नव्हतं. तसा त्याचा डान्सबारला विरोध नव्हता पण त्यामुळे त्याच्या दासींची सख्या दिवसागणिक कमी होत होती. अरे एक सांगायचं राहिलंच की ह्या सुचित्रसेनाची एक मुलगी मैत्रीणही होती तिचं नाव 'संजिवनी कुमारी'. तर जेंव्हापासून सुचित्रसेन पुतळा बनतो तेंव्हापासून ह्या संजिवनी कुमारीच्या जगण्याचे एकच ध्येय असते ते म्हणजे सुचित्रसेनाला परत सजीव करणे. तिला संशय असतोच की विचित्रसेनानेच आपल्या प्रियकराला पुतळा केले आहे. मग ती विचित्रसेनाच्या काळी आकृती ब्रिगेड मध्ये समाविष्थ होते. तिला नंबर मिळतो १११. आता सुज्ञ प्रेक्षकांच्या लक्षात आलेच असेल की सुचित्रसेन सजीव कसा झाला ते. नाही?? परत दोन एपिसोड मागे.. विचित्रसेन आकृतीला एका वेगळ्या अंधार्या वाटेने एका भुयारातून एका अंधार्या दालनात घेऊन गेला. तिथे अनेक पुतळे उभे केलेले होते. " कुणाला शिक्षा द्यायची झाली की त्याला इथं आतमध्ये सोडून देतो आणि दार लावून घेतो. दाराच्या मागे काय लिहिलंय वाच. " दाराच्या मागे लिहिले होते, ' दरवाजा उघडण्यासाठी कृपया खालील प्रश्नाचे उत्तर द्या - हत्तीण कोणाला म्हणतात? विचित्रसेन मग विजयी मुद्रेने सं. कु. कडे डोळे करतो. विचित्रसेन चकणा असल्या कारणाने स्वत:चे हे गुपीत बाहेर येऊ नये म्हणून तो ज्याच्याशी बोलायचे आहे त्याच्याकडे डोळे करून दुसरीकडेच बघत असे ही गोष्ट सं. कु. ला माहित असते. या क्षणाचा फायदा घेऊन, ती सु.से चा मोबाईल काढून आपल्या खिशात ठेवते. नंतर विचित्रसेन आणि ती त्या अंधार्या गुहेतून बाहेर येतात..
|
Shraddhak
| |
| Tuesday, August 29, 2006 - 9:42 am: |
| 
|
सुचित्रसेन सजीव तर झाला पण त्याला बाहेर पडता येईना. ( कारण तेच! प्रश्नाचे उत्तर दिले की पुन्हा पुतळा. खरं तर अभिषेकच्या खबरीने दिलेले उत्तर ऐकले असते तर अडकायची वेळ आली नसती. पण सुचित्रसेन विचित्रसेनाचाच भाऊ असल्याने दोघांचा आयक्यू प्रचंड कमी होता.) सुचित्रसेन पुन्हा संजीवनीकुमारीची वाट पाहात भिंतीला टेकून बसला. तेवढ्यात आणखी एक पुतळा हालचाल करायला लागला. सुचित्रसेनाचे लक्ष तिकडे जाताच तो चांगलाच वैतागला. " !#!@#!@#!... ह्ये जेल हाय का बगीचा.. च्या XXXX जो उठतो तो आपला हालचाल करतोय... हितं येकबी खरा पुतळा हाय का न्हाई देवालाच ठावं... कशापाई हललास रं? " " हाताला रग लागली न्हवं का माज्या? त्ये दारावर लिव्हलंय त्याचं उत्तर काय असंल म्हून इचार करीत व्हतो, न डोकं खाजवीत व्हतो हातानं. येकदम उत्तर घावलं न म्या म्हनलं... हा.. ( एकदम जीभ चावून) तुमाला कळलं आसंल म्या काय म्हनलं. तर डोस्कं खाजवन्याच्याच पोझमधे पुतळा झालो न्हवं का? हाताला रग लागली तशी टॅम्प्लीज घातलाय शापामधे. " " अरं वा असा टॅम्प्लीज घालता येतुय? म्हंजी, आजकालच्या ऋषींच्या शापामधी काय दम न्हाई म्हन की! " " तसंच म्हना राव... बरं मला पुन्ना पुतळा बनायला धा मिन्टं हायेत. वाईच पान मिळंल का? " ते दोघे आरामात पान खात आणि गप्पा छाटत आतमध्ये बसले होते तेवढ्यात दरवाज्याची किल्ली फिरवल्याचा आवाज झाला. त्यांनी चटकन उठून आपापल्या जागा घेतल्या आणि उत्सुकतेने बघत राहिले. एक सेवक एका पुतळ्याला उचलून आत घेऊन आला. थोड्या वेळापूर्वी निसटलेल्या नर्तिकेचा ( अभिषेकची खबरी) पुतळा होता तो... त्या पुतळ्याला तिथेच ठेवून सेवकाने दरवाजा बंद केला आणि ते दालन पुन्हा एकदा अंधारात आणि भयाण शांततेत बुडून गेले. .....त्या पुतळ्यांना तिथेच सोडून आपण संजयनगरला येऊयात. राणीच्या महालात इतक्या रात्रीदेखील दिवा जळत होता. राजा अभिषेक अजून महालात परतलेला नव्हता. राणीकडे राजाचे सर्वच्या सर्व म्हणजे सुमारे १३२ email accounts चेक करण्याची जबाबदारी होती आणि प्रत्येक मेलचे अपडेट तो रात्री महालात परतल्यावर राणीकडून घेत असे. या मेल्स चेक करतानाच तर राणीला नेटचा नाद लागून तिची शारुखशी ओळख झाली होती. आता रात्रीचे अडीच वाजून गेले होते. अभिषेकचा अजून पत्ता नव्हता. ' पिऊन पडला असेल मेला नृत्यागारात. ' तिच्या मनात आले. पण घाईघाईने तिने मनातले अभिषेकबद्दलचे विचार झटकून टाकले आणि शारुखबद्दल विचार करू लागली. ' काय करत असेल बरं राजा शारुख आत्ता? झोपला तर नसेलच माझ्या आठवणीने... आधीच का त्याला कमी काळज्या आहेत? प्रीतीराणी सतत त्याच्यावर ओरडत असते, राजकुमार त्याला काडीची किंमत देत नाहीत... बिचारा... ' वेळ जात नव्हता म्हणून राणी खिडकीशी येऊन उभी राहिली. दूर आकाशात प्लूटो ग्रह आणि ध्रुव तारा दिसत होता. काही तुरळक चांदण्या चमकत होत्या. तिने सहज खाली बागेत बघितले. एक गडद निळ्या रंगाच्या कपड्यांतली आकृती हळूच बागेतून एका गुप्त दाराकडे जात होती. हे दार राणीला माहीत होते, याच दाराने ती लग्नापूर्वी अभिषेकला भेटायला येत असे. तेवढ्यात त्या आकृतीचा हात हलला आणि तिच्या डाव्या हाताच्या बोटातल्या चमचमणार्या हिर्यामुळे राणीचे डोळे दिपले. हा हिरा आपण कुठे बघितला ते तिला चटकन आठवले. शारुख प्रीतीच्या engagement च्या वेळी शारुखने प्रीतीच्या बोटात..... ' प्रीती.. प्रीती राणी????????? अभिषेकला भेटायला या वेळी????? ' दुःख, वैफल्य, निराशा, क्रोध, संताप अशा भावनांनी भरलेल्या डोळ्यांनी राणीने आकाशाकडे पाहिले... दुसर्या दिवशीच्या भूर्जवृत्तपत्र ' संजयनगर समाचार ' मध्ये ठळक बातमी होती.... ' सूर्यमालायाम् नाऊ ओन्ली अष्टग्रहाः रीमेनन्ति| आताच हाती आलेल्या बातमीनुसार, कुठल्यातरी आघातामुळे प्लूटो या ग्रहाचा बहुतांश भाग निखळून कोसळला आहे. परिणामतः त्याचे ग्रह म्हणून अस्तित्व संपुष्टात आले आहे..... लोकांनी ती बातमी वाचण्यात आणि त्यावर चर्चा करण्यात इतका वेळ दवडला की त्यांचे त्याच भूर्जवृत्तपत्रातील दुसर्या एका महत्त्वाच्या बातमीकडे पूर्ण दुर्लक्ष झाले. ' राणीची विश्वासू दासी बेपत्ता| '
|
Shraddhak
| |
| Tuesday, August 29, 2006 - 10:08 am: |
| 
|
BTW DJ संजयनगरलाही हात्तिच्याचा शाप आहे गं. पहिल्याच पोस्टमध्ये लिहिलं आहे बघ.
|
Meenu
| |
| Tuesday, August 29, 2006 - 10:54 am: |
| 
|
श्र मस्त .. बरोबर गं डीजे श्र म्हणतीये ते ..
|
|
|